माझे घर निबंध मराठी My House Essay in Marathi

My House Essay in Marathi – Maze Ghar Essay in Marathi माझे घर निबंध मराठी घर म्हणजे अशी जागा जेथे चार भितींमध्ये एका कुटुंबाला बांधून ठेवण्याची क्षमता असणारी इमारत म्हणजे घर. आणि घर जरी आकाराने मोठे नसले तरी चालेले पण त्या घरामध्ये राहणाऱ्या माणसांची माने मात्र मोठी असली पाहिजेत म्हणजेच ती घराला घरपण देणारी असावी. घराला चारी बाजूंनी भिंत आणि वरती छत असते जे आपल्या घरातील माणसांना एकत्र बांधून ठेवते. आज आपण माझे घर या विषयावर निबंध पाहणार आहोत. पण निबंध लिहिण्या अगोदर मला काही घराविषयी शब्द आठवले आणि मी या निबंधाची सुरुवात त्याच शब्द रचनेने करते.

‘घर म्हणजे केवळ चार भिंतींच

घर नसतं

तर जगण्यासाठी विणलेले एक

सुंदर स्वप्न असतं.’

my house essay in marathi
my house essay in marathi

माझे घर निबंध मराठी – My House Essay in Marathi

Maze Ghar Essay in Marathi

घराबाद्दलाच्या भावना ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात आणि प्रत्येकाला वाटत असत कि आपले घर हे खूप छान असावं. जे लोक पाल्याच्या घोपी मध्ये राहतात त्यांना वाटत कि आपल एक छोटसं खापरीच सुंदर घर असावं. ज्याचं खापरीच घर आहे त्यांना वाटत आपलं ३ ते ४ खोलीच स्लॅपच घर असावं आणि स्लॅपच घर असणाऱ्यांना वाटत कि आपला एक बंगला असावा आणि बंगला असणाऱ्या लोकांना असं वाटत कि आपल घर एक राजवाडा किंवा लघ्झरीअस घर असावं अश्या लोकांच्या घराबद्दलच्या वेगवेगळ्या इच्छा आणि स्वप्न असतात.

आपल्याला एक चांगले आणि नीटनेटके घर असणे जे छोटे का असेना पण ते असणे म्हणजे एक आशीर्वाद आहे कारण भारतामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांना राहण्यासाठी चांगली घरे नाहीत जे खेडे गावामध्ये अजूनही पाल्याच्या खोपी मध्ये राहतात किंवा एका खोलीमध्ये राहतात किंवा त्यापेक्षा बेकार म्हणजे जे फुटपातवर राहतात म्हणून आपल्याकडे घर आहे हा एक आपल्यासाठी आशीर्वाद आहे आणि हे आपल्याला ज्यांच्याकडे घर नाही त्याचे विचार ऐकल्यावर समजते.

घर म्हणजे एक चार भिंतींची इमारत नाही तर हे एक असे ठिकाण आहे जिथे आपल्या कुटुंबासोबत राहतो तसेच त्याच घरामध्ये लहानाचे मोठे होतो. त्याचबरोबर आपल्या संपूर्ण जीवनाचा आनंद घेतो. तसेच आपले दुखं, सुखं, आनंद आपण एकाच छताखाली साजरा करतो ते म्हणजे घर. घर हे एक वरदान आहे आणि हे वरदान माझ्या आई वडलांच्या मेहनतीने मला देखील लाभले त्यामुळे त्यांचे मी धन्यवाद मानतो कारण आपल्याला राहायला एक चांगले घर असणे हि एक छोटी गोष्ट नाही.

माझे घर हे एक छोट्या गावामध्ये आहे जे मुख्य शहरापासून थोडे लांब आहे आणि माझे घर खेडे गावातील घरांच्या मानाने तसे मोठे आहे आणि माझ्या घराचे नाव हे ‘मातृ कृपा’ असे असून माझे घर हे दोन माजली आहे आणि खाली तीन खोल्या आणि वर दोन खोल्या अशी घराची रचना आहे आणि खाली एक रूम, एक सोपा आणि स्वयंपाक घर आहे आणि खालीच रुमच्या बाजूला एक बाथरूम आणि टॉयलेट आहे तसेच वरच्या मजल्यावर २ रूम आहेत आणि वर देखील बाथरूम आणि टॉयलेट आहे.

तसेच आमच्या घराच्या समोर छोटीशी बाग आहे त्या बागेमध्ये जास्त करून फुलांची झाडे आहेत जसे कि गुलाब, झेंडू, शेवंती, मोगरा, सोनचाफा काही शोची फुले तसेच आमच्या बागेमध्ये काही फळाची झाडे देखील आहेत ती म्हणजे आंबा, चिक्कू आणि पेरू. आंब्याचे झाड थोडे छोटे आहे त्याला आंबे लागत नाहीत. प

ण चीक्कुच्या आणि पेरूच्या झाडाला मात्र दरवर्षी चिक्कू आणि पेरू लागतात आणि आम्ही बाजारातून चिक्कू आणि पेरू विकत आणत नाही तर आमच्या झाडाचेच खातो तसेच आमच्या घराच्या समोर असणाऱ्या बागेमध्ये काही शोची झाडे देखील आहेत आणि आमच्या घराच्या समोर थोडा रिकामा जागा देखील आहे तसेच आमच्या घराला विटाच्या भिंतीने बांधलेले कंपाऊंड देखील आहे आणि त्याला गेट आहे.

माझ्या घरामध्ये मी, माझे आई – वडील, मोठा भाऊ आणि वहिनी असा माझा छोटासा परिवार आहे आणि आम्ही सर्वजन खूप आनंदाने त्या घरामध्ये राहतो. मला आणि माझ्या भावाला पुस्तक वाचण्याचा छंद असल्यामुळे आम्ही तेथे एक छोटीशी रूम देखील बनवून घेतली आहे. ज्याला आम्ही स्टडी रूम म्हणतो आणि तेथे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके ठेवण्यासाठी एक कपाट देखील बनवून घेतले आहे आणि त्या रूम मध्ये एक टेबल आणि खुर्ची देखील आहे.

ज्यावेळी आम्हाला पुस्तक वाचण्याचे मन होते त्यावेळी आम्ही तेथे जाऊन अगदी शांतपणे पुस्तक वाचत बसतो. तसेच आमचे स्वयंपाक घर देखील मोठे आहे आणि माझ्या आईला स्वयंपाकाची आवड असल्यामुळे ती दिवसभर काही ना काही स्वयंपाक घरामध्ये बनवत असते आणि बाबा संध्याकाळी ऑफिस मधून आले कि आपला वेळ निवांतपणे हॉलमध्ये पेपर वाचत बसून घालवतात किंवा मह टीव्हीवरील बातम्या पाहतात.

वर ज्या दोन खोल्या आहेत त्यामधील माझी एक स्वतंत्र्य खोली आहे आणि भावाची एक आहे. माझी रूम मोठी आहे आणि रुममध्ये सुंदर पेंटिंग बनवून घेतले आहे त्यामुळे माझी रूम शुशोभित दिसते आणि रूमला एक छानशी गच्ची आहे आणि एक मोठी खिडकी देखील आहे आणि त्यामुळे रुममध्ये सतत खेळते वारे राहते.

तसेच आमच्या पूर्ण घराला मोठ्या आकाराच्या खिडक्या आहे त्यामुळे आमच्या पूर्ण घरामध्ये हवा ताजी राहते आणि खेळती देखील राहते. तसेच माझ्या घराच्या बजुला एक पाण्याची विहिर आहे त्यामुळे आम्हाला पाण्याची देखील काही अडचण येत नाही. आमच्या सोप्याचे वर्णन करायचे म्हटले तर सोप्यामध्ये दोन मोठे मोठे आणि मऊ सोपे आहे आणि त्या सोप्याच्या समोर एक काचेचा छोटासा टेबल आहे.

ज्याला आपण टिपॉय म्हणतो आणि त्याच्या खाली एक मऊ आणि छोटेसे कार्पेट हन्थरलेले आहे आणि समोर टीव्हीचे कपाट आहे आणि सोपा ठेवलेला आहे त्या भिंतींना मोठी मोठी चित्रे लावलेली आहेत तसेच एक मोठी खिडकी आणि प्रवेश दार आहे. सोप्यातून आत गेल्यानंतर स्वयंपाक खोलीला आणि खालच्या रूमला लागून वर जाण्यासाठी जिना आहे आणि खाली जी रूम आहे ते आई आणि बाबांची आहे.

वर निम्या भागामध्ये दोन खोल्या आहेत आणि निम्मा भाग हा रिकामा आहे जेथे आम्ही रात्री जेवाल्यानंतर फेऱ्या मारतो. आमच्या घराला मोठ्या खिडक्या असल्यामुळे आमचे घर प्रकाशित आणि हवेशीर आहे आणि सर्व खोल्यांमध्ये संगमरवरीच्या फरश्या घातल्या आहेत. तसेच माझ्या घर थंड राहण्यासाठी कुलर आणि फॅन देखील आहे आणि स्वयंपाक घरामध्ये एक छोटीशी डायनिंग रूम देखील आहे.

तेथे आम्ही सर्वजन एकत्र जेवतो. असे हे माझे सुंदर घर सर्व गोष्टींनी परिपूर्ण आहे म्हणजेच माझ्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी नाही आणि आमचे घर आमच्या गावातील एक सुंदर घर आहे आणि म्हणून मला माझ्या घराचा खूप अभिमान वाटतो. माझ्या घरामध्ये मी, माझे आई वडील, दादा आणि वहिनी असा माझा छोटासा परिवार अगदी आनंदाने या घरामध्ये राहतो.

आम्ही दिलेल्या My House Essay in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझे घर निबंध मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on my house in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on my house for 6th class in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये my dream house essay in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!