माझा आवडता खेळ फुटबॉल निबंध Football Essay in Marathi

Football Essay in Marathi माझा आवडता खेळ फुटबॉल निबंध मराठी भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोकप्रिय खेळ खेळले जातात जसे कि खो-खो, कब्बडी, क्रिकेट, हॉलीबॉल, हॉकी, टेनिस, फुटबॉल यासारखे आणि खेळ आहेत आणि त्यामधील काही लोकप्रिय आहे आणि आज आपण या लेखामध्ये फुटबॉल या खेळावर निबंध लिहणार आहोत. फुटबॉल हा खेळ तरुण पिढी मध्ये खूप लोकप्रिय आहे आणि भारतामध्ये तर या खेळाचे खूप चाहते आहेत. फुटबॉल हा एक खेळ आहे जो आम्ही शाळेमध्ये असताना खूप खेळायचे आणि हा खेळण्यास खूप मज्जा यायची कारण सगळ्यांना मागे टाकून त्या बॉलला पुढे ढकलणे मस्त वाटायचे.

पण आम्ही हा खेळ शाळेमध्ये फक्त एक विरंगुळा म्हणून खेळायचो. परंतु आज हा खेळ इतका लोकप्रिय झाला आहे कि हा खेळ अनेक देशामध्ये आवडीने खेळला जातो आणि भारतामध्ये देखील हा खेळ खेळला जातो आणि भारतामधील काही भागातील तरुण पिढी या खेळासाठी वेढे आहेत.

Football Essay in Marathi
Football Essay in Marathi

माझा आवडता खेळ फुटबॉल निबंध मराठी – Football Essay in Marathi 

Essay On My Favourite Game Football in Marathi Language

फुटबॉल हा जगामधील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे फुटबॉल या खेळाला सॉकर या नावाने देखील ओळखले जाते. फुटबॉलच्या आंतरराष्ट्रीय फिफा संघटना असे म्हणते कि फुटबॉल हा खेळ सुजू चीनी खेळाचे विकसित खेळ आहे. भारतामध्ये या खेळाची लोकप्रियता नागेंद्र प्रसाद यांच्यामुळे वाढली त्यामुळे यांना भारतामध्ये फुटबॉल या खेळाचे जनक मानले जाते.

त्यांनी बॉईज फुटबॉल क्लबची स्थापना केली त्यानंतर जस जशी या खेळाची लोकप्रियता वाढू लागली आणि १९५० मध्ये कोलकत्ता या शहरात अनेक फुटबॉल क्लब तयार झाले. त्यानंतर भारताने विश्वचषक मध्ये जाण्याची पात्रता साधली पण त्यावेळी भारताकडे विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी तेवढे पैसे न्हवते म्हणून भारताने ऑलंपीक आपले लक्ष केंद्रित केले. भारताची फुटबॉल टीम १९५६ आणि १९५८ मध्ये ऑलंपीक मध्ये ४ स्थान मिळवले आणि येथूनच भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ सुरु झाला.

फुटबॉल म्हणजे एक हवा भरलेले आणि वरती कातडी असणारा मोठा पायचेंडू आणि तो खेळताना जो पायाने पुढे ढकलला जातो आणि गोल केला जातो. फुटबॉल या खेळामध्ये ११ खेळाडू असतात हा खेळ २ स्लाईड्स मध्ये खेळला जातो. हा खेळ खेळत असताना खेळाडू आपले हात वगळता आपल्या शरीराचा कोणत्याही भागाचा वापर करून बॉल हलवू शकतो पण या खेळामध्ये बॉल पुढे ढकलण्यासाठी जास्तीत जास्त पायाचा वापर केला जातो.

पण बॉल पकडण्यासाठी गोलरक्षक हाताचा वापर करू शकतो. या खेळामध्ये २ गट असतात आणि ते एकमेकांविरुध्द खेळतात आणि एकमेकाविरुद्ध गटामध्ये ११ – ११ अशी खेळाडू संख्या असते. फुटबॉल खेळाचे मैदान हे आयताकृती असून या मैदानाची लांबी ९० ते १०० मीटर असते आणि रुंदी ५० ते ७० मीटर असते आणि फुटबॉलच्या मैदानाला फुटबॉल खेळपट्टी, सॉकर खेळपट्टी म्हंटले जाते.

या खेळामध्ये वापरल्या जाणाऱ्या बॉलचा व्यास ६७ ते ७० सेंटी मीटर असतो. फुटबॉल खेळाचा मुख्य उद्देश विरोधी गटाला मागे टाकणे आणि जेव्हा बॉल गोल पोस्टच्या दरम्यान गोल रेषा ओलांडते तेव्हा गोल होतो आणि त्याचे गुण मिळतात.

फुटबॉल या खेळाचे मैदान कृत्रिम किवा नैसर्गिक गवताने बनवलेले असते तसेच खेळपट्टीचा आकार बदलण्याची परवानगी आहे पण ते १०० ते १३० यार्ड लांब आणि ५० ते १०० यार्ड रुंद असले पाहिजे. सामान्यता हा खेळ २ स्लाईड्स मध्ये खेळला जातो आणि ४५ मिनिटाचा असतो आणि त्यामध्ये १५ मिनिटाचा विश्रांतीचा कालावधी असतो.

प्रत्येक संघामध्ये ११ खेळाडू असतात आणि एक गोलरक्षक असतो ज्याला बॉलला स्पर्श करण्याची परवानगी असते आणि खेळाचा सामना खेळण्यासाठी ७ खेळाडू मैदानामध्ये असावे लागतात आणि दोन संघातील राहिलेले ४ – ४ खेळाडू हे राखीव खेळाडू असतात म्हणजे जर मैदानामध्ये खेळणाऱ्या खेळाडूला जर काही दुखापत झाली तर राखील खेळाडूमधील खेळाडू त्यांच्या जागी खेळतात. प्रत्येक गेममध्ये एक रेफरी आणि दोन सहाय्यक रेफरी असणे आवश्यक असते.

आणि फॉल्स, पेनाल्टी, फ्री किक, थ्रो इन्स या सारखे निर्णय रेफरी घेतो आणि निर्णय घेताना रेफरी सहाय्यक रेफरीशी सल्लामसलत करून निर्णय घेतात. सामन्यात दोन्ही संघाची गुणांची पातळी कमी असली तर खेळाला अतिरिक्त वेळ मिळतो आणि ९० मिनिटानंतर जादा ३० मिनिटे जोडली जातात.

जर अतिरिक्त वेळेनंतरहि जर दोन्ही संघ स्तरावर असल्यास पेनाल्टी शूटआउट करणे गरजेचे असते. जर खेळाडूने खेळ खेळताना जर एखादा फॉल्ट केला तर त्याला पिवळे किवा लाल कार्ड मिळते आणि हे कार्ड देण्याचा पूर्ण निर्णय हा रेफारीचा असतो. पिवळे कार्ड खेळाडूला चेतावणी देण्यासाठी दिले जाते आणि लाल कार्ड खेळाडूला डिसमिसल करण्यासाठी दिले जाते. जर खेळाडूला २ पिवळी कार्ड मिळाली असतील तर ते एका लाल कार्डच्या बरोबर असते.

अश्या प्रकारे खेळाचे वेगवेगळे नियम असतात आणि ते खेळाडूला पाळावे लागतात आणि जर खेळाडूने कोणताही नियम मोडला तर त्याला खेळातून बाहेर काढले जाते. त्याचबरोबर फुटबॉल हा खेळ खेळण्यासाठी काही मुख्य साहित्य देखील आवश्यक असते ते म्हणजे खेळपट्टी आणि फुटबॉल. याव्यतिरिक्त खेळाडूसाठी स्टडेड फुटबॉल बूट, शिन पॅड आणि मॅचींग स्ट्रिप्स लागतात आणि गोलरक्षकासाठी पॅड हातमोजे इत्यादी साहित्य लागते.

भारतामध्ये फुटबॉल हा खेळ खूप पूर्वीच्या काळापासून खूप आवडीने खेळला जातो आणि या खेळाची सध्याची लोकप्रियता पूर्वीहून अधिक आहे. भारतातील तरुण पिढी हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळतात आणि भारतातील अनेक प्रसिध्द आणि या खेळामध्ये नाव कमवलेले खेळाडू नवीन फुटबॉल खेळाडूंच्यासाठी प्रेरणा बनतात. त्यामधील काही भारतीय खेळाडूंची नावे आता मी सांगणार आहे.

सुनील छेत्री हा एक प्रसिध्द खेळाडू आहे ज्याने आपल्या फुटबॉल खेळाची सुरुवात दिल्लीतील सिटी क्लबमध्ये सहभागी होवून केली. या खेळाडूने ऑक्टोबर २००१ मध्ये क्वालालंपूर येथे झालेल्या एशियन स्कूल चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतल्यानंतर १२ वीचे शिक्षण सोडले. सुनील छेत्री हा एक भारतीय अंतराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू आहे. ज्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील दुसरा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून नाव मिळवले आहे.

तसेच संदेश झिंगन हा एक प्रसिद्ध भारतीय फुटबॉलपटू आहे आणि त्याला संघामध्ये सेंटर बॅक खेळण्यासाठी ओळखला जातो. संदेश याने खेळाची सुरुवात हि सेंट स्टीफन्स अकॅडमी मध्ये प्रवेश घेवून केली आणि अकॅडमी वतीने मँचेस्टर युनायटेड प्रीमियम कपच्या दक्षिण पूर्व आशियाई अंतिम फेरीत प्रथमच संघामध्ये आपले योगदान दिले.

त्याचबरोबर गुरप्रीत सिंग संधू याने वयाच्या ८ व्या वर्षापासून फुटबॉल खेळ खेळण्यासाठी सुरुवात केली होती या खेळाडूने २००९ – २०१० मध्ये एएफसी अंडर चॅम्पियनशिप पात्रतेमध्ये इराक अंडर १९ विरूद्ध भारताच्या अंडर १९ संघासाठी पदार्पण केले. अनिरुद्ध थापा हा भारतीय व्यावसायिक फुटबॉलपटू आहे जो इंडियन सुपर लीगच्या चेन्नई कडून आय लीगमध्ये मिनर्वा पंजाबसाठी मिडफिल्डर म्हणून खेळतो. अश्या प्रकार भारतामध्ये अनेक फुटबॉल खेळाडू आहेत जे आपले नाव व आपल्या देशाचे नाव जगामध्ये उंचावत आहेत.

आम्ही दिलेल्या Football Essay in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझा आवडता खेळ फुटबॉल निबंध मराठी football marathi nibandh बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या football nibandh in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on football in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये types of yoga information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!