सज्जनगड विषयी माहिती Sajjangad Information in Marathi

sajjangad  information in marathi सज्जनगड विषयी माहिती, सज्जनगड हा एक प्रकारचा किल्ला आहे जो गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे आणि हा किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये वसलेला किल्ला आहे. सह्याद्री डोंगर रांगेवर एक शंभूमहादेव उपरांग आहे आणि या रांगेच्या पूर्वेकडे तीन रांगा आहेत आणि त्यामधील एका रांगेवर सज्जनगड हा किल्ला वसलेला आहे. या किल्ल्याबद्दल असे म्हणतात कि हा किल्ला समर्थ रामदास स्वामी यांचे पदस्पर्श झाले आहे आणि याला समर्थ रामदास स्थापित ठिकाण म्हणून ओळखले जाते आणि याला रामदासस्वामी यांचे अंतिम विश्रामस्थान म्हणून ओळखले जाते.

हा किल्ला ३३५० फुट उंच आहे आणि या किल्ल्याच्या चढण्याची श्रेणी मध्यम प्रकारची आहे. सज्जनगड या किल्ल्याजवळ प्रतापगड, अजिंक्यतारा आणि रायगड हे किल्ले आहेत आणि या किल्ल्याच्या पायथ्याजवळ परळी आणि गजवाडी हि गावे आहेत. सज्जनगड हा किल्ला बहामानिंच्या काळामध्ये म्हणजेच १३४७ ते १५२७ च्या दरम्यान बांधला होता आणि या किल्ल्याला पूर्वीच्या काळी आश्वलायगड म्हणून ओळखला जात होता.

ज्यावेळी समर्थ रामदास स्वामी या ठिकाणी निवास केल्यानंतर या किल्ल्याचे नाव आश्वलायगड बदलून सज्जनगड असे ठेवण्यात आले. सज्जनगड हा किल्ला सातारा या शहरापासून १६ किलो मीटर अंतरावर आहे तर महाबळेश्वर या शहरापासून हा किल्ला ६७ किलो मीटर अंतरावर आहे.

या किल्ल्यावर समर्थ रामदास स्वामी यांची समाधी आहे तसेच अनेक मंदिरे देखील आहेत. त्यामुळे या किल्ल्यावर हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. या किल्ल्यावर जाण्यासाठी ३०० पायऱ्या आहेत आणि त्या सुरक्षित आहेत.

sajjangad information in marathi
sajjangad information in marathi

सज्जनगड विषयी माहिती – Sajjangad Information in Marathi

किल्ल्याचे नावसज्जनगड, आश्वलायगड (पूर्वीचे नाव)
प्रकारगिरिदुर्ग
ठिकाणभारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये हा किल्ला वसलेला आहे.
कोणी बांधलाबहामानिंच्या काळामध्ये
केंव्हा बांधला१३४७ ते १५२७ दरम्यान
उंचीहा किल्ला ३३५० फुट उंचीवर आहे.

सज्जनगड किल्ल्याचा इतिहास – sajjangad story in marathi

सज्जनगड हा किल्ला समर्थ रामदास स्वामी यांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते आणि रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु होते. हा किल्ला बहामानिंच्या काळामध्ये म्हणजेच १३४७ ते १५२७ च्या दरम्यान बांधला होता आणि त्यानंतर हा किल्ला आदिल शहाणे आपल्या ताब्यात घेतला परंतु हा किल्ला आदिल शाहकडे फार काळ राहू शकला नाही म्हणजेच हा किल्ला त्याच वर्षी मुघलांनी आपल्या ताब्यात घेतला.

त्यानंतर हा किल्ला छत्रपती शिवाजी महारांज्यांच्या ताब्यात गेला आणि त्यावेळी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु समर्थ रामदास हे निवास करत होते आणि त्यावेळीच या किल्ल्याचे नामकरण सज्जनगड असे केले. पूर्वी या किल्ल्याला परळी किल्ला आणि आश्वलायगड किल्ला या नावांनी ओळखले जात होते.

हा किल्ला १८१८ पर्यंत मराठ्यांच्या ताब्यात होता ज्यावेळी इंग्रजांनी महराष्ट्रातील अनेक किल्ले आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली त्यावेळी सज्जनगड किल्ला देखील १८१८ मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला.

सज्जनगड किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे – places to see

सज्जनगड या किल्ल्यावर संत समर्थ रामदास स्वामी यांची समाधी आहे ज्याला आता समर्थ रामदास स्वामी संस्थान म्हणून ओळखले जाते आणि हे अनेक भक्तांच्यासाठी सकाळी सुर्योदयापासून संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत चालू असते. या मंदिरामध्ये रोजची पूजा, नैवैद्य, प्रार्थना आणि भजन रोजच असते. त्याचबरोबर या किल्ल्यावर अनेक मंदिरे देखील आहेत जसे कि भगवान रामाचे आणि हनुमानाचे मंदिर, आंगलाई देवीचे मंदिर.

या किल्ल्याला २ मुख्य दरवाजे आहेत तसेच या किल्ल्यावर २ तलाव देखील आहेत आणि यामधील एक तलावाचे नाव घोडेल असे आहे कारण या घोडेल या तलावातील पाणी त्या काळी घोड्यांना पिण्यासाठी वापरले जात असावे. तसेच किल्ल्यावर रामघळ नावाचे एक प्रसिध्द ठिकाण देखील आहे तेथे रामदास स्वामी ध्यान करत होते. तसेच किल्ल्यावर श्रीधर कुट नावाचा आश्रम आहे तसेच ब्रह्मपिसा हे मंदिर देखील आहे.

सज्जनगड किल्ला ट्रेकिंगसाठीची माहिती – information about sajjangad in marathi

ज्या लोकांना ट्रेकची आवड आहे त्यांच्यासाठी हा किल्ला ट्रेकसाठी उत्तम किल्ला आहे. किल्ला चढण्यासाठी चांगल्या पायऱ्या आहेत आणि ह्या पायऱ्या किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापर्यंत आहेत आणि या किल्ल्याला ३०० पायऱ्या आहेत. तसेच पायवाट हि ट्रेकिंग करणाऱ्या लोकांच्यासाठी चांगल्या प्रकारे चिन्हाकित केलेली आहे.

ट्रेकर्सना किल्ला चढून वर गेल्यानंतर अनेक तलाव, राम मंदिर, हनुमान मंदिर, आश्रम, रामदास स्वामी समाधी आणि इतर अनेक ठिकाणे पाहायला मिळतात. या किल्ल्यावर आपल्याला खाण्याची पिण्याची सोय होऊ शकते तसेच हा किल्ला चढण्यासाठी ३० ते ४५ मिनिटे लागतात. ह्या किल्ल्याची चढाई श्रेणी हि खूप सोपी आहे.

कसे पोहचायचे – how to reach

  • हा किल्ला सातारा या शहरापासून १६ किलो मीटर अंतरावर आहे आणि सातारा हे प्रमुख शहर असल्यामुळे या ठिकाणी मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि इतर शहरातून बस किंवा रेल्वे सहज मिळू शकते आणि आपण साताऱ्या पर्यंत बसने किंवा रेल्वेने येऊन मग तेथून सज्जनगड पर्यंत भाड्याने टॅक्सी घेऊन जावू शकतो.
  • हा किल्ला पुणे या शहरापासून १२७ किलो मीटर अंतरावर आहे आणि पुणे ते सातारा चांगल्या रस्ता मार्गाने जोडले आहे आपल्याल पुणे या शहरातून साताऱ्याला येण्यासाठी ३ तास लागतात.

टिप्स – tips

  • ह्या किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा आहे.
  • किल्ला यात्रेकरुंच्यासाठी सकाळी ५.३० वाजल्यापासून संध्याकाळी ९ पर्यंत सुरु असतो.

आम्ही दिलेल्या sajjangad information in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

सज्जनगड कुठे आहे?

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये हा किल्ला वसलेला आहे. सह्याद्री डोंगर रांगेवर एक शंभूमहादेव उपरांग आहे आणि या रांगेच्या पूर्वेकडे तीन रांगा आहेत आणि त्यामधील एका रांगेवर सज्जनगड हा किल्ला वसलेला आहे.

मित्रानो तुमच्याकडे जर राणी दुर्गावती यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sajjangad story in Marathi या sajjangad fort information in Marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about sajjangad in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये sajjangad satara information in Marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!