Essay on Lagori in Marathi माझा आवडता खेळ लगोरी निबंध खेळ हे शारीरक कला आहे. जी आणि आपण कोणतेही खेळ खेळलो कि आपला चांगला व्यायाम होते. त्यामुळे खेळ खेळणे महत्वाचे आहे आणि तो कोणताही असो. जगभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले जातात आणि त्यामध्ये काही मैदानी खेळ असतात तर काही बैठे खेळ असतात. मैदानी खेळ म्हणजे क्रिकेट, फुटबॉल, टेनिस यासारखे अनेक मैदानी खेळ जगभरामध्ये खेळले जातात. तसेच बैठे खेळ म्हणजे साप शिडी, बुद्धीबळ अशे काही खेळ खेळले जातात. भारतामध्ये देखील अनेक असे खेळ खेळले जातात आणि त्यामध्ये काही पारंपारिक खेळ देखील आहे.
जे आम्ही लहानपणी खूप आवडीने खेळायचो आणि हे खेळ खेळताना खूप मज्जा यायची असे खेळ म्हणजे खो खो , कब्बडी, लपंडाव, लंगडी, लगोरी, आत्या पाट्या, विठी दांडू यासारखे मैदानी खेळ पूर्वी खेळले जायचे आणि आजही हे खेळ ग्रामीण भागामध्ये लहान मुले खेळतात. यामधील एक लोकप्रिय आणि सर्वांना खेळण्यासाठी खूप आवडणारा खेळ म्हणजे लगोरी.
लगोरी हा एक पारंपारिक खेळ आहे. म्हणजे हा खेळ खूप पूर्वीपासून खेळला जातो आणि हा खेळ पूर्वीच्या काळी मुले किंवा मुली त्यांचे मनोरंजन होण्यासाठी खेळत होत्या. लगोरी हा एक मैदानी खेळ आहे जो एका गटामध्ये ७ ते ८ खेळाडू असतात किंवा त्याहून आधीक देखील असतात कारण या खेळामध्ये खेळाडूंच्या संखेसाठी काही नियम किंवा अटी नसतात तसेच हा खेळ २ गटांच्यामध्ये खेळला जातो.

माझा आवडता खेळ लगोरी निबंध – Essay on Lagori in Marathi
Lagori Essay in Marathi
जर या खेळाच्या इतिहासाबद्दल बोलायचे म्हंटले तर लगोरी हा खेळ एक पारंपारिक खेळ म्हणून ओळखला जातो म्हणजेच हा खेळ खूप पूर्वीच्या काळापासून खेळला जाऊ लागला. या खेळाची सुरुवात आणि ओळख हि भारतामधून झाली आणि हा खेळ सर्वप्रथम भारतामध्ये भारताच्या पश्चिमेकडील भागामध्ये झाली आणि मग जस जशी या खेळाची लोकप्रियता वाढली आणि हा मजेशीर खेळ लोकांना समजायला लागला त्यावेळी हा खेळ संपूर्ण देशामध्ये खेळण्यास सुरुवात झाली.
आणि इ.स १९९० च्या काळामध्ये हा खेळ भारतामध्ये आणि पाकीस्थान मध्ये देखील खूप लोकप्रिय झाला आणि हा खेळ त्या ठिकाणी आवडीने खेळायला सुरुवात झाली. पूर्वी लगोरी या खेळाचे नाव लगोरी असे नव्हते तर या खेळला सात दगडांचा खेळ म्हणून ओळखले जायचे कारण या खेळामध्ये सात सपाट छोटी छोटी दगडे एकमेकावर ठेवली जायची आणि त्याला चेंडूने मारून फोडले जायचे आणि विरुद्ध असणाऱ्या गटाने ती परत रचण्याचा प्रयत्न केला जायचा.
लगोरी हा खेळ तसा गमतीदार आणि मनोरंजक असल्यामुळे पूर्वी हा खेळ खूप खेळला जायचा परंतु सध्या हा खेळ कोणीच खेळत नाहीत कारण आता भारतामध्ये अनेक नवनवीन खेळ आले आहेत त्यामुळे हा खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. परंतु हा खेळ भारताच्या काही ग्रामीण भागामध्ये आणि काही ग्रामीण भागातील शाळेंमध्ये अजूनही खूप आवडीने खेळला जातो.
लगोरी हा खेळ मैदानावर खेळला जातो आणि त्यामध्ये २ गट असतात आणि हे गट मोठे असतात म्हणजे एका गटामध्ये ७ ते ८ किंवा त्याहून अधिक खेळाडून खेळ खेळी शकतात आणि एका गटामध्ये जितके खेळाडू आहेत तितकेच दुसऱ्या गटामध्ये देखील असतात आणि हा खेळ खेळण्यासाठी विशेष असे काही नियम किंवा आटी नाहीत कारण हा खेळ स्पर्धात्मक स्वरुपात खेळला जात नाही.
हा खेळ खेळताना ७ लाकडाचे चपटे तुकडे किंवा चपटे छोटे छोटे दगड लागतात जे एक मेकावर बसतील आणि हे दगड किंवा लाकडाचे तुकडे खूप लहान किंवा मोठे असून नयेत तर ते मध्यम आकाराचे असावेत. तसेच हा खेळ खेळण्यासाठी एक मऊ बॉल देखील लागतो. हा खेळ खेळताना सर्वप्रथम दोन व्यक्ती निवडून त्यांना गटातील इतर खेळाडू निवडण्याचा अधिकार दिला जातो आणि काटा किंवा छापा असा टॉस करून ज्याचा प्रथम टॉस पडेल त्याला प्रथम खेळाडू निवडण्याची संधी मिळते असे दोघेजण खेळाडू निवडून आपले गट बनवतात आणि दोन्ही गटांची संख्या हि सारखीच असते.
ज्याने टॉस जिंकला आहे त्याने निवडायचे असते कि तो बॉल मारून विरूद्ध गटाला आऊट करणार कि दगडाचा थर रचणार. जर त्यांनी थर रचण्याचे निवडले तर विरूद्ध टीमला त्यांना आऊट करायचा प्रयत्न करावा लागतो. आता हे ठरले कि खेळ खेळण्याचे एक ठराविक अंतर ठरवून एक मोठा गोल बनवला जातो हा गोल इतका मोठा असतो कि थर रचणाऱ्या गटाला अगदी सहजपणे पाळता येईल आणि आणि विरोधी टीमने मारलेला बॉल चुकवता येईल आणि त्या गोलच्या मध्यभागी एक वर्तुळ काढले जाते आणि त्याला एक ठरविक अंतर ठेवून एक रेषा मारली जाते आणि त्या रेषेवरून बॉल मारून तो थर पाडता येईल.
मग त्या छोट्या वर्तुळामध्ये तो सात दगडांचा थर ठेवला जातो आणि विरुद्ध संघाचे खेळाडू मैदानामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उभारलेले असतात तसेच थर लावणाऱ्या संघाचे खेळाडू देखील वेगवेगळ्या ठिकाणी उभारलेल असतात आणि २ ते ३ विरुद्ध गटातील खेळाडू आणि १ थर लावणारा खेळाडू वर्तुळा जवळ असतो. वर्तुळा जवळ असणाऱ्या थर लावणाऱ्या खेळाडूने मऊ बॉल हातामध्ये घेवून वर्तुळा पासून जी रेष ओढली आहे.
तेथून बॉल मारून तो ठार फोडण्याचा प्रयत्न करायचा असतो आणि तो ठार फोडण्यासाठी खेळाडूकडे ३ संधी असतात जर त्याने ३ संधी मध्ये जर थर फोडला नाही तर हि संधी विरूद्ध गटाकडे जाते. आणि जर त्याला तो थर फोडण्यास यश मिळाले तर तो थर फोडून त्याला तेथून पाळावे लागते.
पळताना विरुद्ध टीम बॉल मारून थर बनवणाऱ्या टीमला आऊट करण्याचा प्रयत्न करत असते आणि थर लावणारी ते चुकवून पडलेला सातही दगडांचा ठार लावण्याचा प्रयत्न करत असतात. खेळाडू जर थर लावताना किंवा ठरतील एक दगड हातामध्ये असताना बॉल लागून आऊट झाला तर थर लावण्याची संधी विरुद्ध गटाकडे जाते आणि जर थर लावणारी टीम जर थर लावण्यास यशस्वी झाली तर त्यांना परत पुढच्या डावामध्ये थर लावण्याची संधी मिळते.
लगोरी या खेळामध्ये मुलींचा संघ एकमेकांविरुद्ध खेळू शकतो किंवा मुलांचा संघ एकमेकांविरुद्ध खेळू शकतो किंवा या खेळामध्ये मुले आणि मुली एकत्र मिळून खेळू शकतात किंवा मग मुलांचा एक गात आणि मुलींचा एक गट असे देखील खेळू शकतात या खेळला काही नियम नाही. लगोरी या खेळला जरी पूर्वीच्या काळी सात दगडांचा खेळ म्हणून जरी ओळखत असले,
तरी आज या खेळला भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते जसे कि लगोरी या खेळला उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तरा खंड, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये या खेळला सितोलीया या नावाने ओळखले जाते तसेच महाराष्ट्रामध्ये सात टिलो या नावाने ओळखले जाते. अश्या प्रकारे लगोरी हा खेळ भारतामध्ये खेळला जायचा पण सध्या हा खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
आम्ही दिलेल्या essay on lagori in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर माझा आवडता खेळ लगोरी निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या lagori essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि lagori nibandh in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये lagori nibandh marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट