राजीव गांधी माहिती Rajiv Gandhi Information in Marathi

rajiv gandhi information in marathi राजीव गांधी माहिती, भारतामधील राजकारण आणि राजकीय घराण्यांचा विचार केला तर आपल्या समोर अनेक घराणे येतात आणि त्यामधील एक म्हणजे गांधी घराणे ज्यांचा सर्वांनाच परिचय आहे आणि अश्या गांधी घराण्यातील एक त्यांच्या काळामध्ये लोकप्रिय असणारा नेता म्हणजे राजीव गांधी आणि आज आपण या लेखामध्ये राजीव गांधी यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. राजीव गांधी यांचा जन्म भारतातील महाराष्ट्र राज्यातील मुंबई या शहरामध्ये २० ऑगस्ट १९४४ मध्ये गांधी या राजकीय घराण्यामध्ये झाला होता.

आणि त्यांच्या आई म्हणजेच इंदिरा गांधी ह्या एक लोकप्रिय राजकीय नेत्या होत्या आणि त्यांनी फिरोज गांधी यांच्याशी लग्न केले होते आणि त्या पंडित जवाहरलाल नेहरू यांची मुलगी होत्या म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू हे राजीव गांधी यांचे आजोबा होते.

राजीव गांधी यांचा बहुतेक लहानपणीपासूनच राजकारणाचा आवड असावी कारण त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी हि संपूर्ण राजकारणावर अवलंबून होती, म्हणजेच त्यांचे आई-वडील आणि आजोबा देखील राजकारणामध्ये होते त्यामुळे त्यांना लहान वयातच राजकारणाविषयी शिकायला मिळले आणि ते पुढे राजकारणातील एक मोठे नेते बनले.

इंदिरा गांधी ह्या पुढे फिरोज गांधी यांच्यापासून वेगळ्या झाल्या आणि नंतर त्या आणि त्यांचा मुलगा म्हणजेच राजी गांधी पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजेच आजोबांच्या कडे राहायला गेले आणि त्यांना पुढे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सानिध्यात राहायला मिळाले.

चला तर खाली आपण राजीव गांधी यांच्या जीवन परीचयाविषयी आणि राजकीय कारकिर्दीविषयी सविस्तर माहिती घेवूया.

rajiv gandhi information in marathi
rajiv gandhi information in marathi

राजीव गांधी माहिती – Rajiv Gandhi Information in Marathi

नावराजीव गांधी
ओळखराजकीय नेता
जन्म२० ऑगस्ट १९४४
जन्म ठिकाणमुंबई (महाराष्ट्र)
पालकइंदिरा गांधी आणि फिरोज गांधी
पत्नीसोनिया गांधी
मुलेप्रिया गांधी आणि राहुल गांधी

राजीव गांधी यांचे प्रारंभिक जीवन – early life

राजीव गंधी यांचा जन्म २० ऑगस्ट १९४४ मध्ये महाराष्ट्र राज्यातील मुंबई या शहरामध्ये झाला आणि त्यांच्या पालकांचे नाव इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी असे होते. त्यांनी त्याचे शालेय शिक्षण किंवा प्राथमिक शिक्षण हे त्यांनी दिल्लीमधील शिव निकेतन आणि डेहराडून मधील वेल्हम मुलांच्या शाळेतून अश्या दोन ठिकाणांहून पूर्ण केले.

त्यांनी पुढे १९६५ मध्ये ट्रिनीटी कॉलेज, केम्ब्रिज मधून त्यांनी बी. टेक पूर्ण केले परंतु त्यांनी पदवी पूर्ण केली नाही तर त्यांनी १९६६ मध्ये इम्पिरियल कॉलेज, लंडन मध्ये त्यांनी इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रवेश घेतला आणि इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम देखील पूर्ण केला नाही, कारण त्यांना त्यामध्ये रस नव्हता.

पुढे ते भारतामध्ये आले आणि दिल्ली फ्लाईंग क्लबमध्ये सामील होऊन त्यांनी त्या ठिकाणी विमान चालवण्याचे ४ वर्ष प्रशिक्षण घेतले आणि ते १९७० मध्ये ते एयर इंडिया मध्ये पायलट म्हणून काम करू लागले.

राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट कशी झाली ?

सोनिया गांधी ह्या राजीव गांधी यांच्या पत्नी आहेत आणि त्या भारतीय नसून इटलीच्या आहे आणि राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट ज्यावेळी राजीव गांधी लंडन मध्ये केम्ब्रिज कॉलेज मध्ये शिकत होते त्यावेळी त्यांची भेट झाली होती आणि त्यावेळी कॉलेज मध्ये असताना सोनिया गांधींचे नाव एडवीज अँटोनिया अल्बिना माइनो असे होते आणि त्यांचे ३ वर्ष एकमेकांवर प्रेम होते आणि १९६८ मध्ये त्यांचे लग्न झाले.

राजीव गांधी यांची राजकारणातील कारकीर्द – political career

  • राजीव गांधी यांची राजकीय कारकीर्द हि त्यांचे भाऊ संजय गांधी यांचा विमान अपघात झाला त्यानंतर त्यांनी विमान चालवणे सोडले आणि १९८१ मध्ये त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश घेतला आणि १६ फेब्रुवारी १९८१ मध्ये त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली.
  • राजकारणामध्ये राजीव गांधी येण्यापाठीमागे त्यांच्या आई म्हणजेच इंदिरा गांधी होत्या.
  • राजीव गांधी यांनी त्यांची राजकारणामधील पहिली निवडणूक हि उत्तर प्रदेश मधील अमेठी लोकसभा मतदार संघातून केली आणि त्यांना पहिल्याच निवडणुकीमध्ये यश मिळाले आणि त्यांनी ऑगस्ट १९८१ मध्ये त्यांनी खासदार म्हणून शपथ घेतली.
  • पुढे त्यांनी डिसेंबर १९८१ मध्ये भारतीय कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आणि तेंव्हापासून त्यांनी या पक्ष्याचा कार्यभार हाती घेतला होता.
  • त्याचबरोबर राजीव गांधी यांनी पुढे देशाचे पंतप्रधान हे पद देखील स्वीकारले आणि ते १९८४ या वर्षी देशाचे पंतप्रधान बनले आणि त्यावेळी त्यांचे वय ४० वर्ष होते आणि ते पुढे १९८९ पर्यंत देशाचे पंतप्रधान होते.

राजीव गांधी यांच्याविषयी विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • ज्यावेळी राजीव गांधी लंडन मधून भारतामध्ये परतले त्यावेळी त्यांची आई म्हणजेच इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान होत्या परंतु तरी देखील राजीव गांधी राजकारणामध्ये पडले नाहीत तर ते फ्लाइंग क्लबमध्ये सामील झाले आणि त्यांनी विमान चालवायचे प्रशिक्षण घेतले आणि ते पायलट म्हणून काम करू लागले.
  • राजीव गांधी यांचा मृत्यू हा एक हत्या आहे असे म्हटले जाते.
  • राजीव गांधी यांना संगणक आणि गॅझेटची आवड होती आणि ज्यावेळी ते भारताचे पंतप्रधान बनले त्यावेळी त्यांनी देशामध्ये डिजिटलायझेशन या वर भर दिला त्यावर प्रगती केली.
  • राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने लोकसभेमध्ये ५४२ पैकी ४११ जागांवर विजय मिळवला आणि त्यांना सर्वात मोठे बहुमत मिळाले.
  • राजीव गांधी हे वयाच्या ४० व्या वर्षी भारताचे पंतप्रधान बनले होते.
  • जरी राजीव गांधी यांची पार्श्वभूमी राजकारणातील म्हणजेच त्यांची आई, वडील आणि आजोबा हे राजकारणामध्ये जरी असले तरी त्यांना राजकारणामध्ये काहीच रस नव्हता म्हणजेच त्यांना राजकारणामध्ये यायचे नव्हते परंतु नंतर काही कारणामुळे त्यांना राजकारणामध्ये यावे लागले.
  • त्यांनी देशामध्ये अनेक योजना सुरु केल्या ज्यामध्ये सर्वसमावेशक कर्ज योजना, जवाहर रोजगार योजना आणि इंदिरा गांधी आवास योजना या सारख्या अनेक योजना सुरु केल्या.

राजीव गांधी योजना माहिती

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना – rajiv gandhi jeevandayee arogya yojana information in marathi

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना हि एक महराष्ट्र सरकारने सुरु केलेली योजना आहे ज्यामध्ये राज्यामध्ये जे लोक आर्थिकदृष्ट्या विकलांग आहेत म्हणजेच जे लोक गरीब आहेत अश्या लोकांच्यासाठी हि योजना काम करते म्हणजेच या योजने मार्फत लोकांना आरोग्य सेवेसाठी आर्थिक मदत करते.

राजीव गांधी आवास योजना – rajiv gandhi awas yojana information in marathi

राजीव गांधी आवास योजना (RGAY) हि एक सरकारने शहरी भागामध्ये झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांना राहण्यासाठी चांगली घरे मिळवीत आणि आपल्या भारतातील शहरे हि झोपडपट्टी मुक्त व्हावीत म्हणून सुरु केलेली योजना आहे.

आम्ही दिलेल्या rajiv gandhi information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर राजीव गांधी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about rajiv gandhi in marathi language या rajiv gandhi awas yojana information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about rajiv gandhi in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये rajiv gandhi jeevandayee yojana information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!