वज्रासन मराठी माहिती Vajrasana Information in Marathi

vajrasana information in marathi वज्रासन मराठी माहिती, सध्याच्या प्रदूषणाच्या आणि दगदगीच्या काळामध्ये प्रत्येकाला योग आणि व्यायाम करणे हे काळाची गरज बनली आहे. जे लोक योग आणि व्यायाम नियमित करतात अश्या लोकांचे आरोग्य हे चांगले आणि निरोगी राहण्यास मदत होते. योगाच्या नियमितपणे सराव करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या जीवनशैलीत कायमस्वरूपी सकारात्मक फरक निर्माण करू शकतो आणि योग ही निरोगी जगण्याची कला आणि विज्ञान आहे आणि ही अत्यंत सूक्ष्म विज्ञानावर आधारित एक आध्यात्मिक शिस्त आहे, जी मन आणि शरीर यांच्यात सुसंवाद आणण्यावर लक्ष केंद्रित करते.

योग ही एक जुनी कला आहे ज्यामध्ये शरीर मनाशी जोडलेले असते. हा एक प्रकारचा व्यायाम आहे ज्याद्वारे शरीरातील सर्व घटक ध्यान आणि विश्रांतीच्या मदतीने मनाशी जोडले जातात. योगामध्ये अनेक मुद्रा आहेत आणि योगाची प्रत्येक मुद्रा हि आपल्याला कोणता ना कोणता तरी आरोग्य फायदा जरूर करते पण कोणत्याही योग मुद्रेचा सराव करत असताना मात्र आपण काळजी पूर्वक केला पाहिजे.

अन्लोम विन्लोम, भस्त्रिका, पद्मासन, चक्रासन, सवासन, भुजंगासन, गोमुखासन, वज्रासन, मयुरासन आणि इतर असे अनेक प्रकार आहेत आणि आज आपण या लेखामध्ये वज्रासन विषयी माहिती घेणार आहोत. चला तर आता आपण वज्रासन या विषयी खाली सविस्तर महितो घेवूया.

vajrasana information in marathi
vajrasana information in marathi

वज्रासन मराठी माहिती – Vajrasana Information in Marathi

वज्रासन विषयी महत्वाची माहिती – information about vajrasana in marathi

वज्रासन हा एक योगाचा प्रकार आहे आणि हा प्रकार करण्यासाठी खूप सोपा आहे आणि या आसनाचे अनेक आरोग्य फायदे देखील आहेत. वज्रासन हे गुढघे टेकून केली जाणारी मुद्रा आहे आणि या आसनाचे नाव हे संस्कृत शब्द वज्र ज्याचा अर्थ हिरा असा होतो.

वज्रासन हे वज्र नाडी सक्रीय करते ज्यामुळे चांगले पचन वाढवते आणि यकृताचे चांगले कार्य पार पाडण्यास मदत होते तसेच त्या योगप्रकारच्या नियमित सरावाने मज्जातंतूच्या, सायातिक आणि अपचनाच्या समस्या देखील दूर होण्यासाठी मदत होते. या आसणाविषयी विशेष म्हणजे कोणतेही आसन करताना आपल्या रिकाम्या पोटावर किंवा काही न खाता करावे लागते पण हे आसन भरल्या पोटावर देखील करू शकतो.

वज्रासन कसे करावे – steps

वज्रासन हे खूप सोपे आसन आहे आणि त्यांचे अनेक आरोग्य फायदे आहेत त्यामुळे हे आसन जर नियमित केले तर आपल्याला अनेक आरोग्य फायदे मिळतात. खाली आपण वज्रासन कसे करायचे ते पाहूया.

  • प्रथम जमिनीवर एक चटई अंथरून घ्या आणि समोर सरळ पाय पसरून बसा.
  • आता तुमचे दोन्ही पाय दुमडा आणि गुढघे टेकून बसा आणि हिप्स टाचांच्यावर ठेवा आणि पायाची बोटे तुमच्या मागे दाखवली पाहिजेत आणि तुमच्या मोठ्या बोटांनी मागच्या बाजूला एकमेकांना स्पर्श केला पाहिजे.
  • जर तुम्ही नवशिक्या असाल तर घोट्याच्या दुखण्यापासून बचाव करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पायाखाली उशी ठेवावी लागेल.
  • आता विभाजित केलेल्या ताचांनी तयार झालेल्या पोक्ष भागावर आरामात बसा.
  • तुमचे डोके, मान आणि पाठीचा कणा एका सरळ रेषेमध्ये ठेवा आणि आपले तळवे आपल्या मांडीवर ठेवा आणि वरच्या दिशेने तोंड करा.
  • जर तुम्हाला हे आसन चांगल्या प्रकारे येत असेल तर तुम्ही या असणामध्ये श्वास घेता घेता १५ मिनिटे बसा आणि नवशिक्या असाल तर तुमच्या सोयीच्या पातळीनुसार करा.
  • आता श्वास सोडा आणि अराम करा आणि आपले पाय सरळ करा.

वज्रासन चे फायदे मराठी – vajrasana benefits in marathi

कोणत्याही योग किंवा व्यायामाच्या प्रकारचा काही ना काही आरोग्य फायदा असतो आणि तसेच आपण जर रोज वज्रासन नियमित केले तर आपल्याला त्याचा फायदा देखील होतो. चला तर आता आपण वज्रासन नियमित केल्याने कोणकोणते फायदे होतात ते पाहूया.

  • काही लोकांना अपचनाची समस्या आहे अश्या व्यक्तींनी जर हे आसन नियमित केले तर त्यांची अपचनाची समस्या दूर होते आणि हे आसन आपण जेवल्यानंतर देखील करू शकतो.
  • या आसनाच्या नियमित सरावाने घोटा, पाय आणि गुढघ्याच्या टोप्या मजबूत बनण्यासाठी मदत होते.
  • ज्या स्त्रियांना अनियमित मासिक पाळीचा त्रास आहे अश्या स्त्रियांनी जर नियमित ह्या मुद्रेचा सराव केला तर त्यांची मासिक पाळी नियमित महिन्याला होते.
  • काही लोकांना पोट दुखीच्या समस्या असतात किंवा गॅसची समस्या असते अश्या लोकांनी वज्रासनामध्ये बसल्यानंतर ह्या समस्या लगेच दूर होतात.
  • वज्रासनाच्या नियमित सरावामुळे कंबर आणि नितंब क्षेत्राला आराम मिळते आणि मासिक पाळीच्या वेदानाच्या दरम्यान आराम मिळते.
  • ज्या व्यक्तींना पाठदुखीची समस्या आहे अश्या व्यक्तींनी देखील नियमित वज्रासन केल्यामुळे पाठदुखीची समस्या देखील दूर होण्यास मदत होते.
  • या मुद्रेच्या सरावामुळे गुढघे आणि घोट्याचे सांधे लवचिक बनतात तसेच विशिष्ठ सांधिवाताच्या आजारांना प्रतिबंध करते.
  • मन आणि पाठीचा कणा सरळ आणि ताठ होतो, जास्त प्रयत्न न करता, पाठीमागील नाड्या मध्ये सहज उर्जा प्रवाह सक्षम करतो.

वज्रासन कोणी करू नये

  • ज्या लोकांना पाय, गुढघा, घोटा यामध्ये तीव्र समस्या आहेत अश्या लोकांनी वज्रासन हे आसन डॉक्टरांचा सल्ला घेऊन करावे.
  • मासिक पाळीच्या पाच दिवसामध्ये स्त्रियांनी हे आसन करू नये.
  • ज्या लोकांना हात पायाची हालचाल करताना अडचण येते त्या लोकांनी वज्रासन करू नये.
  • ज्या व्यक्तींना गुढघ्याच्या सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन हे आसन करावा.

आम्ही दिलेल्या vajrasana information in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर व वज्रासन मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या vajrasana yoga information in marathi मध्ये update करू, मित्रांनो हि vajrasana benefits in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये vajrasana information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!