सामाजिक कार्यकर्त्यांविषयी माहिती Social Worker Information in Marathi

Social Worker Information in Marathi सामाजिक कार्यकर्त्यांविषयी माहिती आज या लेखामध्ये social workers म्हणजेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या बद्दल माहिती घेणार आहोत. ते काय करतात, त्यांचा सामाज्यामध्ये काय role असतो आणि ते कश्याप्रकारे लोकांच्या समस्येमध्ये मदत करतात किंवा समस्या दूर करतात. चाल तर मग जाणून घेवूयात सामाजिक कार्यकर्ता (social worker) विषयी माहिती. सामाजिक कार्यकर्ते जे लोक असतात जे लोकांना दुष्काळाच्या काळात, पुराच्या काळामध्ये, साथीच्या रोगाच्या काळात किंवा इतर काही कारणांमुळे लोकांचे जीवन अस्ताव्यस्त होते.

किंवा विस्कळीत होते म्हणजे त्या काळामध्ये लोकांचे घरे किंवा त्यांना अन्नाचा तुडवडा बसत असेल तर काही लोक त्या लोकांना तत्काळ राहण्यासाठी जागेची सोय करून देतात तसेच अन्न पुरवतात किंवा एकाद्या भागाचे पावसामुळे किंवा वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले असेल तर काही लोक त्या भागासाठी आर्थिक मदत करतात अश्या सर्व लोकांना सामाजिक कार्यकर्ते म्हंटले जाते.

सामाजिक कार्यकर्ते शाळा, समुदाय विकास महामंडळे, बालकल्याण, मानव सेवा संस्था आणि मानसिक आरोग्य दवाखाने यासारख्या ठिकाणी काम करतात किंवा आपली सामाजिक जबाबदारी बजावतात.

social worker information in marathi language
social worker information in marathi language

सामाजिक कार्यकर्त्यांविषयी माहिती – Social Worker Information in Marathi

सामाजिक कार्यकर्ते काय करतात ?

सामाजिक कार्यकर्ते लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यात आणि त्यांचा सामना करण्यास मदत करतात. सामाजिक कार्यकर्ते समाजातील लोकांचे कल्याण करणे, लोकांच्या मूलभूत आणि जटिल गरजा पूर्ण करणे आणि लोकांना एक चांगले जीवन जगण्यास मदत करणे.

सामाजिक कार्यकर्त्यांची कर्तव्ये आणि कार्ये 

  • सामाजिक कार्यकर्त्यांचे काम हे लोकांच्या समस्या आणि गरजा लक्षात घेवून त्यावर योग्य ते पाऊल उचलणे.
  • आजारपण, घटस्फोट किंवा बेरोजगारी यासारख्या बदलांना आणि त्यांच्या आयुष्यातील आव्हानांशी जुळवून घेण्यास लोकांना मदत करणे.
  • लहान मुलांचा गैरवापर आणि मानसिक आरोग्य आपत्कालीन परिस्थितीसारख्या संकटाच्या परिस्थितीला प्रतिसाद देणे.
  • दुष्काळ ग्रस्त काळामध्ये आणि पूरग्रस्त काळामध्ये लोकांना मदत करणे त्यांना राहण्यासाठी जागा उपलब्द करून देणे किंवा अन्न पुरवणे यासारखे काम सामाजिक कार्यकर्ते करतात.
  • लोकांची आरोग्य सेवा करणे.

सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रकार 

सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जे लोक लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यात आणि त्यांचा सामना करण्यास मदत करतात. लोक वेगवेगळ्या प्रकारे सामाजिक काम करतात म्हणून त्याच आधारे सामाजिक कार्यकर्त्यांचे काही प्रकार पाडले आहेत ते आपण खाली पाहू.

शालेय सामाजिक कार्यकर्ते 

काही सामाजिक कार्यकर्ते आपली सामाजिक कामगिरी वेगवेगळ्या प्रकारे पार पाडतात तसेच शालेय सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी आणि सामाजिक विकास सुधारण्यासाठी योजना आणि धोरणे विकसित करण्यासाठी शिक्षक, पालक आणि शाळा प्रशासकांसह कार्य करतात.

बाल आणि कौटुंबिक सामाजिक कार्यकर्ते 

या प्रकारचे सामाजिक कार्यकर्ते हे लहान मुलांच्या आणि  कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी कार्यरत असतात. असुरक्षित मुलांचे रक्षण करतात आणि मदतीची गरज असलेल्या कुटुंबांना मदत करतात. या प्रकारचे सामाजिक कार्यकर्ते लहान मुलांचा गैरवापर आणि बाल रोजगारी विरुद्ध लढतात.

आरोग्य सेवा करणारे सामाजिक कार्यकर्ते 

या प्रकारचे सामाजी कार्यकर्ते रुग्णांना त्यांचे निदान समजून घेण्यास आणि त्यांच्या जीवनशैली, गृहनिर्माण किंवा आरोग्यसेवेमध्ये आवश्यक समायोजन करण्यास मदत करतात म्हणजेच ते ते लोकांना रुग्णालयातून त्यांच्या घरी आणि समाजात परत येण्यासाठी आपली मोलाची कामगिरी बजावतात.

सामाजिक कार्यकर्त्याची कौशल्ये 

  • सामाजिक कार्य करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या लोकांच्या मध्ये सहानुभूतीची भावना असणे गरजेचे असते असते कारण जर सामाजिक कार्यकर्त्यामध्ये सहानुभूतीची सहानुभूतीची भावना असेल तर ती व्यक्ती समोरील लोकांच्या समस्या सखोल पणे समजून घेऊ शकतो किंवा त्या व्यक्तीला लोकांच्या समस्या चांगल्या प्रकारे समजू शकतात.
  • लोकांच्या समस्या ह्या चांगल्या संवादामुळे समजू शकतात म्हणून संवाद करताना सामाजिक कार्यकर्त्याने सर्व बाजूंनी विचार करून संवाद करणे गरजेचे असते.
  • सामाजिक कार्यकर्त्यामध्ये लोकांच्या समस्या समजवून घेवून त्यांच्या ह्या समस्या सोडवण्याचे चांगले कौशल्य असले पाहिजे.

भारतातील काही लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते 

भारतामध्ये ज्या लोकांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून सामाजिक कार्य केले त्यामधील काही लोकप्रिय सामाजिक कार्यकर्त्यांची माहिती खाली दिली आहे.

बाबा आमटे 

सामाजिक कार्यकर्ते म्हटले कि सर्वप्रथम तोंडामध्ये येणारे नाव म्हणजे बाबा आमटे कारण त्यांनी अनेक गरीब लोकांना मदत केली. त्यांनी कुष्ठरोगाने ग्रस्त लोकांविरुद्ध भेदभावाच्या विरोधातील लढाईत भारताला मदत केली होती तसेच भारतातील स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होते/

भारत छोडो आंदोलनात त्यांनी प्रमुख भूमिका बजावली होती आणि त्यांनी जंगलामध्ये राहणाऱ्या अधिवासी लोकांच्या आरोग्याविषयी काम केले होते. बाबा आमटे हे डॉक्टर होते आणि त्यांचा जन्म डिसेंबर १९१४ मध्ये झाला आणि फेब्रुवारी २००८ मध्ये नैसर्गिक कारणांमुळे त्यांचे निधन झाले होते.

मेधा पाटकर 

मेधा पाटकर या मुंबईस्थित सामाजिक कार्यकर्त्या आहेत, ज्यांना नर्मदा बचाव आंदोलनात त्यांच्या प्रमुख भूमिकेसाठी ओळखले जाते. ती नर्मदा बचाओ आंदोलन आणि घर बचाओ घर बनाओ आंदोलनात सहभागी होती तसेच मेधा यांनी पश्चिम बंगालमध्ये जमीन बळकावण्याच्या विरोधातही लढा दिला. त्याशिवाय तिने इतर अनेक मार्गांनी समाजात योगदान दिले आहे.

ज्योतिबा फुले 

ज्योतिबा फुले यांचे नाव कोणाला माहित नाही आपण यांच्या बद्दल शाळेमध्ये शिकलोच आहोत. ज्योतिबा फुले हे आणखी एक लोकप्रिय समाजसुधारक आहेत आणि त्यांचे कार्य जातीविरोधी मोहिमेविषयी आहे. ज्योतिबा फुले या महान सामाजिक कार्यकर्त्याला महात्मा फुले या नावाने देखील ओळखले जाते.

महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी लढणाऱ्या त्यांच्या पत्नी सावित्री बाई फुले यांना चांगल्या प्रकारे पाठींबा देवून स्त्री शिक्षणाचा मार्ग मोकळा केला. त्यांनी अस्पृश्यता सारख्या सामाजिक आजारांविरुद्ध लढा दिला आणि विधवांच्या पुनर्विवाहासाठीही काम केले. त्यांनी बालहत्येचे प्रमाण कमी करण्यासाठी अनाथाश्रम देखील स्थापन केले.

विनोबा भावे 

विनोबा भावे भारतातील लोकप्रिय समाजसुधारक / किंवा सामाजिक कार्यकर्त्यांच्या मधील एक होते आणि त्यांनी अहिंसा आणि मानवी हक्कांचे समर्थन केले. विनोबा भावे यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्वाची भूमिका बजावली आणि सर्व सामाजिक सुधारणांसाठी महात्मा गांधींशी त्यांचा निकटचा संबंध होता तसेच त्याशिवाय त्यांनी भूदान चळवळीसारख्या अनेक लोकप्रिय चळवळींचे नेतृत्व केले होते.

सिंधूताई सपकाळ 

सिंधूताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८ मध्ये महाराष्ट्रातील वर्धा या ठिकाणी झाला. भारतातील अनाथ मुलांचे संगोपन करण्याच्या त्यांच्या कार्यासाठी त्या ओळखल्या जातात म्हणून त्यांना अनाथांची आई म्हणू ओळखले जात होते.

सामाजिक कार्यकर्त्याविषयी अनोखी तथ्ये 

  • सामाजिक कार्यकर्ते लोकांना मदत तर करतात कारण हे करणे त्याचे मुख्य काम असते त्याचबरोबर ते अनेक कामे करतात.
  • सामाजिक कार्यकर्त्यासाठी कोणताही सामान्य दिवस नाही किंवा त्यांच्या सामाजिक कार्याच्या कोणत्याही वेळा ठरवलेल्या नसतात.
  • सामाजिक कार्यकर्ते समाजातील लोकांचे कल्याण करणे, लोकांच्या मूलभूत आणि जटिल गरजा पूर्ण करणे आणि लोकांना एक चांगले जीवन जगण्यास मदत करतात.
  • लोक वेगवेगळ्या प्रकारे सामाजिक काम करतात म्हणून त्याच आधारे सामाजिक कार्यकर्त्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत.
  • सामाजिक कार्यकर्ते लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यात आणि त्यांचा सामना करण्यास मदत करतात.
  • सामाजिक कार्यकर्ते शाळा, समुदाय विकास महामंडळे, बालकल्याण, मानव सेवा संस्था आणि मानसिक आरोग्य दवाखाने यासारख्या ठिकाणी काम करतात.

आम्ही दिलेल्या social worker information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर सामाजिक कार्यकर्त्यांविषयी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about social workers in maharashtra in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of social worker in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये social workers information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!