janusirsasana information in marathi जानुशीर्षासन मराठी माहिती, आपल्याला माहीतच आहे योग आणि व्यायाम यांचे अनेक फायदे आहेत आणि जर आपण नियमितपणे योग आणि व्यायाम केला तर आपल्याला अनेक समस्यांच्या पासून लांब ठेवले जाते आणि इतकेच नाही तर नियमितपणे योग केल्यामुळे आपल्याला अनेक रोगांच्यापासून तर दूर ठेवलेच जाते परंतु आपल्याला योगामुळे मानसिक शांतता देखील मिळते. योग ही एक जुनी कला आहे ज्यामध्ये शरीर मनाशी जोडलेले असते आणि हा एक प्रकारचा व्यायाम आहे.
ज्याद्वारे शरीरातील सर्व घटक ध्यान आणि विश्रांतीच्या मदतीने मनाशी जोडले जातात आणि त्यामुळे आपल्या मानसिक आणि शारीरिक शांतता मिळण्यास मदत होते. आपण आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्यायम करू शकतो जसे कि प्राणायाम, अन्लोम विन्लोम, सवासन, भुजंगासन, गोमुखासन, वज्रासन, जाणू शीर्षासन, पद्मासन आणि आज आपण या लेखामध्ये यामधील जानुशीर्षासन या विषयी म्हणेच हे आसन कसे केले जाते, ते केंव्हा करायचे आणि त्याचे फायदे काय आहेत या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत.
जानूशीर्षासन हा एक योगाचा प्रकार आहे आणि या योगप्रकाराला जानूशीर्षासन असे नाव हे संस्कृत मधून पडले आहे म्हणजेच जनू म्हणजे गुढघा आणि शीर्ष म्हणजे डोके असा या शब्दाचा अर्थ होतो म्हणजेच या असणामध्ये हे आसन करताना त्या संबधित व्यक्तीचे डोके हे त्याच्या गूढघ्याला टेकलेले असते.
जानुशीर्षासन हे असं करण्याचा अनेक फायदे आहेत जसे कि आपली हाडे लवचिक बनतात तसेच पाठीच्या कण्याच्या समस्या दूर होतात अश्या प्रकारे जानू शीर्षासन करण्याचे अनेक फायदे आहेत ते आपण खाली पाहणार आहोत.
जानुशीर्षासन मराठी माहिती – Janusirsasana Information in Marathi
जानुशीर्षासन विषयी माहिती – janushirshasana information in marathi
जानुशीर्षासन हे आसन हा एक योगासनाचा प्रकार आहे आणि जर या आसनाचा अभ्यास रोज नियमितपणे केला तर आपल्याला अनेक समस्यांच्या पासून आराम मिळतो. जानु शीर्षासन हे नाव संस्कृत शब्दापासून आलेले आहे आणि जनु म्हणजे गुढघा आणि शीर्ष म्हणजे डोके आणि या असणामध्ये गुढघ्यावर आपले डोके ठेवले जाते आणि म्हणून या आसनाला जानु शीर्षासन असे नाव दिले आहे.
जानुशीर्षासन कसे करायचे – process
जानुशीर्षासन करताना एक विशिष्ट अशी प्रक्रिया करावी लागते आणि ती प्रक्रिया काय आहे ते आपण खाली पाहणार आहोत.
- प्रथम जमिनीवर चटई किंवा जमखाना अंथरून घ्या.
- आता तुम्ही त्यावर तुमचे पाय पुढे शोधून बसा आणि तुमच्या पाठीचा कणा सरळ आणि ताठ करा आणि तुमचे पाय देखील ताठ करून पुढे सोडा.
- आता तुमच्या दावा पायाचा गुढघा वाकवा आणि तुमचा डावा पाय तुमच्या उजव्या मांडीवर ठेवा.
- आता तुम्ही पाठीचा कणा ताठ करा आणि तुमचे दोन्ही हात डोक्याच्या वर घ्या आणि ते सरळ करून तुमच्या उजव्या दिशेला वाळवा.
- आता तुम्हाला तुमचे कपाळ तुमच्या उजव्या पायाच्या गुढ्घ्याला लावायचा आहे आणि आणि दोन्ही हात पायांच्या बोटांना.
- आता हळू श्वास सोडत सोडत कमरेतून खाली वाका आणि तुमचे कपाळ उजव्या गुढघ्याला स्पर्श होऊ द्या आणि तुमचे दोन्ही हात तुमच्या उजव्या पायाच्या बोटांना स्पर्श करू द्या आणि तुमचे दोन्ही हातांचे कोपर जमिनीवर टेकू द्या.
- तुम्ही या स्थितीमध्ये काही वेळ थांबण्याच्या प्रयत्न करा आणि हळुवारपणे पूर्व स्थितीमध्ये या. परंतु पूर्व स्थितीमध्ये येताना श्वास सोडा आणि श्वास घ्या.
- अश्या प्रकारे हि संपूर्ण प्रक्रिया पुन्हा करा.
जानुशीर्षासन करण्याचे फायदे – janusirsasana benefits in marathi
कोणत्याही आसनाचे काही ना काही आरोग्य फायदे असतात आणि ते मानसिक असो किंवा शारीरिक आणि तसेच जानूशीर्षासन करण्याचे देखील काही फायदे आहेत आणि ते काय आहेत ते आपण खाली पाहणार आहोत.
- जानुशीर्षासन हे आसन नियमित केल्यामुळे हाडे लवचिक बनतात त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला पाठीच्या कण्याची समस्या असेल तर त्या व्यक्तीने नियमितपणे हे आसन डॉक्टरांच्या सल्ल्याने केल्यास पाठीच्या कण्याची समस्या देखील दूर होते.
- अनेकांना पचन संस्थेचा त्रास हा सतत जाणवत असतो आणि अश्या लोकांच्यासाठी जानु शीर्षासन हे एक उत्तम आसन आहे. जानु शीर्षासनाच्या नियमित सरावाने पंचन संस्थेच्या अनेक समस्या दूर होतात.
- उच्च रक्तदाबाच्या समस्या ज्यांना आहेत त्यांना देखील हे आसन उपयुक्त ठरते.
- जानुशीर्षासन हे नियमित केल्यामुळे यकृत आणि मूत्रपिंड यांना उत्तेजित करते आणि कार्य देखील सुधारते.
- काही व्यक्तींना पाय दुखण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते परंतु जर त्या संबधित व्यक्तीने जर रोजच्या रोज जानुशीर्षासन केल्यामुळे पाय दुखणे कमी होते.
- या आसनाच्या नियमित सरावाने पोटाचे स्नायू मजबूत होतात तसेच पोटाच्या लहान आणि मोठ्या आतड्यांचा विस्तार होण्यास मदत होते.
- सध्या अनेक लोक आपले वजन कमी करण्याच्या पाठीमागे असतात आणि ते अनेक प्रकारचे व्यायाम करतात तसेच अनेक उपाय करतात पण जर तुम्हाला लठ्ठपणा किंवा वजन कमी करायचे असल्यास तुम्ही हे आसन नियमित केल्यास तुमचे वजन किंवा लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.
- अनेक स्त्रियांना मासिक पाळीच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आणि जर अश्या स्त्रियांनी जर नियमितपणे जानुशीर्षासन केल्यामुळे मासिक पाळीच्या अनेक समस्या दूर होतात.
आम्ही दिलेल्या janusirsasana information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर जानुशीर्षासन मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या janushirshasana information in marathi या sajjangad fort information in Marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about janusirsasana in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट