junat sardi upay in marathi जुनाट सर्दी घरगुती उपाय आज आपण या लेखामध्ये जुनाट सर्दी या वर काय काय उपाय केले जातात या बद्दल माहिती घेणार आहोत. सर्दी हि आयुष्यामध्ये एकदातरी प्रत्येकाला झालेली असते आणि आणि काहींना कधी तरी होते तर काहींना कायमची सर्दी असते आणि हि कायमची म्हणजेच थोड्या दिवसाच्या अंतरांनी पुन्हा परत होणाऱ्या सर्दीला जुनाट सर्दी म्हणून ओळखतात. सर्दी हि अनेकांना पावसामध्ये भिजल्यामुळे, हवामानाच्या अचानक बदलामुळे तसेच पिण्याच्या पाण्यामध्ये बदल झाल्यामुळे अशा अनेक कारणांच्यामुळे सर्दी होते आणि सर्दी हि गंभीर नाही तर आपण अनेक घरगुती उपाय करून घराच्या घरी सर्दी कमी करू शकतो.
सर्दी हा वरच्या श्वसनमार्गाचा संसर्गजन्य संसर्ग आहे जो तुमचे नाक, घसा, सायनस आणि श्वासनलिका (विंडपाइप) प्रभावित करते. २०० पेक्षा जास्त वेगवेगळ्या विषाणूंमुळे सर्दी होऊ शकते परंतु बहुतेक सर्दी rhinovirus मुळे होते. सुरुवातीला हि एक सामान्य सर्दी असते.
पण हि जस जशी जुनी होत जाते तस तशी हि सर्दी जुनाट होऊ लागते आणि मग याला ब्राँकायटीस म्हणतात आणि या समस्येमुळे श्वसनाचा त्रास होतो त्यामुळे यावर योग्य वेळी योग्य तो उपचार करणे खूप गरजेचे असते. चला तर आता आपण जुनाट सर्दीची समस्या कोणकोणते घरगुती उपाय करून कमी करू शकतो या बद्दल माहिती घेवूयात.
जुनाट सर्दी घरगुती उपाय – Junat Sardi Upay in Marathi
जुनाट सर्दी म्हणजे काय ?
काहींना कधी तरी होते तर काहींना कायमची सर्दी असते आणि हि कायमची म्हणजेच थोड्या दिवसाच्या अंतरांनी पुन्हा परत होणाऱ्या सर्दीला जुनाट सर्दी म्हणून ओळखतात. सर्दी हा वरच्या श्वसनमार्गाचा संसर्गजन्य संसर्ग आहे जो तुमचे नाक, घसा, सायनस आणि श्वासनलिका (विंडपाइप) प्रभावित करते. २०० पेक्षा जास्त वेगवेगळ्या विषाणूंमुळे सर्दी होऊ शकते परंतु बहुतेक सर्दी rhinovirus मुळे होते.
जुनाट सर्दी वर घरगुती उपाय – remedies for cold in marathi
काहींना कधी तरी होते तर काहींना कायमची सर्दी असते आणि हि कायमची म्हणजेच थोड्या दिवसाच्या अंतरांनी पुन्हा परत होणाऱ्या सर्दीला जुनाट सर्दी म्हणून ओळखतात. चला तर आता आपण जुनाट सर्दीवर कोणकोणत उपाय करावे लागतात ते पाहूया.
- कोणतीही आपल्या आरोग्याची समस्या सोडवण्यासाठी योगाचा खूप उपयोग होतो आणि जुनाट सर्दी देखील कमी करण्यासाठी आपल्याला सुखासन हे खूप फायदेशीर ठरते. सुखासन हे एका शांत ठिकाणी चटई अंथरून त्या ठिकाणी पद्मासन किंवा मांडी घालून बस आणि तुमची पाठ आणि मान एकदम सरळ करा आणि श्वास जोरात आत घ्या आणि बाहेर सोडा अशा प्रकारे हे १० मिनिटे तरी करा.
- त्याचबरोबर अन्लोमविन्लोम आणि कपालभारती देखील या साठी उपयुक्त ठरू शकते. कपालभारती करतांना एका शांत ठिकाणी चटई अंथरून त्या ठिकाणी पद्मासन किंवा मांडी घालून बस आणि तुमची पाठ आणि मान एकदम सरळ करा आणि मग प्रथम जोरात श्वास घ्यावा आणि मग श्वास आता न घेता सोडत राहावा तसेच अन्लोमविन्लोम करताना एका नाकपुडीने श्वास घ्यावा आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सोडवा आणि सोडलेल्या नाकपुडीने श्वास घ्यावा आणि दुसऱ्या नाकपुडीने सोडवा. अश्या प्रकारची योगासने केली तर आपली जुनाट सर्दी कमी होण्यास मदत होते.
- जुनाट सर्दी कमी करायची असल्यास एक सोपा आणि सर्वांना माहिती असणारा घरगुती उपाय म्हणजे पाण्याची वाफ घेणे. पाण्याची वाफ घेतल्यानंतर सर्दी असणाऱ्या व्यक्तीला एकदम आराम वाटते आणि त्या व्यक्तीच्या नाकपुड्या देखील मोकळ्या होतात. घरगुती पध्दतीने वाफ घेताना प्रथम एका भाड्यामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये विक्स घालून ते पी उकळून वाफ घेतली तर आपल्याला खूप आरामदायी वाटते किंवा आपण त्या पाण्यामध्ये विक्स ऐवजी कुस्करलेला लसून किंवा २ ते ३ लवंग टाकून वाफ घेतली तरी आपल्याला सर्दी पासून आराम मिळतो.
- सर्दी असणाऱ्या व्यक्तींनी तुळशी पासून बनवलेला काढा घेतला तर सर्दी कमी होते आणि हा काढा बनवण्यासाठी तुळशीची पाने, तुळशीच्या मंजुळा, तुळशीच्या फांद्या, थोडेसे आले, हळद, २ लवंग, २ ते ३ काळी मिरी, थोडीसी साखर हे सर्व पाण्यामध्ये घाला आणि ते चांगले उकळून घ्या आणि ते चांगले उकळले कि ते गरम असताना गाळा आणि ते गरम गरम पिले कि आपल्याला सर्दी पासून किंवा घसा खवखवण्यापासून आराम मिळतो. ह्या प्रकारचा काढा पिला तर आपल्या साध्या सर्दीचे प्रमाण देखील कमी होते आणि जुनाट सर्दी देखील कमी होते.
- जर एखाद्याला जुअनात सर्दीचा त्रास असेल तर अशा व्यक्तीने कफ निर्माण करणारे पदार्थ आहारामधून काढून टाकले पाहिजेत म्हणजेच लोणचे, आंबट दही आणि ताक, चिंच, आंबट लोणचे, आंबट फळे, पाणीपुरी आणि भेळ या सारखे पदार्थ खाणे बंद केले पाहिजेत.
- ब्लॉक केलेले सायनस आणि कंजेस्टेड वायुमार्ग ही सर्दीची सामान्य लक्षणे आहेत, ज्यापासून मुक्त होण्यास मेन्थॉल मदत करू शकते. मेन्थॉल पुदिन्याच्या अनेक प्रकारच्या वनस्पतींपासून मिळते. त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि वेदना कमी करणारे प्रभाव आहेत.
- कोमट पाणी वारंवार प्या कारण ते सामान्य सर्दी, खोकला आणि घसा खवखवण्याशी लढण्यास मदत करते. कोमट पाण्याने घशातील जळजळ कमी होते आणि शरीरातील द्रव आणि संसर्ग पुन्हा भरून काढण्यास मदत होते.
- मधामध्ये काही प्रतिजैविक गुणधर्म असतात आणि हे गुणधर्म जीवानुंशी आणि विषाणूंशी लढण्यासाठी मदत करतात त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला सर्दी, खसा खवखवणे, खोकला येत असेल तर अशा व्यक्तींनी सकाळी एक ग्लास गरम पाण्यामध्ये एक चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबू रस मिक्स करून पिले तर त्यांनी सर्दी थोड्या प्रमाणात कमी होते.
- जर तुम्हाला वारंवार सर्दी होत असेल तर तुम्ही पिण्याचे पाणी चांगले उकळून ते गार करून गाळून प्या त्यामुळे देखील तुमची जुनाट सर्दी कमी होण्यास मदत होऊ शकते.
- तसेच जर तुम्हाला वारंवार सर्दी होत असेल आणि ती बरीच होत नसेल तर तुम्ही डॉक्टरांना भेटून डॉक्टरांचा सल्ला घेवून त्यावर उपचार घेणे आवश्यक आहे.
- आल्याचा चहा केवळ चवीलाच चांगला नाही तर सामान्य सर्दी आणि खोकल्याचा उपचार करण्यासही मदत करतो. चहा वाहणारे नाक कोरडे करण्यास मदत करते, त्यामुळे श्वसनमार्गातून कफ बाहेर टाकतो. तसेच आले एक चमचा मधासोबत चाऊन खाल्ले तरी देखील आपली सर्दी कमी होण्यास मदत होते.
- गाजराचा रस हा सामान्य सर्दी आणि खोकल्याशी लढण्यासाठी हा असामान्य घरगुती उपाय उत्तम आहे. हे विचित्र वाटेल परंतु हे मनोरंजक पेय सामान्य सर्दी आणि खोकल्यापासून मुक्त होण्यास मदत करते. तसेच दालचिन देखील सर्दी कमी करण्यास मदत करते त्यामुळे जर तुम्ही कोमात पाण्यामध्ये अर्धा चमचा दालचिन पावडर घालून ते मिक्स करून पिले तर तुमची सर्दी थोड्या प्रमाणात कमी होण्यासाठी मदत होते.
टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.
आम्ही दिलेल्या junat sardi upay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर जुनाट सर्दी घरगुती उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या remedies for cold in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट