जायकवाडी धरण माहिती Jayakwadi Dam Information in Marathi

jayakwadi dam information in marathi – jayakwadi dam history in marathi जायकवाडी धरण माहिती, मित्रांनो निळाशार समुद्र, हिरवे डोंगर,‌ सगळीकडे पसरलेली हिरवळ असे निसर्गाचे रूप आपल्या सगळ्यांना हवेहवेसे वाटते. कारण नदी, समुद्र, डोंगर, इत्यादी ठिकाणांना भेट दिल्यावर मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा तयार होते. त्यामध्ये पावसाळ्यात तर अनेक पर्यटक धबधबा किंवा धरण बघायला जातात. अशातच एक भलंमोठं मातीचे धरण आपल्या महाराष्ट्रात देखील बघायला मिळतं आणि ते म्हणजे जायकवाडी धरण. या ब्लॉगमध्ये आपण आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून ओळखले जाणारे जायकवाडी धरण या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर वसलेले असून महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील जायकवाडी या गावाच्या ठिकाणी बांधले गेले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून जायकवाडी धरणाला प्रसिद्धी लाभली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख धरणांपैकी एक जायकवाडी धरण आहे. जायकवाडी धरणाचे संपूर्ण बांधकाम केवळ माती व दगडांचा वापर करून बांधण्यात आले आहे. मराठवाड्यामधील २.४० लाख हेक्‍टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेली आहे.

jayakwadi dam information in marathi
jayakwadi dam information in marathi

जायकवाडी धरण माहिती – Jayakwadi Dam Information in Marathi

जायकवाडी धरणाचा इतिहास – Jayakwadi Dam History in Marathi

हे धरण बांधण्यासाठी अकरा वर्षांचा कालावधी लागला धरणाचे बांधकाम १९६५ मध्ये सुरू झालं व १९७६ पर्यंत हे धरण संपूर्ण बांधले गेले. जवळपास ३५००० एकर जमीन ओलिताखाली येणे, व ४१.३० मीटर सर्वोच्च उंची व ९९९७.६७ मी. लांबी ही धरणाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. मराठवाड्यातील दुष्काळी भागातील सिंचनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी गोदावरी नदीवर २७ पाण्याचे दरवाजाचे असणारा हा असा धरण बांधण्यात आलेला आहे.

हा एक बहुउद्देशीय सिंचन प्रकल्प आहे. औद्योगिक घटकांना व औरंगाबाद आणि आसपासच्या भागातील रहिवाशांना पाणी पुरवतो. हे धरण अतिशय सुंदर आहे व या धरणाची सुंदरता निसर्ग वेड्यांना आकर्षित करते. त्यामुळे रहिवासी व पर्यटक त्यांच्या कंटाळवाण्या जीवनापासून वाचण्यासाठी आणि नैसर्गिक वातावरणाला भेट देण्यासाठी पैठण शहराजवळील जायकवाडी धरणाला आनंदाने भेट देतात.

नाथ सागर जलसे आणि जवळचे जायकवाडी पक्षी अभयारण्य व ज्ञानेश्वर उद्यान ही धरणाजवळ असणारी काही ठिकाणी निसर्गप्रेमी आणि पक्षीप्रेमींमध्ये विशेषता आवडीचे असल्यामुळे हे जायकवाडी धरण लोकांचे आवडते पर्यटन स्थळ आहे. सर्वप्रथम हैदराबाद राजाच्या काळात बीड जिल्ह्यातील जायकवाडी गावाजवळ गोदावरी नदीवर धरण बांधण्याची कल्पना मांडण्यात आली परंतु राज्याच्या विभाजनानंतर योजनेत सुधारणा करण्यात आली आणि मातीच्या धरणाची जागा पैठण येथे शंभर किलोमीटर वरच्या दिशेने हलविण्यात आली.

या घटनेमुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील अधिक शेतकऱ्यांना सिंचन करणारे मोठे कालवे निर्माण झाले. १९६४ मध्ये प्रस्ताव पूर्ण झाला आणि १८ ऑक्टोबर १९६५ रोजी तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या हस्ते या धरणाची पायाभरणी करण्यात आली. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी एक दशकाहून अधिक काळ लागला आणि अखेरीस २४ फेब्रुवारी १९७६ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते जायकवाडी धरणाचे उद्घाटन केले गेले.

४१.३० मीटर उंची आणि ९९९८ मीटर लांबी या जायकवाडी धरणाला आशियातील सर्वात मोठ्या मातीचा धरणांपैकी एक बनवते. गोदावरी नदीला वेडा घालत तिचे एकूण पाणलोट क्षेत्र २१ हजार ७५० चौरस किलोमीटर इतक आहे. तर एकूण साठवण क्षमता २९०९ दशलक्ष घनमीटर आहे. या धरणाला एकूण २७ दरवाजे लाभले आहेत व नाथ सागर जलाशय नावाने ओळखला जाणारा ३५० चौरस किलोमीटर रुंद जलाशय आहे. ज्याची लांबी ५५ किमी आणि रुंदी २७ किमी आहे. याच जलाशयामुळे या धरणाला नाथसागर धरण असेदेखील म्हटले जाते.

जायकवाडी धरण हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे धरण आहे. व ते मराठवाडा विभागाच्या अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी बांधण्यात आलेल आहे. परंतु हे धरण आज फक्त मराठवाड्या पुरतच मर्यादित न राहता अनेक वेगवेगळी उद्देश पूर्ण करत आहे. सुरुवातीपासूनच हा एक बहुउद्देशीय प्रकल्प होता परंतु सुरुवातीस औरंगाबाद, अहमदनगर, बीड, जालना, परभणी, यांसारख्या दुष्काळी भागातील सिंचनासाठी या धोरणाचा वापर केला गेला. परंतु सध्याच्या घडीला पिण्यासाठी, औद्योगिक वापरासाठी व वीज निर्मितीसाठी देखील हे धरण पाणी पुरवत आहे.

त्याच्या विस्तृत कालवा प्रणालीसह हे धरण अंदाजे २३७,४५२ हेक्टर लागवडीयोग्य जमिनीला सिंचन प्रदान करते. जर हे धरण संपूर्ण भरलं तर जवळपास दोन वर्ष पुरेल इतकं शेताच्या पाण्यासाठी व चार वर्ष पिण्याच्या पाण्याची सोय होऊ शकते. इतकी मोठी या धरणाची क्षमता आहे की या धरणाला मराठवाड्यातील छोटा समुद्र अशी देखील ओळख प्राप्त झाली आहे. या धरणाला दोन कालवे आहेत एक उजवा कालवा आणि एक डावा कालवा या कालव्यांचा उपयोग करून मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांमध्ये शेतीसाठी पाणी सोडले जाता.

दोनशे आठ किलोमीटर अशी यातील डाव्या कालव्याची लांबी आहे. तर १००.८० घनमीटर / सेकंद इतकी क्षमता आहे. उजवा कालव्याची लांबी १३२ किलोमीटर असून त्याची क्षमता ६३.७१ घनमीटर/ सेकंद आहे. जायकवाडी धरणावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत जसे की या धरणातून अडीच ते तीन लाख हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी पाणी सोडलं जातं. तसेच औरंगाबाद व जालना या दोन महानगराच्या पाणीपुरवठा योजना या धरणावर अवलंबून आहेत. तसेच ४०० गावांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा जायकवाडी धरण करत.

औरंगाबाद मधील ज्या काही औद्योगिक वसाहती आहेत जसे की वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, पैठण, जालना इत्यादी यांनादेखील हे धरण पाणीपुरवठा करतो. मराठवाड्याचा आर्थिक विकासाची या धरणावर अवलंबून आहे. शिवाय बीड जिल्ह्यामध्ये असणारा पराळी थर्मल पावर प्लांट जायकवाडी धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. जायकवाडी धरणाची वीज निर्मिती क्षमता १२ मेगावॅट इतकी आहे.

जायकवाडी धरण हे एक उत्तम पर्यटन स्थळ देखील आहे. शहरी भागातील अनेक पर्यटक रोजच्या धकाधकीच्या जीवनातून क्षणभर विश्रांती घेण्यासाठी व काही वेळ निसर्गाच्या सान्निध्यात घालवण्यासाठी या जायकवाडी धरणाला भेट देतात. जायकवाडी धरणाची लांबी व त्याचे भव्य दिव्य स्वरूप बघता असे वाटते की जणू समोर अथांग सागर पसरला आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे झाडे लावण्यात आलेले आहेत. काही जलीय वनस्पती देखील आहेत.

येथे वनस्पतींच्या ३७ पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रजाती पाहायला मिळतात या कारणास्तव येथे अनेक पक्षी स्थलांतर देखील होतात. ही वेगवेगळी झाडे या पक्षांना स्थलांतर करायला भाग पाढते त्यामुळे या धरणाजवळ दोनशेहून अधिक प्रजातींचे पक्षी पाहायला मिळतात. या प्रजातींपैकी बर्‍याचशा प्रजाती स्थलांतरित आहेत. जायकवाडी जलाशयांमध्ये तीस विविध आकाराचे बेट तयार केले गेले आहेत.

धरणाजवळ जायकवाडी पक्षी अभयारण्य आहे जिथे फ्लेमिंगो, पिंटेल, टील आणि इतर असंख्य स्थलांतरित पक्षी पाहायला मिळतील. राज्यातील सर्वात मोठ उद्यानांपैकी एक असणारा ज्ञानेश्वर उद्यान नाथ सागर जलाशयाच्या काठावर वसलेलं आहे. जायकवाडी धरण हे एक लोकप्रिय ठिकाण असून बघण्यासारखे ठिकाण आहे. या धरणाला भेट देण्यासाठी सकाळी आठ ते संध्याकाळी पाच तशी वेळ ठेवली गेली आहे. शिवाय जायकवाडी धरणाला आपण आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत किंवा मित्र परिवारासोबत भेट देऊ शकतो.

या जायकवाडी धरणाची ख्याती इतकी पसरलेली आहे की या धरणाला मराठवाड्याचा समुद्र अशी देखिल उपमा देण्यात आली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून महाराष्ट्रातील जायकवाडी धरण नावारूपाला आलेलं आहे. असं म्हणतात की एका दशकात फक्त दोन ते तीन वेळा हे धरण संपूर्ण भरतं. या दशकाच्या सुरुवातीसच हे धरण तब्बल ९५ टक्के भरलं आहे.

महाराष्ट्रातील अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांच्या सीमेवर जायकवाडी धरण असल्यामुळे या धरणाचा विसर्ग औरंगाबाद मध्ये आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्याला भरपूर महत्त्व प्राप्त झालेले आहे. महाराष्ट्रातील सर्वात पाच मोठ्या धरणांपैकी एक हे जायकवाडी धरण आहे व महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे धरण म्हणून जायकवाडी धरण घोषित करण्यात आले आहेत तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण हे कोयना धरण आहे.

या धरणाची महती इतकी मोठी आहे की ते शब्दात उतरवणं सोपं नाही आहे त्यासाठी प्रत्यक्षात या धरणाला भेट देऊन तेथील सौंदर्याचा आस्वाद पर्यटक घेतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून एक दिवस जर कुठे निवांत वेळ घालवायचा असेल तर त्यासाठी जायकवाडी धरण हे उत्तम ठिकाण आहे.

निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवल्यानंतर मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते शिवाय जो आनंद मिळतो त्याची तुलना कुठेही होऊ शकत नाही व पुन्हा आपल्या नेहमीच्या जीवनातील अडचणींचा सामना करण्यासाठी प्रेरणा व शक्ती मिळते. जायकवाडी धरण हे अथांग सागरासारखे पसरले आहे.

Jayakwadi Dam Water Level Today in Marathi

आम्ही दिलेल्या jayakwadi dam information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर जायकवाडी धरण माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या jayakwadi dam history in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि jayakwadi dam water level today in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये jayakwadi dharan Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!