नारळी पौर्णिमा माहिती मराठी Narali Purnima Information in Marathi

narali purnima information in marathi नारळी पौर्णिमा माहिती मराठी, आपला भारत देश हा विविध प्रकारे संस्कृती जपणारा एक देश आहे आणि आपल्याला देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे करून संस्कृती जपली जाते जसे कि दिवाळी, दसरा, गणेश जयंती, बैल पोळा, गुढी पाडवा, लोहरी, पोंगल, नारळी पोर्णिमा, महाशिवरात्री या सारखे अनेक सन साजरे केले जातात आणि या मधील नारळी पोर्णिमा हा देखील कोळी लोकांच्याकडून साजरा केला जाणारा सण आहे.

आणि आज आपण या लेखामध्ये नारळी पोर्णिमा विषयी माहिती घेणारा आहोत. नारळी पौर्णिमा हा एक श्रावणातला सन आहे जो रक्षाबंधन आणि हा सण एकत्र येतो आणि हा सन कोळी लोक साजरा करतात आणि या सणामध्ये ते समुद्राची आणि वरुणदेवतेची पूजा करतात आणि समुद्राला नारळ अर्पण करतात.

त्याचबरोबर नैवैद्य म्हणून नारळी भात देखील बनवतात. नारळी पोर्णिमा हा सन कोळी लोकांच्याकडून साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे समुद्राला शांत करणे परत त्यांच्या समुद्रातील नौका आणि जहाज सुरक्षित राहण्यासाठी केली जाते. चला तर खाली आपण नारळी पोर्णिमेविषयी सविस्तर माहिती घेवूया.

narali purnima information in marathi
narali purnima information in marathi

नारळी पौर्णिमा माहिती मराठी – Narali Purnima Information in Marathi

नारळी पोर्णिमा सणाविषयी माहिती – information about narali purnima in marathi

नारळी पोर्णिमा हा सन श्रावण महिन्यामध्ये असतो आणि श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. श्रावण महिन्यामध्ये समुद्र हा खूप खवळलेला असतो तसेच समुद्रामध्ये अनेक वादळे निर्माण होत असतात म्हणून कोळी बंधू नारळी पौर्णिमेच्या अगोदर काही दिवस समुद्रावर मासेमारी करण्यासाठी जाण्यास बंद करतात.

आणि मासेमारी हा त्यांचा मुख्य धंदा असतो आणि म्हणून नारळी पोर्णिमे दिवशी ते समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करून त्याच्याकडे प्रार्थना करतात कि आपला व्यवसाय चांगला चालावा, तसेच समुद्र शांत राहावा आणि त्यांचे जहाज समुद्रामध्ये सुरक्षित राहावे.

या दिवशी कोळी पुरुष पूजा करताना आपला पोशाख घालतात त्याचबरोबर स्त्रिया देखील नवीन कपडे परिधान करतात तसेच दागिने घालून नटतात. त्याचबरोबर या दिवशी कोळी बांधवानी आपल्या जहाज पताका लाऊन सजवलेल्या देखील असतात आणि ते समुद्रकिनारी कोळी गीत देखील साजरे करतात.

या दिवशी स्त्रिया नारळा पासून बनवलेले पदार्थ बनवतात जसे कि नारळी भात, करंजी आणि काही इतर पदार्थ. अश्या प्रकारे कोळी लोक हा दिवस अगदी आनंदामध्ये साजरा करतात. मुंबई या शहरामध्ये तेथील कोळी लोकांच्याकडून मोठ्या थाटामाटामध्ये हा सण साजरा केला जातो.

नारळी पोर्णिमेदिवशी बनवली जाणारी एक विशेष रेसिपी – recipes

नारळी भात रेसिपी

नारळी भात रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
 • १ वाटी बासमती तांदूळ.
 • १/२ वाटी खिसलेला गुळ किंवा अर्ध्यापेक्षा थोडा जास्त ( आवडीनुसार ).
 • अर्धी वाटी खिसलेले ओले खोबरे.
 • १ मोठा चमचा तूप किंवा तेल.
 • ५ ते ६ लवंग.
 • २ छोटे दालचिन तुकडे.
 • १ छोटा चमचा वेलची पावडर.
 • १ छोटी वाटी काजू
 • २ ते अडीच वाटी गरम पाणी.
 • मीठ ( चवीनुसार ).
नारळी भात बनवण्याची प्रक्रिया
 • नारळी भात बनवताना तुम्ही तो भांड्यामध्ये बनवणार आहात कि कुकरमध्ये ते ठरवा ( टीप : नारळी भात कुकरमध्ये बनवणे सोपे कारण यामध्ये भात लगेच शिजेल ).
 • कुकर गॅसवर मध्यम आचेवर गरम करायला ठेवा आणि मग त्यामध्ये तूप घाला आणि तूप गरम झाले कि त्यामध्ये लवंग, दालचिन घाला आणि ते काही सेकंद भाजा मग त्यामध्ये काजू घाला आणि ते देखील चांगले भाजून घ्या.
 • काजू खूप लालसर होऊ देवू नका आता त्यामध्ये लगेच धुतलेले तांदूळ घाला आणि ते तुपामध्ये चांगले ५ ते ६ मिनिटे भाजून घ्या.
 • मग तांदूळ चांगले भाजले कि त्यामध्ये खिसलेला गुळ आणि खिसलेले खोबरे घाला आणि ते चांगले मिक्स करा आणि गुळ विरघळे  पर्यंत हलवत रहा.
 • आता गुळ विरघळल्यानंतर त्यामध्ये आपण गरम केलेले पाणी आणि चवीनुसार मीठ घालून ते मिक्स करा आणि कुकरला झाकण लावून त्या भाताला मध्यम आचेवर २ शिट्या येवू द्या. २ शिट्या झाल्या की गॅस बंद करा.
 • तुमचा नारळी पौर्णिमेला बनवला जाणारा नारळी भात तयार झाला.

नारळी पोर्णिमेविषयी काही प्रश्न – FAQs

नारळी पौर्णिमा हा सन केंव्हा साजरा केला जातो ?

नारळी पौर्णिमा हा सन श्रावण महिन्यामधील पोर्णिमे दिवशी साजरा केला जातो आणि हा सन कोळी लोकांच्याकडून साजरा केला जातो.

नारळी पौर्णिमा हा सन का साजरा केला जातो ?

नारळी पोर्णिमा हा सन शक्यतो कोळी लोक साजरा करतात आणि यांच्या संबध हा मासेमारीशी खूप येतो आणि मासेमारी हि समुद्राशी निगडीत आहे आणि नारळी पोर्णिमेदिवशी हे लोक समुद्राला शांत राहावा तसेच समुद्रामधील त्यांच्या जहाज देखील सुरक्षित राहाव्यात म्हणून समुद्रची पूजा करतात तसेच नारळ अर्पण करतात.

नारळी पोर्णिमेदिवशी कोणकोणते पदार्थ बनवले जातात ?

नारळी पोर्णिमा हा सन मोठ्या थाटामाटात कोळी लोक साजरे करतात तसेच कोळी समाजातील स्त्रिया आणि इतर स्त्रिया देखील या दिवशी नारळा पासून काही पदार्थ बनवतात जसे कि नारळी भात, नारळाची खीर, नारळाच्या वड्या, नारळाचे लाडू, सोलकढी, करंजी आणि इतर पदार्थ बनवले जातात.  

नारळी पोर्णिमेदिवशी काय केले जाते ?

नारळी पोर्णिमेदिवशी सर्व कोळी बांधव समुद्राची पूजा करतात आणि समुद्राला नारळ अर्पण अरतात तसेच ते त्या दिवशी समुद्र किनारी आपले नृत्य देखील साजरे करतात.

आम्ही दिलेल्या narali purnima information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर नारळी पौर्णिमा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या narali purnima festival information in marathi या information on narali purnima in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about narali purnima in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!