नारायण सुर्वे यांची माहिती Narayan Surve Information in Marathi

Narayan Surve Information in Marathi नारायण सुर्वे यांची माहिती मराठी साहित्य क्षेत्रामध्ये अनेक नावाजलेले साहित्यिक होऊन गेले ज्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून आपले प्रबोधन विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. नारायण गंगाराम सुर्वे हे मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी होते. मार्क्सवादी विचारांचा पगडा असलेल्या नारायण सुर्वे यांनी आपल्या लेखणी मधून समाजाच परिवर्तन करण्याचे काम केले. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना “पद्मश्री” सारख्या सर्वश्रेष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आजच्या ब्लॉग मध्ये आपण नारायण सुर्वे या प्रसिद्ध मराठी कवी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Narayan Surve Information in Marathi
Narayan Surve Information in Marathi

नारायण सुर्वे यांची माहिती – Narayan Surve Information in Marathi

पूर्ण नाव नारायण सुर्वे
जन्म१५ ऑक्टोबर १९२६
राष्ट्रीयत्व भारतीय
ओळख मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी
राष्ट्रीय पुरस्कारपद्मश्री पुरस्कार
मृत्यू१६ ऑगस्ट २०१०

जन्म

नारायण सुर्वे यांचा जन्मा १५ ऑक्टोबर १९२६ रोजी झाला. जन्माला येताच ते पोरके झाले रस्त्यावर अनाथ म्हणून वावरू लागले. मुंबई येथील इंडिया वूलून मिल गिरणीमध्ये काम करणारे गंगाराम सुर्वे यांनी नारायण यांना अनाथ जीव म्हणून आपल्या घरी आणले. गंगाराम यांची पत्नी काशीबाई त्याच गिरणी मध्ये बाइंडिंग खात्यात काम करत होत्या त्यांनी नारायण यांना आपल्या पोटच्या मुलासारखं प्रेम देऊन लहानाचं मोठं केलं.

नारायण अनाथ असल्यामुळे त्यांच नाव पत्ता काहीच माहित नव्हत. म्हणून गंगाराम सुर्वे यांनी नारायण यांना नाव देऊन त्यांच्या नावापुढे आपलं नाव लावलं. नारायण यांचे बालपण तसं गरीबीत गेलं. परळच्या चाळींमध्ये ते लहानाचे मोठे झाले. घराची परिस्थिती हालाखीची होती घरामध्ये दोन घास मिळायचे वांदे होते.

तरी नारायण यांचं पालन-पोषण करण्यामध्ये त्यांच्या आईवडिलांनी कोणतीही कसर दाखवली नाही. त्यांना लिहिता वाचता यावं म्हणून दादर येथील अप्पर माहिम मराठी महापालिका शाळेमध्ये दाखला नोंदवून दिला. या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर नारायण सुर्वे स्वतःच्या हिमतीवर शिकू लागले. त्यांचे आई-वडील मूळचे कोकणातले होते आणि ते फारसे वयस्कर ही होते.

नारायण थोडे मोठे झाल्यावर त्यांच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवून मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये एकटा सोडून ते दोघं आपल्या खऱ्या घरी म्हणजेच कोकणात निघून गेले. त्यानंतर नारायण यांच्या भविष्याची दोर त्यांच्या स्वतःच्या हातात होती. मिळेल ते काम करून नारायण यांनी स्वतःच शिक्षण पूर्ण केलं.

एका सिंधी कुटुंबात घरगडी बनले तर, कधी हॉटेलात कपबश्या विसरणारा पोर्या बनले, कोणाचे कुत्रे सांभाळले तर कोणाची लहान मुले सांभाळण्याचं काम केलं, इतकच नव्हे तर घरोघरी दूध टाकण्याची ही कामं केली. गोदरेजच्या कारखान्यांमध्ये पत्रे उचलण्याचं काम केलं, टाटा ऑइल मिलमध्ये हमाली देखील केली. इतकं सगळं होत असताना दुसऱ्या बाजूने त्यांनी शिक्षण सुरू ठेवलं.

मुंबई महापालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून नोकरी देखील केली. आणि पुढे त्याच शाळेत १९६१ साली शिपायाचे शिक्षक झाले. नारायण यांना लहानपणापासूनच फार काबाडकष्ट करावे लागले मिळेल ते काम करून स्वतःच्या जिवावर शिपायापासून शिक्षक पर्यंत जाऊन पोहोचले. महापालिकेच्या नायगाव शाळेमध्ये शिक्षक म्हणून सेवा देण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून ते गिरणगावाचे सुर्वे मास्तर म्हणून ओळखले जाऊ लागले.

साहित्यक्षेत्रात पहिलं पाऊल – Narayan Surve Poems in Marathi

लहानपणापासून वेगवेगळ्या परिस्थितीचा सामना करून आयुष्याने वेगवेगळ्या दिशा दाखवल्या होत्या. समोर येणारी प्रत्येक परिस्थिती नारायण सुर्वे यांना आयुष्याचे धडे देऊन गेली. इसवी सन १९५८ मध्ये नवयुग मासिकांमध्ये त्यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली “डोंगरी शेत माझं ग” हे गाजलेलं पहिलं गाणं होतं.

स्वतःच्या हिंमतीवर वाचण्यास लिहण्यास शिकले आणि १९६२ साली नारायण सुर्वे यांचा पहिला कवितासंग्रह “ऐसा गा मी ब्रम्ह” प्रकाशित झाला आणि ह्या काव्यसंग्रहाला राज्य सरकारचा पुरस्कार देखील मिळाला. परंतू आयुष्यामध्ये इतकं पुढे येऊन देखील कष्ट आणि दारिद्र्य काही संपलं नव्हतं. कम्युनिस्ट चळवळीमध्ये नारायण सुर्वे यांनी सहभाग घेतला.

रेडगार्ड बनले होते. या चळवळीतील एक कॉम्रेड तळेकर यांच्या भाचीवर नारायण सुर्वे यांचे प्रेम झालं आणि आई-बापाविना वाढलेल्या या कृष्णा साळुंखे हिच्याशी नारायण सुर्वे यांची लग्नगाठ बांधली गेली. खार जवळच्या एका झोपडपट्टीमध्ये संसार उभा केला. मोठा मुलगा बावीस दिवसांचा असताना ही झोपडपट्टी मोडण्यात आली.

आठ दिवस आपल्या बायकोला आणि पोराला घेऊन त्यांनी रस्त्यावर संसार केला. आयुष्यामध्ये असेही दिवस बघायला मिळाले परंतु आयुष्याचं त्यांनी कधी भांडवल केलं नाही. त्यांनी लहानपणापासून अनेक वेगवेगळ्या परिस्थितींचा सामना केला परंतु त्यांच्या कवितांमधून त्यांनी ते कधीच व्यक्त केलं नाही. त्यांच्या विचारांवर मार्क्सचा पगडा होता.

त्यामुळे त्यांच्या कविता देखील संबंधित पाहायला मिळायच्या. हळूहळू सुर्वे यांच्या आयुष्याला नवी दिशा प्राप्त झाली. त्यांचे वेगवेगळे काव्यसंग्रह रसिकजनांच्या मनामध्ये घर करू लागले. “ऐसा गा मी ब्रम्ह” नंतर “जाहीरनामा”, “नव्या माणसाचे आगमन”, “पुन्हा एकदा कविता”, “माझे विद्यापीठ”, “सनद” ही प्रसिद्ध काव्यग्रंथ नारायण सुर्वे यांची आहेत. नारायण सुर्वे यांचे पहिलं काव्यवाचन कुसुमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली मडगाव येथील साहित्य संमेलनात झालं.

आयुष्यातील सत्य परिस्थिती त्यांनी कधीच आपल्या लेखणी मध्ये उतरवली नाही. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगामुळे त्यांचा वैचारिक विकास होऊ लागला. नालबंद्वाला याकूब, चंद्रा नायकीण, दाऊद शिगवाला, हनम्या, इस लय्, पोटाची खळगी भरण्यासाठी सह्याद्रीचा कडा उतरून मुंबईत कामधंद्याच्या शोधात आलेला व समुद्राच्या तीरावर झुंजत मरण पावलेल्या कष्टकरी मुलाचा बाप, आपल्या तारुण्यातील पराक्रम मुलाला ऐकवणारा वृद्ध पीता, गोदी वर काम करणारा आफ्रिकन चाचा, पंडित नेहरूंचे निधन झाले.

म्हणून धंदा बंद ठेवणारी सुंद्री वेश्या यासारखी अनेक वेगवेगळी व्यक्तिचित्रे नारायण सुर्वे यांनी अत्यंत समर्पक पणे व रेखीवपणे आपल्या समोर उभी केली. “मास्तर तुमचं नाव लिवा”, “असं पत्रात लिवा”, “सर कर एक एक गड”, “मनिऑर्डर”, “मुंबईची लावणी”, “गिरणीची लावणी” या नारायण सुर्वे यांच्या गाजलेल्या कविता आहेत.

आपल्या कवितांच्या माध्यमातून त्यांनी कधीच समाजातील उच्च नीचता किंवा जातीविषयक उल्लेख केला नाही. त्यांच्या पर्वा मध्ये त्यांनी समाजाला नवीन दृष्टी देण्याचा प्रयत्न केला. साहित्य क्षेत्रात पदार्पण केल्यावर नारायण सुर्वे यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि समाजाला नवी दृष्टी. त्यांचं साहित्य क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.

त्यातीलच काही नावाजले पुरस्कार म्हणजे “कुसुमाग्रज प्रतिष्ठान जनस्थान पुरस्कार” इसवी सन २००४ मध्ये नारायण सुर्वे यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर मध्य प्रदेश सरकारचा “कबीर पुरस्कार”. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर हाल-अपेष्टा सहन करणारे नारायण सुर्वे यांना इसवी सन १९९८ मध्ये “पद्मश्री” पुरस्कार जो भारतातील सर्वोच्च पुरस्कारां पैकी एक मानला जातो.

या सारख्या महान पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या नंतर सोव्हिएत रशियाचा नेहरू अवॉर्ड त्यांना प्राप्त झालं. महाराष्ट्र राज्यातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या साहित्य व संस्कृती मंडळाचा नरसिंह मेहता पुरस्कार देऊन नारायण सुर्वे यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर कराड साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले.

नारायण सुर्वे यांच्या नावाचे पुरस्कार

ते म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग. इच्छा तीव्र असली की ती पूर्ण करण्याचा मार्ग आपोआप सापडतो नारायण सुर्वे यांनी साहित्य क्षेत्रामध्ये आपलं पाऊल ठेवण्याचे निर्णय घेतला आणि काळानुसार साहित्य क्षेत्रात सातत्याने एकच नाव पुढे येऊ लागलं. या क्षेत्रातील मान्यवरांनी देखील नारायण सुर्वे यांचे कौतुक केल.

त्यांच्या विचारांचं, साहित्याचं कौतुक केलं. कठोर वास्तव्याशी झुंज देणारे नारायण सुर्वे यांनी आपल्या स्वबळावर प्रसिद्ध साहित्यिक म्हणून नाव कमावलं. आज नारायण सुर्वे यांच्या नावाने साहित्य क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या साहित्यिकांना पुरस्कार प्रदान करण्यात येतात. नारायण सुर्वे यांच्या नावाचे पुरस्कार खालीलप्रमाणे “रयत शिक्षण संस्थेतर्फे नारायण सुर्वे जीवन गौरव पुरस्कार”, “पद्मश्री नारायण सुर्वे जीवन गौरव पुरस्कार”, “नारायण सुर्वे काव्यप्रतिभा पुरस्कार”.

मृत्यू

श्री नारायण सुर्वे हे एकोणिसाव्या शतकातील प्रसिद्ध मराठी कवी होते. आपल्या कवितांच्या माध्यमातून त्यांनी समाजपरिवर्तनाचं कार्य केलं. १६ ऑगस्ट २०१० रोजी नारायण सुर्वे यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रामध्ये मोठी खळगी निर्माण झाली. देशपांडे यांच्यासारखे ज्येष्ठ साहित्यिक देखील नारायण सुर्वे यांच्यावर असे म्हणाले, “अरे केशवसुत कशाला शोधताय? तुमचा केशवसुत परळ मध्येच राहतोय”.

आम्ही दिलेल्या narayan surve information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर नारायण सुर्वे यांची माहिती मराठी narayan gangaram surve बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या narayan surve poems in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of narayan surve in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये information about narayan surve in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

3 thoughts on “नारायण सुर्वे यांची माहिती Narayan Surve Information in Marathi”

  1. माहिती चांगली आहे. पण सुर्वे हे एकोणिसाव्या नव्हे तर विसाव्या शतकातील कवी होते. दुरुस्ती करावी,

    उत्तर
  2. त्यांचे कुटुंब सद्या नेरळ, तालुका कर्जत,जिल्हा. रायगड येथे वास्तव्य करत आहे.

    त्यांच्या घराचे नाव खूप लक्ष वेधून घेते.
    “पद्मश्री नारायण सुर्वे यांचे विद्यापीठ “

    उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!