पालघर जिल्ह्याची माहिती Palghar District Information in Marathi

Palghar District Information in Marathi पालघर जिल्ह्याची माहिती महाराष्ट्र जिल्ह्यातील एक महत्वाचा जिल्हा म्हणजे पालघर होय, आज या लेखामध्ये आपण पालघर या जिल्ह्याबद्दल माहिती घेणार आहोत. पालघर हा जिल्हा महाराष्ट्र राज्यातील ३६ वा जिल्हा असून या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ५३४४ चौरस किलो मीटर इतके आहे. या जिल्ह्याच्या पश्चीमेकडील भागामध्ये एक सुंदर आणि आकर्षक अशी अरबी समुद्र किनार पट्टी लाभली आहे जे पालघरचे नैसर्गिक सौंदर्य आहे आणि हि किनारपट्टी सुमारे ११२ किलोमीटर लांब पसरलेली आहे. पालघर या जिल्ह्यामध्ये १००७ गावे आहेत आणि तेथे एकूण ४६७ ग्रामपंचायती आहेत.

जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागामध्ये ठाणे व नाशिक, पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस मुंबई, ठाणे आणि या जिल्ह्याच्या उत्तरेस वलसाड (गुजरात), दादरा व नगर हवेली आहे. या जिल्ह्यातील वसई तालुक्यात जीवदानी मंदिर आणि डहाणूतील महालक्ष्मी मंदिर आहे. जे या जिल्ह्यातील लोकप्रिय ठिकाणे आहेत, तसेच या जिल्ह्यामध्ये अर्नाळा, वसई, गंभीरगड, काळदुर्ग, कामदुर्ग, केळवा आणि शिरगाव या सारखे ऐतिहासिक किल्ले देखील पाहायला मिळतात.

palghar district information in marathi
palghar district information in marathi

पालघर जिल्ह्याची माहिती – Palghar District Information in Marathi

देशभारत
राज्यमहाराष्ट्र
जिल्हापालघर
क्षेत्रफळ५३४४ चौरस किलो मीटर
जिल्ह्याचे वर्णनया जिल्ह्यामध्ये १००७ गावे आहेत आणि तेथे एकूण ४६७ ग्रामपंचायती आहेत आणि जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागामध्ये ठाणे व नाशिक, पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस मुंबई, ठाणे आणि या जिल्ह्याच्या उत्तरेस वलसाड (गुजरात), दादरा व नगर हवेली आहे.
समुद्र किनारपट्टीअरबी समुद्र किनारपट्टी
समुद्र किनारपट्टी लांबी११२ किलो मीटर
लोकसंख्या२९९५४२८
साक्षरता दर६६.६५ टक्के

इतिहास 

मागील काही काळामध्ये ठाणे जिल्हा हा भारतातील सर्वात मोठा समुद्र टेकडीचा भाग होता पण तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नवीन जिल्ह्याच्या कामाला सुरुवात झाली आणि तो नवीन जिल्हा म्हणजे पालघर होय.

ठाणे या मोठ्या जिल्ह्याची १ ऑगस्ट २०१४ मध्ये विभागणी झाली आणि पालघर हा ३६ वा जिल्हा स्थापन करण्यात आला. या जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके आहेत ते म्हणजे पालघर, वसई-विरार, जवाहर, वाडा, डहाणू, मोखाडा, तलासरी आणि विक्रमगड.

सन उत्सव 

भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव अगदी आनंदाने आणि गुण्या गोविदाने साजरे केले जातात आणि प्रत्येक राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये प्रत्येक उत्सव साजरा करण्याची एक वेगळी पध्दत असते. तसेच पालघर जिल्ह्यामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव साजरे केले जातात.

त्यामधील काही आपण खाली पाहू. पालघर मध्ये णेश चर्तुर्थी, दसरा, दिवाळी, बैल पोळा आणि रक्षाबंधन या सारख्या मोठ मोठ्या सणांसोबत कुपारी उत्सव, वसई विजयोत्सव आणि चिकू उत्सव या सारखे उत्सव देखील साजरे केले जातात.

कुपारी उत्सव

रंग आणि नृत्याने भरलेला कुपारी उत्सव सामवेदी समाजाच्या संस्कृतीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. हा एक प्राचीन काळापासून असणारा म्हणजेच २५०० वर्षापूर्वी पासून वसई मध्ये असणारा एक ब्राह्मण समाज आहे जो हा कुपारी उत्सव साजरा करतो. हजारो अभ्यागतांना आनंद देण्यासाठी वर्षानुवर्षे त्यांची संस्कृती आणि उत्सव टिकून आहेत.

चिकू उत्सव

जागतिक पर्यटकांमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत असलेला सण म्हणजे आश्चर्यकारक चिकू महोत्सव. चिकू महोत्सव हा पालघर जिल्ह्यातील बोर्डी या छोट्या आणि सुंदर गावामध्ये भरतो. पालघर या जिल्ह्यामध्ये २०१३ मध्ये या महोत्सवाची सुरुवात झाली आणि तेंव्हा पासून हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो.

या महोत्सवामध्ये चिकूचे फळ, चिकूचे आइस्क्रीम, चिकू शरबत, चिकू शेख आणि अगदी चिकू चिप्स या सारखे पदार्थ पाहायला मिळतात. त्याचबरोबर या महोत्सवामध्ये ४ किमीची मॅरेथॉन, आदिवासी लोकनृत्य आणि फळांच्या बागांना भेटी देणे या सारखे कार्यक्रम राबवले जातात.

वसई विजयोत्सव

वसई विजयोत्सव हा बहुतेक वसईच्या विजयाचा दिवस असावा आणि हा विजयोत्सव वसई किल्ल्यावर साजरा केला जातो. हा उत्सव पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यामध्ये दरवर्षी साजरा केला जातो कारण हा उत्सव एका महत्वाच्या ऐतिहासिक घटनेची आठवण करून देते. नरवीर चिमाजी अप्पा या महान योध्याने हा किल्ला पोर्तुगीजांकडून वसई किल्ला मिळवला.

त्या दिवशी हा वसई विजयोत्सव साजरा केला जातो. तेथील स्थानिक लोक उत्सवाची सुरुवात चिमाजीच्या पुतळ्याचे पूजन करून करतात, त्यानंतर रॅली आणि ऐतिहासिक नाटक सादर करतात. पारंपारिक खाद्यपदार्थांचे स्टॉल, फोर्ट लघुचित्रांसह बाजारपेठेत हंगामी फळे आणि भाज्या विकल्या जातात.

प्रेक्षणीय स्थळे 

पालघर या जिल्ह्याला पश्चिमेकडील अरबी समुद्र किनारपट्टी लाभली आहे. जे ह्या जिल्ह्याचे नैसर्गिक सौंदर्य आहे आणि या किनारपट्टीवर हजारो पर्यटक नैसर्गिक सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी येतात. तसेच बरोबर पालघर जिल्ह्यामध्ये, वसई, गंभीरगड, काळदुर्ग, कामदुर्ग, केळवा आणि शिरगाव या सारखे ऐतिहासिक किल्ले देखील पाहायला मिळतात. पालघर मधील काही प्रेक्षणीय स्थळे आपण खाली पाहूया.

अर्नाळा किल्ला

अर्नाळा हा किल्ला एक सागरीदुर्ग म्हणजेच हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील आहे आणि हा किल्ला पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील अर्नाळा गावाजवळ आहे. वसई शहरापासून हा किल्ला १२ किलो मीटर अंतरावर आहे. हा किल्ला समुद्रामध्ये एका बेटावर आहे त्यामुळे तेथे किल्ल्याच्या चारही बाजूंनी समुद्र आहे.

अर्नाळा या किल्ल्याला जंजीर अर्नाळा म्हणून देखील ओळखले जाते. अर्नाळा हा किल्ला आकाराने चौरसाकृती असून या किल्ल्याचे क्षेत्रफळ ७०० चौ फुट आहे त्याचबरोबर या किल्ल्याला तटबंदीच्या मजबूत भिंती आहेत आणि या भिंतींची उंची ३० फुट आहे आणि तटबंदीच्या भिंतींना ९ बुरुज आहेत.

जीवदानी मंदिर 

जीवदानी मंदिर हे पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील विरार येथे असणारे एक लोकप्रिय मंदिर आहे. हे मंदिर एक टेकडीवर वसलेले आहे आणि या जवळ जवळ १३७५ पायऱ्या आहेत. १५० वर्षापासून जुने असणाऱ्या या मंदिराला भेट देण्यासाठी हजारो भाविक येतात.

वसई किल्ला 

वसई हा किल्ला पालघर शहरापासून ४० ते ४५ किलो मीटर आहे. या किल्ल्यामध्ये आपल्यला आत गेल्यानंतर चर्च, न्यायालय आणि हॉस्पिटल इमारती दिसतात आणि किल्ल्याचे पूर्वीचे इतर अवशेष देखील पाहायला मिळतात. हा किल्ला भूकील्ला असून या किल्ल्याच्या तीन बाजूस समुद्राचे पाणी आहे.

वसई हा किल्ला ११० एकर क्षेत्रफळा मध्ये विस्तारलेला आहे आणि या किल्ल्यला शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी किल्ल्याभोवती भक्कम अशी तटबंदीची भिंत बांधली आहे ती भिंत २० ते २५ फुट उंच आहे. या किल्ल्याविषयी काही विशेष सांगायचे म्हंटले तर या किल्ल्याला एकूण १० ते ११ बुरुज आहेत त्याचबरोबर या किल्ल्यावर ५० हून अधिक विहिरी आहेत.

तसेच मंदिर आणि चर्च देखील आपल्यला या किल्ल्यावर पाहायला मिळतात त्याचबरोबर या किल्ल्याच्या भिंतीवर मराठा साम्राज्याच्या विजयाचा शिलालेख देखील पाहायला मिळतो, शिव मंदिर, हनुमान मंदिर आणि यासारख्या अनेक गोष्टी आपल्यला किल्ल्यावर पाहायला मिळतात.

सुरुची बीच 

सुरुची बीच हे एक सर्वात सुंदर आणि स्वच्छ समुद्री किनारा आहे जो पालघर जिल्ह्यातील वसई या शहराजवळ आहे आणि ज्या लोकांना समुद्र किनाऱ्यावर आपला वेळ घालवायला आवडतो त्यांच्यासाठी हा सुरुची बीच उत्तम प्रेक्षणीय स्थळ आहे. या बीचवरून आपण सूर्योदयाचा आणि सुर्यास्ताचा आनंद लुटू शकतो.

महालक्ष्मी मंदिर 

महालक्ष्मी ही आदिवासींची कुलदैवत आहे, त्यामुळे सणाच्या काळात आदिवासी त्यांच्या आनंदात  तर्पा नृत्याची व्यवस्था करतात. दरवर्षी हनुमान जयंतीपासून १५ दिवस महालक्ष्मी यात्रा साजरी केली जाते.

पालघर जिल्ह्याविषयी अनोखी तथ्ये – facts about palghar district

  • पालघर या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिकूचे उत्पादन घेतले जाते आणि या जिल्ह्याला चिकू उत्पादक म्हणून ओळखले जाते.
  • हा जिल्हा महाराष्ट्र राज्यातील ३६ वा जिल्हा असून या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ५३४४ चौरस किलो मीटर इतके आहे.
  • या मोठ्या जिल्ह्याची १ ऑगस्ट २०१४ मध्ये विभागणी झाली आणि पालघर हा ३६ वा जिल्हा स्थापन करण्यात आला.
  • पालघर या जिल्ह्यामध्ये १००७ गावे आहेत आणि तेथे एकूण ४६७ ग्रामपंचायती आहेत.
  • जिल्ह्यामध्ये अर्नाळा, वसई, गंभीरगड, काळदुर्ग, कामदुर्ग, केळवा आणि शिरगाव या सारखे ऐतिहासिक किल्ले पाहायला मिळतात.

आम्ही दिलेल्या palghar district information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पालघर जिल्ह्याची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या palghar district information in marathi pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of palghar district in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये palghar district taluka list Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!