महिला दिन भाषण मराठी 2024 Women’s Day Speech in Marathi

वार नाही तलवार आहे,

ती समशेरीची धार आहे.

स्त्री म्हणजे काही राख नाही,

तर धगधगता एक अंगार आहे!”

Women’s Day Speech in Marathi – Mahila Din Speech in Marathi जागतिक महिला दिन भाषण मराठी “त्वमेव माता, पिता त्वमेव!” मित्रांनो, या विधानात देखील मातेचे स्थान हे पहिल्या स्थानी आहे. म्हणजेच, ते पित्यापेक्षाही उच्च आहे. तस पाहिलं तर, आपणा सर्वांच्या लक्षात येईल की मातृशक्तीचे स्मरण हे सर्व देवांच्या आधी केले जाते. जसे की, राधाकृष्ण, गौरीशंकर, सीताराम इत्यादी. म्हणूनच, आज या आदरणीय मंचावर स्त्रियांचे विविध रूपातील आपल्या जीवनामध्ये असणारे महत्व आणि त्यांची सर्वांच्या जीवनात असलेली विशेष भूमिका तुम्हा सर्वांना पटवून देण्यासाठी, मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यार्थिनी कुमारी तेजल तानाजी पाटील आज तुमच्यासमोर विषय घेऊन येत आहे.

महिला दिन“. पहिल्यांदा, मला या मंचावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे मनापासून आभार मानते. तसेच, आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या दररोजच्या वेगवेगळ्या कामांतून वेळात वेळ काढून याठिकाणी एकत्रित जमलेल्या सर्व महिला वर्गाचे देखील मी विशेष आभार मानते. कारण, त्यांच्यामुळे आज या कार्यक्रमाला खरी शोभा आली आहे. शिवाय, हा कार्यक्रम देखील त्यांच्यासाठीच आपल्या आयोजकांनी आयोजित केला आहे.

women's day speech in marathi
women’s day speech in marathi

जागतिक महिला दिन भाषण मराठी – Women’s Day Speech in Marathi

महिला दिन भाषण – mahila din speech in marathi

संपूर्ण अमेरिकेतील आणि युरोपातील तसेच, जवळजवळ जगभरातील सर्व स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत त्यांचा मतदानाचा हक्क हा सर्वत्र नाकारला गेला होता. मित्रहो, आपल्या पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण आपल्याला याठिकाणी दिसून येते.

त्याकाळी प्रचलित असलेल्या या स्त्री-पुरुष विषमतेविरूद्ध आणि अन्यायाविरुद्ध त्या त्या अन्यायग्रस्त प्रदेशांतील स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. अशा रीतीने, सन १८९० मध्ये अखेर अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात ‘द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली.

परंतु, ही असोसिएशन सुद्धा वर्णद्वेषी लोकांविषयी त्याचबरोबर, स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती. त्यामुळे, दक्षिणेकडील देशांना काळया मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्यासाठी स्त्रियांना त्यांचा मतदानाचा नागरी  हक्क हा मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन तेथील स्त्रिया आक्रमकतेने करीत होत्या.

अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य कृष्णवर्णीय लोकांनी आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी देखील जोरदार पद्धतीने विरोध केला. मित्रहो, यामध्ये क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा मिळत गेला. इसवी सन १९०७ साली स्टूटगार्ड याठिकाणी पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली होती.

त्यामध्ये, क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने ‘सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.’ अशी घोषणा केली. याशिवाय, ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली.

आणि कारखान्यांतील मालकांकडे स्त्रियांना दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता मिळाली पाहिजे अशा मागण्या देखील केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही स्त्रियांनी जोरकसपणे केली.

अशा प्रकारे, कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन ही महिला अतिशय प्रभावित झाली आणि शेवटी तो आनंदाचा दिवस उजाडला.

इसवी सन १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत दिनांक ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ म्हणून परिषदेने स्वीकारावा; असा जो ठराव क्लाराने मांडला होता, तो पास झाला.

यानंतर मात्र युरोप तसेच, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले. मित्रहो, आपल्या भारत देशात सुद्धा मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला होता.

शिवाय, ८ मार्च १९७१ यादिवशी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात एक मोठा मोर्चा देखील काढण्यात आला होता. काही वर्षांनंतर १९७५ हे वर्ष युनोने ‘जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर, मात्र स्त्रियांच्या अनेक समस्या या ठळकपणे आपल्या  समाजासमोर येत गेल्या. त्याचबरोबर, स्त्रियांच्या कित्येक संघटनांना बळकटी देखील आली.

महिला दिनाचे भाषण – jagtik mahila din bhashan

मित्रहो, आपल्याला माहीतच आहे की बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले; अगदी तशाच पद्धतीने स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. सार्वत्रिक बँका तसेच, अनेक कार्यालयांमधूनही ८ मार्च हा महिलांचा  दिवस मोठ्याने साजरा व्हायला लागला.

आजच्या या एकविसाव्या शतकात जर आपण डोकावून पाहिलं तर, आपल्या लक्षात येईल की आजच्या या विज्ञानाच्या काळात देखील जागतिक महिला दिन हा सर्वत्र खूप उत्साहाने साजरा केला जातो. इसवी सन १९७५ या साली जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने, संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले.

यानुसार, इसवी सन १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता हे हेतू सर्वांनी लक्षात ठेवून साजरा करावा यासाठी आवाहन केले. मित्रहो, याशिवाय काही देशांमध्ये जसे की रोमानिया आणि बल्गेरिया या देशांत हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो.

यादिवशी, सर्व मुलं आपल्या घरातील आईला, बहिणीला आणि आजीला सुंदर भेटवस्तू देतात. इटली या देशामध्ये तर यादिवशी, पुरुष वर्ग  महिलांना पिवळ्या मिमोसासची फुले भेट देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा देतात. खरंतर, महिला दिन हा आपल्या स्त्रीत्वाचा अभिमान बाळगून त्याचा गौरव करण्याचा दिवस आहे.

जागतिक महिला दिन हा महिलांचा दिवस आहे म्हणजे जगाच्या जवळजवळ निम्म्या लोकसंख्येचा दिवस आहे. पण मित्रांनो, केवळ तो निम्म्या लोकसंख्येच्या स्त्रियांचा दिवस आहे असे म्हटल्याने त्याचे महत्त्व आपल्या लक्षात येणार नाही.

कारण, ज्या लोकसंख्येचा हा दिवस आहे ती लोकसंख्या मात्र उपेक्षित लोकसंख्या आहे. पण,  त्यातल्या त्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी की ही लोकसंख्या म्हणजेच स्त्रियांची संख्या, स्त्रियांमध्ये कर्तबगारीची धमक असूनसुध्दा आज उपेक्षित आहे. याला कारण मित्रांनो एकच आहे ते म्हणजे, या महिलांना हा समाज संधीच देत नाही.

त्यामुळे तिची तिच्या आत सूप्त राहिलेली कर्तबगारी ही तशीच अप्रकट राहते. मात्र असा एखादा दिवस नेमला आणि  तिच्या क्षमतांवर आपण विचार केला व तिला तिच्यातील क्षमता सिध्द करून दाखवण्याची संधी दिली, तर ती महिला काय करू शकते हे आपल्या सर्वांच्याच खऱ्या अर्थाने लक्षात येईल.

मित्रहो, देश, समाज, वस्ती अथवा व्यक्ती कोणतीही असो पण वास्तव मात्र हे आहे की परंपरेने, धर्माने, रूढीने आणि समाजाच्या पुरुषप्रधान वागणुकीमुळे आजही निम्मी मानवता अशी उपेक्षित राहिलेली आहे.

तरीदेखील, हा अतिशहाणा मानवप्राणी स्वतःला मात्र कायम प्रगत समजत असतो आणि खरंतर हिच आपणा सर्वांसाठी सगळ्यात मोठी दुर्दैवाची बाब आहे. आपण आपल्या आसपास पाहिल्यावर असे लक्षात येते की महिलांना ज्या ज्या क्षेत्रात संधी मिळाली आहे, त्या त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये महिलांनी स्वतःची प्रगती करून, आपले वेगळेपण या समाजाला सिध्द करून दाखवले आहे.

यावरून, मुलगी ही अधिक परिपक्व असते हे आपल्या  लक्षात येते. शिवाय, मुलींना त्यांच्या घरी अगदी  लहानपणापासूनच आपल्या जीवनाकडे गंभीरपणे बघण्याचे आणि जबाबदारीच्या जाणीवेने वागण्याचे शिक्षण दिलेले असते.

मित्रांनो, आपण जर आपल्या स्वतःच्या घरी पाहील तर आपल्याला जाणून येईल की आपली बहीण किंवा मुलगी ही उद्याची माता असते, म्हणून तिला आपल्या घरचे लोक, “तुझ्या हाती पाळण्याची दोरी आहे, हे विसरू नकोस!” असे वारंवार सांगताना दिसतात.

त्यामुळे, मुलींमध्ये आपल्याला पुढे चालून कुटुंबाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडायची आहे, अशी एक सूक्ष्म जाणीव प्रत्येक मुलीमध्ये असते आणि या जाणीवेमुळेच खरंतर तिच्यामध्ये कोणत्याही क्लासेस शिवाय आपोआपच चांगल्या व्यवस्थापनाचे कौशल्य विकसित झालेले असते.

आजच्या या जगातल्या अनेक उद्योगांमध्ये पुरुष आणि महिलांमधला फरक आपल्यातील अनेक जणांनी अनुभवलेला आहे. महिलांचे व्यवस्थापन  कौशल्य हे पुरुषांपेक्षा सरस असते हे विशेषत्त्वाने पुरुषांनी देखील मान्य केलेले आहे. स्त्री ही सगळ्याच गोष्टींकडे गांभिर्याने पाहत असल्यामुळे, ते गांभिर्य पुढच्या पिढीत उतरवण्याचे दायित्व आपल्यावर आहे याचीही जाणीव तिच्या मनामध्ये सतत जागती असते.

पण मित्रांनो, अशा सगळ्या गुणांनी मंडित असलेल्या महिलांकडे आणि मुलींकडे पुरुष मात्र हीनत्वाच्या भावनेने बघत असतात. खरंतर, पुरुषांचा हा स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन सुधारावा आणि त्यांच्या मनात स्त्री जातीविषयी विश्‍वास निर्माण व्हावा यासाठी आज सार्‍या जगात जागतिक महिला दिन हा पाळला जातो.

मित्रांनो, आपल्या भारत देशात तर अलीकडच्या काळात महिलांचे हे गुण फार प्रकर्षाने जाणवायला लागले आहेत. आपल्या देशामध्ये जेंव्हा दहावी आणि बारावी सारख्या मोक्याच्या परीक्षांचे निकाल जाहीर होतात, तेंव्हा तर मुलींच्या पासाचे प्रमाण हे मुलांच्या प्रमाणापेक्षा कायम जास्त असल्याचे आपल्याला दिसून येते.

शिवाय, अशा अनेक जास्तीत जास्त  परीक्षांमध्ये प्रथम क्रमांक हा मुलींचाच असतो. यावरून आपल्याला एक गोष्ट उमजून येईल की मुलींसारखीच समान परिस्थिती ही मुलांची देखील असते, शिवाय दोघांनाही डोळे जाणारे शिक्षणही समान, परंतु लिंगभेदामुळे येणारे गांभिर्य इतके भिन्न असते की मुली आपल्या घरकामात लक्ष घालूनही, घरातील सगळी कामं करूनही मुलांपेक्षा अधिक गुण मिळवतात.

हे सारे दिसत असूनही समाजातले पुरुष मंडळी मात्र मुलींकडे किंवा महिलांकडे आदराने तर सोडूनच द्या पण, भारतीय कायद्याने सर्वांना घालून दिलेल्या समानतेच्या भावनेनेसुध्दा बघायला तयार नाहीत.

आजही मित्रांनो, खूप मोठ्या प्रमाणावर स्त्री वर्गाकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहिले जाते. एखाद्या मुलाचा जेंव्हा एखाद्या मुलीशी विवाह होतो, तेंव्हा आजवर रूढ असलेल्या पध्दतीनुसार मुलगीच आपल्या आई वडिलांचे घर सोडून त्या मुलाच्या घरी जाते; त्यामुळे, हा प्रवाह उलटा करण्याची हिम्मत अजून तरी कोणत्याही देशात दाखवली गेलेली नाही.

सगळ्या जगात, सगळ्या जातींमध्ये आणि सगळ्या धर्मांमध्ये मुलगी विवाहानंतर मुलाच्या घरी नांदायला जाते. मित्रहो, हा व्यवहार म्हणून आपण मान्य करू, परंतु आपल्या भाषेमध्ये या नातेसंबंधाविषयी बोलताना ‘अमक्याची मुलगी तमक्याच्या मुलाला दिली’, अशी अपमानास्पद भाषा देखील वापरली जाते आणि अशा प्रकारच्या भाषेतूनच भारतीय समाजाची मानसिकता प्रकट होते.

सध्या तर आपल्या भारत देशात मुली सुद्धा मुलांप्रमाणे मोठ्या प्रमाणावर शिकत आहेत आणि भारतात हळूहळू शाळांमध्ये प्रवेश घेण्याचे मुलींचे प्रमाण मुलांच्या बरोबर देखील व्हायला लागले आहे.  

निदान या पातळीवर तरी, मुलीच्या जातीला शिकून करायचेय काय? असा प्रश्‍न विचारण्याचे प्रमाण जवळजवळ शून्य झाले आहे हे आपल्यासाठी चिंतामुक्त आहे. परंतु, या शिक्षणाच्या समान संधीचा अर्थ लोकांच्या मनात मुलीविषयी समानतेची भावना निर्माण झाली आहे असा काढू लागलो तर ती आपली चूक ठरेल हेही तितकेच खरे.

आपल्या समाजामध्ये अस्पृश्यता, रोटी व्यवहार अशा अनेक रूढींचा त्याग केला गेला आहे. परंतु त्या त्यागामागे आपल्या समाजातील लोकांकडे सामाजिक जाणीव आहे असे आपल्याला म्हणता येणार नाही. नाईलाज म्हणून, निरुपाय म्हणून आणि आता गत्यंतरच नाही म्हणून या रूढींचा आपण त्याग केलेला आहे, असे मलातरी याठिकाणी वाटते आणि तीच गोष्ट मुलींच्या शिक्षणाला देखील लागू आहे.

मुलगा आणि मुलगी यांच्याकडे समानतेच्या भावनेतून बघण्याची वृत्ती वाढली म्हणून मुली शाळेत जात आहेत असे नाही. तर मुली  शिकल्याशिवाय मुलींचे लग्न ठरू शकणार नाही या निरुपायापोटीच मुलींना आज शाळेत पाठवले जात आहे. त्यामुळे मुलींचे शिक्षण वाढत असले तरी मुलींकडे समानतेच्या भावनेने बघण्याची प्रवृत्ती आज  वाढली आहे असे आपण कुणीही म्हणू शकत नाही.

तेंव्हा मित्रहो, आपल्या समाजामध्ये मुलींकडे समानतेच्या भावनेने बघण्याची प्रवृत्ती आजच्या या प्रगतशील युगात तरी वाढवली गेली पाहिजे, असे मला वाटते!

मित्रहो, स्त्रियांचे आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे. अनेक क्षेत्रात आपल्याला स्त्रिया या पुरुषांपेक्षा चांगले काम करताना आणि स्वतःसोबत आपल्या घरचे तसेच, देशाचे नाव उंचावतानाही दिसत आहेत. आपल्या समाजात काही प्रमाणात आज महिलांना पुरुषांसमान मान आणि संधी मिळत आहे.

तरीही मित्रांनो, काही ठिकाणी मात्र महिलांना चांगली वागणूक दिली जात नसल्याचे देखील आपल्याला दिसून येते. स्त्रियांना अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचे योग्य अधिकार आणि त्यांचा मान दिला जात नाही. खरंतर, सगळ्या महिलांचा देखील या समाजात समान वागणुकीचा अधिकार आहे. यासाठी महिलांना त्यांच्या अधिकारांची माहिती असायला पाहिजे, समाजात त्यांचा काय अधिकार आहे?

घरात त्यांचा काय अधिकार आहे? शिवाय, कार्यालयात त्यांचा काय अधिकार आहे? इत्यादी. त्यांना कोणता अधिकार कुठे उपयुक्त ठरू शकतो? हे सर्व माहिती असणे खूप  आवश्यक आहे.

दरवर्षी आपण आठ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतो, जेणेकरून या निमित्ताने तरी आपल्यासाठी कष्ट करणाऱ्या स्त्रियांचा  सन्मान होऊ शकेल. पण खरचं, आपण त्यांना योग्य मान आणि अधिकार देतो का? तर नाही. आपण नेहमी त्यांना तुच्छतेने वागवतो.

याचच उदाहरण म्हणजे, आपल्या घरात सुद्ध आपण सर्व मुलं आपल्या वडिलांच्या प्रत्येक आध्यांचे पालन करतो, आपल्या वडिलांना आपण कधीही उलटून बोलत नाही. मात्र, आईने आपल्याला काही सांगितलं, तर तिची एकही गोष्ट आपण ऐकत नाही. उलट आपण तिच्यावर स्वतःचे हक्क गाजवतो.

शिवाय आपल्यासोबत, घरातील इतर सगळेजण सुद्धा आपला राग तिच्यावरच काढतात. घरातील या स्त्री देवतेला समजावून घेण्याचा, तिला काय हवंय नको बघण्याचा, तिच्या मतांचा मात्र कुणीही विचार करत नाही. तर, हे मित्रांनो कुठंतरी चुकीचं आहे.

आपण जरी आपल्या आईवर हक्क गाजवत असलो तरी तिलाही मन आहे याची जाणीव सुद्धा आपल्या मनात कुठंतरी असली पाहिजेत. अशा प्रकारे, आपण सर्वांनी स्वतःच्या घरातूनच स्त्रियांना आदर द्यायला सुरुवात केली पाहिजेत.

मित्रहो, आपल्या समाजामध्ये दोन बाजू आहेत. एकीकडे मंदिरातील स्त्रिरुपी देवीच्या मूर्तीवर आपण भरजरी शालू चढवतो आणि दुसरीकडे मात्र भरचौकात त्याचं स्त्रीची आबरू लुटतो. एकीकडे आपण या स्त्रिरुपी देवीच्या मूर्तीवर दुधाचा अभिषेक घालतो आणि दुसरीकडे याच स्त्रीवर पेट्रोल, रॉकेल ओतून जाळून टाकतो.

एकीकडे आपण तिच्या पायावर नतमस्तक होतो,तर दुसरीकडे त्याचं स्त्रीला लाथा मारून, आपण तिचा अपमान करतो. स्त्री ही देवतेचे रुप आहे. अस म्हटलं जातं की देवाला प्रत्येकाजवळ, प्रत्येकासोबत राहणं शक्य नव्हतं म्हणून त्यानं आई ही संकल्पना तयार केली, ती आई म्हणजे स्त्रीचं ना!

गावच्या शेजारी नदी असणं हे जस गावच्या विकासाच प्रतीक आहे. तसच, घरात मुलगी असणं हे सुख – समृद्धीच, आनंदाचं, भरभराटीच आणि नाविण्याच प्रतीक आहे.

महिला दिन विशेष मराठी कविता   

लई झाल्या लेकी, नको म्हणू बापा

उडूनिया जाईल तुझ्या जीवनाचा थापा ||||

अहो, कशाला करता मुलाचा अट्टाहास

मुलगीच भरवेल ना सोन्याचा घास ||||

आज आपल्या समाजात शंभर टक्के मुलांपैकी, दहा टक्के मुल अशी असतील जी आई-वडिलांची काळजी करतात, त्यांचा सांभाळ करतात, त्यांची सेवा करतात पण, बाकीच्या मुलांचं काय? जे आपल्या आई-वडिलांची साधी विचारपूसही करत नाहीत. तसही, आता पूर्वीचे श्रावणबाळ राहिलेतच किती?

त्यांच्या आई-वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की हे दृष्य जाणवत देखील. पण, एक मुलगी, एक स्त्री जी नेहमी तुमच्यासोबत असते, आई-वडिलांची सेवा करते, ते  आजारी असतील तर रात्रंदिवस जागरण करते. मग, इतकं असताना देखील स्त्रीभ्रूणहत्या थांबत का नाहीय? का तिच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो? का आजही तिला शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं? 

पण, जर ही मुलींची हत्या अशीच चालू राहिली तर, तुमच्या मुलांसाठी मुली आणयच्याच कुठून हा यक्षप्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. आज आपण म्हटलं, मुलींचं प्रमाण कमी होत चाललंय. तर, आपला हा समाज लगेच म्हणेल मग मुलांचं कस होणार? त्यांच्याशी लग्न कोण करणार? त्यांचा संसार कोण थाटनार? म्हणजे, या मुलांचं लग्न व्हावं, त्यांचा संसार व्हावा यासाठी आपल्याला मुली वाचवायच्या आहेत! मुळीच नाही.

त्या कशा सुरक्षित राहतील? कशी त्यांना  सन्मानाची वागणूक मिळेल?  यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. आज महिलांना आरक्षण तर हवच पण, सगळ्यात महत्वाचं आहे ते संरक्षण. चला तर मित्रांनो, या महिला दिनानिमित्त आज याठिकाणी आयोजित केलेल्या  कार्यक्रमात आपण सर्वांनी सर्व महिलांना आदर, मान देण्याचा निश्चय करूया आणि त्यांच्या प्रगतीसाठी त्यांना प्रोत्साहित करून त्यांचा संरक्षणासाठी प्रयत्न देखील करूयात!

                   –  तेजल तानाजी पाटील

                         बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या women’s day speech in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “जागतिक महिला दिन भाषण” speech on women’s day in marathi विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mahila din speech in marathi language या marathi bhasha din speech in marathi article मध्ये upadate करू, मित्रांनो हि 8 march women’s day speech in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर international women’s day speech in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!