प्रणामासन मराठी माहिती Pranamasana Information in Marathi

pranamasana information in marathi प्रणामासन मराठी माहिती, योग ही एक जुनी कला आहे ज्यामध्ये शरीर मनाशी जोडलेले असते. हा एक प्रकारचा व्यायाम आहे ज्याद्वारे शरीरातील सर्व घटक ध्यान आणि विश्रांतीच्या मदतीने मनाशी जोडले जातात. सध्याच्या दगदगीच्या जीवनामध्ये आणि प्रदूषित जगामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या उद्भवत असतात आणि त्यामुळे आपली तब्येत बिघडते आणि त्यामुळे आपली अनेक कामे रखडली जातात. या आरोग्य समस्यांच्या पासून जर आपल्याला आपला बचाव करून घ्यायचा असेल तर आपल्याला रोज नियमित पण वेगवेगळ्या प्रकारेचे व्यायाम आणि योगासन करणे खूप गरजेचे आहे.

कारण आपण जर नियमितपणे योगा आणि व्यायाम केला तर आपल्याला कोणत्याही प्रकारची आरोग्य समस्या उद्भवणार नाही तसेच योग नियमितपणे सराव करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या जीवनशैलीत कायमस्वरूपी सकारात्मक फरक निर्माण करू शकतो. योगाचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत ते म्हणजे प्राणायाम, अन्लोम विन्लोम, भस्त्रिका, प्रणमासन, पद्मासन, चक्रासन, सवासन, भुजंगासन, वज्रासन आणि इतर असे अनेक प्रकार आहेत.

आणि आज आपण या लेखामध्ये प्रणमासन या विषयी माहिती घेणार आहोत. चला तर आता आपण प्रणमासन हे आसन काय आहे ते कसे करायचे आणि त्यांचे फायदे काय आहेत ते पाहूया. प्रणामासन हा एक योगासनाचा प्रकार आहे आणि हे आसन एक मध्यवर्ती आसन आहे आणि हे आसन सूर्यनमस्काराचा एक भाग आहे.

pranamasana information in marathi
pranamasana information in marathi

प्रणामासन मराठी माहिती – Pranamasana Information in Marathi

प्रनामासना विषयी महत्वाची माहिती – information about pranamasana in marathi

प्रणमासन हा एक योग प्रकार आहे आणि हा योगप्रकार सूर्यनमस्काराचा एक भाग आहे आणि या आसनाला प्रार्थना मुद्रा म्हणून देखील ओळखले जाते. प्रणमासन हे आसन करण्यासाठी खूप सोपे आहे आणि हे आसन आपण उभे राहून किंवा बसून देखील करू शकतो. हे आसन करताना आपल्या हाताचे तळवे हृदयाच्या केंद्रासमोर एकत्र केले जातात आणि खाद्यांना पाठीमागे खाली खेचेले जाते आणि कोपारांना कोपारांना बरगडीच्या पिंजऱ्याच्या बाजूला विश्रांती दिली जाते.

संस्कृत मध्ये प्रणाम म्हणजे जीवन किंवा आत्मा आणि आसन म्हणजे मुद्रा. जर हे आसन नियमित केले तर या आसनाचा आपल्यावर सकारात्मक प्रभाव पडतो आणि मन आणि शरीर शांत होण्यास मदत होते तसेच हे आसन श्वासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि गहन करण्यासाठी वापरला जातो. प्रनामासना हि मुद्रा बहुतेकदा योगाभ्यासाच्या सुरुवातीस किंवा शेवटी केला जातो.

प्रणमासन कसे करायचे – pranamasana steps in marathi

कोणतीही योग मुद्रा करण्यासाठी काही विशेष अशी प्रक्रिया असते आणि त्या प्रक्रीयेनुसार आपण ती योगमुद्रा केली तर आपली मुद्रा चांगल्या प्रकारे होऊ शकते म्हणून आता खाली आपण प्रणमासन कसे करायचे या बद्दल पाहणार आहोत.

 • प्रणमासन करण्यासाठी सर्वप्रथम जमिनीवर चटई किंवा जमखाना अंथरून घ्या.
 • आता तुमचे पाय हे एकत्र करून ताठ उभे रहा.
 • आता दोन्ही हात एकत्र आणा आणि तळवे छातीच्या पातळीवर एकमेकांना स्पर्श करा आणि सरळ पुढे पहा.
 • आता सामान्यपणे श्वास घ्या आणि सोडा आणि असे केल्यामुळे तुम्हाला विश्रांतीची भावना मिळेल.
 • प्रणमासन असे आसन सूर्यनमस्कार घालताना सुरवातीला किंवा शेवटी करावे. सूर्यनमस्काराचा एक भाग म्हणून सराव करताना एक विशिष्ट मंत्र देखील जपला जातो.

प्रणमासन या योगप्रकारचे फायदे – benefits of pranamasana in marathi

आपल्या माहित आहे कि योगामध्ये अनेक प्रकार आहेत आणि त्या वेगवेगळ्या प्रकारांचा वेगवेगळा फायदा आहे तसेच जर आपण प्रणमासन हे आसन नियमित केले तर आपल्या देखील अनेक फायदे होऊ शकतात आणि आज आपण या लेखामध्ये प्रणमासन याचे काय फायदे आहेत ते पाहणार आहोत.

 • प्रणमासन हे भारत आणि अनेक पूर्वेकडील देशांमध्ये अभिवादन करण्याचा सर्वात सामान्य प्रकार म्हणून वापरला जातो.
 • हे सूर्यनमस्कार आसनाच्या मालिकेतील पहिले आणि शेवटचे आसन आहे.
 • हे आसन नियमित केल्याने आपल्या विश्रांती मिळते तसेच एक्रग्रहतेची भावना देखील निर्माण होते.
 • हे आसन नियमित केले तर या आसनाचा आपल्यावर सकारात्मक प्रभाव पडतो आणि मन आणि शरीर शांत होण्यास मदत होते तसेच हे आसन श्वासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी देखील मदत होते.
 • प्रणमासन हे आसन श्वासाचे नियमन करण्यासाठी खूप उपयोगी पडते.
 • छातीचे क्षेत्र उघडते आणि श्वसन प्रणाली सुधारण्यास मदत होते.
 • मांडीचे स्नायू आणि पाठीचा कणा तों तुम्हाला शांत आणि संयमित बनवते आणि तुमच्या हिप आणि गुढघ्याच्या सांध्याचे पोषण करते.
 • या आसनाच्या नियमित सरावाने तुमच्या शरीराची स्थिती सुधारते तसेच खांदे आणि संरेखीत आणि मजबूत करते.
 • जर आपण प्रणमासन हे आसन रोज केले तर आपल्याला रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील मदत होते.
 • तुमच्या आत्म्याला जागृत करण्यास मदत करते तसेच मनातून नकारात्मकता काढून टाकण्यास मदत होते.
 • मांडीचे स्नायू मजबूत बनण्यासाठी मदत होते.

प्रणमासन करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी – things to remember 

 • हे आसान शक्यतो तुम्ही तुम्हाला शक्य असल्यास सकाळी लवकर करा आणि सूर्योदयाच्या वेळी प्रार्थना करण्याचा सराव करा.
 • सूर्याच्या दिशेला किंवा सूर्याकडे तोंड करून या आसनाचा सराव करावा.
 • प्रणमासन हे आसन करताना डोळे बंद करणे आवश्यक असते, त्यामुळे हे आसन करताना डोळे बंद करायला विसरू नका.
 • हे आसन रिकाम्या पोटी म्हणजेच काही न खाता करा.

आम्ही दिलेल्या pranamasana information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर प्रणामासन मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या benefits of pranamasana in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information on pranamasana in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!