RR Patil Biography in Marathi – RR Patil Information in Marathi आर आर पाटील माहिती मराठी रावसाहेब रामराव पाटील हे महाराष्ट्र राज्यातील भारतीय राजकारणी होते. ते तासगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते व महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नेते होते. महाराष्ट्रातील एक स्वच्छ आणि सच्चा नेता म्हणून त्यांची ओळख होती. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य होते २००९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या विजयानंतर त्यांनी दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे गृहमंत्री पद पटकावलं. याव्यतिरिक्त ते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री होते. या लेखामध्ये त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या यांच्या कार्याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
आर आर पाटील माहिती मराठी – RR Patil Biography in Marathi
पूर्ण नाव (Name) | रावसाहेब रामराव पाटील |
जन्म (Birthday) | १६ ऑगस्ट १९५७ |
जन्म गाव (Birth Place) | महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील अंजनी गावात |
राष्ट्रीयत्व (Citizenship) | भारतीय |
ओळख (Identity) | राजकारणी |
मृत्यू | १६ फेब्रुवारी २०१५ |
RR Patil Information in Marathi
जन्म व वैयक्तिक आयुष्य
आर. आर पाटील यांचं संपूर्ण नाव रावसाहेब रामराव पाटील आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक लोकांनी त्यांना त्यांच्या कार्या मुळे आबा ही नवीन ओळख दिली. रावसाहेब रामराव पाटील उर्फ आबा यांचा जन्म १६ ऑगस्ट १९५७ रोजी महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील अंजनी गावात झाला. रावसाहेब पाटील यांच्या घरची परिस्थिती नाजूक होती त्यांचे वडील गावातील प्रमुख होते.
घरात पैशाचा तुटवडा होता त्यामुळे रावसाहेब पाटील यांनी आपलं बहुतांश शिक्षण कमवा व शिका या सरकारी योजनेअंतर्गत पूर्ण केलं. रावसाहेब पाटील यांनी बी.ए व एल.एल.बी या दोन पदव्या संपादन केल्या आहेत. सांगलीच्या शांतिनिकेतन मधून त्यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. आर. आर. पाटील यांचा विवाह सुमन पाटील यांच्याशी झाला आहे आणि आबांना मुलगी स्मिता आणि मुलगा रोहित अशी दोन मुले देखील आहेत.
राजकीय कारकीर्द
रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर. आर. पाटील हे त्यांचं मूळ नाव असले तरी संपूर्ण महाराष्ट्रात ते आबा या नावाने प्रसिद्ध होते. तीच त्यांची खरी ओळख होती. आबा हे गरीब घरातील होते परंतु अतिशय प्रामाणिक, साधं व अभ्यासू व्यक्तिमत्व होतं. त्यांची राजकीय कारकीर्द अतिशय यशस्वी ठरली त्यांनी आपल्या सच्चेपणाने महाराष्ट्रातील लोकांच्या मनावर राज्य केलं. एका सामान्य गरिब शेतकऱ्याचा मुलगा असलेले आबा हे जिल्हा परिषद सदस्य, सहा वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशी त्यांची राजकीय कारकीर्द ठरली आहे.
रावसाहेब पाटील उर्फ आबा हे एक होतकरू तरुण होते ज्यांना समाजात प्रबोधन घडवून आणायचं होतं त्यांना समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची इच्छा होती. त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी लाभलेली नव्हती परंतु एक उत्तम भाषण शैली जी सरळ प्रेक्षकांच्या मनावर वार करेल, स्वच्छ प्रतिमा आणि अखेरीस समाजासाठी काही करून दाखवण्याची जिद्द या जोरावर आबा यांनी राजकारणामध्ये पाऊल ठेवलं. आर.आर.पाटील हे सन १९७९ ते १९९० पर्यंत सावळज मतदारसंघातून सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य होते.
त्यानंतर १९९०, १९९५, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ मधील सांगली जिल्ह्यातील तासगाव चे प्रतिनिधित्व करत महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. १९९९ मध्ये आर आर पाटील यांनी काँग्रेस सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांनी शरद पवार यांचा विश्वास जिंकला म्हणूनच त्यांना पवारांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक अशी वेगळी ओळख निर्माण झाली. सुरुवातीला आर आर पाटील यांच्याकडे ग्रामविकास मंत्री पद सोपवण्यात आलं होतं.
तेव्हा त्यांनी गाडगे महाराज स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवून आपली भूमिका उत्तमरित्या पार पाडली. सन १९९६ ते १९९७ व १९९८ ते १९९९ मध्ये आर आर पाटील हे विधान सभेतील काँग्रेस पक्षाचे मुख्य होते. सोबतच ते विधानसभेच्या सार्वजनिक लेखा समितीच्या अध्यक्ष बनले. सन १९९९ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर आर आर पाटील ऑक्टोंबर १९९९ मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री झाले. पुढे त्यांना गृहमंत्री पद मिळालं तिथेही त्यांनी उत्तम कामगिरी केली.
२५ डिसेंबर २००३ रोजी आर आर पाटील महाराष्ट्राचे गृहमंत्री झाले. आमदारकी सोबतच आबांनी गृहमंत्री पद आणि उपमुख्यमंत्री पदही भूषविले. मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांच्या काही वक्तव्यांनी वाद निर्माण झाले ज्यामुळे परिणामी आबांना गृहमंत्री पद व उपमुख्यमंत्री पद सोडावं लागलं होतं. परंतु तोपर्यंत लोकांच्या मनामध्ये त्यांनी आपली स्वच्छ प्रतिमा कायमची बिंबली होती. गृहमंत्री पदावर असताना देखील आबांनी अनेक डान्स बार बंद केले.
आर आर पाटील एक सच्चा नेता होते आणि त्यामुळेच त्यांनी गृहमंत्री पद देखील उत्तम रित्या बजावलं त्यांनी महात्मा गांधी तंटामुक्त अभियान राबवलं. गाडगे बाबा, महात्मा गांधी, यशवंतराव चव्हाण हे आबांचे प्रेरणास्त्रोत होते. राजकारणामध्ये असतानादेखील आबांनी आपली सादगी नेहमीच जपली. साधेपणा हा त्यांच्या स्वभावातील अत्यंत आकर्षक वैशिष्ट्य होता. आपल्या साधेपणाने आर आर पाटील यांनी राजकारणामध्ये काम केलं आणि महाराष्ट्रातील लोकांच्या मनावर राज्य केलं.
१ नोव्हेंबर २००४ रोजी आर आर पाटील यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र युनिट आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे प्रमुख देखील होते. महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित राजकारणी म्हणून आर आर पाटील यांची ओळख होती त्यांना राजकीय वर्तुळात मिस्टर क्लीन अशी ओळखही मिळाली होती. आघाडी सरकारच्या काळात आबा पाटील नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्याचे पालक मंत्री होते.
आबा पाटील आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर गृहमंत्री पदापर्यंत पोचले परंतु त्यांनी कधीही आपल्या सत्तेचा गैरवापर केला नाही. बहुतेक वेळी सत्ता मिळाल्यावर बऱ्याच नेत्यांमध्ये एक वेगळाच रुबाब येतो परंतु आबा पाटील यांच्यासाठी तो एक अपवादच ठरला. आबांनी कधीच आपल्या स्वभावाच्या मध्ये खुर्चीला येऊ दिले नाही. सत्ता येत जात राहते परंतु सच्चा कार्यकर्ता क्वचितच जन्माला येतो. आणि त्यातीलच एक म्हणजे आर आर पाटील होय.
तंटामुक्ती गाव अभियानाने व ग्रामस्वच्छता अभियानामुळे आर आर पाटील यांना एक वेगळी ओळख निर्माण झाली. आपण बहुतांशवेळा असं म्हणत असतो की साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचा नेमका अर्थ काय असतो किंवा याची प्रचिती आर आर पाटील यांचे व्यक्तिमत्व अनुभवल्यावर कळतं. आबा पाटील अतिशय सामान्य व साधे भोळे व्यक्तिमत्व होतं. अतिशय गरीब परिस्थितीतून वर येत त्यांनी राजकारणासारख्या क्षेत्रांमध्ये त्यांचा साधेपणा आणि नम्रपणा कायम टिकवून ठेवला आणि हीच त्यांची खरी ओळख आहे.
मृत्यू
राजकारण हे एक असं क्षेत्र आहे जिथे लोक सत्तेच्या मैदानात बऱ्याच वेळा आपलं चारित्र्य मातीत मिळवतात. परंतु आबा पाटील यांनी सत्तेच्या आहारी न जाता ज्या हेतूने ते राजकारणात उतरले होते म्हणजेच समाजकल्याण, जनकल्याण हा हेतू त्यांनी शेवटपर्यंत पूर्ण करून दाखवला. एक सच्चा राजकारणी व नेता होते ज्यांनी वेगवेगळे प्रकल्प व क्रांतिकारक निर्णय घेऊन समाजात प्रबोधन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. आबा पाटील यांची राजकीय कारकीर्द उत्तम राहिली त्यांच्याकडून येणाऱ्या काळामध्ये अनेक महत्त्वपूर्ण व फायदेशीर कार्य बघायला मिळाले असते तर उत्तम झालं असतं.
परंतु काळाने घात केला आबा पाटील यांना तोंडाचा कर्करोग होता त्यांचा बराच काळ कर्करोगाशी लढा सुरू होता परंतु १६ फेब्रुवारी २०१५ रोजी लीलावती रुग्णालयांमध्ये आबा पाटील यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले ज्यामुळे त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होतच होती परंतु अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. १७ फेब्रुवारी २०१५ रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील तासगाव परिसरातील अंजनी गावात आबा पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आबा पाटील यांचे अंत्यसंस्कार राज्य सन्मानाने करण्यात आले यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या २१ तोफांची सलामी दिली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अण्णा हजारे, शरद पवार आणि विविध पक्षांचे इतर राजकीय नेते उपस्थित होते. त्यांच्या पश्चात त्यांची आई त्याची बायको व त्यांची दोन मुले अशी त्यांची फॅमिली आहे. आबा पाटील यांचे अकाली निधन महाराष्ट्रसाठी धक्कादायक व नुकसान देणारं ठरलं त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने व सामान्य माणसाने एक होतकरू व सच्चा नेता गमावला आहे. आर आर पाटील हे एक संवेदनशील व्यक्तिमत्व होतं त्यांचं कार्य आणि ते महाराष्ट्रातील जनतेच्या नेहमीच स्मरणात राहतील.
आम्ही दिलेल्या RR Patil Biography in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर आर आर पाटील माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या RR Patil information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of RR Patil in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट