Vinda Karandikar Information in Marathi विंदा करंदीकर यांची माहिती एकोणचाळीसाव्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी ठरलेले गोविंद करंदीकर एक ज्येष्ठ साहित्यिक होते. लेखक कवी गोविंद विनायक करंदीकर उर्फ “विंदा” करंदीकर चे मराठी साहित्य क्षेत्रामध्ये भर घालणारे एक दिग्गज साहित्यिक होते. वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज यांसारख्या थोर कलाकारांसोबत गोविंद करंदीकर यांचे नाव जोडलं जातं. भारतातील ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळवणारे गोविंद करंदीकर हे वि. स. खांडेकर व कुसुमाग्रज यांच्यानंतर चे तिसरे साहित्यिक होते. आयुष्याची ६५ वर्ष त्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये काढली आहेत.
गोविंद करंदीकर यांच्या ह्या भव्य दिव्य मराठी साहित्य क्षेत्रातल्या योगदानासाठी त्यांना स्मरणार्थ ठेवून आज आपण या लेखामध्ये त्यांच्या जीवनावरील अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

विंदा करंदीकर यांची माहिती – Vinda Karandikar Information in Marathi
पूर्ण नाव | गोविंद विनायक करंदीकर |
जन्म | २३ ऑगस्ट १९१८ |
जन्म गाव | कोकणातील सिंधुदुर्ग मधल्या धालवली इथला |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
ओळख | ज्येष्ठ साहित्यिक |
मृत्यू | १४ मार्च २०१० रोजी |
राष्ट्रीय पुरस्कार | ज्ञानपीठ पुरस्कार |
जन्म
गोविंद विनायक करंदीकर यांचा जन्म (२३ ऑगस्ट १९१८) आपल्या कोकणातील सिंधुदुर्ग मधल्या धालवली इथला. विंदा हे गोविंद करंदीकर यांच टोपण नाव होतं. बालपण तर कोकणातच गेल, त्यामुळे त्यांचा स्वभाव अगदी कोकणी होता एकदम साधा भोळा. कोकणात प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर पुढील शिक्षणासाठी ते कोल्हापूरला आले. कोल्हापूर मध्ये त्यांनी एम.ए व बी. ए या दोन पदव्या संपादन केल्या.
शैक्षणिक आयुष्य पूर्ण झाल्यावर गोविंद करंदीकर हे बऱ्याच कॉलेजेस मध्ये इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. बसवेश्वर कॉलेज (रत्नागिरी), रामनारायण रुईया महाविद्यालय (मुंबई), एस. आय. ई. एस, इत्यादी. कॉलेजस मध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून सेवा दिली. याआधी हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतल्यामुळे गोविंद करंदीकर यांना तुरुंगवास देखील भोगावा लागला होता.
अतिशय साध्या पद्धतीची जीवन शैली बाळगणारे गोविंद करंदीकर साहित्य क्षेत्रामध्ये मात्र उच्च स्तरावर होते. पत्नी सुमा करंदीकर यादेखील एक लेखिका होत्या. गोविंद करंदीकर यांची एक मुलगी आणि दोन मुले अशी एकूण तीन अपत्य आहेत.
- नक्की वाचा: मंगेश पाडगावकर यांची माहिती
मराठी साहित्य
मराठी साहित्य क्षेत्रामध्ये गोविंद करंदीकर यांनी कवितांच्या माध्यमातून आपल्या विचारांचा ठसा लोकांच्या मनावर उमटवून मराठी साहित्य क्षेत्रांमध्ये अग्रगण्य कामगिरी करून ठेवली आहे. गोविंद करंदीकर यांची कारकीर्द फार मोठी आहे. ६५ वर्षे त्यांनी मराठी साहित्य क्षेत्रामध्ये काम केले. विंदा करंदीकर हे त्यांचे टोपण नाव होतं. गोविंद करंदीकर यांनी वेगवेगळ्या प्रकारच साहित्य लेखन केल आहे.
विंदा करंदीकर यांच्या साहित्यलेखनामध्ये प्रामुख्याने बालकविता, विरुपिका, छंदोबद्ध काव्य, मुक्तछंद, लघुनिबंध यांचा समावेश असतो. इसवी सन १९४९ साली “स्वेदगंगा” हे विंदा करंदीकर यांचं पहिलं प्रकाशित साहित्य लेखन होतं. इथूनच विंदा करंदीकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली.
मराठी भाषा अग्रगण्य व्हावी व समाजाला मराठी भाषेचे महत्व आणि त्यातली गोडी समजावी म्हणून आपल्या काव्यसंग्रहांचा वापर करून अनेक ठिकाणी त्यांनी वेगवेगळे प्रयोग घडवून आणले. मराठी भाषेचे समीक्षक म्हणून विंदा करंदीकर यांची ओळख झाली. माननीय विंदा करंदीकर यांचे संहिता, जातक, विरुपिका, मृदगंध, द्रुपद, स्वेदगंगा, इत्यादी काव्यसंग्रह आहेत.
बाल कविता देखील गोविंद करंदीकर यांचा प्रमुख साहित्यप्रकार होता. विंदा करंदीकर यांचे बालकविता संग्रह देखील उपलब्ध आहेत. “राणीची बाग”, “परी ग परी”, “सर्कसवाला”, “एकदा काय झाले सशाचे कान”, “एटू लोकांचा देश”, “अजबखाना”, “पिशी मावशी आणि तिची भुतावळ”, “आडम तडम”, “बागुल बुवा”, “टॉप”, “सात एके सात” हे विंदा करंदीकर यांचे बालकविता संग्रह आहेत.
- नक्की वाचा: पु ल देशपांडे यांची माहिती
बाल कविता हा प्रकार गोविंद करंदीकर यांचा आवडता प्रकार आहे. काव्य प्रकारांमध्ये गोविंद करंदीकर यांनी वेगवेगळे प्रकार हाताळले आहेत. त्यामध्ये गझल, गीत, मुक्तसुनीत, तालचित्रे या प्रकारांमध्ये काव्यलेखन केले आहे. कविता लिहिताना प्रत्येक वेळी वेगवेगळ्या कल्पना, नवीन गोष्टी त्या समाजापुढे मांडतील याची ते नेहमीच काळजी घेत.
त्यांच्या कवितांमध्ये प्रबोधन कारक विचार आणि त्याच्या जोडीला विनोदाचे तडके असा मिश्र कवितालेखन पाहायला मिळेल. गोविंद करंदीकर यांनी लघुनिबंध हा प्रकार देखील हाताळला आहे. गोविंद करंदीकर यांचे “स्पर्शाची पालवी” आणि “आकाशाचा अर्थ” हे लघुनिबंध संग्रह उपलब्ध आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी काव्य वाचन केलं होतं.
ज्यामुळे ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. “मानवाचे अंती गोत्र एक”, “सर्वस्व तुला वाहुनी”, “माझ्या घरी मी पाहुणी” ही प्रसिद्ध भावगीते गोविंद करंदीकर यांची आहेत.
पुरस्कार
विंदा करंदीकर यांची साहित्य क्षेत्रांमधील कारकीर्द यशस्वी ठरली. मराठीचे समीक्षक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या कार्याचं, त्यांच्या विचारांच, त्यांच्या कवितांच, त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांच बीज त्यांनी समाजाच्या मनामध्ये रुजवलं. गोविंद करंदीकर एक मराठी
ख्यातनाम साहित्यिक होते. त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने घेतली व त्यांना वेगवेगळ्या प्रतिष्ठित पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. १९९१ रोजी गोविंद करंदीकर यांना राष्ट्रीय कवी म्हणून “कबीर पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आलं. त्याशिवाय “कालिदास पुरस्कारा” चे देखील ते पात्र ठरले.
सन १९८७ मध्ये विंदा करंदीकर यांना “कवी कुसुमाग्रज पुरस्कार” प्रदान करण्यात आला. सन१९७० मध्ये “कुमारन आसन पुरस्कार” त्यांना जाहीर झाला. पुढे माननीय विंदा यांना “केशवसुत पुरस्कार”, “कोणार्क सन्मान” (१९९३), “जनस्थान पुरस्कार” (१९९३) असे मानाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
- नक्की वाचा: कुसुमाग्रज यांची माहिती
१९९९ मध्ये “भारतीय भाषा परिषद सह्यादी पुरस्कार”, “महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार” (१९९७), “महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार” (१८८५), विद्यापीठांचा “डी.लीट्स” पुरस्कार, “डॉक्टर लाभसेटवार साहित्य पुरस्कार” (२००२), “साहित्य अकादमी महत्म सदस्यता” (१९९६), “सीनियर फुल्ब्राईट फेलोशिप” (१९६७-६८), “सोव्हिएट लँड नेहरू लिटररी पुरस्कार” (१९७०).
इसवी सन २००३ मध्ये गोविंद करंदीकर यांना साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा “ज्ञानपीठ” पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार गोविंद करंदीकर यांना आठ तत्त्वचिंतकांच्या विचारांचे छंदोबद्ध काव्यरूप असलेल्या “अष्टदर्शने” या साहित्यकृतीसाठी देण्यात आला.
पुस्तके
गोविंद करंदीकर यांनी आपल्या साहित्य लेखनाच्या माध्यमातून आपले विचार मांडून मराठी साहित्य क्षेत्राच्या इतिहासामध्ये आपले नाव कोरले आहे. गोविंद करंदीकर यांच्या जीवनाबद्दल माहिती देणारे आणि त्यांच्या साहित्य लेखनाविषयी सांगणारे काही पुस्तके उपलब्ध आहेत. “इरावती कर्वे आणि विंदा करंदीकर” हे डॉक्टर पुष्पलता राजापुरे यांनी लिहिलेले पुस्तक आहे.
“विंदाची कविता” (डॉक्टर रमेश धोंगडे), “विंदा करंदीकरांची कविता: स्वरूप आणि समीक्षा” हे डॉक्टर शैलेश त्रिभुवन यांनी प्रकाशित केलेले पुस्तक आहे. “ज्ञानपीठ त्रिमूर्ती” (अनिल बळेल), “ज्ञानपीठ पुरस्कारित प्रतिभा नाट्यात्म दर्शने” (प्रा. मधु पाटील) ही काही गोविंद करंदीकर यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके आहेत.
- नक्की वाचा: राम गणेश गडकरी यांची माहिती
मृत्यू
गोविंद करंदीकर उर्फ विंदा करंदीकर मराठी साहित्य क्षेत्रातील एक मोठं नाव. ६५ वर्षे मराठी साहित्य क्षेत्रामध्ये घालवून मराठी साहित्य क्षेत्राचा दांडगा अनुभव त्यांना होता. ज्याकाळी काव्यवाचन इतकं प्रसिद्ध नव्हते तरीही माननीय वसंत बापट आणि माननीय मंगेश पाडगावकर यांच्या साह्याने संपूर्ण महाराष्ट्रात काव्यवाचनाचे अनेक प्रयोग केले, ते गोविंद करंदीकर जे “ज्ञानपीठ” सारख्या सर्वश्रेष्ठ पुरस्काराचे मानकरी ठरले.
ज्यांच्या कवितेमधून विमुक्तपणा, सामर्थ्य, संयम, अवखळपणा, गांभीर्य, प्रबोधन विचारांचा प्रत्यय येतो ते गोविंद करंदीकर १४ मार्च २०१० रोजी निधन पावले. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्य सृष्टी मध्ये मोठा असर पडला. परंतु मराठी साहित्य क्षेत्रांमधील त्यांचे नाव अजरामर झालं. मराठी भाषेला कवितांच्या माध्यमातून प्राधान्य मिळवून देणारे एक महान साहित्यिक ठरले.
गोविंद करंदीकर हे मार्क्सवादी आणि गांधीवादी होते. ज्याचा प्रत्यय त्यांच्या कवितांमधे देखिल दिसून येतो. साहित्य लेखनामध्ये देखील वेगवेगळे साहित्यप्रकार त्यांनी हाताळले. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन घेऊन येण्याचा त्यांचा प्रयत्न कायम राहिला. महाराष्ट्र सरकारने २०११ सालापासून साहित्यिकांना “वींदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार” देण्यास सुरुवात केली आहे.
आम्ही दिलेल्या yoga information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर विंदा करंदीकर यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या vinda karandikar information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of vinda karandikar in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये vinda karandikar kavita Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट