पूर्वोतानासन मराठी माहिती Purvottanasana Information in Marathi

purvottanasana information in marathi पूर्वोतानासन मराठी माहिती, नियमितपणे योग आणि व्यायाम करणे हि काळजी गरज बनली आहे कारण सध्या जगामध्ये वातावरणच तसे बनले आहे म्हणजेच सध्या जगामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारे प्रदूषण वाढत चालले आहे आणि त्यामुळे हवा दुषित होत आहे आणि त्यामुळे लोकांना अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परंतु योग हे एक असे औषध आहे जे आपल्याल अनेक रोगांच्यापासून लांब ठेवू शकते आणि म्हणून जर आपण नियामिपणे योग केला तर आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होतेच परंतु आपल्या जीवनशैली मध्ये देखील आपल्याला सकारात्मक बदल घडून आल्या सारखे दिसते.

योग हा एक अध्यात्मिक उपक्रम आहे आणि हा उपक्रम रोज नियमितपणे केल्यामुळे आपले शरीर, मन आणि आत्मा यांचे संपूर्ण समर्पण होते आणि म्हणून हा अध्यात्मिक उपक्रम हा रोजच्या रोज केला तर या प्रदूषित जगातून आपला बचाव होऊ शकतो आणि आपण अनेक आरोग्य समस्यांच्यापासून देखील दूर राहू शकतो.

वेगवेगळ्या प्रकारच्या योगाच्या नियमित सरावाने आपल्या अनेक आरोग्य समस्या तर दूर होतातच परंतु योग केल्याने आपल्या मनाला शांती आणि समाधान मिळते तसेच योगामुळे आपला आत्मविश्वास, धाडस आणि सहनशीलता देखील वाधाण्य्स मदत होते.

लोक अनेक वेगवेगळ्या प्रकारचे योग करतात जसे कि चक्रासन, अन्लोम विन्लोम, पद्मासन, त्रिकोणासन, सूर्यनमस्कार, गोमुखासन, पूर्वोत्तनासन, मयुरासन, प्राणायाम आणि इतर असणे करतात. आज आपण या लेखामध्ये पूर्वोत्तनासन, कसे करतात आणि त्याचे काय फायदे आहेत या विषयी संपूर्ण माहिती खाली घेणार आहोत.

purvottanasana information in marathi
purvottanasana information in marathi

पूर्वोतानासन मराठी माहिती – Purvottanasana Information in Marathi

आसनाचे नावपूर्वोत्तनासन
इंग्रजी नावअपवर्ड प्लांक पोझ (Upward plank pose)
फायदेशरीर लवचिक आणि मजबूत बनते, थायरॉईड ग्रंथी सुधारण्यास मदत होते, मानसिक आरोग्य सुधारते, आत्मविश्वास वाढतो.

पूर्वोत्तनासन विषयी महत्वाची माहिती – ardha purvottanasana information in marathi

पूर्वोत्तनासन हा देखील योगासनाचा भाग आहे परंतु पूर्वोत्तनासन हे इतर योग आसनांच्या पेक्षा सर्वात कठीण आसन आहे. पूर्वोत्तनासन हा संकृत शब्द आहे आणि हा शब्द तीन शब्दांच्या पासून बनलेला आहे म्हणजेच पूर्वा, उत्तन आणि आसन. पूर्व म्हणजे ज्याचा संदर्भ शरीराचा पुढचा भाग आहे, उत्तन म्हणजे तीव्र ताण आणि आसन म्हणजे मुद्रा. पूर्वोत्तनासनाला इंग्रजी मध्ये अपवर्ड प्लांक पोझ (Upward plank pose) म्हणून ओळखले जाते.

पूर्वोत्तनासन हे असं आपल्या शारीरिक आरोग्य फायदे तर प्रधान करतेच परंतु हे आपल्या मानसिक आरोग्यासाठी देखील एक चांगले आसन आहे आणि हे आसन केल्याने आपले धाडस आणि आत्मविश्वास देखील वाढण्यास मदत होते. पूर्वोत्तनासन हे थोडे अवघड आहे परंतु याचे आरोग्य फायदे चांगले आहेत आणि हे आसन करताना आपल्याला आपल्या शरीराला ताण द्यावा लागतो आणि शरीर पुढील बाजूस वाहते दिसेल अशी मुद्रा करावी लागते.

हे आसन नियमित केल्याने आपले शरीर मजबूत आणि लवचिक बनण्यास मदत होते त्याचबरोबर ज्या व्यक्तीला थायरॉईड आहे अश्या व्यक्तींच्या समस्या दूर होतात तसेच थायरॉईड ग्रंथी सुधारण्यास मदत होते.

पूर्वोत्तनासन कसे करायचे – steps 

पूर्वोत्तनासन हे आसन इतर आसनांच्यापेक्षा खूप कठीण आहे आणि खाली आपण पूर्वोत्तनासन कसे करायचे ते पाहणार आहोत.

  • सर्वप्रथम जमिनीवर चटई किंवा जमखाना अंथरून घ्या.
  • आता त्या वर समोरच्या दिशेने पाय पसरून जमिनीवर बसा.
  • शरीराच्या बाजूला जमिनीवर तुमचे तळवे ठेवा आणि आता तुमचा हात नितंबाच्या मागे सुमारे ३० सेंटी मीटर ठेवा आणि तुमचे कोपर सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा.
  • आता तुमच्या हाताची बोटे नितंबाच्या दिशेने दाखवा आणि हि स्थिती सुरुवातीची स्थिती आहे.
  • त्यानंतर श्वास घ्या आणि तुमच्या शरीराला वरच्या दिशेने उचलण्याचा प्रयत्न करा आणि शरीराला जास्त ताण न आणता शक्य तितके उंच करा आणि तुमचे पाय आणि हातावर तुमच्या शरीराचे संपूर्ण वजन संतुलित करण्याचा प्रयत्न करा.
  • तुमचे हात जमिनीवर लांब ठेवा आणि तुमच्या पायाचे तळवे जमिनीवर ठेवा आणि तुमचे कोपर आणि गुढघे घट्ट ठेवण्याचा प्रयत्न करा.
  • या मुद्रेमध्ये तुमचे डोके मागच्या दिशेला सैल म्हणजेच लटकल्यासारखे दिसते आणि तुम्ही या स्थितीमध्ये असताना श्वास घ्या.
  • या मुद्रेच्या अनातिं स्थितीमध्ये शरीर मजल्याच्या समांतर दिसेल.
  • तुम्ही जितका वेळ या मुद्रेमध्ये राहू शकता तितका वेळ या मुद्रेमध्ये राहण्याचा प्रयत्न करा.
  • आता सुरुवातीच्या स्थितीमध्ये परत येताना मात्र हळू हळू श्वास सोडत सोडत तुमचे शरीर हळू हळू खाली घ्या.

पूर्वोत्तनासनाचे आरोग्य फायदे – Purvottanasana benefits in marathi

योगासनाचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत आणि हि वेगवेगळी असणे नियमित केली तर आपल्या अनेक आरोग्य फायदे मिळतात तसेच मानसिक आरोग्य देखील लाभते तसेच पूर्वोत्तनासनाच्या देखील नियमित सरावाने आपल्याला फायदे मिळू शकतात ते कोणते फायदे आहेत ते आपण खाली पाहूया.

  • पूर्वोत्तनासन या आसनाच्या नियमित सरावाने थायरॉईड ग्रंथी सुधारण्यास मदत होते त्याचबरोबर थायरॉईड अनेक समस्या दूर होण्यास मदत देखील होते.
  • या आसनाच्या नियमित सरावाने आपले मानसिक आरोग्य देखील सुधारण्यास मदत होते.
  • त्याचबरोबर या योग प्रकारामुळे शरीर लवचिक आणि मजबूत बनते.
  • ज्या लोकांना पाठीच्या कण्याच्या समस्या सतत उद्भवत असतात अश्या लोकांनी हा योगप्रकार नियमित केला पाहिजे तसेच या आसनामुळे पाठीचा कणा लांब बनण्यास देखील मदत होते.
  • आत्मविश्वास आणि धाडस वाढवायचे असेल तर आपण हा योग प्रकार नियमित करावा.

आम्ही दिलेल्या purvottanasana information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पूर्वोतानासन मराठी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about purvottanasana in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!