Dadpe Pohe Recipe in Marathi दडपे पोहे रेसिपी मराठी पोहे हा एक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे जो लोक नाश्त्यासाठी बनवतात आणि आवडीने खातात. सकाळच्या नाश्त्याला आपण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवतो जसे कि साधे पोहे, शिरा, उपमा, इडली, वडा आणि डोसा या प्रकारचे पदार्थ बनवतो तसाच एक खूप सोपा आणि झटपट बनणारा पदार्थ म्हणजे दडपे पोहे. दडपे पोहे हा पदार्थ महाराष्ट्रीयन म्हणजेच कोकणातील आहे जो भारतामध्ये इतर काही ठिकाणी देखील बनवला जातो आणि आवडीने खाल्ला जातो आणि हा पदार्थ आपण विशेषता नाश्त्यासाठी बनवू शकतो आणि लहानांच्या पासून मोठ्यांच्यापर्यंत सर्वांना खावू घालू शकतो.
पोहे हे वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात जसे कि साधे पोहे, कांदा पोहे, ताक पोहे, तर्री पोहे आणि दडपे पोहे पण आपण आज या लेखामध्ये दडपे पोहे कसे बनवायचे ते पाहणार आहोत.
दडपे पोहे रेसिपी मराठी – Dadpe Pohe Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | ८ ते १० मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
पाककला | महाराष्ट्रीयन ( कोकण ) |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
दडपे पोहे म्हणजे काय ?
दडपे पोहे बनवताना पोहे हे पाण्यामध्ये न भिजवता ते ओल्या खोबऱ्यामध्ये एका वर एक थर लावून ते दडपून तास ते दीड तास एका हवा बंद डब्यामध्ये बंद करून ठेवलेले असतात. मग ते तास ते दीड तासांनी जागले भिजले कि खोबऱ्यासह त्याला आपण जसे कांदे पोह्यांना फोडणी देतो तशी फोडणी द्यावी लागते.
- नक्की वाचा: झटपट नाश्ता रेसिपी मराठी
- पोहे : दडपे पोहे बनवण्यासाठी पोहे हा एक महत्वाचा घटक आहे जो ओल्या खोबऱ्यामध्ये दडपून ठेवले जातात आणि मग ते फोडणी दिले जातात.
- ओले खोबरे : ओले खोबरे देखील दडपे पोहे बनवण्यासाठी लागणारा एक मुख्य घटक आहे. ओले खोबरे खवले जाते आणि एक डब्यामध्ये खोबऱ्याचा एक थर, पोह्याचा एक थर आहे ५ ते ६ पातळ थर लावले जातात आणि ओल्या खोबऱ्यामुळे पोहे भिजले जातात.
दडपे पोहे रेसिपी – dadape pohe recipe in marathi
महाराष्ट्रातील कोकण भागामध्ये नारळ जास्त प्रमाणात पिकत असल्यामुळे कोकणामध्ये ओले खोबरे वापरून बनवला जाणारा दडपे पोहे हा एक स्वादिष्ट आणि खमंग नाश्त्यासाठी खाल्ला जाणारा पदार्थ आहे. जो बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये अगदी उत्तम बनतो. पोहे हा पदार्थ वेगवेगळ्या पध्दतीने बनवले जातात त्यामधील एक प्रकार म्हणजे दडपे पोहे. आता आपण दडपे पोहे कसे बनवायचे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते याबद्दल माहिती घेवूयात.
पूर्वतयारी : पोहे एक तास अगोदर खोबऱ्यामध्ये दडपून ठेवणे.
तयारीसाठी लागणारा वेळ | ८ ते १० मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
पाककला | महाराष्ट्रीयन ( कोकण ) |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
दडपे पोहे बनवण्यासाठी पोहे आणि ओले खोबरे हे महत्वाचे साहित्य लागते त्याचबरोबर दडपे पोहे बनवण्यासाठी इतर साहित्य देखील लागते आणि ते साहित्य बहुतेकदा आपल्या घरामध्ये उपलब्ध असू शकते आणि जर उपलब्ध नसेल तर ते आपण बाजारातून विकत अनु शकतो. चला तर आता आपण दडपे पोहे बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- पाव किलो पोहे.
- १ ओल्या नारळाचा खीस.
- ३ ते ४ हिरव्या मिरच्या ( चिरलेल्या ).
- ५ ते ७ कडीपत्ता पाने.
- १ मध्यम कांदा ( चिरलेला ).
- १ टोमॅटो ( चिरलेला ).
- १ चमचा जिरे.
- १ चमचा मोहरी.
- १ मोठा चमचा तेल.
- हळद ( आवश्यकतेनुसार ).
- १/४ चमचा हिंग.
- २ ते ३ चमचे लिंबू रस.
- मीठ ( चवीनुसार ).
- साखर ( चवीनुसार ).
- कोथिंबीर.
आता आपण वर दिलेले साहित्य वापरून दडपे पोहे कसे बनवायचे ते पाहूयात.
- दडपे पोहे बनवताना सर्वप्रथम एक हवाबंद डबा घ्या आणि त्यामध्ये खिसलेल्या नारळाचा एक पातळ थर घाला आणि मग त्यावर पोहे घाला मग त्यावर परत ओल्या खिसलेल्या खोबऱ्याचा थर घाला मग त्यावर आणि पोह्याचा थर घाला आणि मग त्यावर ओल्या खिसलेल्या खोबऱ्याचा थर घाला असे पोह्याचे आणि खोबऱ्याचे एकूण पाच थर घाला आणि डब्याचे झाकण बंद करून एक तास ते दीड तास तसेच ठेवा.
- त्यामुळे पोहे चांगले भिजतील.
- मग पोह्यांना फोडणी देण्यासाठी लागणारे साहित्य काढून घ्या तसेच हिरवी मिरची आणि कांदा बारीक चिरून बाजूला ठेवा.
- आता एक कढई घ्या आणि ती गॅसवर मध्यम आचेवर गरम करा आणि कढई गरम झाली कि त्यामध्ये तेल घाला.
- तेल गरम होईपर्यंत वाट पहा एकदा तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला.
- मोहरी तडतडली कि त्यामध्ये लगेच जिरे, हिरवी मिरची आणि कडीपत्ता घाला आणि हे मिश्रण २ ते ३ सेकंद हलवा आणि मग त्यामध्ये कांदा घाला आणि तो चांगला ३ ते ४ मिनिटे भाजा किंवा थोडा लालसर होईपर्यंत भाजा .
- आता त्यामध्ये टोमॅटो घाला आणि ते चांगले एकत्र करा. मग त्यामध्ये हळद, हिंग आणि मीठ ( चवीनुसार ) घाला आणि ते चांगले मिक्स करा आणि मग त्यामध्ये दडपून ठेवलेले पोहे खोबऱ्या सोबत घाला आणि ते चांगले मिक्स करा.
- आता पोह्यामध्ये लिंबूचा रस आणि साखर घाला आणि ते चांगले मिक्स करा आणि गॅस बंद करा.
- तुमचे स्वादिष्ट आणि चवदार दडपे पोहे तयार झाले.
- दडपे पोहे सर्व्ह करताना त्यावर चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
टिप्स (Tips)
- दडपे पोहे हे वेगवेगळ्या प्रकारे बनवले जावू शकतात.
- पोहे हे दडपून ठेवण्याऐवजी आपण ते नारळाच्या पाण्यामध्ये देखील भिजवू शकतो.
आम्ही दिलेल्या dadpe pohe recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर दडपे पोहे रेसिपी मराठी dadpe pohe history बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dadape pohe recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of dadape pohe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये dadpe pohe recipe Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट