लोकसंख्या वाढ एक समस्या निबंध Loksankhya Vadh Ek Samasya Essay in Marathi

Loksankhya Vadh Ek Samasya Essay in Marathi लोकसंख्या वाढ एक समस्या निबंध निसर्गाने माणसाला बरीच नैसर्गिक साधन संपत्ती दिली आहे परंतु माणसाने कितीही निसर्गापेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न केला तरी ते कधीच शक्य होणार नाही. वाढती लोकसंख्या एक समस्या बनत चालली आहे आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे मनुष्य.‌ अगदी हजारो वर्षांपासून मनुष्य या भूतलावर वास्तव्य करत आहे आणि बदलत्या काळासोबत मानवाने भरपूर प्रगती देखील केली परंतु आता लोकसंख्या ही झपाट्याने वाढत चालली आहे ज्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नैसर्गिक साधन संपत्ती मध्ये घट पाहायला मिळेल.

आता वाढती लोकसंख्या नैसर्गिक साधन संपत्ती वर कशाप्रकारे परिणाम करते? तर ही संपूर्ण पृथ्वी निसर्गावर आधारित आहे. माणसाला जगण्यासाठी सूर्यप्रकाश, पाणी, अन्न गरजेचे आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आपल्या वास्तव्याचा प्रश्न देखील उद्भवतो म्हणूनच आपल्या वास्तव्याच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी मनुष्य अगदी मोठ्या प्रमाणांवर झाडें तोडत आहे.

झाडं तोडली जाऊन त्या भागामध्ये घर बांधता येतील. झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन मिळतं. जितक मनुष्याला जगण्यासाठी अन्न व पाणी गरजेच आहे तितकच ऑक्‍सिजन देखील गरजेचं आहे. झाडांमुळेच पाऊस पडतो आणि तेच पाणी आपण वापरतो जर झाडच राहिली नाही तर पाऊस देखील पडणार नाही आणि आपल्या जीवन मरणाचा प्रश्न उद्भवेल.

loksankhya vadh ek samasya essay in marathi
loksankhya vadh ek samasya essay in marathi

लोकसंख्या वाढ एक समस्या निबंध – Loksankhya Vadh Ek Samasya Essay in Marathi

Loksankhya Essay in Marathi

वाढती लोकसंख्या ही आपल्या देशाची एक तणाव दायक समस्या बनली आहे. फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे ज्यामुळे अगदी या पृथ्वीवरील छोट्यातील छोट्या घटकांवर ताण येत आहे. लोकांना जगण्यासाठी मूलभूत गरजा व प्राथमिक सोयी सुविधा आवश्यक आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे राहण्याचा प्रश्न उद्भवत आहे तसंच बेरोजगारीची समस्या वाढत आहेत. त्या शिवाय वीज पुरवठा, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शैक्षणिक सोयी सुविधा अशा सगळ्याच क्षेत्रांमध्ये तणाव दायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगाराची समस्या उद्भवत आहे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बरेच जण आपापला स्वतंत्र असा व्यवसाय सुरू करतात. दरवर्षी लाखो वेगवेगळे कारखाने स्थापन होतात. कारखान्यातून बाहेर पडणारे टाकाऊ पदार्थ किंवा केमिकल नदी नाल्यांमध्ये सोडले जातात ज्यामुळे जल प्रदूषण होतं नदी नाल्यातील पाणी आपण पिण्यासाठी वापरतो आणि यामुळे आपल्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो. कारखान्यातून बाहेर पडणार्या धुरामुळे वायू प्रदूषण होतं ज्यामुळे आपल्याला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो किंवा वेगवेगळे आजार होऊ शकतात.

या सगळ्या कारणांमुळे आपलं आरोग्य बिघडू शकत आणि वाढत्या लोकसंख्येमुळे एका वेळी लाखो लोकांवर उपचार करणं अशक्य आहे. लोकसंख्या दरवर्षी इतक्या झपाट्याने वाढत आहे की आपल्या मूलभूत सोयीसुविधा आपल्यापर्यंत पोहोचवणं देखील सरकारला अवघड जात आहे. आज ही अशी बरीच भाग आणि गाव आहे तिथे ना वीज पुरवठा आहे ना पाणीपुरवठा आहे ना धड राहण्याच्या सोयी सुविधा आहेत.

या सगळ्या गावा कडे दुर्लक्ष केलं गेल्याच एकमेव उत्तर म्हणजे वाढती लोकसंख्या. शहरांमध्ये लोकसंख्या इतकी झपाट्याने वाढत आहे की शहरातील लोकांना मूलभूत सोयीसुविधा पुरविणे अवघड जात आहे ज्यामुळे दुर्गम भागातील लोकांकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्याचा प्रश्न देखील समोर आला आहे.    

प्रत्येकापर्यंत अन्न पोहोचावे म्हणून धान्यांमध्ये देखील वेगवेगळी केमिकल वापरून घोटाळे केले जातात या केमिकल्स मुळे अन्नाची गुणवत्ता संपुष्टात आली आहे आणि परिणामी चांगल्या गुणवत्तेचे अन्न न खाल्ल्यामुळे आपण आजारी पडत आहोत. वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक वेगवेगळ्या समस्या देखील उद्भवत आहेत. प्रत्येकाला चांगलं आयुष्य जगावसं वाटत असतं म्हणूनच आपल्या सगळ्यांच स्वप्न असतं एक चांगलं घर चांगली गाडी आपल्याकडे असावी वाहनांचा बेसुमार वापर केल्यामुळे वायुप्रदूषण वाढत चाललं आहे.

ज्यामुळे बऱ्याच लोकांना अस्थमा किंवा अनेक रुदयाचे आजार होत आहेत ध्वनिप्रदूषण वाढत चाललं आहे प्लास्टिकचा अतिरिक्त वापरामुळे पर्यावरणाला खूप मोठा धोका आहे. सागर किनाऱ्यावर शांतता कमी आणि कचरा जास्त झाला आहे. मनुष्याच्या बेजबाबदार वागणुकीमुळे निसर्गाला मोठ्या प्रमाणावर धोका आहे.

आज मनुष्याने वैज्ञानिक क्षेत्रांमध्ये बरीच प्रगती केली आहे तरीही निसर्गाचा समतोल राखणे हे मनुष्याला जमत नाही आहे आणि निसर्गाच्या पुढे मनुष्य कधीच जाऊ शकत नाही. मनुष्य वास्तव्यासाठी झाड कापत आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची समस्या पुढे आली आहे बऱ्याच ठिकाणी दुष्काळ पडला आहे.

दुष्काळामुळे नीट शेती करण्यास चांगली उपयुक्त जमीन देखील उपलब्ध नाही आहे आणि यामुळे बरेच शेतकरी आत्महत्या करताहेत. असं म्हणतात पृथ्वीवर ७१ टक्के पाणी आहे आणि २९% जमीन आहे आणि सध्या पृथ्वी सोडली तर असा कुठलाही दुसरा ग्रह नाही जिथे मानवी वस्ती आढळून आली असेल. त्या २९% जमिनीतील देखील अर्धा भाग शेतीसाठी वापरला जातो आणि उरलेल्या भागावर मनुष्यवस्ती आहे जर अशीच लोकसंख्येचे प्रमाण वाढत राहिलं तर आपल्या सगळ्यांचा अस्तित्व धोक्यात येईल.

जग खूप पुढे गेल आहे मनुष्याने बुद्धीच्या व ज्ञानाच्या जोरावर वैज्ञानिक क्षेत्रांमध्ये भरीव प्रगती केली आहे. विज्ञानाच्या साहाय्याने मनुष्याने जीवन अधिक सुखद केल आहे. विज्ञानाच्या सहाय्याने प्रगती करून असे काही शोध लावले व किंवा कठीणातून कठीण आजारांवर‌ औषध बनवली जी असाध्य रोगांवर देखील मात करू शकते. त्यामुळे मानवाचे आयुष्य तर वाढले आहे. वैज्ञानिक क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे असाध्य रोगांवर देखील मात करता येते आणि ज्यामुळे मृत्युदराचे प्रमाण कमी झाले आहे.

मनुष्याने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या जोरावर वेगवेगळी साधने उपलब्ध केली ज्याद्वारे मनुष्याची काम चुटकीसरशी होऊ लागली जसं की संगणक, मोबाईल इत्यादी. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती हे देखील एक लोकसंख्यावाढीच कारण बनू शकतं. लोकसंख्या वाढीच सर्वात प्रमुख व महत्त्वपूर्ण कारण म्हणजे लोकांमध्ये असणारा अशिक्षितपणा व जुन्या चालीरीतींना मान्यता देणे. आपल्या देशात फार पूर्वीपासूनच मुलगा मुलगी असा भेदभाव करण्यात आला आहे.

जर वंशाला मुलगा नसेल तर आपलं घर कसं चालणार किंवा वैवाहिक जीवन अपूर्ण समजलं जातं. अशी बरीच लोक आहेत जे जोपर्यंत मुलगा जन्माला येत नाही तोपर्यंत त्या अगोदर बऱ्याच अपत्यांना जन्म देतात. वंशाचा दिवा हवा म्हणून ४-५ कन्या झाल्या तरी मुलांसाठी प्रयत्न सुरू ठेवणं. कुटुंबनियोजन देखील अतिशय महत्त्वाचं आहे परंतु समाजामध्ये साक्षरता नसल्यामुळे कुटुंब नियोजनाचा प्रश्न उद्भवतो.

त्यासोबतच पूर्वी आपल्या समाजामध्ये बालविवाहाची देखील प्रथा होती या कारणामुळे देखील लोकसंख्या वाढीस चालना मिळाली. वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगारी, गुन्हेगारी, दहशतवाद यांसारखे परिणाम दिसू लागले आहेत. आज जागोजागी शाळा महाविद्यालय स्थापन करण्यात आली आहेत तरीपण अशी बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येत नाही कारण सर्व जागा आधीच संपल्या असतात. याचे एकमेव कारण म्हणजे वाढती लोकसंख्या आहे.

आज आपला भारत देश वेगवेगळ्या अनेक समस्यांना तोंड देत आहे परंतु या सगळ्या समस्यांचे मुख्य कारण म्हणजे वाढती लोकसंख्या आहे. लोकसंख्या वाढ ही समस्या आपण कल्पनाही करू शकत नाही इतकी मोठी व भयंकर आहे येणाऱ्या पुढील भविष्या मध्ये जर लोकसंख्या वाढीमुळे होणारे दुष्परिणाम टाळायचे असतील तर आत्ताच लोकसंख्या वाढीवर एक चांगला तोडगा काढायला हवा. सरकारने लोकसंख्यावाढ ही समस्या लक्षात घेऊन लवकरात लवकर त्यावर उपाय शोधायला हवा.

लोकसंख्यावाढीला थांबविण्यासाठी सरकारने वृत्तपत्र, रेडिओ, जाहिराती समाचार या सगळ्यांच्या माध्यमातून समाजाला लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम जाणवून देणे गरजेचे आहे. लोकसंख्या वाढीच कारण व त्याचे‌ उपाय देखील समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत समाजातील लोकांना कुटुंब नियोजन काय असतं किंवा लैंगिक शिक्षण याबद्दल माहिती देणे गरजेचे आहे.

असं म्हणतात जेवढे जास्त हात तेवढी जास्त मदत परंतु आपल्या देशाची वाढणारी लोकसंख्या आपल्यासाठी प्रगती नसून तर आपल्यासाठी एक शापच आहे कारण पुढे जाऊन आपल्याला नैसर्गिक साधन संपत्ती कमी पडेल. मग मोठ्या प्रमाणावर महागाई, रोगराई, गुन्हेगारी, दहशतवाद वाढेल आणि आपण कोणीच सुखाने आयुष्य जगू शकणार नाही.

मनुष्य आपल्या सुख सुविधा पुरवण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिरिक्त वापर करत आहे. देशाच हवामान, विवाह संबंधीचा समाजाचा दृष्टिकोण, बालविवाह, मुलींचे लग्न लवकर करणे, निरक्षरता, अज्ञानी पणा, घरातील दारिद्र्य, कमी प्रतीचे जीवनमान ही सगळी कारणं लोकसंख्यावाढीची मुख्य कारणे आहेत.

आम्ही दिलेल्या loksankhya vadh ek samasya essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर लोकसंख्या वाढ एक समस्या निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या loksankhya ek samasya essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि loksankhya essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Population Essay in Marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!