टोमॅटो निबंध मराठी Essay on Tomato in Marathi

Essay on Tomato in Marathi टोमॅटो वर निबंध चला तर आता आपण या लेखामध्ये टोमॅटोवर निबंध (essay on tomato ) लिहिणार आहोत. टोमॅटो हि एक फळ भाजी आहे आणि हे सर्वांना माहित आहे आणि टोमॅटोचा वापर हा बहुतेक भागामध्ये तसेच बहुतेक देशामध्ये रोजच्या जेवणामध्ये केला जातो. भारतामध्ये टोमॅटो या फळभाजीचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो आणि भारतामध्ये टोमॅटोचे पिक देखील मोठ्या प्रमाणात घेतला जातो. टोमॅटोची शेती हि भारतामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि काही इतर भागामध्ये केली जाते आणि भारताच्या रोजच्या बाजारामध्ये टोमॅटो हि फळभाजी विकण्यासाठी असतेच कारण भारतातील लोक टोमॅटो वापर दैनंदिन स्वयंपाकामध्ये केला जातो. टोमॅटो पासून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज बनवल्या जातात.

तसेच टोमॅटो हा अनेक पदार्थांची चव वाढवण्यासाठी त्या पदार्थांमध्ये घातला जातो. आपण कोणत्याही पदार्थासोबत जसे कि फ्राईड राईस, नुडल्स, फिंगर चिप्स, कटलेट, मॅगी हे पदार्थ ज्या सॉस सोबत खातो तो सॉस देखील टोमॅटो पासूनच बनलेला असतो आणि त्याला आपण टोमॅटो सॉस किंवा केचअप म्हणू शकतो. तसेच टोमॅटो पासून आपण चटणी, टोमॅटो भाजी, टोमॅटो सूप, टोमॅटो सलाड, टोमॅटो ऑम्लेट यासारखे अनेक पदार्थ बनवले जातात तसेच टोमॅटो अनेक पदार्थांच्यामध्ये त्या संबधित पदार्थाची चव वाढवण्यासाठी घालू शकतो.

Essay on Tomato in Marathi
Essay on Tomato in Marathi

टोमॅटो निबंध मराठी – Essay on Tomato in Marathi

Tomato Essay in Marathi

टोमॅटो हा भारतामधेच नाही तर जगामध्ये बहुतेक देशांमध्ये वापरला जातो. टोमॅटो भारतामध्ये मोठ्या प्रमाणात स्वयंपाक घरामध्ये वापरला जातो कारण तो पदार्थाची चव वाढवतो आणि टोमॅटो फक्त पदार्थाची चवच वाढवत नाही तर यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म देखील असतात आणि त्यामुळे आपल्याला टोमॅटो खाण्याचे अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात.

टोमॅटो हि मुळची पेरू या देशातील वनस्पती आहे म्हणजेच या वनस्पतीची उत्क्रांती किंवा पहिल्यांदा जडण घडण हि पेरू या देशामध्ये झाली. तसेच मग या वनस्पतीची लागवड इ.स १९५० पासून युरोप, स्पेन, ब्रिटन, अमेरिका आणि भारत देशामध्ये देखील होऊ लागली. पूर्वी टोमॅटो या वनस्पतीला विषारी मानले जायचे त्यामुळे टोमॅटो खाण्यास लोक घाबरायचे पण सध्या टोमॅटोचा वापर हा सर्व पदार्थामध्ये करतात. स्पेन या देशामध्ये ‘ला टोमातीना’ नावाचा एक उत्सव असतो ज्यामध्ये टोमॅटो खाल्ले जात नाहीत तर एकमेकांच्या अंगावर टाकले जातात.

टोमॅटोची वनस्पती हि छोटी असते आणि हिरव्या रंगाची असते आणि त्याला टोमॅटो लागताना प्रथम फुले लागतात आणि मग त्याला हिरव्या रंगाचे टोमॅटो लागतात आणि मग ते पिकाल्यानंतर लाल रंगाचे होतात आणि टोमॅटोचा कर हा कधी छोटा तर कधी मोठा असा त्या वनस्पतीवर आधारित असतो. टोमॅटोचे वैज्ञानीक नाव ‘सोलॅनम लायकोपार्सिकम’ असे आहे हि वनस्पती मुळात दक्षिण अमेरिकेतील असून भारतामध्ये १९ व्या शतकापासून टोमॅटोचे पिक घेण्यास सुरुवात झाली.

त्याच बरोबर टोमॅटो या फळभाजी मध्ये काही औषधी फायदेही आहेत तसेच टोमॅटोमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात जसे कि पौटैशियम आणि विटामिन सी, विटामिन असते जे आपल्या शरीराला खूप उपयोगी असते तसेच टोमॅटो मध्ये सायट्रिक अॅसिड आणि मैलिक अॅसिड हि असते. भारतामध्ये जरी बहुतेक ठिकाणी एकाच प्रकारचा टोमॅटो जरी जेवणासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जात असला तरी टोमॅटोचे अनेक प्रकार आहेत.

जसे कि चेरी टोमॅटो, मनी मेकर टोमॅटो, बेटर बॉय टोमॅटो, प्लम टोमॅटो आणि रोमा टोमॅटो हे काही टोमॅटोचे प्रकार आहेत आणि यामधील काही प्रकार हे आपल्याला ओळखीचे आहेत तर काही प्रकार हे अनोळखी आहेत. चेरी टोमॅटो हा आपल्याला माहित आहे कारण हा काही ठिकाणी सलाड किंवा कबाब मध्ये वापरला जातो तसेच चेरी टोमॅटोचा वापर हा पिझ्झा मध्ये देखील केला जातो आणि चेरी टोमॅटो हा आकाराने खूप लहान असतो आणि तो लाल रंगाचा असतो. चेरी टोमॅटो मध्ये मिनरल्स आणि विटामिन असतात.

रोमा टोमॅटो हा तसा माझ्याही महितातला नाही आणि हा टोमॅटोचा प्रकार माझ्यासाठी देखील नवीनच आहे. हे टोमॅटो गोड आणि रसाळ असतात आणि याचा वापर सॉस किवा कॅनिंग बनवण्यासाठी होते. मनी मेकर हा टोमॅटो खूप प्राचीन काळापासून पिकवला जाणारा टोमॅटो आहे पण आता त्याचे पिकाचे प्रमाण कमी आले आहे.

या टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात पिक घेता येते म्हणून या टोमॅटोला मनी मेकर टोमॅटो असे म्हणतात. तसेच आपण प्लम टोमॅटो बद्दल विचार केला तर हे टोमॅटो आकाराने लांब आणि दिसायला प्लम सारखे असतात म्हणून या टोमॅटोला प्लम टोमॅटो म्हणतात आणि हे टोमॅटो सॉस बनवण्यासाठी वापरले जातात. अश्या प्रकारे जगामध्ये ९ ते १० हजार प्रकार आहेत.

टोमॅटो हे फळ फक्त स्वयंपाक घरामध्ये पदार्थ बनवाण्यासाठीच आणि त्या पदार्थाची चव वाढवण्यासाठीच वापरले जात नाहीत तर टोमॅटो हि फळभाजी खाल्ल्यामुळे आपल्याला अनेक आरोग्य फायदे देखील होतात कारण टोमॅटो ह्या फळभाजी मध्ये अनेक पोषक घटक असतात जसे कि विटामिन ए, विटामिन के, विटामिन ई, विटामिन सी, फोलेट, फायबर, प्रोटीन, कॅल्शियम यासारखे अनेक पोषक घटक असतात.

टोमॅटोच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, बीटा-कॅरोटीनचे आणि लाईकोपीन या प्रकारचे पोषक घटक असतात जे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवतात आणि त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढल्यामुळे आपण कोणत्याही रोगापासून लांब राहतो म्हणजेच आपली रोग प्रतिकार शक्ती चांगली असल्यामुळे आपल्यावर कोणतेही रोग जंतू परिणाम करत नाहीत.

त्याचबरोबर टोमॅटो मध्ये १०० ग्रॅम प्रमाणामध्ये १.२ ग्रॅम फायबर असते आणि हे फायबर आपले वजन कमी करण्यास मदत करते आणि म्हणून ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी टोमॅटोचे सलाड किंवा ज्यूस करून ते रोज सेवन केले तर त्यांचे वजन कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर टोमॅटो मध्ये फोलेट बी-ग्रुप विटामिन असते जे फोलिक अॅसिड गर्भाशयातील गर्भास मज्जातंतुवेद्य दोषांपासून वाचविण्यास मदत करते म्हणजेच टोमॅटो हि फळभाजी गरोदरपणा मध्ये देखील खूप उपयुक्त असते.

तसेच टोमॅटो मध्ये असणाऱ्या फोलेट बी-ग्रुप विटामिन हे पाठीचा कणा आणि मेंदुंच्या आजारावरही गुणकारी आहे. टोमॅटोमध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडेंट्स, बीटा-कॅरोटीन, लाईकोपीन, पोटॅशियम, विटामिन ई, विटामिन सी यामुळे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मदत होते तसेच हृदयाचे ठोके आणि गती नियंत्रित होते. टोमॅटोमध्ये विटामिन के असते आणि हे हाडे मजबूत करण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर टोमॅटो मध्ये कॅल्शियम चे प्रमाण असते आणि त्यामुळे हाडे आणि दात दोन्हीहि मजबूत होतात. अश्या प्रकारे टोमॅटोचे अनेक औषधी गुण असतात आणि त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते तसेच अनेक रोगांच्या पासून बचाव होतो. 

टोमॅटो हि फळभाजी जगभरामध्ये सर्व ठिकाणी वापरली जाते आणि जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे टोमॅटो वापरले. भारतामध्ये देखील पदार्थाची चव वाढवण्यासाठी बहुतेक तिखट पदार्थामध्ये टोमॅटो वापरले जातात तसेच भारतामध्ये टोमॅटो पौष्टिक महत्व देखील माहित आहे त्यामुळे अनेक आरोग्य फायद्यासाठी देखील टोमॅटो खाल्ला जातो. अश्या प्रकारे टोमॅटोचा उपयोग वेगवेगळ्या कारणासाठी केला जातो.

आम्ही दिलेल्या essay on tomato in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर टोमॅटो निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या tomato essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि tomato nibandh marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!