उजनी धरण माहिती Ujani Dam Information in Marathi

ujani dam information in marathi उजनी धरण माहिती, महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक जसे कि कोयना धरण, पावना धरण राधानगरी धरण आणि हि धरणे बांधण्याचा मुख्य हेतू पाणी साठवून ते पाणी सिंचनासाठी, वीजनिर्मितीसाठी आणि इतर वापरासाठी वापरता यावे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील एक धरण आहे ते म्हणजे उजनी धरण जे सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीवर पाणी साठवण्यासाठी बांधलेले आहे. उजनी या धरणाचे बांधकाम हे १९६९ मध्ये सुरु झाले होते आणि १९८० पासून या धरणाचा पाणी साठवण्यासाठी उपयोग करण्यात आला.

हे धरण २५३४ मीटर लांब असून या धरणाची उंची ५६ मीटर आहे. या धरणाच्या बॅकवॉटर एक मोठा क्षेत्र व्यापला आहे आणि उजनी धारण आणि धरणाचा मोठा जलाशय सिंचन, वीजनिर्मिती आणि पिण्याचे पाणी अश्या अनेक बहुउद्देशीय फायद्यामध्ये केला जातो. उजनी धरण हे खोऱ्यातील सर्वात मोठे धरण आहे आणि हे धरण १४८५६ चौरस किलो मीटर पाणलोट क्षेत्र रोखते आणि या धरणाचे सर्व बांधकाम जे दगड आणि काँक्रीटचे आहे.

ज्या नदीवर उजनी धरण बांधला आहे ती भीमा नदी पश्चिमेकडे असणाऱ्या भीमशंकर डोंगरातून उगवते आणि त्याला सह्याद्रीच्या डोंगररांगा म्हणून ओळखले जाते आणि मग हि नदी सोलापूर जिल्ह्यातील नरसिंगपूर या ठिकाणी कृष्णा नदीला येऊन मिळते.

ujani dam information in marathi
ujani dam information in marathi

उजनी धरण माहिती – Ujani Dam Information in Marathi

धरणाचे नावउजनी धरण
ठिकाणमहाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीवर आहे
सुरुवात१९८०
लांबी आणि उंचीधरणाची लांबी २५३४ मीटर आणि उंची ५६ मीटर आहे
साठवणूक क्षमता१४८५६ चौरस किलो मीटर

उजनी धरण परिसराविषयी माहिती – information about ujani dam in marathi

उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा नदीवर वसलेले आहे आणि या धरणावर आपण सहज  पोहचू शकतो आणि या ठिकाणाचा सुंदर नजरा पाहण्यासाठी अनेक लोक किंवा पर्यटक या धरणाला भेट देतात. धरण क्षेत्र हे चांगल्या प्रकारे विकसित केलेले आहे त्यामुळे आणि तेथील धरणामध्ये साठवलेल्या पाण्याचा पाणलोट हा ५७३७ चौरस मैलावर पसरलेला आहे आणि हा पाणलोट पाहून एक वेगळाच आनंद मिळतो.

या ठिकाणी धरण पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणत गर्दी असते आणि हे धरण पर्यटकांना पाहण्यासाठी सकाळ पासून संध्याकाळपर्यंत उघडे असते. डिसेंबर या काळामध्ये या परिसरामध्ये स्थलांतरित पक्षी पहायला मिळतात जसे कि फ्लेमिंगो, गुल, टर्न, रोलर, ड्रोगो, कॉमन हुपो, जकाना, मुनिया, वूली नेक्ड करकोचा, रुडी शेलडक या सारखे पक्षी पहायला मिळतात.

भिगवण हे धरणाचे पाणलोट क्षेत्र आहे आणि या ठिकाणी पक्षी अभयारण्य आहे त्या ठिकाणी आपण वर सांगितलेले पक्षी पहायला मिळतात. या ठिकाणी पक्षी अभयारण्य असल्यामुळे हे पक्षी निरीक्षकांच्यासाठी एक चांगले ठिकाण आहे तसेच हे ठिकाण निसर्गप्रेमींच्यासाठी देखील खूप चांगले ठिकाण आहे.

धरणावर पाहायला मिळणारे पक्षी

 • फ्लेमिंगो
 • गुल.
 • टर्न.
 • रोलर.
 • वूली नेक्ड करकोचा.
 • ड्रोगो.
 • कॉमन हुपो.
 • जकाना.
 • मुनिया.
 • रुडी शेलडक.

उजनी धरणाविषयी विशेष तथ्ये – facts

 • उजनी धरणाला भीमा धरण किंवा भीमा सिंचन प्रकल्प म्हणून देखील ओळखले जाते.
 • उजनी या धरणाचे बांधकाम हे १९६९ मध्ये सुरु झाले होते आणि १९८० पासून या धरणाचा पाणी साठवण्यासाठी उपयोग करण्यात आला.
 • हे धरण बांधण्याचा मुख्य उद्देश म्हणजे साठवलेले पाणी भागातील सिंचनासाठी वापरणे तेवढेच नाही तर वीजनिर्मिती आणि इतर कामासाठी देखील्न या पाण्याचा वापर करता यावा.
 • उजनी धरणाजवळ एक प्राचीन असे पार्श्व मंदिर आहे ते देखील पर्यटकांना पाहण्यासाठी चांगले ठिकाण आहे त्यामुळे तुम्ही उजनी धरण पाहण्यासाठी गेल्यानंतर या मंदिराला देखील भेट देऊ शकता.
 • उजनी धरणाच्या प्रकल्पाला यशवंतसागर या नावाने देखील ओळखले जाते.
 • उजनी धारण हे भीमा नदीवर बांधले आहे आणि हि नदी पुढे सोलापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या नरसिंहपूर या गावामध्ये कृष्णा नदीला जाऊन मिळते.
 • उजनी धरण हे खोऱ्यातील सर्वात मोठे धरण आहे आणि हे धरण १४८५६ चौरस किलो मीटर पाणलोट क्षेत्र रोखते

कसे पोहचायचे – how to reach

सोलापूर मध्ये असणाऱ्या उजनी धरणापर्यंत आपल्याला रस्त्याने सहज जाता येते कारण अनेक मुख्य रस्त्यांनी सोलापूरला चांगल्या वाहतूक मार्गाने जोडलेले आहे. उजनी धरण पाहण्यास येणारे पर्यटक हे सोलापुरातून धरणापर्यंत बस किंवा टॅक्सीने जावू शकतात.

 • बसने : उजनी धारण हे रस्ता वाहतूकने चांगले जोडलेले आहे आणि सोलापूर, पुणे आणि मुंबई या शहरातून आपल्याला या धरणापर्यंत सहज बसने जाता येते. पुणे आणि सोलापूर दरम्यान जाणारा NH९ हा मार्ग उजनी धरणाला जोडतो.
 • ट्रेन : सोलापूर रेल्वे स्थानक हे उजनी धरणासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे. आपण पुणे किंवा मुंबईहून सोलापूरला ट्रेन येऊ शकतो आणि तेथून धरणापर्यंतचा प्रवास टॅक्सीने करू शकतो.

धरणाला भेट देण्याची उत्तम वेळ – best time to visit dam

या ठिकाणी शक्यतो वर्षभर पर्यटक हे उजनी धरणाला भेट देत असतात कारण या धरणावर वर्षभर पर्यटकांची गर्दी पहायला मिळते परंतु एक मनमोहक आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणाला हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये भेट देऊ शकता. कारण ऑक्टोबर ते जानेवारी या काळामध्ये या धरणावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी स्थलांतरित होतात त्यामुळे ऑक्टोबर ते जानेवारी हा या धरणाला भेट देण्याचा उत्तम काळ आहे.

आम्ही दिलेल्या ujani dam information in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?

भीमा नदीवर पाणी साठवण्यासाठी बांधलेले आहे.

उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे.

उजनी धरण कोणत्या तालुक्यात आहे?

सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यात भीमानगर या गावाजवळ हे एक मोठे धरण आहे.

उजनी धरण किती टीएमसी आहे?

उजनी धरणाची क्षमता ही 117 टीएमसी इतकी आहे.

उजनी धरणाला किती दरवाजे आहेत?

उजनी धरणाला ४१ दरवाजे आहेत.

मित्रानो तुमच्याकडे जर उजनी धरण माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ujani dam news in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि ujani dam capacity in tmc in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!