माझे आवडते ठिकाण महाबळेश्वर निबंध My Favourite Place Essay in Marathi

My Favourite Place Essay in Marathi – My Favourite Place Mahabaleshwar Essay in Marathi माझे आवडते ठिकाण महाबळेश्वर मराठी निबंध खरंतर, जेंव्हा मी सातवीच्या वर्गात शिकत होते, तेंव्हा आमच्या प्राथमिक शाळेची सहल लोकप्रिय असलेल्या महाबळेश्वर याठिकाणी गेली होती. तिथं गेल्यावर मला ते थंड हवेचं ठिकाण इतकं आवडलं की आज मी इतकी मोठी होऊन देखील दरवर्षी अगदी न चुकता महाबळेश्वरला जाते. मित्रहो, सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आणि नामांकित असलेले प्रेक्षणीय स्थळ म्हणजे महाबळेश्वर होय.

येथे पर्यटक खासकरून पावसाच्या हंगामात किंवा थंडीच्या दिवसांत हमखास भेट देतात. याशिवाय, पूर्वी आपल्या भारत देशावर राज्य केलेल्या ब्रिटीश सत्ताधाऱ्यांच्या काळापासून महाबळेश्वरला लाभलेले उत्कृष्ट दर्जाचे  गिरीस्थान हे लौकिक आजही तितकेच कायम आहे.

तसेच, समुद्रसपाटीपासून साधारणतः १३७२ मीटर इतक्या उंचीवर असलेले आणि पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे अतीथंड अथवा गार हवेचे क्षेत्र, माझ्यासारख्या पर्यटकांचे निसर्गरम्य ठिकाण सुद्धा आहे. शिवाय, हे ठिकाण महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून देखील ओळखले जाते.

my favourite place essay in marathi
my favourite place essay in marathi

माझे आवडते ठिकाण महाबळेश्वर मराठी निबंध – My Favourite Place Essay in Marathi

My Favourite Place Mahabaleshwar Essay in Marathi

महाबळेश्वरच्या भौगलिक परिस्थितीचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, हे ठिकाण पुणे शहराच्या पश्चिम-दक्षिण बाजूस १२० किमी.आणि मुंबई शहरापासून जवळजवळ २८५ किमी इतक्या अंतरावर आहे. तसेच, १५० वर्ग किमी. क्षेत्रफळ असलेले आणि आकाराने खूप मोठे दिसणारे हे पठार आहे, शिवाय त्याच्या सर्व बाजूंनी खूप खोलवर असलेल्या दर्‍या देखील आहेत.

मित्रहो, याशिवाय या पठारावरील, समुद्रसपाटीपासून अगदी  सर्वात उंचवर असलेले म्हणजे साधारणतः १४३९ मी. इतकी उंची असलेले एक ठिकाण आहे जे विशेषतः ‘विल्सन अथवा सनराईज पॉइंट’ या नावाने सगळीकडे ओळखले जाते. यांखेरीज, मळकोम पेठ, जुने क्षेत्र महाबळेश्वर आणि शिंडोलचा भाग, अशा एकूण तीन खेडेगावांपासून हे शहर निर्माण झालेले आहे.

शिवाय, याच ठिकाणी पवित्र मानल्या जाणाऱ्या कृष्णा नदीचा उगम झालेला आहे आणि पुढे कृष्णा नदी येथून तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधून वाहत जाते.

याखेरीज, कृष्णा नदीच्या उगमाबद्दल एक पौराणिक कथा खूप प्रचलित आहे. या कथेनुसार पूर्वीच्या काळी महाबळेश्वरमध्ये स्थित असलेल्या एका पुराणकालीन महादेव मंदिराच्या जवळील ‘गो’ मुखातून या नदीचा उगम झाला असावा असे मानले जाते. शिवाय, याबद्दल अशीही दंतकथा प्रसिद्ध आहे की एकदा सावित्री मातेने विष्णू देवाला शाप दिला आणि त्यामुळे, विष्णूचे रूपांतर कृष्णा नदीमध्ये झाले.

तसं पहायला गेलं तर कृष्णा नदीच्या वेण्णा आणि कोयना या दोन प्रमुख उपनद्या आहेत, ज्यांना शिव आणि ब्रम्हा असे देखील म्हटले जाते. याशिवाय, महाबळेश्वर येथील अजुन एक नवलाईची बाब म्हणजे कृष्णा नदी सोडून येथे आणखीन चार नद्या त्याच ‘गो’ मुखातून उगम पावलेल्या आहेत.

परंतू, या नद्यांमध्ये फरक फक्त एवढाच की त्या कृष्णा नदीला मिळण्याअगोदर आधी काही अंतरावरून वाहतात. मित्रहो, या नद्यांची नावे अनुक्रमे; कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री ही आहेत. खरंतर, महाबळेश्वर येथील थंड हवामान हे स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी योग्य आहे.

त्यामुळे, महाबळेश्वर याठिकाणी स्ट्रॉबेरीचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. एकंदरीत, आपल्या भारत देशातील एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनापैकी जवळजवळ ८५% स्ट्रॉबेरीचे उत्पादन हे येथे होते. याशिवाय, आपणा सर्वांना माहीत आहे की महाबळेश्वर हे ठिकाण अतिशय सुंदर असे पर्यटन स्थळदेखील आहे.

मित्रांनो, महाबळेश्वर येथील महादेवाचे मंदिर हे यादव राजा सिंघनदेव याने इसवी सनाच्या तेराव्या शतकामध्ये बांधले होते. शिवाय, या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे शिवरायांच्या काळात मावळ्यांनी अफझलखानाच्या तंबूवरील कापून आणलेला सोन्याचा कळस हा छत्रपती शिवाजी महाराजांनी महाबळेश्वरच्या या मंदिरास अर्पण केला होता.

महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या सुंदर ठिकाणी खूप चांगली घनदाट वनश्री देखील आहे. त्याचबरोबर, महाबळेश्वर येथील महाबळेश्वर मंदिर असो किंवा त्याला लागून असलेले जावळीचे खोरे आणि प्रतापगड किल्ले इत्यादी सर्व स्थळांना शिवरायांच्या नावाचा व कर्तृत्वाचा ऐतिहासिक संदर्भ जोडला गेलेला आहे.

मित्रांनो, महाबळेश्वरला पावसाचे प्रमाण खूप जास्त असल्याने पावसाळयामध्ये हा संपूर्ण परिसर जलमय होऊन जातो. त्यामुळे, येथील बहुमोल निसर्गसौंदर्य हे खंडाळा, लोणावळा अथवा माथेरान यांच्याप्रमाणे खूप आकर्षक बनते. तसेच, विल्सन पॉइंट, आर्थर सीट पॉइंट, लॉडविक पॉइंट इत्यादी पॉइंट म्हणजे महाबळेश्वर येथील प्रसिद्ध डोंगरकडे असून, यांठिकाणी देखील पर्यटकांची खूप गर्दी असते.

खरंतर, महाबळेश्वर येथील महादेवाच्या मंदिरातून कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गोवित्री अशा पाच नद्या उगम पावतात. त्यामुळे, येथे पंचगंगेचे देऊळ स्थापन करण्यात आले आहे. शिवाय, यांतील ‘सावित्री’ ही नदी पश्चिमवाहिनी आहे, तर बाकीच्या चार नद्या या पूर्णपणे पूर्ववाहिनी आहेत. महाबळेश्वर येथील ‘वेण्णा तलाव’ म्हणजे जास्तीत जास्त पर्यटकांचे विलक्षणीय असे आकर्षक केंद्र आहे.

यासोबतच, याठिकाणी ‘वाघाचे पाणी’ या नावाचा मोठा जलाशय देखील स्थित आहे. येथे अनेक वाघ पाणी पिण्यासाठी येत असल्याने, या जलाशयाला वाघाचे पाणी असे नावं देण्यात आले असावे, असा यामागचा एक समज आहे. मित्रांनो, महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरी, रासबेरी, जांभळाचा मध, लाल मुळे आणि गाजरे खूप प्रचलित आहेत.

यांखेरीज, महाबळेश्वर येथील मध खूपच गोड असल्याने, ते खूप प्रसिद्ध आहे. तसेच, याठिकाणी गुलकंद देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते. एकंदरीत मित्रांनो, महाबळेश्वरची बाजारपेठ ही खूप नावारूपाला आलेली आणि प्रचलित असलेली एक बाजारपेठ आहे. कारण, येथे लोकरीचे कपडे, स्वेटर, चमड्याचे पट्टे अथवा चमड्याची पाकीटे इत्यादी.

वस्तू अगदी निरनिराळ्या व्हरायटीमध्ये मिळतात. शिवाय, महाबळेश्वरच्या बाजारपेठेतील चणे-फुटाणे मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. पर्यटकांसाठी जुन्या महाबळेश्वरपासून साधारणतः ७ किमीच्या अंतरावर अनेक प्रेक्षणीय ठिकाणे आहेत.

शिवाय, येथे अशी पाच मंदिरे आहेत जी पर्यटकांना खासकरून पूर्वीच्या काळातील भारतीय वास्तुकलेचे दर्शन घडवितात. त्याचबरोबर, याठिकाणी नैसर्गिकरित्या तयार झालेले अनेक दर्शनीय पॉईंट्स देखील आहेत. मित्रांनो, विशेष म्हणजे ब्रिटिश राजवटीमध्ये अनेक ब्रिटिश लोक येथे विश्रांतीसाठी येतं असतं, त्यावेळी त्यांनी विविध स्थळांना तेथील वैशिष्ट्यानुसार अनेक नावे दिली.

यांतील, ‘मंकी पॉइंट’ या ठिकाणाला असे नाव दिलेले आहे, कारण नैसर्गिकरित्या येथे तीन मजबूत दगड अशा पद्धतीने स्थित आहेत जे पाहणाऱ्या व्यक्तीला, अगदी माकडांप्रमाणे एकमेकांच्या समोरासमोर बसलेले आहेत असे भासतात. शिवाय, मित्रांनो हे तीन दगड आपल्याला आपल्या महात्मा गांधीजींच्या शब्दांची आठवण देखील करून देतात.

हे चित्र पाहण्यासाठी आपण जर येथील खोल दरीत थोडेसे डोकावून पाहिले की आपल्याला असे दिसेल की एका मोठ्या, मजबूत पाषणामध्ये तीन हुशार मंकी एकमेकांच्या अगदी समोरासमोर बसलेले आहेत. खरंतर, ‘आर्थर सीट पॉइंट’ ला जाण्याच्या मार्गावर हा पॉइंट स्थित आहे. अशा प्रकारे, महाबळेश्वर हे ठिकाण पर्यटकांचे मन वेधून टाकणारे आणि त्यांना स्वतःकडे आकर्षित करणारे एक विलोभनीय असे स्थळ आहे.

 तेजल तानाजी पाटील

                         बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या my favourite place essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझे आवडते ठिकाण महाबळेश्वर निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या my favourite natural place essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि my favourite historical place for class 8 essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये my favourite natural place essay in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!