माझे गाव निबंध My Village Essay in Marathi

My Village Essay in Marathi – Maza Gaon Nibandh in Marathi माझे गाव मराठी निबंध गाव म्हटलं की अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय होय. कारण प्रत्येकालाच आपले गाव आतिशय जवळच असते. शहरातले थकलेभागलेले सगळे आत्मे जीवाच्या शांतीसाठी सगळे आपापल्या गावी वळतात. माझ्या गावचे नाव तुर्केवाडी. महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एक खेडेगाव तुर्केवाडी. कोल्हापूर जिल्ह्यापासून दोन तासाच्या अंतरावर असणारे तर चंदगड तालुक्यापासून एक तास अंतरावर असणारा माझं गाव. अगदी साधं गाव आणि गावातील साधी माणसं.

गावामधले जवळपास सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. जसे की हिंदू, मुसलमान, चांभार, कुंभार हे सर्व जण मिळून मिसळून आनंदाने राहतात. गावातील लोक अतिशय मनमिळावू आणि प्रेमळ आहेत. कोणत्याही कामासाठी एकमेकांच्या मदतीला तयार असतात. अशा या एकोप्यामुळे माझे गाव आदर्श गाव म्हणून ओळखले जाते.

माझ्या गावात मोठ्या इमारती नाही परंतु माझ्या गावातील लोकांची मने फार मोठी आहेत. गाव शांत आणि स्वच्छ आहे. गावातील पहाटेचा सूर्योदय जसा मनाला भुरळ घालणारा असतो तसाच सायंकाळचा सूर्योदय सुद्धा मनाला हुरहूर लावून जातो. दोन्ही वेळी निसर्गाचे रूप अगदी डोळ्यात साठवून ठेवावे असे असते. गावात शुद्ध, खेळती हवा अनुभवायला मिळते.

my village essay in marathi
my village essay in marathi

माझे गाव मराठी निबंध – My Village Essay in Marathi

असावे माझे गाव निबंध – Maza Gaon Nibandh in Marathi

गावातील लोक धार्मिक असून युवकांपासून ते जेष्ठापर्यंत सर्व लोक धार्मिक कार्यात सहभागी होतात. गाव धार्मिक असल्याने गावामध्ये काही ना काही धार्मिक कार्यक्रम सारखे चालू असतात. वर्षातून एकदा गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होतो. गावच्या चारी दिशेला देव जनु गावची रक्षा करत आहे अशी गावच्या मंदिराची रचना केली आहे.

गावात गणपती मंदिर मारुती मंदिर महालक्ष्मी मंदिर रवळनाथ मंदिर अशी अनेक सुंदर मंदिरे आहेत. गावच्या माथ्यावर लक्ष्मीमाता गावचे रक्षण करीत आहे. सर दुसऱ्या दिशेला मारुती गावावर लक्ष ठेवून आहे. तर गावच्या मधोमध बसून गावची जबाबदारी घेणारा गणपती बाप्पा  दरवर्षी गणपतीच्या मंदिरात गणपती चा वाढदिवस साजरा केला जातो.

त्यावेळी गावातील लोक एकत्र येऊन वर्गणी काढून मोठ्याने गाव जेवण घातले जाते. तर हनुमान जयंतीला मारुती मंदिर मध्ये  भजन कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला जातो. तर दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. हालचाली केल्या जातात आणि या हालचाली पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोक आमच्या गावाला भेट देतात.

गणेश उत्सवाच्या निमित्ताने गावात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. गावात नऊ वर्षातून एकदा लक्ष्मी देवीचा उत्सव साजरा केला जातो. महालक्ष्मी उत्सव नऊ दिवस असतो. हे नऊ दिवस केव्हाच केव्हा निघून जातात समजतच नाही. गावातील माणसांचे राहणीमान अगदी साधेच आहे. गावात सर्व उत्सव गावकरी लोक सर्व जण मिळून आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात तर मग होळी असो, दसरा, गुढीपाडवा, शिगमा असो गणपती उत्सव असो वा दिवाळी.

माझा गाव कविता

माणूस इथला जिवलग जीवाचा

मायाळू आणि मोठ्या मनाचा

आदराने घ्यावे तुम्ही नाव

असं आहे तुर्केवाडी माझं गाव

गावात मुलांना शिकण्यासाठी दोन शाळा आहेत. गावात शिकण्यासाठी पहिली ते दहावीपर्यंत शाळा आहे. पहिली ते चौथीसाठी कुमार विद्यामंदिर तुर्केवाडी तर पाचवी ते दहावी साठी जनता विद्यालय तुर्केवाडी अशा शाळा आहेत. मुला-मुलींना प्राथमिक शिक्षणासाठी बाहेरगावी जावं लागत नाही उलट शाळेत शिकण्यासाठी तडशीनहाळ, माडवळे, यशवंतनगर, कार्वे, वैतागवाडी अशा आजूबाजूच्या गावातील मुली शिकण्यासाठी येतात.

तसेच लहान मुलांसाठी अंगणवाडी आहे. गावकऱ्यांचा शिक्षणावर जास्त भर असून गावातील काही लोक डॉक्टर, इंजिनीयर, तलाठी, ग्रामसेवक या पदावर कार्यरत आहेत. गावातील युवकही सुशिक्षित आहेत. त्यातील काही नोकरीच्या शोधात आहेत तर काही व्यवसायात उतरले आहेत.

गावात किराणा मालाचे दुकान, कपड्याचे, सोन्याचे, जनरल स्टोअर्स, मेडिकल, इलेक्ट्रिक, मोबाईल शॉपी अशी भरपूर दुकाने आहेत. गावातील लोकांना साहित्य आणण्यासाठी बाहेर गावी जावे लागत. गावामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र ही बँक आहे. गावातील लोकांचे आर्थिक व्यवहार गावातच होतात त्यासाठी त्यांना बाहेर गावी जावे लागत नाही.

गावामध्ये ग्रामपंचायत आहे. पाच गावांची मिळून एक ग्रामपंचायत तुर्केवाडीमधे आहे. माडवळे, तडशीनहाळ, जगमहट्टी येतील लोग ग्रामपंचायतिमध्ये कामानिमित्त येतात. हॉस्पिटल आहेत. गावात आठवड्यातुन एकदा म्हणजे दर बुधवारी बाजार भरतो. बाजारात पालेभाजीचा बाजार, माशांचा बाजार आणी जनावरांचा बाजार भरतो. गावात प्रत्येक गोष्टीची सोयी सुविधा केलेली आहे त्यामुळे लोकांना कोणत्याही गोष्टीसाठी बाहेर गावी जावे लागत नाही.

गाव अगदी शांतताप्रिय आणि गुण्यागोविंदाने नांदत आहे. गावातील निम्म्याहून अधिक लोकी शेतकरी त्यामुळे निसर्गावर अफाट प्रेम असणारी माणसं या गावात राहतात. कलेला वाहून घेतलेलं, सांस्कृतिक वारसा जपणार आणि प्रत्येक सणवार अगदी आनंदाने साजरे करणारे हे गाव.

या गावाने आपल्या बऱ्याच लेकरांना सर्व दृष्टीने चांगले संस्कार केले. गावचे वेळापत्रक त्यावेळी ठरलेलं असायच सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. अगदी एखादा चित्रपट पाहावा तशी हुबेहूब चालणारी ही दृश्ये. रोज भल्या पहाटे पिंगळ्या, नंदी बैलवाला हेळवी, तर कधी वासुदेववाला यांची नेहमी रेलचेल असायची.

यानंतर आगमन व्हायचे ते डोंबाऱ्याचा खेळ करून दाखवणाऱ्या कुटुंबाचं. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी प्रत्येक घरातून भिक्षा मागून आपलं कुठून चालवायचं हा त्यांचा दिनक्रम ठरलेला असायचा. कधी-कधी ते गावात खेळ करून दाखवायचे दुपारच्या भर उन्हात पों पों पों करत सायकलला भोंगा भोंगा अडकून भोंगा वाजवत येणाऱ्या गारेगार वाल्यांची आम्ही नेहमी वाट बघत बसायचो. त्या वेळी गावात गारेगार वाल्यांकडून गारेगार घेऊन खाण्याचा आनंद काही वेगळाच होता.

गाव म्हणजे गाव. गावात असं म्हटलं जरी तरी अगदी बालपणातील सगळेजण क्षण झरर्कन डोळ्यासमोरून निघून जातात आणि मनात फक्त आठवणी दाटून येतात. प्रत्येकाच्या मनात बालपण आणि गाव या दोन्ही गोष्टी जिव्हाळ्याच्या असतात. आपली आणि गावची नाळच अशी जोडलेली असते की ती आपल्याला कायम लहान होण्यासाठी भाग पाडते.

गावाकडे पावसाचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. त्यामुळे कौलारू घरांची छपरे उतरती आहेत. गावी भरपूर पाऊस असल्यामुळे पावसाच्या चार महिन्या नंतरच्या काळात सुद्धा गावातील विहिरींना मुबलक पाणी असते. त्यामुळे पाण्याची टंचाई कधी गावात भासलीच नाही. गावात प्रत्येकाच्या घरासमोर अंगण आणि अंगणामध्ये तुळशी वृंदावन आहे.

आम्ही दिलेल्या my village essay in marathi wikipedia माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “माझे गाव मराठी निबंध” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या maza gaon nibandh in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि maza gaon essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण essay on mobile phone in marathi या लेखाचा वापर village in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!