ब्रेड पकोडा रेसिपी मराठी Bread Pakora Recipe in Marathi

Bread Pakora Recipe in Marathi ब्रेड पकोडा रेसिपी मराठी सकाळी आपण नाश्त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज बनवतो जसे जी पोहे, उपमा, शिरा, इडली आणि डोसा यासारखे अनेक पदार्थ आपण बनवून खातो परंतु ह्या रेसिपीज रोज रज खावून कंटाळा आलेला असतो आणि आपल्याला नाश्त्यामध्ये काही वेगळापणा हवा असेल तर तुम्ही ब्रेड पकोडे हि रेसिपी नाश्त्यासाठी बनवू शकता. ब्रेड पकोडे हि रेसिपी भारतीय रेसिपी आहे आणि हि भारतामध्ये बहुतेक भागामध्ये नाश्त्यासाठी किंवा मग संध्याकाळच्या चहा सोबत खाण्यासाठी बनवली जावू शकते.

ब्रेड पकोडा रेसिपी बनवताना ब्रेड स्लाईसच्या कडा काढल्या जातात आणि ब्रेड स्लाईस त्रिकोणी आकारामध्ये कात केली जाते आणि मह त्यामध्ये बटाटा भाजी भरली जाते आणि ब्रेडची एक त्रिकोणी आकाराची स्लाईस त्यावर ठेवली जाते आणि ते डाळीच्या पिठाच्या बॅटरमध्ये बुडवून ते कोट करून तेलामध्ये लालसर रंग येईपर्यंत तळले जाते. ब्रेड पकोडा घरी बनवणे खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनते. चला तर आता आपण ब्रेड पकोडा कसा बनवायचा ते पाहूयात.

bread pakora recipe in marathi
bread pakora recipe in marathi

ब्रेड पकोडा रेसिपी मराठी – Bread Pakora Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ ते ३० मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

ब्रेड पकोडा कसा बनवायचा ?

ब्रेड पकोडा रेसिपी बनवताना ब्रेड स्लाईसच्या कडा काढल्या जातात आणि ब्रेड स्लाईस त्रिकोणी आकारामध्ये कात केली जाते आणि मह त्यामध्ये बटाटा भाजी भरली जाते आणि ब्रेडची एक त्रिकोणी आकाराची स्लाईस त्यावर ठेवली जाते आणि ते डाळीच्या पिठाच्या बॅटरमध्ये बुडवून ते कोट करून तेलामध्ये लालसर रंग येईपर्यंत तळले जाते.

ब्रेड पकोडे बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients 

  • ब्रेड स्लाईस : ब्रेड पकोडा बनवण्यासाठी ब्रेड स्लाईसेस हा महत्वाचा घटक आहे. दोन कात केलेल्या ब्रेड स्लाईसेस मध्ये बटाटा भाजी भरली जाते आणि महाते डाळीच्या भिजवलेल्या पिठामध्ये बुडवून तेलामध्ये तळले जातात.
  • बटाटा : ब्रेड पाकोड्या मध्ये जे सारण भरलेले असते ते बटाट्या पासून बनवले जाते. बटाटा सर्वप्रथम उकडून घेतला जातो मग त्याची भाजी बनवली जाते आणि मग ती ब्रेड पकोड्यामध्ये वापरली जाते.
  • डाळीचे पीठ : डाळीचे पीठ देखील ब्रेड पोकोडा बनवण्यासाठी लागणारे महत्वाचे साहित्य आहे. बेसन पीठाचे बॅटर बनवले जाते आणि त्यामध्ये ब्रेड कोट केले जातात.

ब्रेड पकोडा रेसिपी – how to make bread pakora recipe 

ब्रेड पकोडा हि रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहा सोबत खावू शकतो आणि हि रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे म्हणजेच हि रेसिपी २५ ते ३० मिनिटामध्ये बनते आणि मोजक्याच साहित्यामध्ये बनते. चला तर आता आपण ब्रेड पकोडा रेसिपी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ ते ३० मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

ब्रेड पकोडा रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make bread pakora 

ब्रेंड पकोडा बनवण्यासाठी जे साहित्य लागते त्यामधील काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते तर काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध नसते आणि ते आपल्याला बाजारातून विकत आणावे लागते. आता आपण ब्रेड पकोडा बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • ५ ते ६ ब्रेड स्लाईसेस.
  • १ चमचा लाल मिरची पावडर.
  • १ वाटी बेसन पीठ.
  • १/४ चमचा हळद.
  • १/२ चमचा ओवा.
  • ३ ते ४ बटाटे ( उकडलेले ).
  • ८ ते ९ हिरव्या मिरच्या ( बारीक चिरलेल्या ).
  • ५ ते ६ कडीपत्ता पाने.
  • १ चमचा मोहरी.
  • १ मोठा कांदा ( बारीक चिरलेला ).
  • २ चमचा आलं लसून पेस्ट.
  • १/२ चमचा हळद.
  • १/४ चमचा हिंग.
  • मीठ ( आवश्यकतेनुसार ).
  • तेल ( आवश्यकतेनुसार ).
  • पाणी ( गरजेनुसार ).
  • कोथिंबीर.

 ब्रेड पकोडा रेसिपी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make bread pakora 

आता आपण वर दिलेले साहित्य वापरून ब्रेड पकोरा कसा बनवायचा ते पाहूयात.

  • ब्रेड पकोडा बनवताना सर्वप्रथम डाळीचे पीठ एका मिक्सिंग बाऊल मध्ये घ्या आणि त्यामध्ये हळद, ओवा, कोथिंबीर, लाल मिरची पावडर घाला आणि मग त्यामध्ये लागेल तेवढे पाणी घालून त्याचे चांगले बॅटर बनवून घ्या आणि ते थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा. ( टीप : बॅटर बनवते वेळी पिठाच्या गाठी होणार नाहीत याची काळजी घ्या ).
  • आता आपण भाजी बनवूया, भाजी बनवण्यासाठी उकडलेले बटाटे सोलून ते मॅश करा किंवा एकदम बारीक चिरून घ्या.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करायला ठेवा आणि कढई गरम झाली की त्यामध्ये २ ते ३ चमचे तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला.
  • मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये कांदा घाला आणि तो कांदा लालसर होईपर्यंत चांगला भाजा.
  • मग त्यामध्ये आलं लसून पेस्ट घाला आणि ते कांद्यासोबत चांगले एकत्र करा.
  • त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कडीपत्ता घाला आणि तो तेलामध्ये थोड्या वेळासाठी परता म्हणजे मिरचीचा तिखटपणा आणि कडीपत्त्याचा फ्लेवर त्यामध्ये उतरेल.
  • आता यामध्ये हिंग, हळद घाला मिक्स करा आणि मग त्यामध्ये शिजवलेला बटाटा आणि मीठ ( चवीनुसार ) घाला ते चांगले मिक्स करा.
  • भाजीला गॅसवर मध्यम आचेवर थोडा वेळ वाफ येवू द्या आणि मग गॅस बंद करा.
  • आता हे मिश्रण थोडा वेळ गार होऊ द्या आणि त्या वेळेमध्ये कढई मध्ये पकोडे तळण्यासाठी तेल घाला आणि ते गॅसवर मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा तसेच ब्रेडच्या कडा काढून ब्रेडच्या एका स्लाईसचे दोन त्रिकोणी भाग करून ठेवा.
  • आता ब्रेडचे दोन त्रिकोणी भाग घ्या आणि ब्रेंडाच्या एका भागावर भाजीचे आवरण पसारा आणि मग त्यावर दुसरी ब्रेडची त्रिकोणी स्लाईस ठेवा आणि मग ते डाळीच्या पिठाच्या बॅटरमध्ये बुडवून कोट करून घ्या आणि हळुवार पाने तेलामध्ये सोडा आणि ते पकोडे कुरकुरीत होईपर्यंत आणि लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्या.
  • अश्या प्रकारे सर्व पकोडे बनवून घ्या .

ब्रेड पकोडा कश्या सोबत खातात – serving suggestion

  • ब्रेड पकोडा हि रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहा सोबत खावू शकतो तसेच हि रेसिपी टोमॅटो सॉस सोबत खूप छान लागते.

टिप्स (Tips) 

  • बटाट्याच्या भाजीमध्ये आपण हिरव्या मिरची ऐवजी लाल मिरची पावडर घालून लाल बटाट्याची भाजी बनवू शकतो.
  • भाजीमध्ये चवीसाठी थोडी गोड साखर घालू शकतो.

आम्ही दिलेल्या bread pakora recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ब्रेड पकोडा रेसिपी मराठी माहिती मराठी simple bread pakora recipe बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bread pakora recipe in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि bread pakora recipes in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये recipe of bread pakora in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!