Aai Sampavar Geli Tar Essay in Marathi आई संपावर गेली तर निबंध लेखन मला आजही माझे लहानपणीचे दिवस जशाच तसे आठवतात. अजूनही आठवत की मी सहावीला होते आणि प्राथमिक शाळेला दिवाळीच्या सुट्ट्या लागून नुकतेच दोन दिवस झाले होते. त्यामुळे, आम्हां तिघा भावंडांचा घरी भरपूर गोंधळ चालला होता. त्यात मी दररोज सकाळी खूप उशिरा उठत होते. असचं एकेदिवशी सकाळी मी नऊ वाजता उठले होते आणि तेही केवळ आई माझ्यामागे लागली होती म्हणून! तेंव्हा वाटायचं काय ती कटकट असते आईची? सुट्टीच्या दिवशीही शांतपणे झोपू देत नाही.
असे कित्येक विचार त्यावेळी सहजपणे माझ्या मनात येऊन जायचे. काही वेळानंतर मी सकाळचा नाष्टा दहा वाजता करून माझ्या भावंडांबरोबर खेळायला जायचे. पण, दुसरीकडे मात्र आईची दिवाळीच्या कामांची लगबग सुरुच होती. कारण, दिवाळी फक्त चार दिवसांवर येऊन ठेपली होती, त्यामुळे घरी तिला खूप कामे होती. शिवाय, घरातील सगळी कामं पहिल्यापासून ती एकटीच करायची.
आई संपावर गेली तर निबंध लेखन – Aai Sampavar Geli Tar Essay in Marathi
Aai Sampavar Geli Tar
खरंतर, आम्ही भावंडांनी तिला थोडीशी तरी कामात मदत करावी असं तिला कित्येक वेळा वाटायचं, परंतू आम्ही तिघं मात्र तिच्याकडे सहज दुर्लक्ष करायचो आणि दररोजच्या सारखं आपल्या खेळण्यात गुंग व्हायचो. घरामध्ये खेळू नका, घरी फराळाची तयारी चालू आहे, बाहेर अंगणात खेळा, असं कितीवेळा तरी आईने आम्हां तिघांना बजावलं तरीदेखील, आम्ही मात्र नेहमीप्रमाणे तिच्याकडे आणि तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचो.
दिवाळीच्या या गडबडीत एकेदिवशी खेळता-खेळता चुकून माझा धक्का आईने बनवून ठेवलेल्या एका सारणाच्या डब्याला लागला आणि तिने बिचारीने इतक्या मेहनतीने करंजीसाठी केलेले सारण पटकन जमीनीवर सांडले. आता माझा हा पराक्रम पाहून, आई काय गप्प बसणार होती?
- नक्की वाचा: मी पंतप्रधान झालो तर
माझा हा निष्काळजीपणा पाहून आईचा पारा चढला आणि ती खूप रागारागाने आम्हां तिघांनाही बोलू लागली, “कितीदा सांगितलं तुम्हां तिघांना इथं खेळू नका म्हणून? बाहेर खेळायला सांगितलं होतना, चार तास बसून मी केलेले सगळे सारण तुम्ही तिघांनी वाया घालवले. एकतर मला तुमची घरच्या कोणत्याच कामात काडीचीही मदत होत नाही; पण, दरवेळी तुम्ही माझी कामे मात्र हातभार वाढवून ठेवता.
खरचं, कंटाळा आलाय मला सगळ्याचा. अस वाटतंय की मी एक दिवस संपावर निघून जावं, तेंव्हाच तुम्हाला माझी किंमत कळेल.” आईचं बोलून झाल्यावर आम्ही सगळे घरातून बाहेर धूम पळून गेलो आणि घराजवळच्या एका मोठ्या आणि डौलदार आंब्याच्या झाडाखाली शांतपणे जाऊन बसलो.
त्यावेळी, मी विचार करू लागले की खरंच माझी आई संपावर गेली तर? मला वाटू लागलं की आई संपावर गेली तर, मला रोज सकाळी खूप वेळ झोपता येईल. सकाळी-सकाळी माझी झोप मोड करायला कोणी नसेल, त्यामुळे हवा तितका वेळ मला निवांतपणे झोपता येईल, शिवाय अंघोळी करण्यासाठी कोणी माझ्या मागेदेखील लागणार नाही.
याखेरीज, मला मनसोक्त माझ्या भावंडांसोबत आणि मित्र मैत्रिणींसोबत खेळता येईल. किती छान ना! म्हणजे माझ्यामागे कुणाचीही कोणत्याही प्रकारची कटकट असणार नाही. मी कितीही लाडू खाल्ले, तरी कुणीही मला काहीच विचारणार नाही, त्यामुळे मला वाटेल तेंव्हा मी बिनधास्तपणे भरपूर काही खाऊ शकेन.
त्याचबरोबर, मला कुणीही अभ्यासाला का बसली नाहीस, मी शाळेला एखाद्या दिवशी सुट्टी मारली तर, शाळेला का गेली नाहीस, यांवरून मला कुणीही काही बोलणार नाही अथवा रागवणार नाही. किती मज्जा येईल ना! असं झालं तर; पण मित्रांनो, आई संपावर गेली तर, मला दररोज रुचकर जेवण कोण करून देईल? मला कोण भरवेल?
माझ्या आवडीची भेंडीची भाजी, वाटाण्याची भाजी, पालकाची भाजी, डाळ खिचडी आणि बटाट्याची भाजी मला कोण खायला देईल? मी जर आजारी पडले तर माझी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक देखभाल कोण करेल?
मला आणि माझ्या भावंडांना दररोज न चुकता माझ्या शाळेला पाठवण्यासाठी माझ्यासोबत कोण येईल? शाळेतील परीक्षेच्या आधी माझ्या अभ्यासाची सगळी उजळणी कोण करून घेईल? शाळेतून संध्याकाळी घरी आल्यावर मला जवळ बसवून माझे लाड कोण करेल? घरातील सगळयांची काळजी कोण घेईल? सगळ्यांसाठी स्वयंपाक कोण बनवेल? घरातील सगळयांना कोण बांधून ठेवेलं?
खरंच, आई संपावर गेली तर, माझे संपूर्ण आयुष्यच एका ठिकाणी थांबून जाईल. किती भयंकर ना! खरंच मित्रांनो, आईशिवाय आपल्या जीवनाला काहीच अर्थ नाही. म्हणूनच तर म्हटले जाते, “स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी!” जगाची निर्मिती करणारा, शक्तिशाली, सर्वश्रेष्ठ, सर्वगुणसंपन्न, बलाढ्य, भव्य परमेश्वर देखील आईशिवाय भिकारीचं आहे, हे वरील वाक्यावरून आपल्या लक्षात येतं. म्हणूनच मित्रांनो, आपण सर्वांनी आईला देवाच्या स्थानी पुजले पाहिजेत आणि तिची मनोभावे सेवा केली पाहिजेत.
- नक्की वाचा: मी पक्षी झालो तर
आपल्या जीवनातील आईचे महत्त्व
मित्रांनो, वरील भागात आपण पाहिलं की आई संपावर गेली तर आपली अवस्था कशी होईल. खरंतर, आपल्या कुटुंबातील सगळयांना एकत्रितपणे एका ठिकाणी बांधून ठेवणारी एक व्यक्ती म्हणजे आपली आई असते. दररोज सकाळी आपल्याला सकाळच्या गाढ साखर झोपेतून उठवणारी व्यक्ती म्हणजे आपली आई.
सकाळपासून ते घरातील सगळेजण अगदी रात्री झोपेपर्यंत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आईशिवाय स्वतःची अनेक कामे करता येत नाहीत. कारण, घरातील सगळ्यांची जास्तीत जास्त कामे ही आईशी निगडीतच असतात. परंतू मित्रांनो, जर एखादया दिवशी आपल्या सर्वांची मनापासून काळजी करणारी आई संपावर गेली तर…, खरंच विचार करूनच मला तरी खूप भीती वाटते.
आई जर संपावर गेली आणि त्यावेळी जर मला सकाळी झोपेतून लवकर जाग आली नाही तर, मला वेळेवर कोण उठविणार? शिवाय, मी जर लवकर उठलेच नाही तर मला शाळेत जायला उशीर होईल किंवा मी तशीच जास्त वेळ झोपून राहीन आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यादिवशी मला शाळेची सुट्टी लागेल.
याचबरोबर, मी दुपारी उशिरा उठल्यामुळे मला लगेच भूक लागेल परंतु, माझी आई संपावर असल्यामुळे मला त्यावेळी नाष्टाही मिळणार नाही. अशावेळी माझे बाबा किंवा ताई मला ब्रेड-बटर खायला देतील. पण पोहे, डोसा, उपमा अशा प्रकारचे माझ्या आईचे हातचे स्वादिष्ट आणि रुचकर पदार्थ मात्र मला खायला मिळणार नाहीत.
यासोबतच दुपारच्या जेवणाचे देखील आम्हां घरातील सगळ्यांचे तेच हाल होतील. याखेरीज माझी खेळणी, कपडे, पुस्तक, अशा अनेक वस्तू माझ्या खोलीत सगळीकडे पसरलेल्या आणि विस्कटलेल्या अवस्थेत पडतील. त्यामुळे, माझी खोली मलाच दररोज आवरावी लागेल व खोलीतील विस्कटलेल्या वस्तुदेखील मलाच उचलाव्या लागतील.
- नक्की वाचा: मी चित्रकार झालो तर
शिवाय, आई संपावर गेली तर माझा शाळेचा गृहपाठ कोण घेईल? संध्याकाळच्या वेळी आई नित्यपणे माझ्या बाजूला बसून माझी काळजीपूर्वक शिकवणी घेते, मला गणितासाठी पाढे पाठ करायला सांगते आणि चांगले-चांगले श्लोक शिकवते.
आई संपावर असताना या सगळ्या गोष्टी मला कोण शिकवेल? याखेरीज, आई संपावर गेली तर परीक्षेच्या वेळी माझी चांगली तयारी कोण करून घेईल, माझ्या अभ्यासातील अडचणी मला कोण समजावून सांगेल. एखाद्या वेळी माझी परीक्षेची तयारी नीट न झाल्यामुळे जर, मला कमी मार्क मिळाले तर मला जवळ घेऊन कोण धीर देईल.
आई संपावर गेली तर मला आणि माझ्या भावंडांना खेळायला गार्डनमध्ये कोण नेणार? मी जर जास्त वेळ टीव्ही समोर बसून राहिले तर त्यावेळी मला कोणीही ओरडणारे नसेल, त्यामुळे माझा जास्त वेळ टीव्ही पाहण्यात वाया जाईल आणि परिणामी यामुळे माझ्या डोळ्यांना देखील त्रास होईल.
मित्रांनो, जर आई संपावर गेली तर माझा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि हौशेने कोण साजरा करेल? कारण, दरवर्षी तर माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आईच माझी ओवाळणी करते आणि माझ्या आवडीचे सगळे गोडधोड पदार्थ देखील तीच बनविते.
याखेरीज, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या मित्रमैत्रिणींसाठी खास मेजवानीचा बेत कोण आखेल? मित्रांनो, आज जेंव्हा आई संपावर गेली तर…., अशी कल्पना मनात आली आणि त्यामुळे आईच्या नसण्याने आपल्या आयुष्यातील सगळ्या गोष्टींवर इतके सगळे परिणाम होतील हे लक्षात आलं. तेंव्हा खरंच मला माझ्या आईची माझ्या आयुष्यातील मौलाची, बहुमोल आणि अमूल्य जागा समजली.
त्यामुळे, आज आपण प्रत्येकाने मनात हे पक्के ठरवूया की यापुढे आपण सर्वांनी आपल्या आईला जेवढी जमेल तेवढी तिला तिच्या कामात मदत करायची. तिच्यावरचा घरातील सगळ्या कामाचा अतिरिक्त भार कमी करण्याचा प्रयत्न करूया आणि आपण सर्वांनी आपल्या महान आईविषयी नेहमी कृतज्ञता दाखवूया.
तेजल तानाजी पाटील
बागीलगे, चंदगड.
आम्ही दिलेल्या aai sampavar geli tar essay in marathi 9 class माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर आई संपावर गेली तर निबंध लेखन बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या aai sampavar geli tar essay in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि aai sampavar geli tar essay in marathi nibandh माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये aai sampavar geli tar essay in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट