जागतिक शिक्षक दिन माहिती 2023 Teachers Day Information in Marathi

Teachers Day Information in Marathi जागतिक शिक्षक दिन माहिती 5 सप्टेंबर शिक्षक दिन दर वर्षी ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षकदिन म्हणुंन संपुर्ण देशभर साजरा केला जातो. आपल्या भारत देशाचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. राधाकृष्ण यांचा हा जन्मदिन. शिक्षण हे सर्वच तळागाळातील जनतेला मिळावं. शिक्षणाशिवाय माणसाची प्रगती शून्य आहे. त्यामुळे चांगले शिक्षण हीच आपली प्रगती म्हणूनच देशात शिक्षकदिन साजरा होणे सर्व राष्ट्रच्या हिताचं ठरणार आहे. प्रत्येक विद्यार्थी हा गुरूंच्या नजरेतूनच तयार होत असतो. प्रत्येक गुरु आपल्या अविरत अन् घोर प्रयत्नांनी आपल्या शिष्याला घडवत असतो. गुरु शिष्यांच नातं अगदी प्राचीन काळापासून ज्ञात आहे. एकलव्यानेही द्रोणाचार्य यांचेकडून धनुर्विद्याचं.

शिक्षण घेतलं होतं. राम आणि श्रीकृष्णनेहि घरापासून दूर राहून ऋषींच्या आश्रमात शिक्षा प्राप्त केली होती. चांगलं ज्ञान हे चांगल्या गुरूकडूनच आत्मसात करता येते. आणि या शिक्षणाला महत्त्व देण्यासाठी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या गुरूंचा अर्थात शिक्षकांचा गौरव करण्याचे अतुलनीय काम म्हणूनच देशभर मोठ्या उत्साहाने शिक्षक दिन साजरा केला जातो.

teachers day information in marathi
teachers day information in marathi

जागतिक शिक्षक दिन माहिती – Teachers Day Information in Marathi

Teachers Day in Marathi

कुंभार आपल्या कौशल्याने भिजवलेल्या मातीतून एखादं मडक, किंवा काही वस्तू बनवतो. शिल्पकार दगडातून एखादं शिल्प निर्माण करतो, त्याचप्रमाणे शिक्षक सामान्य, निरागस, सोज्वळ बालकातून विद्यार्थी नावाचं. बुद्धिमान, हुशार आणि चलाख भांडवल बनवतो. ज्याच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या जातात. आणि तो विद्यार्थी एक दिवस आकाशालाही गवसणी घालतो. 

आई माझा गुरू. आई कल्पतरू, असं म्हटलं जातं. प्रत्येकाचा पहिला गुरु आईच असते. परंतु विश्वाच्या निर्मितीचे, त्याच्याही पलीकडचे ज्ञान मिळवण्यासाठी गरज असते ती शिक्षक रुपी मार्गदर्शकाची. विद्यार्थ्याला घडवत असताना त्याच्यावर चांगले संस्कार लादणे, चांगले चरित्र घडवणे, त्याच्या मनात थोर व्यक्तींच्या बद्दल आदर, निर्माण करणे.

एक आदर्श आणि आज्ञाधारक विद्यार्थी घडवणे. हे कोणत्याही शिक्षकाचे काम आहे. शिक्षकाने स्वतः व्यसनापासून दूर राहून व्यसनमुक्त विद्यार्थी तयार केला पाहिजे. असत्यापासून पासून स्वताला दूर ठेवून सत्याची कास, नेहमी खऱ्या गोष्टींच्या सहवासात राहणारा विद्यार्थि असावा. प्रत्येक विद्यार्थ्याने जन्मजात्या आईवडिलांचे आज्ञापालन केलंच पाहिजे.

असा विद्यार्थी ज्ञानाबरोबरच समाजातली छोट्या मोठ्या गोष्टींचं ज्ञान मिळवून एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व निर्माण करून एक आदर्श नागरिक बनावा. हे सारं श्रेय शिक्षकांनाच जातं.

म्हणूनच राष्ट्रपती म्हणजे देशाचं अभिमानाच, प्रथम नागरिक म्हणून नाव लौकीक असणारं पद भूषविणारे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन ५ सप्टेंबर, देशातील युवकांना प्रेरणा देण्यासाठी आणि गुरूंचा, शिक्षकांचा येथोच्च गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म तामिळनाडूतील एका गावात झाला. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी शिक्षणावर जास्त भर दिला. शिक्षण पूर्ण होताच विद्यार्थी घडवण्याचे, शिक्षकाचे काम केले. त्यांची बुद्धीमत्ता बघून आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू यांनी त्यांना राजदूत म्हणून नेमणूक केली.

काही दिवसाने डॉ. राधाकृष्णन यांची पहीलांदा उपराष्ट्रपती आणि नंतर राष्ट्रपती म्हणून निवड झाली. याच दिवशी शिक्षकांच्या आदराप्रती शाळा महविद्यालायातील विद्यार्थी स्वतः शिक्षक बनून संपूर्ण शाळा आपल्या ताब्यात घेतात. त्या दिवशी सर्वच शिक्षकांना एक दिवस विश्रांती देतात.

विध्यार्थ्याच्याकडून शिक्षकांना आकर्षक भेटवस्तू दिली जाते. त्याच प्रमाणे आदर्श आणि उत्कृष्ट, हुशार, हरहुन्नरी विद्यार्थ्याला शिक्षकाकडून विशेष पुरस्कार देवून गौरविण्यात येते आणि भावी आयुष्यात एक आदर्शगुरु नागरिक, विद्यार्थी बनण्याची प्रेरणा दिली जाते. गुरुशिष्य नातं हे पुरातन काळापासून आपल्या पृथ्वीवर रूढ आहे. आणि एक पवित्र नातं, म्हणूनच त्याकडे पाहिलं जातं.

अगदी पूर्वी आश्रमात कुटिरा मध्ये मिळणारं शिक्षण, त्यानंतरची रवींद्रनाथ टागोर याची शांतिनिकेतन मधली गुरुकुल पद्धती. साधू महाराजांनी दिलेली वृक्षाखालील शिक्षण पद्धत. अशा विविध शिक्षण पद्धतीतून शिक्षण मिळत गेलं आणि विद्यार्थी घडत गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, शिक्षणाशिवाय देशाची प्रगती नाही.

शिक्षक दिन कधी असतो

म्हणूनच देश प्रगतीपथावर न्यायचा असेल तर शिक्षणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. अशाच प्रकारचे शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी देशभर शिक्षक दिंन साजरा केला जातो. बाहेरच्या राष्ट्रातही ६ ऑक्टोबर हा शिक्षक दिन साजरा केला जातो. थोडक्यात संपूर्ण जगभर शिक्षकदिन साजरा केला जातो.

शिक्षणामुळे, माणसाची विद्वत्ता समजते. म्हणूनच समाजात शिक्षकाला आदर्श नागरिक म्हणून पाहिलं जातं. संपुर्ण विश्वात शिक्षक दिन साजरा केला जातो, परंतु त्यांच्या तारखाही अलग अलग आहेत. शिक्षणाला अनन्य साधारण महत्त्व दिलं जातं. प्रत्येक विचारवंतांच्या मते शिक्षणाला विविध पैलूंचे महत्त्व दिले आहे.

स्वामी विवेकानंद म्हणजे सखोल ज्ञांचाच भांडारच होतं. आपल्या ज्ञानाच्या आधारावर त्यांनी संपूर्ण विश्वाला गवसणी घातली होती. केवळ सकल माहिती डोक्यात, मेंदूत भटने म्हणजे ज्ञान मिळवणे नसून त्या ज्ञानाचा योग्य उपयोग करणे त्याला ज्ञान म्हणतात. संत कबीर म्हणतात या पृथ्वीवर मनुष्य जोपर्यंत गुरु भेटत नाही तोपर्यंत अंधकाराताच भटकत राहतो.

एकदा का गुरूंच्या संगतीत स्वताला झोकून दिलं की तो नक्कीच चांगला नागरिक बनतो. कबीर पुढे म्हणतात कोणत्याही विद्यार्थ्याला सत्य असत्या मधील फरक शिक्षकच सांगतात. आई वडील आपल्याला जन्म देतात पण विश्वातील चांगल्या वाईटांची ओळख शिक्षकच करून देतात.

त्यामुळे शिक्षकांना आपल्या हृदयी स्थान देणं हे प्रत्येक शिष्याच परम कर्तव्य आहे. आपल्या देशात शिक्षकदिनाची सर्वात सर्वात पहिल्यांदा १९६२ साली झाली. विद्यार्थ्यांचा एक गट डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिन साजरा करू, या निश्चयाने राष्ट्रपतींना भेटायला गेले. तेव्हा डॉ. राधाकृष्ण म्हणाले, वाढदिवस साजरा करणे मला योग्य वाटत नाही.

तेव्हा आपण त्याऐवजी माझा जन्मदिन म्हणून साजरा करू म्हणजे त्या निमित्ताने मला शिक्षकाप्रती आत्मीयता व्यक्त करण्याची संधी मिळेल. अन् त्या दिवसापासून आपल्या देशात ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षकदिन म्हणून साजरा होऊ लागला. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्यावर स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रभाव अधिक होता. त्यांची अनेक पुस्तकं त्यांनी वाचली होती.

शिक्षक निबंध मराठी

जगभरातल्या तमाम शिक्षकांचा आणि त्यांच्या पवित्र आणि महत्त्वपूर्ण कामाचा गौरव करण्याच्या उद्देशानेच शिक्षक दिन देशभर. जगभर साजरा होतोय. कुणीतरी म्हणाले आहेच. गुरु.. ब्रम्ह.. गुरु विष्णू ..गुरु…. देवो… महेश्वरा. आणि हे खरे आहे. ज्ञानाच्या अखंड सागरात विहार करणाऱ्या. गुरूना तेच ज्ञान शिष्याच्या बुद्धीमध्ये समर्पित करण्याच्या कौशल्याला, अनेकविध ज्ञानाचे पैलू विद्यार्थ्यांना त्यांच्या अंतकर्णापासून अर्पण करणाऱ्या शिक्षकांना मनापासून धन्यवाद.

मराठीतल्या एका संताने म्हंटले आहेच. “गुरुविना कोण दाखविल वाट.” भारतीय अथवां जगभरातील शिक्षण क्षेत्रातील शिष्य, गुरुविणा अज्ञानीच आहे. म्हणूनच सर्व विद्यार्थ्यांनी प्रामाणिक राहून, आज्ञाधारक, नम्रपणा अंगिकारला पाहिजे. कारण असं म्हटलं जातं “विद्या विनयेन शोभते.” म्हणून आपल्याकडे नम्रपणा असायलाच पाहिजे.

केवळ अभ्यासातील नव्हे, तर खेळ आणि इतर म्हणजे संगीत, कला, नृत्य, अशा शेकडो  क्षेत्रातील गुरु शिष्य नात्याला आपल्या कर्तृत्वाने आणि प्रयत्नाने सुशोभित केलं पाहिजे. तरच शिक्षकदिनाच्या निमित्तानं डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् आणि जगभरातील सर्व शिक्षकांचा, खऱ्या अर्थाने गौरव होईल यात शंकाच नाही.

आम्ही दिलेल्या 5 september Teachers Day Information in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “जागतिक शिक्षक दिन” बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about teachers day in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि 5 september teachers day in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये shikshak din in marathi Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर teachers day in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!