Mi Pahilele Vidnyan Pradarshan Essay in Marathi – Essay on Visit to an Exhibition in Marathi मी पाहिलेले विज्ञान प्रदर्शन मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये मी पाहिलेले विज्ञान प्रदर्शन या विषयावर निबंध लिहिणार आहोत. आपण निबंधाला सुरुवात करण्याअगोदर विज्ञान प्रदर्शन म्हणजे काय ते पाहूया, विज्ञान प्रदर्शन म्हणजे वैज्ञानिक प्रकारची उपकरणे, यंत्रे, साधने जे कार्यक्रमामध्ये प्रदर्शित केली जातात त्याला विज्ञान प्रदर्शन म्हणतात. चला तर आता आपण मी पाहिलेले विज्ञान प्रदर्शन या विषयावर निबंध कसा लिहायचा ते पाहूयात.
मी पाहिलेले विज्ञान प्रदर्शन मराठी निबंध – Mi Pahilele Vidnyan Pradarshan Essay in Marathi
Essay on Visit to an Exhibition in Marathi
विज्ञान प्रदर्शन भरवणे हे महत्वाचे आहे कारण हे तरुण पिढीला विज्ञानाच्या मार्गाकडे नेते म्हणजेच या प्रकारच्या प्रदर्शनामुळे तरुणांच्या मनामध्ये विज्ञानाबद्दल आवड निर्माण होते आणि जर मुलांच्यामध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण झाली तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारची विज्ञानाविषयाची माहिती जाणून घेण्यास आवडते तसेच ते नवी नवीन गोष्टी करण्यास प्रोत्साहित होतात आणि म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारची विज्ञान प्रदर्शन भरवणे गरजेचे असते.
त्यामुळे ज्या मुलांना आवड आहे ती काहीतरी नवीन कल्पना घेवून स्पर्धेमध्ये किंवा प्रदर्शनामध्ये येतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या कल्पना मिळतात तसेच लोकांना देखील वेगळ्या प्रकारची माहिती मिळते आणि माहिती घेणाऱ्या व्यक्तीला ते चांगल्या प्रकारे समजू शकते तसेच त्यांना ते समजावून घेन्यासाठी मनोरंजक देखील वाटेल कारण विज्ञान प्रदर्शनामध्ये संबधित प्रकल्पाची प्रातेक्षित दाखवली जातात.
आयुष्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची अनेक प्रदर्शने बघितली असतील आणि आणि अनेक वेग वेगवेगळ्या विषयांच्यावरील असतात पण आपण आयुष्यामध्ये पाहिलेले विज्ञान प्रदर्शन हे आपल्याला खास लक्षात राहते. मी शाळेमध्ये असताना आणि कॉलेजमध्ये असताना अनेक विज्ञान प्रदर्शन पहिली पण त्यातील एक हे खूप चांगले आठवणीत राहिलेले आणि या प्रदर्शनामध्ये मला विज्ञानाविषयी काही गोष्टी शिकण्यास मिळाल्या होत्या.
आमच्या शाळेमध्ये २५ आणि २६ जानेवारी या दोन दिवशी एक “विज्ञान आणि तंत्रज्ञान” या सर्व विषयांच्यावर एक विज्ञान प्रदर्शन भरवले होते ज्यामध्ये मुलांनी आणि भागातील तुरुनांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प बनवले होते आणि प्रदर्शनामध्ये जवळ जवळ ६५ ते ७० प्रकल्प होते. २५ जानेवारीला सकाळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले आणि मग ते पाहुणे काही प्रकल्पाजवळ जाऊन त्या प्रकल्पा विषयी माहिती विचारू लागले आणि मग ज्या मुलांनी तो संबधी प्रकल्प बनवला आहे. त्या विद्यार्थ्यांनी त्या प्रकल्पाविषयी माहिती दिली आणि प्रकल्प कसा काम करतो या बद्दल सांगितले.
त्यावेळी प्रमुख पाहुण्यांनी तेथील प्रत्येक सहभाग घेणाऱ्या व्यक्तीचे कौतुक केले. शाळेमध्ये जी प्रदर्शने होतात ती फक्त मुलांना विज्ञाना विषयी आपुलकी आणि आवड निर्माण होण्यासाठी आणि आपल्याला जगण्यासाठी तसेच वेगवेगळ्या कारणासाठी विज्ञानाची गरज कशी लागते हे सांगण्यासाठी विज्ञान प्रदर्शन भरवली जातात आणि आमच्या शाळेमध्ये देखील विज्ञान प्रदर्शन भरवण्याचे हेच कारण होते कि मुलांना आणि आमच्या शाळेच्या आजुबाजुतील गावामधील तरुणांच्या मनामध्ये विज्ञान विषया बद्दल आवड निवडावे.
ह्या विज्ञान प्रदर्शनामध्ये सगभागी लोकांनी अनेक प्रकारचे प्रकल्प बनवले जसे कि तंत्रज्ञान, हरित उर्जा, जैवविविधता, वाहतूक, दळण वळण, पर्यावरण, गणितीय प्रकल्प, आरोग्य आणि कृषी यासारख्या अनेक वेगेवगळ्या विषयांच्यावर हे प्रदर्शन भरले होते आणि ते सहभागी व्यक्ती त्यांचे प्रकल्प पाहायला जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते सांगत होते.
त्याचबरोबर मी देखील हे प्रदर्शन अगदी तास ते दीड तास फिरून पहिले आणि ज्या प्रकल्पाविषयी मला अजूनही माहित नाही आणि जे प्रकल्प माझ्यासाठी नवीन आणि ज्या विषयांच्या बद्दल आवड आहे तिथे थांबून त्या प्रकल्पाचे चांगल्या प्रकारे निरीक्षण करून आणि त्या संबधित प्रकल्पाची पाहणी करून माझ्या मनामध्ये आलेल्या शंका आणि प्रश्न मी त्या प्रकल्प बनवलेल्या विद्यार्थ्याला विचारल्या आणि आणि त्याने मला समजेल अशी उत्तरे त्याच्या प्रकल्पाविषयी सांगितली.
अश्या प्रकारे असे ५ ते ६ प्रकल्प अश्या प्रकारे निरखून पहिले आणि त्याचा थोड्या प्रमाणात अभ्यास केला आणि त्या सहभागी व्यक्तींच्याकडून समजावून घेतला. अश्या प्रकारे मला त्या प्रदर्शनातील जैवविविधता, पर्यावरण आणि हरित उर्जा या विषयावरील प्रकल्प खूप आवडले आणि या विषयावरील प्रकल्पाचे मी खूप निरीक्षण केले. विज्ञान प्रदर्शन हे २ दिवस भरले होते आणि मी माझ्या मित्रांच्या सोबत दोनही दिवस प्रदर्शन पाहण्यासाठी गेलो होतो आणि मी पहिल्या दिवशी प्रदर्शनातील काही प्रकल्प पाहायचे राहिले होते ते देखील पहिले.
आमच्या शाळेतील हे प्रदर्शन पाहण्यासाठी पंचक्रोशीतील अनेक विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रेमी व्यक्तींनी गर्दी केली होती आणि विज्ञान प्रदर्शन पाहायला येणाऱ्या मधील काही व्यक्ती उत्सुकतेने प्रदर्शन पाहत होते. अश्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकल्पांनी आमच्या शाळेतील प्रदर्शन हे खुलून आले होते आणि लोकांनी गर्दी, विद्यार्थ्यांची आणि प्रदर्शनामध्ये सहभागी होणाऱ्या मुलांची धावपळ आणि लोकांना आपल्या प्रकल्पा विषयी समजावून सांगणे चालूच होते.
अश्या प्रकारे आमच्या शाळेमध्ये चाललेले दोन दिवसाचे प्रदर्शन संपले आणि त्यामुळे खूप काही शिकायला मिळाले तसेच माझ्या मनामध्ये विज्ञाना विषयी आवड निर्माण झाली तसेच मला विज्ञाना विषयी अधिक गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्साह वाटू लागतात. जर विज्ञानाविषयी आपल्या भागातील तरुणांच्या मनामध्ये आवड निर्माण करायची असेल तर आपल्या पंचक्रोशीमध्ये असणाऱ्या शाळांच्यामध्ये तसेच कॉलेजमध्ये विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम राबवणे हे खूप गरजेचे आहे त्यामुळे तरुणांच्या मनामध्ये विज्ञान विषयी जागृकता निर्माण होईल अनिया अश्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये विज्ञानाचे काय महत्व आहे ते देखील पटेल.
आम्ही दिलेल्या mi pahilele vidnyan pradarshan essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर मी पाहिलेले विज्ञान प्रदर्शन मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Essay on Visit to an Exhibition in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट