कर्णपीडासन माहिती मराठी Karnapidasana Information in Marathi

karnapidasana information in marathi कर्णपीडासन माहिती मराठी, रोजच्या दगदगीच्या आणि प्रदूषणाच्या काळामध्ये योग करणे हि काळाची गरज बनली आहे कारण जर अशा प्रदूषणाच्या काळामध्ये एखाद्या व्यक्तीने जर रोजच्या रोज व्यायाम आणि योगासने केली तर अशा व्यक्तीला डॉक्टरकडे सतत जाण्याची गरज लागणार नाही. योगासन करणे खूप गरजेचे आहे कारण आपण जर नियमितपणे योगा आणि व्यायाम केला तर आपल्याला कोणत्याही प्रकारची आरोग्य समस्या उद्भवणार नाही तसेच योग नियमितपणे सराव करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या जीवनशैलीत कायमस्वरूपी सकारात्मक फरक निर्माण करू शकतो.

योग हा एक अध्यात्मिक उपक्रम आहे आणि हा उपक्रम रोज नियमितपणे केल्यामुळे आपले शरीर, मन आणि आत्मा यांचे संपूर्ण समर्पण होते आणि म्हणून हा अध्यात्मिक उपक्रम हा रोजच्या रोज केला तर या प्रदूषित जगातून आपला बचाव होऊ शकतो आणि आपण अनेक आरोग्य समस्यांच्यापासून देखील दूर राहू शकतो.

योग केल्याने आपल्या अनेक आरोग्य समस्या तर दूर होतातच परंतु आपले मन, आत्मा शांत होतो तसेच आपले ध्येय आणि आत्मविश्वास देखील वाढण्यास मदत होते. योगाचे अनेक प्रकार आहेत जसे कि सूर्य नमस्कार, प्राणायाम, चक्रासन, गोमुखासन, बकासन, मयुरासन, धनुरासन, कर्णापिडासन, वज्रासन. परंतु आज आपण या लेखामध्ये “कर्णापिडासन” या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. चला तर आता आपण कर्णापिडासन हे आसन कसे करतात, त्याचे फायदे काय आहेत या विषयी सर्व माहिती घेवूया.

karnapidasana information in marathi
karnapidasana information in marathi

कर्णपीडासन माहिती मराठी – Karnapidasana Information in Marathi

आसनाचे नावकर्णापिडासन
इंग्रजी नावknee to ear pose
फायदेहे आसन नियमित केल्यामुळे कानाच्या समस्या दूर होतात

कर्णापिडासन विषयी महत्वाची माहिती – information about karnapidasana in Marathi

कर्णापिडासन हे एक योगाचे आसन आहे आणि कर्णापिडासनाची मुद्रा हि हलासनासारखी दिसते. कर्णापिडासन हा शब्द तीन शब्दांच्या पासून बनलेला आहे म्हणजेच कर्ण, पीडा आणि आसन. कर्ण म्हणजे कान, पीडा म्हणजे वेदना आणि आसन म्हणजे मुद्रा असा या शब्दाचा अर्थ होतो आणि या आसनाला असे नाव देण्याचे मुख्य कारण म्हणजे या आसनाच्या नियमित सरावाने आपल्या कानाच्या वेदना आणि समस्या कमी होण्यास मदत होते.

कर्णापिडासन हा मुद्रेला knee to ear pose म्हणून ओळखले जाते आणि हि मुद्रा करताना आपल्याला पाठीवर जमिनीवर झोपावे लागते आणि या प्रकारच्या योगाने आपले शरीर हे लवचिक आणि संतुलित बनण्यास मदत होते.  

कर्णापिडासन कसे करावे – steps 

कर्णापिडासन हे एक असे असं आहे ज्यामुळे कानाच्या अनेक समस्या दूर होतात. आता आपण कर्णापिडासन कसे करावे या विषयी माहिती घेणार आहोत.

 • कर्णापिडासन करताना सर्वप्रथम जमिनीवर चटई किंवा जमखाना अंथरून घ्या.
 • आता त्या चटईवर तुम्ही तुमच्या पाठीवर झोपा आणि तुमचे दोन्ही पाया आणि हात सरळ रेषेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा.
 • त्यानंतर आता दीर्घ श्वास घ्या आणि तुमचे दोन्ही पाय वर घ्या.
 • मग आता हळू हळू तुमचे दोन्ही पाय हे तुमच्या डोक्याच्या मागे आणण्याचा प्रयत्न करा. आता या स्थितीमध्ये तुमचे पाय हे हलासानामध्ये असल्यासारखे दिसतील.
 • आता तुमच्या शरीराचे वजन तुमच्या खांद्यावर ठेवण्याचा प्रयत्न करा आणि हात जमिनीवर सरळ ठेवा.
 • हलासनामध्ये आल्यानंतर तुमचे दोन्ही पाय गुढघ्यावर वाकवा. तुमचे गुढघे वाकवत वाकवत तुमच्या कानाजवळ आणण्याचा प्रयत्न करा. आता तुमचे कान गुढघ्यांनी झाकून घ्या.
 • या स्थितीमध्ये रहा आणि कमीत कमी ६ ते ८ वेळा श्वास घ्या.
 • आता श्वास सोडताना पाय खाली करा आणि सुरुवातीच्या स्थितीमध्ये या.

कर्णापिडासनाचे फायदे – karnapidasana benefits in marathi

अनेक वेगवेगळ्या प्रकारचे योगासन केल्यामुळे अनेक आरोग्य समस्या दूर होतात तसेच कर्णापिडासनाच्या नियमित सराव केल्याने देखील अनेक फायदे मिळतात ते काय आहेत ते खाली आपण पाहूया.

 • कर्णापिडासन थायरॉईड उत्तेजक संप्रेरकावर दबाव टाकते आणि हे आपल्या चयापचयाला चालना देतात जे आपल्या शरीराचे योग्य कार्य करण्यास मदत करते तसेच यामुळे थायरॉईड अनेक समस्या देखील दूर होण्यास मदत होते.
 • निरोगी शरीरासाठी निरोगी पचन होणे देखील खूप गरजेचे असते आणि कर्णापिडासनाच्या नियमित सरावाने चांगले पचन होण्यास मदत होते.
 • कर्णापिडासन हे आसन नियमित केल्याने तुमच्या फुफ्फुसाचा अधिक विस्तार करण्यास मदत करते जेणेकरून शरीरात जास्त ऑक्सिजन पोहचू शकते.
 • आपल्या शरीराचा मुख्य भाग म्हणजे पाठीचा कणा आणि आपल्याला आपला पाठीचा कणा मजबूत करायचा असेल तर आपण कर्णापिडासनाचा नियमितपणे सराव केला पाहिजे.
 • आजच्या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काहीना काही समस्या, तणाव आणि त्रास आहेच जसे कि नोकरी करताना तणाव, घरातील जबाबदारीचा तणाव, मुलांच्या भविष्याची काळजी अशा अनेक समस्यांना व्यक्तीला सामोरे जावे लागते आणि त्यामुळे त्या संबधित व्यक्तीला खूप तणाव येतो आणि हा दूर करण्यासाठी अनेक योगासने देखील आहेत आणि कर्णापिडासन या आसनाच्या नियमित सरावाने देखील तणाव कमी होण्यास मदत होते.
 • कर्णापिडासन या आसनाच्या नियमित सरावाने कानाच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.
 • अंतर्गत अवयवांची मालिश करण्यासाठी कर्णापिडासन या आसनाचा चांगला उपयोग होतो.
 • ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे अश्या लोकांनी कर्णापिडासन हे आसन नियमित केले तर दम्याचा त्रास कमी होण्यास मदत होते.
 • या आसनामुळे शरीरातील हाडांना तन पडतो आणि स्नायू लवचिक बनण्यास मदत होते.

आम्ही दिलेल्या karnapidasana information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कर्णपीडासन माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या
karnapidasana information in marathi language या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about karnapidasana in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!