माथेरान हिल स्टेशन Matheran Information in Marathi

matheran information in marathi माथेरान हिल स्टेशन, महाराष्ट्रामध्ये अनेक निसर्गरम्य पर्यटक ठिकाणे आहेत आणि हि पर्यटन स्थळे पाहण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणांना भेट देत असतात आणि अश्या प्रकारे महाराष्ट्र राज्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये माथेरान हे एक थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण आहे आणि आज आपण या लेखामध्ये माथेरान या ठिकाणाविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. माथेरान हे महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील एक हिल स्टेशन आहे आणि हे भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन आहे आणि या हिल स्टेशनाची उंची हि समुद्रसपाटीपासून सुमारे ८०० मीटर म्हणजेच २६२५ फुट इतकी उंच आहे.

माथेरान हे ठिकाण भारत सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाने घोषित केलेला पर्यावरण संवेदनशील प्रदेश आहे आणि या ठिकाणी जरी वाहने जाणे बंद असले तरी या ठिकाणी पर्यटक या ठिकाणावरील नैसर्गिक सुंदरता पहायला येतात आणि या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असून देखील या ठिकाणी शांत वातावरण आहे.

माथेरान या परिसरामध्ये जवळपास एकूण ३८ नियुक्त लुक आऊट पॉइंट आहेत. या ठिकाणी सूर्योदयाचे आणि सूर्यास्ताचे दृष्य हे चित्त थरारक आहे तसेच लुईसा पॉइंटप्रबळ किल्ल्याचे स्पटिक स्पष्ट दृश्य देते आणि या ठिकाणी मंकी पॉइंट, वन ट्री हिल पॉइंट, रामबाग पॉइंट आणि हार्ट पॉइंट हि ठिकाणे पाहायला मिळतात.

matheran information in marathi
matheran information in marathi

माथेरान हिल स्टेशन – Matheran Information in Marathi

माथेरान विषयी माहिती – information about matheran in marathi

माथेरान हे महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील एक हिल स्टेशन आहे आणि हे भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन आहे आणि या हिल स्टेशनाची उंची हि समुद्रसपाटीपासून सुमारे ८०० मीटर म्हणजेच २६२५ फुट इतकी उंच आहे.

माथेरानचा शोध मे १८५० मध्ये ठाणे जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी ह्यु पॉयंट्स मालेट यांनी लावला आणि मग मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड एल्फीन्स्टस यांनी भविष्यातील हिल स्टेशन म्हणून विकासाचा पाया घातला. माथेरान हे डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या नेरळ शहराशी जोडलेले आहे आणि डांबरी रस्ता नेरळला दस्तुरी नाका जोडतो.

जो माथेरानपासून ९ किलो मीटर अंतरावर आहे आणि माथेरानचा वेगळेपणा टिकवण्यासाठी या ठिकाणाहून कोणत्याही वाहनांना परवानगी नाही. माथेरान या परिसरामध्ये जवळपास एकूण ३८ नियुक्त लुक आऊट पॉइंट आहेत. या ठिकाणी सूर्योदयाचे आणि सूर्यास्ताचे दृष्य हे चित्त थरारक आहे तसेच लुईसा पॉइंटप्रबळ किल्ल्याचे स्पटिक स्पष्ट दृश्य देते आणि या ठिकाणी मंकी पॉइंट, वन ट्री हिल पॉइंट, रामबाग पॉइंट आणि हार्ट पॉइंट हि ठिकाणे पाहायला मिळतात.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने माथेरान या ठिकाणाला पर्यावरण संवेदनशील प्रदेश म्हणून सूचीबध्द केले आहे आणि १९०७ पासून कार्यरत असलेल्या नॅरोगेज रेल्वेने नेरळच्या जवळच्या शहराशी जोडले आहे. माथेरान हा पश्चिम घाटातील एक एको ट्युरीझम स्पॉट म्हणून विकसित झालेला प्रदेश आहे आणि सरकारने हिल स्टेशनला मनोरंजन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी आणि येथील पर्यटन क्रीयाकालापांना समर्थन देण्यासाठी मोठी पावले उचलली आहेत.

माथेरान हिल स्टेशनवरील वनस्पती आणि प्राणी

माथेरान या हिल स्टेशनच्या परिसरामध्ये आंबा, जॅक फळे या सारख्या वनस्पती आहेत तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे हे ठिकाण काळ्या रंगाच्या बेरीच्या उत्पादनासाठी देखील प्रसिध्द आहेत आणि या प्रदेशामध्ये आढळणारी काळी बेरी हि इतर कोणत्याही प्रदेशाच्या तुलनेने अद्वितीय आहे आणि हि उच्च पौष्टिक मुल्ये देतात.

तसेच या ठिकाणी औषधी झाडे, सजावटीच्या वनस्पतील तसेच इतर शोभेची झुडपे देखील पहायला मिळतात तसेच या ठिकाणी तमालपत्र, कोकंम शिककाई या सारखे काही सामान्य प्रकार आहेत. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी कोकिळा आणि बुलबुल यांचा गोड आवाज ऐकू येतो कारण ते पावसाळ्याचा आनंद घेतात आणि गोड सुरामध्ये गात असतात. त्याबरोबर माथेरान हिल स्टेशनवर माकडे आणि घोडे दिसणे हे एक समान्य दृश्य आहे आणि या परिसरामध्ये वाहनांना बंदी असल्यामुळे या ठिकाणच्या आतील भागात घोडेस्वारीने प्रवेश करता येतो.

माथेरान या ठिकाणावर मिळणारे अन्न

माथेरान या हिल स्टेशनवर अनेक प्रकारचे अन्न उपलब्ध आहे आणि शाकाहारी अन्न देखील उपलब्ध आहे आणि मांसाहारी अन्न देखील उपलब्ध आहे परंतु बहुतेक पदार्थ हे शाकाहारीच आहेत. या ठिकाणी फ्रुट ज्यूस आणि चॉकलेट्स हे स्नॅक्सचे इतर प्रकार हे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत.

माथेरान मधील खरेदी – shopping

माथेरानमध्ये लहान लहान बेरी देखील मिळतात तसेच या ठिकाणी आपण इतर फळे देखील खरेदी करू शकतो. माथेरान हिल स्टेशन या ठिकाणी एक बाजारपेठ देखील आहे आणि या बाजारपेठे मध्ये वनउत्पादने देखील खूप लोकप्रिय आहेत आणि लोकांना मध, सुकी फुले, फळे, सजावटीचे फुले, चामड्याच्या वस्तू आणि मसाले या सारख्या वस्तू देखील खरेदी करू शकता.

माथेरान या ठिकाणाविषयी मनोरंजक तथ्ये

  • माथेरान हे महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील एक हिल स्टेशन आहे आणि हे भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन आहे आणि या हिल स्टेशनाची उंची हि समुद्रसपाटीपासून सुमारे ८०० मीटर आहे.
  • माथेरान या परिसरामध्ये जवळपास एकूण ३८ नियुक्त लुक आऊट पॉइंट आहेत.
  • या ठिकाणी मंकी पॉइंट, वन ट्री हिल पॉइंट, रामबाग पॉइंट आणि हार्ट पॉइंट हि ठिकाणे पाहायला मिळतात.
  • सर्वात महत्वाचे म्हणजे हे ठिकाण काळ्या रंगाच्या बेरीच्या उत्पादनासाठी देखील प्रसिध्द आहेत आणि या प्रदेशामध्ये आढळणारी काळी बेरी इतर कोणत्याही प्रदेशामध्ये आढळत नाही.
  • माथेरानचा शोध मे १८५० मध्ये ठाणे जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी ह्यु पॉयंट्स मालेट यांनी लावला.

आम्ही दिलेल्या matheran information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माथेरान हिल स्टेशन माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या matheran hill station information in marathi या matheran ghat information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about matheran in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!