महाराष्ट्रातील हिल स्टेशन माहिती Hill Stations in Maharashtra Information in Marathi

hill stations in maharashtra information in marathi महाराष्ट्रातील हिल स्टेशन, आपल्या सर्वांनाच लहानपणी पासून पर्वत आणि टेकड्या यांच्याविषयी जाणून घ्यायची, त्याविषयी माहिती घ्यायची आणि अनेक वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या टेकड्यांना आणि पर्वतांना भेट देण्याची उत्सुकता असते. भारतामध्ये मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लोकप्रिय टेकड्या आहेत, ज्या पर्यटनासाठी अगदी परिपूर्ण आहेत परंतु महाराष्ट्रातील पर्यटन टेकड्यांना एक वेगळेच महत्व आहे आणि आज आपण या लेखामध्ये महाराष्ट्रातील काही प्रसिध्द आणि निसर्गरम्य टेकड्यांच्याविषयी माहिती घेणार आहोत.

ज्यावेळी भारतावर ब्रिटीशांचे राज्य होते त्यावेळी ब्रिटिशांनी बहुतेक प्रसिध्द हिल स्टेशन्स म्हणजेच टेकड्या शोधून काढल्या आणि त्या विकसित करून त्या लोकप्रिय केल्या आणि त्यामधील काही टेकड्या ह्या महाराष्ट्र मध्ये देखील आहेत आणि त्यामधील काही लोकप्रिय टेकड्यांची माहिती खाली आपण थोडक्यात घेवूया.

hill stations in maharashtra information in marathi
hill stations in maharashtra information in marathi

महाराष्ट्रातील हिल स्टेशन माहिती – Hill Stations in Maharashtra Information in Marathi

महाराष्ट्र मधील काही लोकप्रिय टेकड्या – Top 10 hill stations in maharashtra information in marathi

महाबळेश्वर 

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम हिल स्टेशन आहे आणि महाबळेश्वर हे सह्याद्री डोंगररागांवर वसलेले आहे आणि समुद्रसपाटी पासून याचे अंतर ४५०० फुट इतके उंच आहे. महाबळेश्वरला प्रेक्षणीय स्थळांचा “बिंदू” असे म्हटले जाते आणि हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात वसलेले एक सुंदर हिल स्टेशन आहे.

इ. स १७९१ मध्ये सर चार्ल्स मालेट या ठिकाणी पाय ठेवणारे पहिले ब्रिटिश होते आणि जनरल पीटर लॉडविक आणि सर जॉन माल्कम, बॉम्बेचे गव्हर्नर यांच्या नेतृत्वाखाली इ. स १८२८ मध्ये येथे एक सेनेटोरियम बांधण्यात आले म्हणजेच हे ब्रिटिशांनी शोधलेल्या हिल स्टेशन्स मधील एक आहे.

महाबळेश्वर हे पवित्र ठिकाण मानले गेले आणि या ठिकाणी स्थानिक भाविक भेट देतात. महाबळेश्वर हे नाव एका देवतेपासून पडले आहे, ज्याची पूजा जुन्या महाबळेश्वर मंदिरात केली जाते आणि हे ठिकाण पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. उन्हाळ्यात आणि ख्रिसमस आणि दिवाळीच्या सुट्टीत हिल स्टेशनवर खूप गर्दी असते.

माथेरान

माथेरान हे महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील एक हिल स्टेशन आहे आणि हे भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन आहे आणि या हिल स्टेशनाची उंची हि समुद्रसपाटीपासून सुमारे ८०० मीटर म्हणजेच २६२५ फुट इतकी उंच आहे.

हे हिल स्टेशन पाहण्यासाठी जरी वाहने नेता येत नसले तरी अनेक लोक ट्रेकचा पर्याय निवडून या ठिकाणाला भेट देतात आणि त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते आणि हे हिल स्टेशन खूप उंच नसल्यामुळे हा ट्रेक देखील अवघड नाही.

या ठिकाणी सूर्योदयाचे आणि सूर्यास्ताचे दृष्य हे चित्त थरारक आहे तसेच लुईसा पॉइंटप्रबळ किल्ल्याचे स्पटिक स्पष्ट दृश्य देते आणि या ठिकाणी मंकी पॉइंट, वन ट्री हिल पॉइंट, रामबाग पॉइंट आणि हार्ट पॉइंट हि ठिकाणे पाहायला मिळतात.

भीमाशंकर

भीमाशंकर हे देखील एक निसर्गरम्य टेकडीचे ठिकाण आहे आणि या ठिकाणी १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले प्राचीन मंदिर देखील आहे आणि हे मंदिर महादेवाचे मंदिर असल्यामुळे या ठिकाणाला भीमाशंकर मंदिर म्हटले आहे आणि हे मंदिर टेकडीवर घनदाट जंगलामध्ये आणि शांत वातावरणामध्ये १२ व्या शतकामध्ये बांधले आहे.

चिखलदरा

ज्यांना निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी आवडते जसेच जे निसर्गप्रेमी आहेत अश्या लोकांच्यासाठी चिखलदरा हिल स्टेशन हे एक चांगले ठिकाण आहे आणि या ठिकाणी मॅग्पी, पँथर्स, स्लॉथ बिअर, बार्बेट, हायना, चार शिंगी काळवीट, नीलगाय, वाघ आणि रंगीबेरंगी पक्षी यासारखे अनेक प्राणी या ठिकाणी आहेत.

तसेच आपल्या पावसाळ्यामध्ये धबधब्यांचे चित्तथरारक दृष्ये देखील पहायला मिळतात. या ठिकाणी एक व्याघ्र प्रकल्प देखील आहे जो मेळघाट प्रकल्प म्हणून प्रसिध्द आहे आणि या ठिकाणी ८२ वाघ आहेत. चिखलदरा हा परिसर अनेक निसर्गरम्य आणि प्रेक्षणीय स्थळांनी परिपूर्ण आहे म्हणजेच त्या ठिकाणी मेळघाट व्याघ्र प्रकल्प, भीमा कुंड, शक्कर तलाव, सनसेट पॉइंट, हरिकेन पॉइंट, गोराघाट पॉइंट अशी अनेक ठिकाणे आहेत.

इगतपुरी

इगतपुरी हिल स्टेशन हे नाशिक जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि हे पश्चिम घाटातील एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. जे लोक निसर्गप्रेमी, छायाचित्रकार आणि ज्यांना आकर्षक प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी आवडते अश्या लोकांच्यासाठी इगतपुरी हिल स्टेशन हे चांगले पर्यटन ठिकाण आहे.

आंबोली घाट

नैसर्गिक सुंदरता असणारे पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाणारा आंबोली घाट हा सिंधूदुर्ग जिल्ह्यातील एक घाट आहे. जो पर्यटन स्थळासाठी खूप प्रसिध्द आहे आणि या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी लोकांची खूप गर्दी असते. आंबोली घाट हा महाराष्ट्राच्या कोकण भागामध्ये येतो आणि त्या ठिकाणी राज्याच्या तुलनेने सर्वाधिक पावूस पडतो असे म्हंटले जाते आणि म्हणूनच या ठिकाणाला महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले तर काही हरकत नाही.

घाटातून उंचीवरून पडणारे धबधबे, रस्त्यावर छत असल्यासारखी असणारी झाडे किंवा जंगले, हिरव्यागार आणि खोल दऱ्या, घाटातील उंच उंच कडा तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे घाटातून दिसणारा सूर्योदय आणि सूर्यास्त ह्या सर्व गोष्टी पर्यटकांना भुरळ पडतात.

आंबोली घाट हा सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील एक लोकप्रिय घाट म्हणून ओळखले जाते आणि ह्या घाटावर लोकांची ये जा हि सतत सुरु असते तसेच गोव्याला जाणारे लोक हे याच मार्गावरून जातात.

आंबोली घाटाचे मुख्य आकर्षण म्हणजे धबधबा आंबोली घाटामध्ये आपल्याला पारपोली गावाजवळील धबधबा, सूर्योदय आणि सूर्यास्त पॉइंट, कावळशेत पॉइंट, नांगरतास धबधबा, महादेव गड आणि हिरण्यकेशी नदीचा उगम यासारखी अनेक ठिकाणे पहायला मिळतात.

लोणावळा

काही लोकप्रिय हिल स्टेशनमधील एक महत्वाचे आणि लोकप्रिय हिल स्टेशन म्हणजे लोणावळा हिल स्टेशन आणि हे हिल स्टेशन ट्रेकिंगसाठी एक चांगले ठिकाण आहे आणि या ठिकाणी गुहा आणि धबधबे पाहायला मिळतात. हे हिल स्टेशन सह्याद्री पर्वत रंगांचा एक भाग आहे आणि हा स्थानिक लोकांच्यासाठी एक दिवसीय पिकनिक स्पॉट देखील ठरू शकतो.

पाचगणी

पाचगणी हे देखील एक निसर्गसुख देणारे हिल स्टेशन आहे जे पुणे या शहरापासून १०० किलो मीटर अंतरावर आहे हे देखील महारष्ट्रातील सर्वोत्तम हिल स्टेशनपैकी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी देखील पर्यटक मोठ्या संखेने भेट देतात.

आम्ही दिलेल्या hill stations in maharashtra information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर महाराष्ट्रातील हिल स्टेशन माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या hill station in maharashtra in marathi या Hill stations in maharashtra information in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि Top 10 hill stations in maharashtra information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये hill station in maharashtra information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!