शिवाजी महाराज वंशावळ Shivaji Maharaj Family Tree in Marathi

shivaji maharaj family tree in marathi शिवाजी महाराज वंशावळ, छत्रपती शिवाजी महाराज कोणाला माहित नाहीत असे नाही किंवा त्यांची अशी वेगळी ओळख देखील करण्याची आवश्यकता नाही कारण ते आपल्या भारतामध्ये आणि खासकरून महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वांनाच परिचित आहेर कारण त्यांचा शूरवीरपणा आणि त्यांनी गाजवलेले पराक्रम सर्व जनतेला माहित आहे आणि आज आपण या लेखामध्ये या महान राजाच्या कुटुंबाविषयी सविस्तरपणे माहिती घेणार आहोत.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या खूपच लहान वयामध्ये विरोधकांशी लढून आपले स्वताचे स्वतंत्रीत राज्य स्थापन केले ज्याला स्वराज्य किंवा मराठा साम्राज्य असे नाव दिले होते अश्या या महाराजांच्या कुटुंबाविषयी माहिती म्हणजेच त्यांच्या आई-वडिलांच्या विषयी माहिती, त्यांच्या पत्नीविषयी माहिती आणि त्यांच्या अपत्यांविषयी माहिती पाहणार आहोत

shivaji maharaj family tree in marathi
shivaji maharaj family tree in marathi

शिवाजी महाराज वंशावळ – Shivaji Maharaj Family Tree in Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांचे आई – वडील

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते आणि त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या आईच्या सहवासात खूप राहिलेले आहेत कारण त्यांचे वडील शहाजीराजे भोसले हे कामासाठी बाहेर राहत होते त्यामुळे जिजाबाईंनी त्यांचे पालनपोषण करून त्यांना चांगले संस्कार केले तसेच त्यांना राजकारण आणि युद्धातील कला या विषयी शिक्षण दिले आणि त्यांना एक चांगला राजा बनण्यासाठी तयार केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी

सईबाई

सईबाई ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नी होत्या. महाराणी सईबाई यांचा जन्म फलटण मधील निंबाळकर घराण्यामध्ये १६३३ मध्ये झाला आणि त्यांचा विवाह १४ मे १६४० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्यासोबत झाला. सईबाई यांना चार मुले होती राणूबाई, अंबिकाबाई आणि संभाजी महाराज.

सोयराबाई

छत्रपती शिवाजी महाराज यांना आठ पत्नी होत्या आणि त्यामधील सोयराबाई ह्या त्यांच्या दुसऱ्या नंबरच्या पत्नी होत्या. सोयराबाई ह्या तळबीडच्या मोहिते घराण्यातील होत्या आणि त्यांच्या वडिलांचे नाव संभाजी मोहिते हे होते आणि त्यांचे सख्खे बंधू हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती होते.

सोयराबाई ह्या अतिशय सुंदर, देखण्या आणि रूपवान होत्या आणि सोयराबाई यांचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांच्यासोबत १६५० पूर्वी झाला होता आणि त्यांना राजाराम हे पुत्र झाले होते.

पुतळाबाई

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिसऱ्या पत्नी म्हणून ओळख असणाऱ्या पुतळाबाई ह्या पालकर घराण्यातील होत्या आणि त्यांचे लग्न छत्रपती शिवाजी महाराजांशी १६५३ मध्ये झाले होते. त्यांना स्वताचे मुलबाळ नव्हते त्यामुळे त्या छत्रपती संभाजी महाराजांना आपला मुलगा मानून त्यावर प्रेम करत होत्या.

ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला त्यावेळी काही दिवसांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या सख्या आई सईबाई यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची काळजी आणि त्यांचे पालन पोषण हे पुतळाबाई यांनीच केले.

सकवारबाई

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ पत्नींच्यामधील सकवारबाई ह्या चार नंबरच्या पत्नी होत्या आणि त्या गायवाडघराण्यातील असून त्यांना कमलाबाई या नावाने देखील ओळखले जाते होते.

सगुणाबाई

सगुणाबाई ह्या शिर्के घराण्यातील होत्या आणि त्यांचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांच्यासोबत झाला आणि ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाचव्या पत्नी असून त्यांना राजकुवरबाई या नावाने देखील ओळखले जात होते.

काशीबाई

जाधव घराण्यातील काशीबाई ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सहाव्या पत्नी होत्या.

लक्ष्मीबाई

लक्ष्मीबाई ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातव्या पत्नी होत्या आणि त्यांचे माहेरचे नाव लक्ष्मीबाई विचारे असे होते.

गुणवंताबाई

गुणवंताबाई इंगळे ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शेवटच्या पत्नी होत्या.

छत्रपती शिवाजी महाराज मुले    

संभाजी महाराज

संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र आणि स्वराज्याचे धाकल धनी म्हणजेच मराठा साम्राज्याचे दुसरे महाराज होते. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म पुरंदर या किल्ल्यावर १४ मे १६६५ मध्ये झाला. जन्मापासूनच त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.

छत्रपती संभाजी महाराज फक्त २ ते ३ वर्षाचे असतांना त्यांची आई महाराणी सईबाई यांचे निधन झाले. छत्रपती संभाजी महाराज यांचे पूर्ण नाव छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले असे होते आणि त्यांच्या आईचे नाव सईबाई असे होते आणि त्यांचे वडील स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे होते.

राजाराम महाराज

राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र आणि मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती होते. यांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी सोयराबाई यांच्या पोटी २४ फेब्रुवारी १६७० मध्ये झाला. राजाराम महाराजांना तीन पत्नी होत्या.

राणूबाई

राणूबाई ह्या छत्रपती शिवाजी महाराजांची मुलगी होती आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या लाडक्या देखील होत्या. राणूबाई ह्या छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांची मुलगी होती आणि त्या संभाजी महाराजांची सख्खी बहिण असल्यामुळे तिने देखील त्यांना आईसारखे प्रेम दिले आणि म्हणून त्यांना शंभू राजेंची दुसरी आई म्हणून ओळखले जाते.

सखुबाई

सखुबाई ह्या देखील छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांची मुलगी होती आणि सखुबाई यांचा विवाह फलटणच्या निंबाळकर घराण्यामध्ये १६४८ मध्ये झाला होता.

अंबिकाबाई

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिसऱ्या मुलगी म्हणजे अंबिकाबाई आणि यांनी १६५४ मध्ये सईबाई यांच्या पोटी जन्म घेतला होता. अंबिका बाई ह्या खूप हुशार आणि चतुर होत्या आणि त्यांना राजकारणामध्ये देखील खूप हुशार होत्या.

इतर मुली  

दीपाबाई ह्या शिवाजी महाराज आणि सोयराबाई यांची मुलगी होती आणि तसेच राजकुवर बाई आणि कमलाबाई ह्या देखील त्यांच्या मुली होत्या.

आम्ही दिलेल्या shivaji maharaj family tree in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर शिवाजी महाराज वंशावळ माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या shivaji maharaj family information in marathi या chhatrapati shivaji maharaj family tree in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about shivaji maharaj family in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये shivaji maharaj family history in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!