wheat information in marathi गहू पिकाविषयी माहिती, जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची पिके हि शेतामध्ये घेतली जातात जसे कि काही ठिकाणी फळांची शेती हि मोठ्या प्रमाणात केली जाते काही ठिकाणी फुलांची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते तर काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे धाण्य हे मोठ्या प्रमाणात घेतले जाते कारण धाण्य हे जगण्यासाठी एक गरज आहे आणि यामध्ये जोंधळा, गहू, बाजरी, नाचना, तांदूळ, मक्का, हरभरा, तूर, मुग आणि इतर प्रकारची धान्ये आणि कडधान्य हि महत्वाची पिके आहेत.
आणि आज आपण या लेखामध्ये महत्वाच्या पिकापैकी गहू या धाण्याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती घेणार आहोत. गहू हे एक प्रकारचे धान्य आहे जे सर्वांच्या परिचयाचे आहे कारण याचे पीठ बनवून याच्या पोळ्या बनवून रोज लोक खातात.
गहू हे एकदल पिष्टमय धान्य आहे, जे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर घेतले जाते आणि हे भारतातील सर्वात महत्वाच्या अन्नधान्यापैकी एक आहे. रशिया, युएसए आणि चीन या देशांच्यानंतर भारत देश हा चौथ्या क्रमांकावरील गहू पिकवणारा देश आहे.
गहू पिकाविषयी माहिती – Wheat Information in Marathi
गव्हाच्या जाती आणि त्याचा वापर
गहू हा एक एकदल धान्याचा प्रकार आहे आणि ह्याचा वापर हा अनेक खाद्य पदार्थ बनवण्यासाठी केला जातो खाली आपण गव्हाचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते आहेत ते पाहूया.
- कडक लाल गहू : कडक लाल गहू हे गव्हाचा सामान्य प्रकार आहे आणि ज्याचा वापर हा अनेक वेगवेगळ्या पदार्थ बनवण्यासाठी केला जातो जसे कि या प्रकारच्या गव्हाच्या पिठाचा वापर हा पोळ्या बनवण्यासाठी, रोटी बनवण्यासाठी ब्रेड बनवण्यासाठी, हार्ड रोल बनवण्यासाठी तसेच क्रोइसेंट बनवण्यासाठी देखील केला जातो. तसेच काही प्रकारच्या आशियाई नुडल्स बनवण्यासाठी कडक लाल गव्हाचा वापर होतो.
- कडक पांढरा गहू : कंडक पांढरा गहू हा आशियाई गहू आहे जो आशियाई नुडल्स, ब्रेड किंवा पोळी बनवण्यासाठी वापरले जाते.
- कडक लाल उन्हाळी गहू : कडक लाल उन्हाळी गहू हे वसंत ऋतूमध्ये पिकवले जातात आणि या प्रकारच्या गव्हाच्या पिठाचा वापर हा ब्रेड, पिझ्झा, रोल्स आणि क्रोइसेंट बनवण्यासाठी वापरले जाते.
- मऊ लाल गहू : मऊ लाल गहू हा एक गव्हाचा प्रकार आहे ज्याचे पिक हे हिवाळ्यामध्ये घेतले जाते आणि हे प्रकारच्या गव्हाच्या पिठाचा वापर हा बिस्कीट, क्रॅकर्स आणि केक बनवण्यासाठी केला जातो.
- मऊ पांढरा गहू : मऊ पांढऱ्या गव्हाचा वापर हा नुडल्स, पेस्ट्री किंवा केक बनवण्यासाठी केला जातो.
भारतामध्ये अनेक राज्य आहेत आणि प्रत्येक राज्यामध्ये गहू या धान्याला एक वेगळे नाव आहे आणि खाली आपण गव्हाची वेगवेगळ्या भाषेतील वेगवेगळी नावे काय आहेत ते पाहणार आहोत.
भाषा | नाव |
मराठी | गहू, कपले, गोहिंग |
इंग्रजी | गेहू, कनक |
कन्नड | गोधी |
इंग्रजी | व्हीट (wheat) कॉमन ब्रेड व्हीट (common wheat bread) |
तमिळ | गोदुनारी आणि गोदुमाइ |
तेलगु | गोडूमुलू |
पंजाबी | गंधम आणि गेंहु |
संस्कृत | गोधूम, यवनक, नंदिमुख आणि रसाळ. |
गहू या धान्याविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts
- गहू हा गावात कुटुंबातील एक सदस्य आहे जो कोरडे, एक बिया असलेले फळ तयार करतो.
- गहू हे अमेरिका धान्य उत्पादनामध्ये वापरले जाणारे प्राथमिक धान्य आहे आणि अमेरिकेमध्ये एकूण ४२ राज्यांच्यामध्ये गहू हे धान्य पिकवले जाते.
- गहू हे मोठ्याप्रमाणात घेतले जाणारे जगातील धान्य आहे.
- २०१६ मध्ये भारत, रशिया, अमेरिका, चीन आणि फ्रांस या देशांनी मोठ्या प्रमाणात गव्हाचे पिक घेतले होते.
- गहू हे एकदल पिष्टमय धान्य आहे जे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर घेतले किंवा पिकवले जाते.
- भारतामध्ये उत्तर प्रदेश या राज्यामध्ये ३२ टक्के गव्हाचे पिक घेतले जाते पंजाब मध्ये १५ टक्के पिक घेतले जाते आणि १६ टक्के गव्हाचे पिक हे मध्य प्रदेशमध्ये घेतले जाते.
- गव्हाच्या काही जाती ह्या २१० सेमी म्हणजेच ७ फुट उंच वाढू शकतात परंतु काही जाती ह्या ६० ते १२० सेमी इतक्याच वाढतात म्हणजेच २ ते ४ फुट इतक्याच वाढतात.
- जे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे गहू आहेत ते गहू दोन मुख्य प्रकारामध्ये विभागले जावू शकतात म्हणजेच वसंत ऋतूमधील गहू आणि हिवाळी गहू.
- गव्हाची झाड हे गवतासारखे दिसते आणि सामान्य गव्हाच्या झाडाची उंची हि ६० ते १२० सेमी इतकी असते.
- उष्ण कटिबंधामध्ये तरी गहू चांगला पिकतो परंतु समशीतोष्ण प्रदेशामध्ये गहू उत्तम पिकतो.
- बुरशी, जीवाणू आणि इतर घटकांच्यामुळे होणारे विविध रोग हे गव्हाच्या वाढीवर परिणाम करू शकतात त्यामुळे आपल्याला अनेक कीटक नाशके गव्हाच्या पिकावर मारावी लागतात ज्यामुळे गव्हावर कोणत्याही प्रकारचा रोग पडणार नाही.
- गहू या पिकाचा उगम हा आशिया खंडामध्ये झाला आणि जरी हे बहुतेक धान्य पिक म्हणून वापरले जात असले तरी ते वार्षिक चारा पिक म्हणून वापरले.
गव्हाचे फायदे – wheat benefits in marathi
कोणत्यही धान्यामध्ये किंवा फळामध्ये कोणता ना कोणतातरी आरोग्य फायदा असतोच आणि तसेच गव्हामध्ये देखील काही आयुर्वेदिक गुण असतात जे आरोग्य समस्या दूर होण्यास मदत होते.
- ज्या लोकांना सांधेदुखीचा त्रास आहे अश्या लोकांनी गव्हाचा वापर त्यांच्या आहारामध्ये केला तर सांधेदुखी थोड्या प्रमाणात कमी होण्यास मदत होते.
- तसेच अनेकांना त्वचेच्या काही समस्या असतात त्यांनी जर गव्हाचा वापर त्यांच्या आहारामध्ये केला तर त्यांच्या त्वचेच्या समस्या दूर होतात तसेच हे त्वचा रोगावर उपचार म्हणून देखील वापरले जाते.
- सध्या अनेकांना मधुमेह या रोगाचा सामना करावा लागत आहेत आणि अश्या लोकांनी त्यांच्या आहारामध्ये गव्हाचा वापर केला तर गव्हाच्या सेवनामुळे मधुमेह कमी होण्यास मदत होते.
- पोटांच्या आजारासाठी देखील गव्हाचा वापर हा चांगल्या प्रकारे होऊ शकतो.
- गव्हाच्या वापरामुळे सर्दी, खोकला आणि कफ या पासून आराम मिळतो.
- गव्हाची पेरणी आणि काढणी हि साधारणपणे हवामानावर आधारित असते आणि हे पिक घेण्यासाठी ११० ते १३० दिवसांचा कालावधी लागतो.
- भारतामध्ये उत्तरप्रदेश, पंजाब, गुजरात, हरियाना, बिहार, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गहू पिकवले जाते.
आम्ही दिलेल्या wheat information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर गहू पिकाविषयी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या wheat crop information in marathi या wheat meaning in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about wheat in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये information on wheat in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट