माझा आवडता फूल निबंध My Favourite Flower Essay in Marathi

My Favourite Flower Essay in Marathi माझा आवडता फूल निबंध आज आपण या लेखामध्ये फुल (flower essay) या विषयावर निबंध लिहिणारा आहोत. फुल हे कोणाला माहित नाही तर हे सर्वांना माहित आहे आणि हे आपण वेगवेगळ्या कारणासाठी वापरतो. जगामध्ये बघायला गेले फुलाचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत तसेच जगभरामध्ये वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या सुगंधामध्ये, आणि दिसायला वेगवेगळी आणि सुंदर असतात. फुले हि मानवाला मिळालेली अशी एक निसर्ग देणगी आहे ज्यामुळे आपण जर फुलांची झाडे आपल्या घराच्या परिसरामध्ये लावले तर आपल्या घराच्या परिसराचे सौंदर्य अधिक खुलून येते तसेच वातवर स्वच्छ आणि सुगंधित होते.

अनेक वेगवेगळ्या फुलांचा वापर हा वेगवेगळ्या कारणासाठी केला जातो जसे कि काही फुले हि शोभेची फुले म्हणून वापरली जातात तसेच काही फुले अनेक मोठ मोठ्या कार्यक्रमांच्या सजावटीसाठी वापरली जातात तसेच फुलांचा वापर हा हार बनवण्यासाठी तसेच मंदिरामध्ये तसेच घरातील देवांच्या पूजेसाठी वापरली जातात.

तसेच फुलांचा वापर हेयर स्टाईल मध्ये वापरली जातात आणि तसेच अनेक फुलांचा वापर अनेक वेगवेगळ्या कारणासाठी होतो आणि फुलांच्या विषयी आपण खाली सविस्तर माहिती घेणार आहोतच. चला तर मग आता आपण फुल या विषयावर निबंध लिहुयात.

my favourite flower essay in marathi
my favourite flower essay in marathi

माझा आवडता फूल निबंध – My Favourite Flower Essay in Marathi

Flower Essay in Marathi

फुल हि एक देवाने मानवाला दिलेली एक नैसर्गिक संपत्ती आहे ज्यामुळे निसर्गाचे तसेच आपल्या अवती भोवतीचे सौंदर्य वाढते. लोकांना वेगवेगळ्या प्रकारची फुलाची झाडे लावून त्यांच्या घराबाहेरचा परिसर हा सुंदर करण्यास आवडते तसेच अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांच्या बागा करतात. वेगवेगळ्या प्रकारची फुले हि त्यांच्या दिसण्याने आणि त्यांच्या सुगंधाने आकर्षित करतात आणि प्रत्येक फुलाला त्याचा त्याचा सुगंध असतो आणि काही फुलांचा सुगंध हा जास्त उग्र असतो तर काही फुलांचा वास हा जास्त उग्र नसतो.

उग्र फुले सांगायची म्हटली तर गुलाब, मोगरा, निशिगंधा, सोनचाफा या फुलांना उग्र वास असतो आणि या फुलांना उग्र वास असल्यामुळे हि फुले वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट बनवण्यासाठी होतो. जास्त सुगंधित असणारी फुले परफ्युम, साबण, तेल, अगरबत्ती, धूप या सारखे प्रोडक्ट बनवण्यासाठी जास्त सुगंधित फुलांचा वापर केला जातो. तसेच काही फुलांच्यामध्ये औषधी गुणधर्म असतात आणि यामुळे या फुलांचा वापर हा औषधी फुल म्हणून केला जातो.

वेगवेगळ्या प्रकारची फुले हि वेगवेगळ्या कारणासाठी वापरली जातात जसे कि गुलाब हे पाहताच क्षणी सर्वांना मोहून टाकणारे अतिशय सुंदर आणि सुंगंधी फुल आहे. या फुलांचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे त्याचे उत्पादन हि मोठ्या प्रमाणात होते व त्याचा व्यापार हि मोठ्या प्रमाणात होतो तसेच भारतातील गुलाबांच्या फुलांची निर्यात हि मोठ्या प्रमाणात होते.

गुलाब हे विविध प्रकारचे व रंगांचे असतात. गुलाब हे मैत्रीचे, प्रेमाचे आणि शांततेचे प्रतिक आहे असे म्हटले जाते त्याचबरोबर वेगवेगळ्या रंगांचे गुलाब वेगवेगळ्या भावना दर्शविते असेही म्हटले जाते. गुलाबाचा उपयोग हा आपल्या प्रिय जणांना भेट देयासाठी केला जातो तसेच फुलांचा उपयोग हा सजावटीसाठी, हेयर स्टाईल साठी देखील केला जातो.

Essay on Mogra Flower in Marathi

तसेच अजून एक लोकप्रिय आणि जास्त वापरले जाणारे फुल म्हणजे मोगरा, मोगरा म्हंटल कि त्याच्या अत्यंत सुगंधित सुवासाची आठवण होतेच अश्या या सुगंधित फुलाचा उगम भारतामध्ये झाला. मोगरा या फुलाचा उपयोग अरोमा थेरपी करण्यासाठी केला जातो कारण मोगऱ्याच्या सुगंधामुळे मनाला शांती मिळते आणि उत्साह मिळतो तसेच या फुलांचा उपयोग अत्तरे, सुवासिक साबण, अगरबत्ती, सुगंधित धूप तसेच सुगंधीत मेणबत्या तयार करण्यासाठी होतो.

त्याचबरोबर या फुलांचा मुख्य उद्देश म्हणजे या फुलांच्या पासून बनवलेला गजरा हा भारतातील स्त्रिया हेयर स्टाईलसाठी वापरली जातात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये डोळ्यांना रखरख वाटत असेल तर हि फुले ४ ते ५ फुले पाण्यामध्ये बुडवून ५ मिनिटासाठी डोळ्यावर ठेवावीत डोळे लगेच शांत होतील. आपल्याला झेंडू या फुलांची ओळख करून देण्याची काहीच गरज नाही कारण झेंडूची फुले हि भारतामध्ये लोकप्रिय आहेत आणि ह्या फुलांचा वापर हा खूप पूर्वीच्या काळापासून केला जात आलेला आहे.

झेंडू हे असे फुल आहे ज्याला मोठ्या प्रमाणात पाकळ्या असतात या फुलावर पाकळ्यांचे ठार असतात आणि फुलाच्या आतल्या भागातील पाकळ्या ह्या थोड्या छोट्या आकाराच्या असतात आणि वरील पाकळ्या मोठ्या आकाराच्या असतात. झेंडूची फुले जास्तीत जास्त केशरी किंवा पिवळ्या रंगाची असतात. झेंडू हा फुलाचा प्रकार १२ महिने वाढणारे फुल असून हि फुले सणांना, सजावट करण्यासाठी, घरामध्ये पूजा करण्यासाठी, मंदिरातील पूजेसाठी अश्या वेगवेगळ्या कारणासाठी वापरली जातात.

ज्यावेळी आपण झेंडूची फुले वापरून सजावट करतो त्यावेळी ती केलेली सजावट पारंपारिक वाटते. कमळ हे एक सुंदर दिसणारे फुल आहे आणि हे आपल्या सर्वांच्याच ओळखीचे किंवा परिचयाचे आहे कारण हे फुल आपण विशेषता लक्ष्मीच्या पूजेसाठी करतो. कमळ हे भारताचे राष्ट्रीय फुल आहे. अशा प्रकारे अनेक फुले आहेत जसे कि जाई, जुई, शेवंती, निशिगंधा, सोनचाफा, ट्युलिप, डेलिया, जास्वंदी, अस्टर, सुर्यफुल यासारखी फुले जगामध्ये आहेत आणि या फुलांच्या मुले नैसर्गिक सौंदर्य वाढते.

फुले हा आपल्या सभोतालचा एक सुंदर महत्वाचा भाग आहे आणि फुलांचा वापर हा प्राचीन काळापासून वापर केला जातो. सध्या आपण पाहतो कि मोठ मोठ्या कार्यक्रमांच्यामध्ये म्हणजेच लग्न, रिसेप्शन, संगीत सेरेमणी या सारख्या कार्यक्रमांना फुलांची सजावट केली जाते जसे कि गुलाब, ऑर्किड, झेंडू, लिली, कार्नेशन, जरबेरा यासारखी फुले सजावटी साठी वापरली जातात.

तसेच सध्या स्त्रिया हेयर स्टाईल मध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारची फुले वापरतात जसे कि मोगरा, गुलाब, पाणसी, जिप्सी ( babys breath ), ऑर्किड, जास्मिन या सारखी अनेक फुले हेयर स्टाईल साठी वापरली जातात तसेच देव पूजेसाठी मंदिरामध्ये जी फुले उपयोगी होतात ती म्हणजे झेंडू, शेवंती, जास्वंदी, गुलाब आणि कमळ यासारखी अनेक फुले देव पूजेसाठी वापरली जातात.

अशा प्रकारे कोणत्याही कार्यक्रमाचे, आपल्या आजूबाजूचे सौंदर्य वाढवण्यासाठी तसेच आपले सौंदर्य वाढवण्यासाठी फुलांचा वापर केला जातो आणि भारतामध्ये फुलांना अनेक गोष्टींच्यामध्ये महत्व आहे.

आम्ही दिलेल्या my favourite flower essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझा आवडता फूल निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on mogra flower in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on tulip flower in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये lotus flower essay in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!