अर्ध मत्स्येंद्रासन मराठी माहिती Ardha Matsyendrasana Information in Marathi

ardha matsyendrasana information in marathi – ardha matsyendrasana marathi mahiti अर्ध मत्स्येंद्रासन मराठी माहिती, सध्याच्या दगदगीच्या आणि प्रदूषणाच्या जीवनामध्ये आपले आरोग्य चांगले ठेवणे हे आपल्यासाठी एक चॅलेंजच आहे. कारण आपल्याला आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय, व्यायाम, चालणे आणि वेगवेगळ्या प्रकारची योगासने करून आपले आरोग्य चांगले ठेवावे लागते. काही लोक आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमितपणे व्यायाम करतात तर काही जण नियमितपणे व्यायाम करत नसल्यामुळे त्यांना अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते.

ही निरोगी जगण्याची कला आणि विज्ञान आहे आणि ही अत्यंत सूक्ष्म विज्ञानावर आधारित एक आध्यात्मिक शिस्त आहे, जी मन आणि शरीर यांच्यात सुसंवाद आणण्यावर लक्ष केंद्रित करते. योग नियमितपणे सराव करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या जीवनशैलीत कायमस्वरूपी सकारात्मक फरक निर्माण करू शकतो आणि आपल्याला सततच्या आरोग्य समस्या देखील उद्भवणार नाहीत आणि योग केल्यामुळे आपल्या मनाला देखील शांतता आणि समाधान मिळते.

आपले आरोग्य आणि मन चांगले ठेवण्यासाठी लोक अनेक वेगवेगळ्या प्रकारची योगासने करतात जसे कि सूर्य नमस्कार, पद्मासन, गोमुखासन, मयुरासन, चक्रासन, वज्रासन, धनुरासन, शवासन, अर्ध मत्स्येंद्रासन, प्राणायाम, भुजंगासन आणि इतर अनेक प्रकार आहेत आणि आज आपण या लेखामध्ये “अर्ध मत्स्येंद्रासन” कसे करतात आणि त्याचे फायदे काय आहेत या सर्व गोष्टींच्याविषयी आपण खाली सविस्तरपणे माहिती घेणार आहोत.

ardha matsyendrasana information in marathi
ardha matsyendrasana information in marathi

अर्ध मत्स्येंद्रासन मराठी माहिती – Ardha Matsyendrasana Information in Marathi

नावअर्ध मत्स्येंद्रासन
प्रकारयोगासन
दुसरे नाववक्रासन
अर्थमत्स्य म्हणजे मासा, इंद्र म्हणजे राजा आणि आसन म्हणजे मुद्रा ( मत्स्येंद्रासन )
शैलीहठयोग
कालावधी३० ते ६० सेकंद
पुनरावृत्तीप्रथम उजव्या बाजूला आणि नंतर डावीकडे करा.

अर्ध मत्स्येंद्रासन माहिती – information about ardha matsyendrasana in Marathi

अर्ध मत्स्येंद्रासन हा एक योगासनाचा प्रकार आहे आणि या आसनाचे नाव हे योगी मत्स्येंद्रनाथ यांच्या वरून पडले आहे. या असणानाचे नाव हे मत्स्येंद्रासन असे संस्कृतमधून पडले आहे आणि हे नाव तीन शब्दांच्यापासून बनलेले ते म्हणजे मत्स्य, इंद्र आणि आसन आणि मत्स्य म्हणजे मासा, इंद्र म्हणजे राजा आणि आसन म्हणजे मुद्रा आणि या आसनाला वक्रासन या नावाने देखील ओळखले जाते.

अर्ध मत्स्येंद्रासन हे हठयोग वर्गामध्ये शिकवल्या जाणाऱ्या बारा मुलभूत आसनांच्यापैकी हे एक आहे. अर्ध मत्स्येंद्रासन हे करण्यासाठी तसे खूप सोपे आहे आणि आपल्याला खाली जमिनीवर बसून पाठ वळवावी लागते. अर्ध मत्स्येंद्रासन हे आसन बहुतेकजण सकाळी करतात तर हे आसन जेवणानंतर ५ ते ६ तासांनी करता येते परंतु हे जेवण झाल्यानंतर हे आसन करू नये. हे आसन करताना तुमचे पोट आणि आतडे रिकामे असणे आवश्यक असते.

अर्ध मत्स्येंद्रासन कसे करतात – ardha matsyendrasana steps

 • सर्वप्रथम जमिनीवर चटई किंवा जमखाना अंथरून घ्या.
 • आता चटईवर पाय पसरून ताठ बसा आणि तुमचे पाय एकत्र ठेवलेले आहेत आणि तुमचा पाठीचा कणा पूर्णपणे ताठ करून बसा.
 • आता त्यानंतर तुमचा डावा पाय असा वाकवा कि तुमच्या डाव्या पायाची टाच उजव्या नितंबाच्या पुढे असावा.
 • त्यानंतर उजवा पाय गुढघ्यावर घेऊन डाव्या गुढघ्याजवळ ठेवा.
 • आता तुमची कंबर, मान आणि खांदे उजवीकडे वळवा आणि तुमची नजर तुमच्या उजव्या खांद्याकडे असू द्या आणि या सर्व प्रक्रियेमध्ये तुमच्या पाठीचा कणा ताठ ठेवा.
 • ताण वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी तुम्ही तुमचे हात ठेवू शकता असे अनेक मार्ग आहेत. परंतु हे सोप्या पध्दतीने करण्यासाठी आपण आपला उजवा हात आपल्या पाठीमागे आणि डावा हात गुढघ्यांच्यावर ठेवू शकता.
 • आता हि मुद्रा पूर्ण झाली आणि या मुद्रेमध्ये थोडा वेळ राहण्याचा प्रयत्न करा म्हणजेच ३० ते ६० सेकंद या मुद्रेमध्ये राहण्याचा प्रयत्न करा.
 • श्वास सोडा आणि उजवा हात सोडा आणि नंतर कंबर छाती आणि शेवटी मान आणि थोडा वेळ सरळ बसल्यावर आराम करा.
 • दुसऱ्या बाजूला देखील वरील पायऱ्या वापरा आणि हि मुद्रा करा.

अर्ध मत्स्येंद्रासन कोणी करू नये

अर्ध मत्स्येंद्रासन हे जरी अनेक आरोग्य समस्या दूर करण्यासाठी केला जात असेल तरी देखील हि योगमुद्रा काही लोक करू शकत नाहीत. चला तर खाली पाहूया हि योग मुद्रा कोण करू शकत नाहीत ते पाहूया.

 • ज्या लोकंच्या पोट, मेंदू आणि हृदय या अवयवांच्या शस्त्रक्रिया झालेली आहे अश्या लोकांनी हा योगा प्रकार करू नये.
 • तसेच गर्भवती स्त्रियांनी देखील हा योगा प्रकार करू नये.
 • मासिक पाळीच्या काळामध्ये देखील हे आसन करणे टाळावे.
 • हर्निया आणि पेप्टिक अल्सर असलेल्या लोकांनी हा योग प्रकार अगदी सावधगिरीने केला पाहिजे.

अर्ध मत्स्येंद्रासनाचे फायदे – ardha matsyendrasanain benefits in Marathi

नियमित योग करणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही आरोग्य समस्येला सामोरे जावे लागत नाही कारण नियमित योगाचे अनेक फायदे असतात. चला तर आता आपण अर्ध मत्स्येंद्रासनाचे कोणकोणते फायदे आहेत ते पाहूया.

 • अर्ध मत्स्येंद्रासन हि योगमुद्रा रोज नियमितपणे केल्यामुळे आपल्या पाठीचा कणा मजबूत तसेच लवचिक बनण्यास मदत होते
 • हे आसन करताना पोटाच्या अवयवांना पीळ पडतो आणि पीळ पडून पोटाच्या अवयवांना मालिश मिळते.
 • हे छाती उघडण्यास आणि फुफ्फुसांना ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यास मदत करते.
 • या आसनाच्या सरावाने रक्ताभिसरण सुधारते तसेच रक्त शुध्द करण्यास मदत होते.
 • यामुळे युरिनरी ट्रक्ट इन्फेक्शहि दूर होण्यास मदत होते.
 • मासिक विकारांच्यावर हे असं फायदेशीर ठरू शकते.

आम्ही दिलेल्या ardha matsyendrasana information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर अर्ध मत्स्येंद्रासन माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या benefits of ardha matsyendrasanain Marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about ardha matsyendrasana in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये ardha matsyendrasana information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!