कशेडी घाट माहिती Kashedi Ghat Information In Marathi

Kashedi Ghat Information In Marathi कशेडी घाट माहिती फेसाळणारे धबधबे, पावसाने तुडुंब भरून वाहणारी भातखाचरे , आल्हाददायक थंड बोचणारा वारा आणि त्यात अंगावर पावसाच्या कोसळणाऱ्या सऱ्या हे कोणालाही मोहात टाकायला पुरेसा आहे. एखाद्या सौंदर्यवतीला जसे रूपाचे देणे लाभलेला आहे तसंच देखन लेन सह्याद्रीला पण लाभलेले आहे. या सह्याद्रीच्या कुशीत तामिनी घाट, माळशेज घाट, आंबोली घाट असे अनेक घाट आहेत. त्यापैकी आणखी एक प्रसिद्ध घाट म्हणजे कशेडी घाट. मुंबई-गोवा महामार्गावरील हा घाट. कशेडी घाट हा 20 किलोमीटर लांबीचा घाट आहे.

kashedi ghat information in marathi
kashedi ghat information in marathi

कशेडी घाट माहिती – Kashedi Ghat Information In Marathi

कशेडी घाटमाहिती
श्रेणीपश्चिम घाट
लांबीकशेडी घाट हा 20 किलोमीटर लांबीचा घाट आहे.
कोठे आहेमहाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात येतो
पाहण्यासारखी ठिकाणेकुडपण भीमाची काठी, चंद्रगड, मंगळगड, मोरझोत धबधबा, झुलता पूल
रस्ताहा घाट मुंबईगोवा महामार्गावरील आहे.

पावसाळ्याचे दिवस, डोंगरकडे, डोंगरकडा वरून लहान मोठे ओघगळत येणारे धबधबे, वळणावळणाचा रस्ता, सगळीकडे हिरवळ आणि त्यामध्ये असणारे धुके हे सर्व पाहता डोळ्यासमोर येतो तो म्हणजे कशेडी घाट. धोक्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे समोरून येणाऱ्या गाड्याही दिसत नाहीत. कशेडी घाट पाहिल्यानंतर असं वाटते की आकाशातील ढग आणि डोंगररांगा या एकमेकासोबत लपंडाव खेळत आहेत .

डोंगर कड्यावरून उघडत येणारे धबधबे पाहता असे वाटते की कोणीतरी या डोंगर कड्यावर उभा राहून त्यांना दुधाने अंघोळ घालत आहे. आहेत पोलादपूर ओलांडून पुढे गेल्यानंतर लागतो तो काशेदी घाट. पोलादपूर आणि खेड या दोन्ही मध्ये काशेदी घाट येतो. या घाटात आपण टू व्हीलर फोर व्हीलरने जाऊ शकतो. तसेच या घाटातून महाराष्ट्र शासनाच्या बसही आहेत.

हा घाट जितका दिसायला सुंदर मनमोहक अल्हाददायक आहे तितकाच अपघाती आहे. या घाटात वाहनांची नेहमीच गर्दी असते. या घाटांचा रस्ता वळणावळणाचा असल्यामुळे येथे भरपूर अपघातही होतात. त्यामुळे या घाटातून प्रवास सावधगिरीने करावा.

कशेडी घाट बोगदा :

कशेडी घाट हा चढून उतरण्यासाठी कमीत कमी अर्धा-पाऊण तास लागतो. म्हणून सरकार कशेडी घाटावर एक बोगदा बनवणार आहेत. हा बोगदा बनवल्यानंतर आपण हा घाट दहा मिनिटांमध्ये पार करू शकतो. मुंबई-गोवा महामार्गावरील काशेदी घाटातील बोगद्याची सुरुवात खेड तालुक्यातील कशेदी गावातून होणार आहे. हा बोगदा कशेडी ला सुरु होऊन भोगावला पूर्ण होणार आहे. 

या बोगद्याचा फायदा असा होईल की काशेदी घाट वळणावळणाचा असल्यामुळे तिथे भरपूर अपघात होतात हे अपघात या बोगद्यामुळे कमी होऊ लागतील. या बोगद्यामुळे वाहनांची गर्दी कमी होऊन अपघाताचे प्रमाणही कमी होईल. हा बोगदा दोन प्रकारे बनवणार आहेत.एक जाण्यासाठी तर दुसरा परत येण्यासाठी.

हा बोगदा बनवण्यासाठी सरकारकडून 745 करोड रुपये मंजूर झालेले आहेत. या बोगद्याच्या आत मध्ये फुटपाथ बनवण्यात आली आहे. हा बोदगा पुढील एक वर्षामध्ये बांधून तयार होईल असे तेथील लोक म्हणतात. आणि या बोदग्यामुळे लोक सर्व पर्यटकांना हा घाट पार करणे सोयीस्कर होईल.

कशेडी घाट फोटो:

kashedi ghat
kashedi ghat

पोलादपूर  :

पोलादपूर नेहमीच पर्यटकांसाठी आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. पोलादपूर मध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. झुलता पूल, मोरझोतचा धबधबा चंद्रगड, मंगळगड, भीमाची काठी,  कुडपण अशी अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. त्यामुळे पोलादपूर मध्ये नेहमीच पर्यटकांची ये-जा असते.

झुलता पूल :

पोलादपूर पासून नऊ किलोमीटर अंतरावर झुलता पूल आहे. पोलादपूर तालुक्यातील घागरकोंड या गावांमध्ये असणारा झुलता पूल हे त्या गावाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. हा झुलता पुल सावित्री नदीवर बांधला आहे. सावित्री नदी त्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सावित्री नदीच्या नदीपात्रातील धबधबा. हा पांढराशुभ्र धबधबा व झुलता पूल पाहण्यासाठी पर्यटकांची येथे नेहमीच गर्दी असते.

मोरझोत धबधबा:

पोलादपूर तालुक्यात पावसाळ्यामध्ये अनेक धबधबे पाहायला मिळतात .चंद्रगडमध्ये तानाजी मालुसरे यांचे जन्मगाव उमरठ आहे. उमरठ येथे नरवीर तानाजी मालुसरे व शेलार मामा यांची समाधी आहे. या समाधीचे दर्शन घेऊन पर्यटक पुढे जातात. उमरठ पासून गाडीने दहा-पंधरा मिनिटे पुढे आल्यानंतर आणखी एक पर्यटन स्थळ पाहायला मिळते ते म्हणजे मोरझोत धबधबा.

हा धबधबा पोलादपूर पासून 19 किलोमीटर अंतरावर आहे. मोरझोत धबधबा खोपट गावाजवळ असल्यामुळे याला खोपडचा मोरझोत धबधबा असे म्हणतात. हा धबधबा दोनशे ते अडीचशे फूट उंचावरून खाली कोसळतो. या धबधब्याच्या आजूबाजूचा परिसर मस्त झाडांनी वेढलेला आहे. वरून पडणारा पांढराशुभ्र धबधबा दिसायला खूप सुंदर आहे.

या धबधब्याजवळ एक गुहा आहे.हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची खूप गर्दी असते. महाड,पोलादपूर या ठिकाणाहून पर्यटक येतात तसेच मुंबई पुणे इथून येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप असते. आणी पावसाळ्यामध्ये हा धबधबा खूप सुंदर दिसतो. पावसाळ्यात जसं जसे पावसाचे प्रमाण वाढत जाते. तसे या धबधब्याचा आकारही वाढत जातो. धबधब्याचे दिसणारे ते दृश्य खूप मनमोहक आहे.

मंगळगड :

या गडाची उंची 664 मीटर इतकी आहे.या गडाची स्थापना 1170 मध्ये झाली. हा गिरीदुर्ग प्रकारचा गड आहे.

चंद्रगड :

चंद्रगडाला ढवळगड असेही म्हणतात. या गडाची उंची 2337 मीटर आहे. हा गिरीदुर्ग गड आहे. सह्याद्रीच्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधले गेले त्यापैकी हा एक ढवळगड आहे.

कुडपण भीमाची काठी :

कुडपणला मिनी महाबळेश्वर म्हणून देखील ओळखला जातो. निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या सह्याद्रीच्या कुशीतील कुडपण हे गाव सातारा, रत्नागिरी आणि रायगड या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. महाराष्ट्र शासनाकडून कुडपण या गावाला पर्यटन स्थळाचा दर्जाही देण्यात आला आहे. भीमाची काठी आणि कुडपण धबधबा हा येथील विशेष आकर्षण आहे. सर्वत्र पसरलेली हिरवळ, दाट धुक डोंगर कड्यावरून वाहत जाणारा धबधबा आणि भीमाच्या काठीची भव्यता हे सर्व पाहून मनाला एक वेगळाच आनंद मिळतो.

खेड :

खेड हा पुणे जिल्ह्यातील एक तालुका आहे. खेड तालुक्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. खेड तालुक्यातील भालचंद्र येथे अनेक कोरीव लेण्या आहेत. तसेच कुंडेश्वर, शिंगी, वरसुबाई या शिखर देवता आहेत. शिंगी शिखर हे खेड तालुक्यातील सर्वात उंच शिखर आहे. या शिखराची उंची 1293 मीटर आहे. तसेच खेड तालुक्यात अनेक डोंगररांगा, धबधबे पाहण्यासारखे आहेत हे पाहण्यासाठी पर्यटक नेहमीच उत्सुक असतात.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, कशेडी घाट kashedi ghat information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about kashedi ghats in maharashtra in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही कशेडी घाटा विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या kashedi ghat माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही information of kashedi ghat in marathi त्यामध्ये नक्की बदल करू.  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “कशेडी घाट माहिती Kashedi Ghat Information In Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!