नाणेघाट विषयी माहिती Naneghat Information in Marathi

naneghat information in marathi नाणेघाट विषयी माहिती, पूर्वीच्या काळी अनेक राज्यकर्ते घाट मार्गाने व्यापार करत होते कारण ते त्यांना सुरक्षित वाटत होते आणि तसेच नाणेघाट देखील असाच एक मार्ग आहे ज्या मार्गावरून व्यापार होत होता आणि तसेच या मार्गावरून अनेक राज्यकर्त्यांनी व्यापार केला आहे आणि म्हणून या मार्गाला प्राचीन व्यापारी मार्ग म्हणून ओळखले जाते आणि आज आपण या लेखामध्ये नाणेघाट विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

नाणेघाट हे एक सध्या प्रेक्षणीय स्थळ बनले असले तरी हे पूर्वी एक व्यापारी मार्ग होता आणि या मार्गावरून अनेक व्यापार होत होते. जरी या घाटावरून अनेक राज्यकर्त्यांनी व्यापार केला असां तरी या घाटाची निर्मिती हि सातवाहन यांच्या काळामध्ये झाली होती.

नाणेघाट हा महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील जीवधन या किल्ल्याजवळ हा घाट पर्यटकांना पहायला मिळतो आणि या घाटाची उंची २६०० फुट इतकी आहे. नाणेघाट हा कोकण आणि दख्खनला जोडणारा एक छोटासा मार्ग आहे आणि या ठिकाणी एक प्राचीन गुहा आहे.

जी या ठिकाणावरील मुख्य आकर्षण आहे आणि या ठिकाणी सातवाहनांच्या काळातील काही प्राचीन लेणी देखील पर्यटकांना आज देखील पहायला मिळतात. नाणेघाट हि डोंगररांग हि ट्रेकसाठी खूप लोकप्रिया आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक ट्रेकर्स आणि पर्यटक या निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी येतात.

आणि या ठिकाणी पहिल्यांदा प्रवास करणारे पर्यटक असोत किंवा मग नेहमीच्या लोकांच्यासाठी असो या ठिकाणी उलटा वाहणारा धबधबा हे एक या ठीकानावरील महत्वाचे आकर्षण आहे. चला तर खाली आपण नाणेघाट विषयी सविस्तर आणि संपूरणे माहिती घेवूया.

naneghat information in marathi
naneghat information in marathi

नाणेघाट विषयी माहिती – Naneghat Information in Marathi

घाटाचे नावनाणेघाट
उंची२६०० फुट
ठिकाणमहाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये

नाणेघाटचा इतिहास – naneghat history in marathi

प्राचीन नाणेघाट किंवा घाट मार्गाचा शोध हा सातवाहन यांच्या काळामध्ये लागला असे म्हटले जाते आणि त्याकाळी जे व्यापारी या घाटावरून व्यापार करत होते त्यांच्या कडून कर वसूल केला जाते होता आणि म्हणूनच हा घाटाला नाणेघाट म्हणून ओळखले जाते.

सातवाहनांच्या काळामध्ये तसेच त्यांच्या नंतर देखील हा एक महत्वाचा व्यापारी मार्गे होता ज्यामुळे सोपारा, ठाणे आणि कल्याण या बंदरांना नाशिक, जुन्नर आणि पैठण शहरांना जोडत होता. त्याचबरोबर या घाटावर धर्म इंद्र, चंद्र आणि सूर्य या वैदिक देवांचा उल्लेख देखील या ठिकाणी आहे.

नाणेघाट विषयी विशेष माहिती – naneghat wikipedia in marathi

नाणेघाट हा एक प्राचीन इतिहासाशी जोडलेला म्हणजेच त्या ठिकाणी काही ऐतिहासिक प्राचीन अवशेष असलेला एक घाट आहे आणि हा घाट ५ किलो मीटर लांबीचा आणि ८५० किलो मीटर इतका उंच आहे आणि हा घाट मुंबई आणि पुणे या सीमेवर असून हा जुन्नर तालुक्यामध्ये वायव्य दिशेमध्ये वसलेला आहे.

हा मार्ग जुन्नर, नगर, नाशिक, नेवास आणि पैठण या गावांना जोडणारा मार्ग असल्यामुळे हा कोकण आणि देशाला जोडणारा घाटमार्गे म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी वर सांगितल्याप्रमाणे सातवाहनांच्या काळातील प्राचीन गुहा आहेत आणि यामध्ये सातवाहन यांच्या राजघराण्यातील राज्यांच्या आणि वंशजांच्या प्रतिमा आणि पुतळे आहेत.

आणि या प्रतिमांच्यावर त्या व्यक्तीचे नाव आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सातवाहनांची राणी नागनिका हिने केलेल्या वैदिक यज्ञ आणि दानाचा एक मोठा आणि लांब शिलालेख या ठिकाणी पहायला मिळतो आणि हा राणी नागनिकाने कोरलेला शिलालेख हा ब्राह्मी लिपीमध्ये आहे.

नाणेघाट मधील मुख्य आकर्षणे – main atrractions

  • नाणेघाट मध्ये एक लोकप्रिय असा धबधबा आहे आणि त्या धबधब्याचे महत्व म्हणजे हा धबधबा उलटा वाहतो म्हणजे ज्यावेळी धबधब्याचे पाणी खाली पडत असते त्यावेळी ते पाणी प्रचंड जोराच्या वाऱ्यामुळे उलटे वाहते आणि हे दृश्य पर्यटकांना पाहण्यासारखे असते आणि हे दृश्य पावसाळ्यामध्ये चांगले दिसते.
  • त्याचबरोबर या घाटामध्ये प्राचीन गुहा आणि सातवाहन यांच्या काळातील प्राचीन लेणी देखील पर्यटकांना पहायला मिळते. या ठिकाणी असणाऱ्या गुहेमध्ये सातवाहन घराण्यातील काही राज्यकर्त्यांचे पुतळे देखील पहायला मिळतात.
  • नाणेघाटावर गुहेकडे जाण्याच्या मार्गावर आपल्याला एक मोठ्या आकाराचे दगडी रांजण देखील पहायला मिळते आणि पूर्वी या रांजणाचा वापर हा गोळा झालेला कर साठवून ठेवण्यासाठी केला जात होता.

नाणेघाट विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • नाणेघाट या ठिकाणाला नानाचा अंगठा म्हणून देखील ओळखले जाते.
  • नाणेघाट या व्यापारी मार्गाला कल्याण, सोपारा आणि चौल या बंदरांना चांगले जोडलेले आहे.
  • आपल्याला घाटावर नागनिका हिने लिहिलेला एक शिलालेख पहायला मिळतो आणि नागनिका हि सातवाहन घराण्यातील पहिला शासक सातकर्णी या राज्याची पहिली पत्नी म्हणजेच सातवाहन घराण्याची ती पहिली राणी होती.
  • नाणेघाटाला जर पर्यटकांना भेट द्यायची असेल तर पर्यटकांनी या ठिकाणाला पावसाळ्याच्या शेवटच्या काळामध्ये भेट देणे उत्तम ठरेल कारण त्यावेळी खिंड धबधब्यांनी भरलेली असते.
  • या ठिकाणी देवनागरी आणि ब्राह्मी लिपीमध्ये असलेला शिलालेख असलेली एक प्राचीन गुहा आहे जी २००० वर्षा पूर्वीची गुहा आहे असे मानले जाते.
  • या घाटावर ट्रेक करण्यासाठी किंवा चढाईसाठी एकूण २ तास ते अशीच तास इतका वेळ लागतो त्यामुळे ट्रेक सकाळी लवकर चालू केलेली करून लवकर परत फिरलेले बरे कारण या ठिकाणी राहण्याची आणि खाण्याची सोय नाही.

नाणेघाटावर कसे पोहचायचे – how to reach

  • तुम्ही जर या ठिकाणाला भेट देणार असाल तर तुम्हाला हे मुंबई शहरामधून खूप जवळ पडते त्यामुळे तुम्ही बसने, रेल्वेने किंवा विमानाने या शहरामध्ये येऊ शकता आणि मग त्यानंतर मुंबई शहरातून कल्याण (मुंबई) कडे जाणारी एक लोकल बस पकडून तुम्ही कल्याण स्टेशनवर पोहचा.
  • आता तेथून आळेफाट्याकडे जाणारी कोणतीही बस पकडा जी माळशेज घाटमार्गे जाते. कंडक्टरला सांगा कि तुम्हाला नाणेघाटाच्या सुरुवातीला उतरायचे आहे जे टोकावडे गावानंतर ५ किलो मीटर अंतरावर आहे.
  • आता तुम्ही घाटाच्या सुरुवातीस उतरल्या नंतर तुम्हाला एक फलक दिसेल जो नाणेघाट गुहेकडे जाणारा रस्ता धाखावेल.
  • त्याचबरोबर तुम्ही पुणे शहरातून पुणे – आळेफाटा – माळशेज घाट – सावरणे आणि नाणेघाट सुरुवात अश्या मार्गाने जाऊ शकता किंवा मग पुणे – नारायणगाव – जुन्नर घाटघर आणि नाणेघाट अश्या मार्गाने तुम्ही नाणेघाटाला जाऊ शकता.

नाणेघाट ट्रेकसाठी जाताना आवश्यक असणाऱ्या टिप्स – tips

  • मुंबई या शहरातून नाणेघाटला यायला तीन तास लागतात आणि हे मुंबई पासून १२० किलो मीटर अंतरावर आणि पुणे या शहरापासून १५० किलो मीटर अंतरावर आहे.
  • जरी तुम्ही नाणेघाट ट्रेकसाठी जात असाल तर तुम्ही ट्रेकसाठी जात असताना पिण्याच्या पाण्याची बाटली,लहान टॉर्च, बांधून घेतलेले अन्न, आवश्यक अशी औषधे या सारख्या महत्वाच्या वस्तू घेणे आवश्यक आहे त्याचबरोबर ट्रेक ला जाताना तुम्ही वॉटरफ्रुफ जॅकेट आणि सनग्लासेस या सारख्या गोष्टी देखील घेवू शकता.

आम्ही दिलेल्या naneghat information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर नाणेघाट विषयी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या naneghat trek information in marathi या naneghat history in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about naneghat in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये naneghat wikipedia in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!