लोकनेते बाळासाहेब देसाई माहिती Balasaheb Desai Biography in Marathi

Balasaheb Desai Biography in Marathi – Loknete Balasaheb Desai information in Marathi लोकनेते बाळासाहेब देसाई माहिती बाळासाहेब देसाई हे महाराष्ट्र , भारतातील एक प्रख्यात राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते होते. बाळासाहेब देसाई हे महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि लोकनेते होते. बाळासाहेब देसाई यांनी गृहराज्यमंत्री, शिक्षा मंत्री आणि महाराष्ट्र राज्य सरकारमधील इतर महत्त्वपूर्ण पदे भूषवली आहेत. सुरुवातीच्या काळात बाळासाहेब देसाई महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंत्री होते. सन १९६२ मध्ये कोल्हापूर येथे स्थापन करण्यात आलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये बाळासाहेब देसाई यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. या ब्लॉगमध्ये बाळासाहेब देसाई यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

balasaheb desai biography in marathi
balasaheb desai biography in marathi

लोकनेते बाळासाहेब देसाई माहिती – Balasaheb Desai Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)बाळासाहेब देसाई
जन्म (Birthday)१० मार्च १९१० 
जन्म गाव (Birth Place)सातारा जिल्ह्यातील विहे तालुक्यातील पाटण या गावात
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते

Loknete Balasaheb Desai information in Marathi

जन्म

बाळासाहेब देसाई यांचे संपूर्ण नाव दौलतराव श्रीपतराव देसाई होतं. बाळासाहेब देसाई यांचा जन्म १० मार्च १९१० रोजी सातारा जिल्ह्यातील विहे तालुक्यातील पाटण या गावात झाला. बाळासाहेब देसाई अवघी दीड वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झालं. बाळासाहेब देसाई यांचे वडील श्रीपतराव हे अशिक्षित असल्यामुळे घरामध्ये अठराविश्व दारिद्र्य होतं. लहानपणापासूनच बाळासाहेब देसाई यांना कठीण परिस्थितीशी सामना करावा लागत होता. त्यांना त्यांचं संपूर्ण आयुष्य असंच गरिबीत व दारिद्र्यात घालवायचे नव्हतं आणि त्यासाठी त्यांनी कोल्हापूर गाठलं‌. त्यांना साहित्य, नाटक, संगीत इत्यादींची आवड होती.

सुरुवातीचे आयुष्य

घरच्या परिस्थितीकडे पाठ फिरवून बाळासाहेब देसाई कोल्हापूरमध्ये आले. तिथे त्यांना वसतिगृहात राहून शिक्षण घेता येईल असं वाटलं होतं ही नवीन उमेद घेऊन ते कोल्हापुरात आले. परंतु वसतिगृहामध्ये त्यांना प्रवेश मिळाला नाही त्यामुळे कसतरी उदरनिर्वाह करण्यासाठी बाळासाहेब देसाई यांनी दवाखान्यामध्ये झाडलोट करण्याचं काम स्वीकारलं त्यासोबतच मिळेल ते काम करून त्यांनी आपल शिक्षण सुरू केलं.

इयत्ता चौथीमध्ये असताना बाळासाहेब देसाई यांनी इंग्रजीमध्ये १५० विद्यार्थ्यांपैकी प्रथम क्रमांक पटकावला आणि त्यांच्या या हुशारीचा फायदा त्यांना निश्चितच झाला. या कारणास्तव त्यांना प्रिन्स शिवाजी वस्तीगृहात प्रवेश मिळाला यापुढे बाळासाहेब देसाई यांचे उच्च शिक्षण होईपर्यंत त्यांनी उर्वरित आयुष्य प्रिन्स शिवाजी वस्तीगृहातच घालवलं. पुढे बाळासाहेब देसाई यांनी एलएलबी ही पदवी संपादन केली. सन १९३० मध्ये बाळासाहेब देसाई यांचा विवाह करवीर पीठाचे क्षात्रजगद्ररू सदाशिव पाटील यांचे भाऊ दाजीराव यांची कन्या बानूताई यांच्याशी झाला.

कारकीर्दीची सुरुवात

बाळासाहेब देसाई यांचं एलएलबी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालं होतं. त्यांनी सन १९३७ ते १९४० या दरम्यान कराड येथे वकिली व्यवसाय सुरू केला. सन १९३९ मध्ये बाळासाहेब देसाई सातारा जिल्ह्यातील लोकल बोर्डाचे सदस्य बनले आणि त्यानंतर १९४१ ते १९५२ या दरम्यान सातारा जिल्हा लोकल बोर्डाचे ते अध्यक्ष होते. सन १९५२ मध्ये बाळासाहेब देसाई पाटण येथून विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. या कालावधीमध्ये बाळासाहेब देसाई यांनी आपली भूमिका अत्यंत अचूक पणे पूर्ण केली.

मध्यंतरी बोर्डाची आर्थिक स्थिती खालावली होती अशावेळी सरकारी मंजुरीचे अपेक्षेवर काढलेल्या पंचावन्न शाळा व ३८८ शिक्षकांचा प्रश्न बाळासाहेब देसाई यांनी हुशारीने सोडविला. या शिवाय सर्वत्र सक्तीचे प्राथमिक शिक्षण लागू करण्यासाठी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना अमलात आणणारे मुंबई प्रांतातील सातारा जिल्हा लोकल बोर्ड हे पहिलं बोर्ड ठरलं. सन १९५७ ते १९६० या दरम्यान बाळासाहेब देसाई बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री होते.

अर्थातच आपल्या कामाशी निष्ठा ठेवणारे बाळासाहेब देसाई यांनी या खात्याचा बारकाईने अभ्यास केला होता. हे पद सांभाळताना बाळासाहेब देसाई यांनी अत्यंत मोलाची कामगिरी केली. अर्थसंकल्पात रस्ते खर्चासाठी १६ कोटी मधील १४ कोटी ज्यावेळी गुजरात साठी ठेवण्यात आले आणि फक्त दोन कोटी महाराष्ट्राच्या वाट्याला आले तसेच गुजरातमधील पाटबंधारे, कालव्यांची कामे शोभिवंत फरशी बसवून करण्याचे ठरले तेव्हा त्यांनी महाराष्ट्रावर होणारा हा अन्याय जनतेसमोर मांडला.

त्यांनी अतिशय कणखरपणे पुराव्यांसह हा मुद्दा मांडला आणि अर्थातच परिणामी महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी १४ कोटी रुपये जाहीर करण्यात आले सोबतच इतर विविध योजनांवर ही खर्च करण्याचा निर्णय घेतला गेला. बाळासाहेब देसाई यांच्या नेतृत्वाखाली मुंबई-गोवा हमरस्ता, भुईबावडा, करूळ सारखे घाटांचे रस्ते, किल्ले व खेड्यांकडे जाणारे रस्ते, पूल व कालवे इत्यादी प्रकल्प पार पाडण्यात आली.

इतकच नव्हे तर कोयना धरण योजनेला आर्थिक, प्रशासकीय, मनुष्यबळ आणि इतर सर्व प्रकारची मदत मिळवून देण्यासाठी बाळासाहेब देसाई यांनी पुढाकार घेतला होता. बाळासाहेब देसाई हे महाराष्ट्र राज्याचे पहिले शिक्षणमंत्री ठरले. सन १९६० ते १९६२ या काळामध्ये बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्रामध्ये क्रांती घडवून आणणारे अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले.

शिक्षणाचं आयुष्यामध्ये फार महत्त्व असतं परंतु आर्थिक दृष्ट्या मागास मुलांना शिक्षण घेणे शक्य नव्हते म्हणून ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न बाराशे रुपयाच्या आत आहे अशा गरीब व मागासलेल्या पालकांच्या मुलांसाठी सर्व शिक्षण मोफत केलं गेलं. एक शिक्षण मंत्री म्हणून बाळासाहेब देसाई यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी केली होती. प्राथमिक व माध्यमिक शाळा खेड्यापाड्यात व तंत्रशिक्षणाच्या शाळा सर्वत्र जिल्ह्यांमध्ये सुरू केल्या.

या व्यतिरिक्त त्यांनी सैनिकी व तांत्रिक ग्रामशिक्षणास महत्व देणं योग्य ठरवलं. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेत बाळासाहेब देसाई यांचा मोलाचा वाटा होता. सन १९६२ ते १९६३ यादरम्यान कृषिमंत्री पद बाळासाहेब देसाई यांच्या हाती सोपवण्यात आलं होतं. या वेळेस कसेल त्याची जमीन या दृष्टिकोनातून त्यांनी शेतीमध्ये सुधारणा आणण्यासाठी अनेक विविध योजना राबवल्या. शेतकऱ्याला फायदा व्हावा या हेतूने त्यांनी शेतीसाठी बडींग योजना, विहीर खोदाई, पाणी उपसण्यासाठी तगाईवर इंजिन देणे, नव्या जातीच्या पिकांचे संशोधन, अन्नधान्य, कडधान्य, फळबागा व नगदी पिके वाढविणे या सर्व सोयी सुविधा व योजना राबवल्या.

जून १९६३ मध्ये बाळासाहेब देसाई यांनी कोल्हापूर येथे कृषी महाविद्यालयाची स्थापना केली. सन १९६३ ते १९६७ यादरम्यान बाळासाहेब देसाई गृहमंत्री होते. यादरम्यान त्यांनी मधुसूदन गोळीबार, औरंगाबाद स्पोर्ट या प्रकरणांमध्ये विघातक शक्तींना कठोर प्रशासन दिले. तसेच पुणे नागपूर औरंगाबाद इत्यादी जिल्ह्यांमध्ये नव्या पोलीस आयुक्तलयांची निर्मिती केली गेली.

पोलीस उपनिरीक्षक, पोलीस निवासव्यवस्था यांच्या जागा वाढवल्या. १९६७ ते १९७० मध्ये महसूल खात्याचे बाळासाहेब देसाई मंत्री होते यावेळी त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यामध्ये कूळ कायद्याची अंमलबजावणी करणे, धान्य उत्पादनाच्या विविध योजना राबवणे, जमीनधारकांना खाते पुस्तकांचे वाटप केले, आधुनिक पद्धतीने शेती, शेती शिक्षण व संशोधनावर भर घातला, कोल्हापूर मध्ये महसूल न्यायालयाची स्थापना करण्यात आली, नवा जमीन महसूल कायदा व ६०० वाड्यांचे स्वतंत्र महसुली गावांमध्ये रूपांतर केले.

बाळासाहेब देसाई यांनी अनेक पदे भूषवली. प्रशासनामध्ये दरारा व कडक शिस्त निर्माण करणारे लोक मंत्री म्हणून त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रसिद्ध होतं. ११ डिसेंबर १९६७ रोजी ज्यावेळी कोयना परिसरामध्ये भूकंप झाला त्यावेळी तिथली परिस्थिती अत्यंत नाजूक होती अशावेळी अत्यंत संयमाने बाळासाहेब देसाई यांनी योग्य ती पावले उचलली.

तेथील भूकंपग्रस्तांना मिळेल ती मदत व सहाय्य करून शासकीय मदत त्यांना मिळवून दिली. पाटण येथे बाळासाहेब देसाई यांनी विविध संस्था कार्यालय, रस्ते सहकारी, साखर कारखाना, कोयना एज्युकेशन सोसायटी, माध्यमिक शाळा व महाविद्यालय इत्यादींची उभारणी केली होती.

बाळासाहेब देसाई यांनी कोल्हापूर येथील भुयारी गटार योजना, एसटी स्थानक, गुळ संशोधन केंद्र, ज्योतिबा डोंगरावर सुविधा, रस्ते, धरण, इमारती, सहकारी कार्यालय इत्यादी उभारण्या पासून ते अगदी मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया जवळ शिवाजी पार्क याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळा उभारण्यात पर्यंत सामाजिक कार्य केल आहे. मल्लविद्या व तमाशा या कलांना बाळासाहेब देसाई यांचा नेहमीच पाठिंबा राहिला आहे. बाळासाहेब देसाई यांनी कुस्ती परिषदेचे अध्यक्ष पद देखील सांभाळलं होतं.

मृत्यू

महाराष्ट्र राज्य सरकार मध्ये महत्व पूर्ण पद भूषविणारे बाळासाहेब देसाई यांचे मुंबई येथे निधन झालं.

आम्ही दिलेल्या Balasaheb Desai Biography in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर लोकनेते बाळासाहेब देसाई माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Balasaheb Desai information in marathi language pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of Balasaheb Desai in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!