आगाखान पॅलेस पुणे माहिती Aga Khan Palace Information in Marathi

Aga Khan Palace Information in Marathi आगाखान पॅलेस पुणे माहिती मराठी भारतातील पुणे या शहरामध्ये १२५ वर्षांहून अधिक वर्षांचा वारसा असलेला भव्य आगा खान पॅलेसला इतिहासातील वारसा आणि वास्तुकला यांचा गौरवशाली पुरावा मनाला जातो. आध्यात्मिक प्रमुख आणि ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष तिसरे सुलतान मोहम्मद शाह आगा खान यांनी इ. स. १८९२ मध्ये हा भव्य राजवाडा बांधला ज्याचे नाव त्यांनी आगा खान पॅलेस असे ठेवले गेले. त्यांनी राजवाड्याचे बांधकाम करण्यापाठीमागील उद्देश हा पुण्याच्या आसपासच्या दुष्काळग्रस्त भागात गावकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देणे हा होता.

या वाड्याच्या बांधकामासाठी सुमारे १००० हून अधिक कामाकर कामाला लागले होते. तसेच देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील या राजवाड्याची भूमिका भारताच्या आधुनिक इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या खुणांपैकी एक आहे कारण हा राजवाडा एकेकाळी कारागृह म्हणून काम करत होता जिथे महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यलढ्यातील इतर प्रख्यात नेत्यांना ठेवण्यात आले होते.

aga khan palace information in marathi
aga khan palace information in marathi

आगाखान पॅलेस पुणे माहिती मराठी – Aga Khan Palace Information in Marathi

स्मारकाचे नावआगा खान पॅलेस
ठिकाणपुणे
संस्थापकतिसरे सुलतान मोहम्मद शाह आगा खान
स्थापनाइ.स १८९२
क्षेत्रफळ१९ एकर
खर्चबांधण्यासाठी त्यावेळी १२ लाख रुपये खर्च झाले होते.
बांधकाम शैलीइस्लामिक शैली

आगा खान पॅलेसचे बांधकाम आणि बांधकाम शैली

आगा खान पॅलेस बांधकाम हे खोजा इस्माइली धर्माचे ४८ वे इमाम तिसरे सुलतान मोहम्मद शाह आगा खान यांनी करवून घेतले. या वाड्याच्या बांधकामासाठी सुमारे १००० हून अधिक कामाकर कामाला लागले होते आणि या बांधकामासाठी ५ वर्ष लागली होती. या वाड्याचे बांधकाम हे इतके भव्य आणि सुंदर आहे कि ते बांधण्यासाठी त्यावेळी १२ लाख रुपये खर्च झाले होते.

हा राजवाडा त्याच्या चमकदार इस्लामिक शैलीच्या वास्तुकलेसाठी ओळखला जातो आणि हे १९ एकर जमिनीवर स्थित आहे ज्यामध्ये विस्तृत, सुस्थितीत असणाऱ्या लॉनचा समावेश आहे. मुख्य वास्तू ७ एकर क्षेत्रफळावर बांधलेली आहे आणि त्यात ५ मोठे हॉल आहेत. राजवाड्याच्या वास्तुकलेचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे इटालियन शैलीतील कमानी अश्या सुंदर वगवेगळ्या वास्तू शैली पासून हि इमारत बनलेली आहे.

या राजवाड्याचे जवळजवळ २८००० चौरस मीटरचे अंगभूत क्षेत्र, अनेक सुंदर फ्रेंच लॉन, कारंजे, लांब कॉरिडॉर, प्रशस्त खोल्या, गुलाब शैलीतील खिडक्या तसेच इटालियन कमानी या राजवाड्याची ऐश्वर्य वाढवतात.

आगा खान पॅलेसमध्ये साजरे केले जाणारे वार्षिक कार्यक्रम 

पुण्यातील गांधी मेमोरियल सोसायटीतर्फे आगा खान पॅलेसमध्ये अनेक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि साजरे केले जातात.

  • प्रजासत्ताक (२६ जानेवारी) दिन साजरा केला जातो.
  • या वाड्यामध्ये ३० जानेवारी रोजी शहीद दिन साजरा केला जातो.
  • कस्तुरभा गांधी यांची पुण्यतिथी जो मातृदिन म्हणून साजरा केला जातो.
  • १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो.
  • २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती.
  • बालदिन (१४ नोव्हेंबर) साजरा केला जातो.

महात्मा गांधी आणि आगा खाण पॅलेस

आपल्या सर्वांना माहीतच आहे कि आगा खान या पॅलेसने ऑगस्ट १९४२ ते मे १९४४ पर्यंत पुण्यातील महात्मा गांधींचा तुरुंग म्हणून काम केले. ते त्यांच्या पत्नी कस्तुरबा, त्यांचे सचिव महादेव देसाई आणि सरोजिनी नायडू यांच्यासह येथे राहत होते.

कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई या दोघांचाही या राजवाड्याच्या आवारातच मृत्यू झाला. राजवाड्याच्या आवारातील एक कोपरा त्यांच्यापैकी दोघांना समर्पित समाधी म्हणून काम करतो आणि दोन समाधींच्या शेजारी महात्मा गांधींच्या काही अस्थी ठेवण्यात आल्या आहेत.

आगा खान पॅलेस बद्दल अनोखी तथ्ये – facts about aga khan palace 

  • खादी बनवणे हा आजही राजवाड्यात चालवल्या जाणार्‍या मुख्य उपक्रमांपैकी एक आहे.
  • इ.स १९६९ मध्ये आगा खान यांनी हा राजवाडा भारत सरकारला दान केला.
  • ज्या खोल्यांमध्ये गांधी आणि इतर राहत असत, त्या खोल्या संग्रहालय म्हणून काम करतात.
  • कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई या दोघांचाही या राजवाड्याच्या आवारातच मृत्यू झाला.
  • इ.स १९४२ मध्ये सरोजिनी नायडू यांनाही येथे तुरुंगात टाकण्यात आले होते.
  • हा राजवाडा त्याच्या चमकदार इस्लामिक शैलीच्या वास्तुकलेसाठी ओळखला जातो आणि हे १९ एकर जमिनीवर स्थित आहे.
  • आज आगा खान पॅलेस हे गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीचे मुख्यालय म्हणून काम करते.
  • या राजवाड्याच्या आवारात पाच भव्य हॉलसह ७ एकर क्षेत्रफळावर विस्तृत, सुस्थितीत लॉन बांधले गेले आहेत आणि प्रसिद्ध वास्तुविशारद चार्ल्स कोरिया यांनी या महालाची रचना केली होती.

आगा खान पॅलेस बद्दल आवश्यक माहिती 

ठिकाणाचा पत्ता : नगर रोड, सम्राट अशोक रोड, पुणे, महाराष्ट्र ४११००६.

वेळ : दररोज सकाळी ९.०० ते ५.३० दरम्यान राजवाड्याला भेट देऊ शकतो.

शुल्क : भारतीय नागरिकांसाठी आगा खान पॅलेसमध्ये प्रवेश शुल्क ५ रुपये आहे आणि परदेशी पर्यटकांच्यासाठी १०० रुपये प्रवेश शुल्क आहे.

आगा खान पॅलेस जवळील इतर प्रेक्षणीय स्थळे – palces to visit near aga khan palace 

लाल महाल 

लाल महाल हा शहाजीराजे भोंसले यांनी इ. स. १६३० च्या सुमारास बांधले होते. राजाने आपली पत्नी जिजाबाई आणि मुलगा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी हा सुंदर वाडा बांधला होता.

पाताळेश्वर गुहा मंदिर 

आगा खान पॅलेसपासून ११ किलोमीटर अंतरावर पाताळेश्वर गुहा मंदिर आहे, जे भगवान शिवाला समर्पित आहे आणि पूर्णपणे खडकात कोरलेले आहे.

बंड गार्डन 

आगा खान पॅलेसपासून सुमारे ५.६ किलोमीटर अंतरावर स्थित, हे ठिकाण महात्मा गांधी उद्यान म्हणूनही ओळखले जाते आणि जमशेदजी जीजीभॉय यांना समर्पित आहे.

शनिवार वाडा 

आगाखान पॅलेसपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर शनिवार वाडा आहे, जो एका महालाच्या रूपात बांधला गेला आहे आणि बाजीराव प्रथम याने इ.स १७३० मध्ये ते बांधले आहे.

आगा खान पॅलेसला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ

मार्च ते जूनच्या सुरुवातीचे महिने शहरातील सर्वात उष्ण आणि जाचक महिने असतात. यावेळी आगा खान पॅलेसला भेट देणे अयोग्य आहे तसेच जून ते सप्टेंबर हे थंड पावसाळ्याचे महिने असतात, जुलै हा वर्षातील सर्वात आर्द्र महिना असतो.

या काळात, धूळ आणि निसरड्या मैदानामुळे राजवाड्यातील बागांना भेट देणे खूप कठीण असते त्यामुळे पुण्यात डिसेंबर ते फेब्रुवारी हे थंडीचे महिने असतात त्यावेळी हवामान २५ अंश सेल्सिअस इतके असते त्यामुळे डिसेंबर ते फेब्रुवारी या वाड्याला भेट देणे सोयीचे ठरेल.

कसे जावे 

आगा खान पॅलेस हा पुणे या शहरामध्ये असल्यामुळे आपल्याला कोणत्याही शहरातून बस मिळू शकते आणि जर तुम्हाला रेल्वे किंवा विमानाने पुण्याला यायचे असल्यास मुख्य शहरातून पुणे शहरामध्ये येणारी रेल्वे किंवा बस मिळू शकते. मग पुण्यातून स्थानिक बस, टॅक्सी आणि रिक्षाने वाडा पाहण्यासाठी जावू शकता.

आम्ही दिलेल्या aga khan palace information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर आगाखान पॅलेस पुणे माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या aga khan palace pune information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about aga khan palace in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये information on aga khan palace Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!