प्रजासत्ताक दिन भाषण 2024 26 January Speech in Marathi

26 January Speech in Marathi 2022 – Republic Day Speech in Marathi प्रजासत्ताक दिन भाषण 26 January Marathi Bhashan खरंतर, आपल्या भारत देशातील भारत या शब्दामधील ‘भा’ म्हणजे तेज आणि ‘रत’ म्हणजे रममाण झालेला, अशा प्रकारे तेजामध्ये रममाण झालेला देश म्हणजे भारत देश. असा सुंदर आणि परिपूर्ण अर्थ आपल्या भारत देशाला मिळाला आहे. आपल्या भारत देशामध्ये तीन सण हे राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात. त्यातील सगळ्यात पहिला सण म्हणजे ‘२६ जानेवारी’, जो दिवस भारतामध्ये प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. दुसरा सण म्हणजे ‘१५ ऑगस्ट‘, या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला होता आणि आपले भारतीय इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाले होते.

” उत्सव तीन रंगांचा,

आभाळी आज सजला.

नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,

ज्यांनी भारत देश घडविला. “

त्यामुळे, हा दिवस भारतात सगळीकडे स्वतंत्रता दिवस म्हणून साजरा करतात. आता, आपल्या देशातील तिसरा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण सण म्हणजे ‘गांधी जयंती’. या पवित्र दिवशी आपल्या भारताच्या पितामहाचा जन्म झाला होता.

 26 january speech in marathi
26 january speech in marathi

प्रजासत्ताक दिन भाषण – 26 January Speech in Marathi

Republic Day Speech in Marathi

महात्मा गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप हालअपेष्टा सोसल्या होत्या. शिवाय त्यांनी अनेक गोष्टींचा त्याग देखील केला होता. त्यामुळे, संपूर्ण भारत देश महात्मा गांधीजींच्या कार्याच्या आणि त्यागाच्या स्मरणार्थ त्यांचा जन्म दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतात. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य तर मिळाले होते.

परंतू, स्वतंत्र भारताला स्वतःचे असे संविधान नव्हते. त्यामुळे, भारताचे संविधान तयार करण्यासाठी २८ ऑगस्ट १९४७ रोजी एक समिती नेमण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली.

त्यानंतर, २६ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाला, संविधान समितीने मान्यता दिली आणि शेवटी २६ जानेवारी १९५० रोजी आपले भारतीय संविधान अमलात आणण्यात आले. म्हणूनच २६ जानेवारीला ‘प्रजासत्ताक दिन‘ साजरा केला जातो.

प्रजासत्ताक दिनाला ‘गणराज्य दिन’ असेही म्हटले जाते. आपले भारत राष्ट्र एक आदर्श लोकशाही राष्ट्र आहे. लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले स्वतंत्र राज्य होय. त्यामुळे, आपला भारत देश चालविण्याचा अधिकार आपल्या भारतीय जनतेला भारताच्या संविधान घटनेनुसार याच दिवशी देण्यात आला आणि या दिवसापासून प्रजेची सत्ता स्थापन झाली.

प्रजासत्ताक दिवस, स्वातंत्र्य दिवस हे असे उत्सव आहेत की जे आपल्या महान नेत्यांच्या, विचारवंतांच्या आणि क्रांतिकारकांच्या बलिदानाविषयी आणि त्यांनी केलेल्या पराकोटीच्या त्यागाबद्दल आपल्याला जाणीव करून देतात.

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिशांच्या हालअपेष्टा सोसल्या, इंग्रजांच्या गुलामीतून भारताला बाहेर काढण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध दीर्घकालीन लढा चालू ठेवला.

आज आपण आपल्या भारत देशात आनंदाने राहतोय हे फक्त यांच्यामुळे, त्यामुळे ही गोष्ट आपण कधीही विसरता कामा नये. खरंतर याच गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी आपले भारतीय राष्ट्रिय सण साजरे केले जातात. जे आपल्या थोर क्रांतीकारकांच्या बलिदानाविषयी आपल्या भारतीयांना आठवण करून देतात.

२६ जानेवारी यादिवशी भारतातील सर्व राज्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये तसेच प्रत्येक गावागावांमध्ये ध्वजारोहण होते. ठिकठिकाणी भाषणे, अनेक कार्यक्रमांची प्रदर्शने, उत्सव यांचे आयोजन केले जाते. शाळांना, महाविद्यालयांना, सरकारी इमारतींना तोरण पताका लावून सजवले जाते.

शाळांमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एकत्रितपणे गावामध्ये प्रभातफेरी काढून गावातील लोकांना या सुवर्ण दिवसाचे महत्त्व समजून सांगतात. शिवाय, सर्व विद्यार्थी भारत मातेच्या नावाचा जयघोष देखील करतात. यादिवशी संपूर्ण देशभर आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते.

पण मित्रांनो, फक्त मोठमोठ्याने भारत मातेच्या घोषणा दिल्या, उत्साहाने हा सण साजरा केला म्हणजे आपले देशाबद्दलचे कर्तव्य संपले का? तर नाही. भारत देशाचे नागरिक म्हणून आपण देशाच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आजच्या काळामध्ये भ्रष्टाचार, गरिबी, अस्वच्छता अशा अनेक गोष्टी देशाच्या प्रगतीच्या आड येत आहेत.

भारतातील अशा अनेक समस्या सोडविण्यासाठी आपण भारत सरकारला त्याच्या कार्यात हातभार लावला पाहिजेत. प्रत्येक देशाचे सरकार त्या त्या देशाच्या उन्नतीसाठी अनेक योजना राबवत असत पण, त्या योजना आपण नागरिकांनी यशस्वी बनवल्या पाहिजेत. आपण सर्वांनी देश हितकारक काम करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजेत आणि भारत देशाला समृद्ध देखील करता आले पाहिजे.

आपले हेच कार्य म्हणजे आपली देशासाठीची खरी मानवंदना असेल, हे खरे! त्यामुळे, आपण भारतीयांनी देशाच्या विकासाचे कार्य हाती घेतले पाहिजेत.

रक्ताने लिहिला आहे,

भारत देशाचा इतिहास.

हसत हसत स्वीकारले,

कित्येकांनी मृत्यूचे ते फास! “

आपल्या भारत देशाला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. आपल्या भारतमातेच्या स्वातंत्र्यात, भारताचा स्वातंत्र्यलढा आणि या स्वातंत्र्यलढ्यातील महात्मा गांधी यांचा मोलाचा वाटा होता. याशिवाय, महात्मा गांधीजींच्या अहिंसा पद्धतीचा खूप मोठा फायदा भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात झाला.

मात्र त्यावेळी स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसूदा समिती स्थापना केली गेली. 

या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून ४ नोव्हेंबर १९४७ रोजी भर सभेपुढे सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष, ११ महिने आणि १८ दिवसाच्या कालावधीनंतर मसुदा समितीने हा मसुदा अंतिम केला.

यावेळी सभेमध्ये संविधानाशी संबंधित बरेचसे विचारविमर्श झाले आणि संविधानात काही वाक्यांमध्ये सुधारणा करने गरजेचे असल्याचे दर्शवले. यानंतर समितीच्या ३०८ सदस्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या.

दोन दिवसानंतर भारताचे हे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले आणि अखेर भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा २६ जानेवारी यादिवशी साजरा करण्यात येऊ लागला. दरवर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत म्हणजेच नवी दिल्ली येथे भारतातील सर्वात मोठे संचलन आयोजित केले जाते.

हे संचलन रायसीना हिलपासून ते राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे केले जाते. संचलनाच्या अगोदरच्या दिवशी अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक  अमर जवान ज्योती येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. तसेच, भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना येथेच श्रद्धांजली वाहण्यात येते.

त्यानंतर आपल्या भारत देशाचे पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेट देतात. त्याचवेळी प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे देखील आगमन होते. थोड्या वेळाने आपल्या देशाचे राष्ट्रगीत सुरु होते आणि आपल्या देशाचे राष्ट्रपती ध्वजारोहण करतात.

ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थित असलेल्या एकवीस तोफांची तिरंगी झेंड्याला सलामी दिली जाते. त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनावरून या संचलनात सहभागी होतात.

प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना देखील यादिवशी निमंत्रण दिले जाते. भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत क्षेपणास्त्रे जसे की पृथ्वी, अग्नी यांचे रणगाडे समवेत संचलन करतात. यावेळी, आपल्या भारताचे राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात.

२६ जानेवारी हा राष्ट्रीय समारंभ असल्यामुळे, यादिवशी सर्वांना सार्वजनिक सुट्टी असते. २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. आपला प्रजासत्ताक दिवस हा भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक आहे.

यादिवशी संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक सुद्धा प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात. यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा देखील चित्ररथही असतो. या चित्ररथांच्या सादरीकरणाची विशेष पूर्वतयारी सर्व राज्यांचे कलाकार काही दिवस आधी करतात.

या चित्ररथ सादरीकरणाला विशेष पारितोषिक दिले जात असल्याने, प्रत्येक राज्य आपापल्या संस्कृतीचे दर्शन अधिक चांगल्या पद्धतीने चित्ररथात दिसून येईल यासाठी प्रयत्न करत असते.

स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत १९५० साली राजधानी दिल्ली येथे राजपथावर पहिले संचलन आयोजित करण्यात आले होते. खरंतर, भारताच्या विविधतेतून एकता या वैशिष्ट्याला ही मानवंदना होती. २०१६ साली ६७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या शिष्ट समितीतर्फे मरीन ड्राइव्ह येथेही एक संचलन आयोजित करण्यात आले होते.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी देशभक्तीपर गीतांच्या ओळी, तिरंंगा ध्वज आदि संंकल्पनांचा कल्पक वापर करून भारतभर परस्परांना शुभेच्छा दिल्या जातात. देशाभिमान मनात टिकून राहण्यासाठी भारतीय नागरिक अशा शुभेच्छा एकमेकांना देऊन परस्परांमधले ऐक्य टिकवून ठेवण्याचे आवाहनही करतात.

इसवी सन १९५० पासून आपल्या भारत देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दुसऱ्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला भारतात आमंत्रित केले जाते. आता हा प्रजासत्ताक दिन भारताच्या मुख्य ठिकाणी कसा साजरा करतात ते आपण पाहिलं. पण मित्रांनो, आपल्या गावांकडे ही आपल्या प्रिय देशाचा गणतंत्र दिवस खूप उत्साहाने साजरा केला जातो.

गावाकडच्या आपल्या मराठी शाळांना तोरणे-पताका तसेच, आपले तिरंगी ध्वज सगळीकडे लावले जातात. लहानमोठी मुले तीरंगी ध्वज मोठ्या उत्साहाने हातात घेऊन भारत मातेचा जयघोष करीत प्रभात फेरीत भाग घेतात. सर्व विद्यार्थी, अध्यापक, मुख्याध्यापक तसेच गावातील लोक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले जाते.

शाळेतील एन. सी. सी. आणि स्काउटचे शाळेतील विद्यार्थी सुंदर संचलन करतात. शाळेतील वाद्य – वृंदावरही राष्ट्रीय गाणी वाजविली जातात. तसेच, मुले आणि मुली आपापल्या आवडीची राष्ट्रगीते गातात. अनेक विद्यार्थी प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत देशावर भाषणे देखील करतात. नंतर सर्वजण राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतात आणि अखेर सर्वांना खायला गोड काहीतरी वाटलं जात. या कार्यक्रमाच्या मध्यामध्ये मुख्याध्यापकाकडून गुणी विध्यार्थ्यांचे कौतुक होते आणि त्यांना सन्मान पत्रे दिली जातात.

२६ जानेवारी या दिवशी संपूर्ण देशभर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसून येते. पण मित्रहो, निव्वळ उत्साहात दिवस साजरा केल्याने आपले भारत देशाबद्दलचे कर्तव्य संपत नाही. खरंतर, हा प्रतीज्ञेचा दिवस! लोकशाहीच्या उदघोषाचा दिवस! प्रत्येक भारतीयाने या महत्वाच्या दिवशी देशासाठी काहीतरी चांगले कार्य करण्याची प्रतिज्ञा केलीच पाहिजे आणि त्यानुसार वागले पाहिजे.

आपण सर्वांनी असे राष्ट्रीय दिन साजरे केल्यामुळे प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रीय भावना, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्ती अधिक उसळून आणि उजळून निघते. २६ जानेवारी यादिवशी आपण प्रजासत्ताक दिन मोठ्या हर्षोल्हासाने साजरा करी‍त असतो. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांना आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागले तर काहींना घरदार सोडावे लागले होते.

एवढेच नाही तर आज बॉर्डरवर आपले सैनिक डोळ्यात तेल घालून अहोरात्र जागून, भारत देशाचे आपल्या शत्रूपासून संरक्षण करीत आहेत. म्हणूनच तर आपण आपल्या आलिशान घरांमध्ये स्वस्थ आहोत.

मात्र गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशाचे मानचिन्ह म्हणजेच ‘तिरंगा’ झेंड्याची अवहेलना होत असल्याचे आपल्याला दिसत आहे. आपल्या भारतीय राज्यघटनेने स्वातंत्र्यदिनी, प्रजासत्ताकदिनी आपापल्या घरावर राष्ट्रध्वज फडकावण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक भारतीयाला दिले आहे. यादिवशी मोठ्या अभिमानाने सर्वजण ‘कागदी’ किंवा ‘प्लास्टिक’ यांचे राष्ट्रध्वज , बिल्ले आणि स्टीकर मिरवत असतात.

मात्र हेच ध्वज दुसर्‍या दिवशी कचरा कुंडी आणि गटारींमध्ये आपल्याला फाटलेल्या अवस्थेत दिसतात. आपले भारतीयच देशाच्या स्वातंत्र्याचे ध्वज पायाने तुडवत असतात, मात्र ते उचलून त्याची योग्य ती विल्हेवाट कुणीही लावत नाही. राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर करता येणार नाही, या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशाला लाथाळून सर्रासपणे असे ध्वज तयार केले जातात.

भारतीय जनता आपल्या मुलांना त्या ध्वजाचे महत्त्व न सांगता त्यांना खुशाल असे प्लास्टिकचे ध्वज खरेदी करून देत असते. मुले तर मुलेच ना, त्यांना या ध्वजाचे महत्त्व माहित नसल्याने त्यांच्याकडून अशा चुका तर होणारच. परंतु पालकांनी सजगता दाखवून अशा प्रकारचे प्लास्टिकचे ध्वज खरेदी करू नयेत आणि ते मुलांनाही देऊ नयेत.

तरच त्याच्या उत्पादनाला आपोआप खिळ बसेल. दुसरीकडे आपण जर डोकावून पाहिलं, आपल्या लक्षात येईल की क्रिकेट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांकडूनही आपल्या ध्वजाची अवहेलना केली जाते. त्यांना तोंड व परिधान केलेल्या कपड्यावर तिरंगा रंगवून घेतांना काहीच कसे वाटत नाही! याचे तर मला खूप आश्चर्य वाटते.

मला याठिकाणी भारतीयांनाच विचारायचे आहे की हे कितपत योग्य आहे. ध्वजाला कपड्यावर नाही तर मनावर स्थान पाहिजे आणि ते नेहमी आपल्या कर्तृत्त्वातून जाणवत असते. शासनाने प्लास्टिकचे ध्वज तयार करणारे उद्योग बंद पाडून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. तरच भारतभर होणाऱ्या आपल्या तिरंगी झेंड्याचा अपमान कुठंतरी आटोक्यात येईल. शिवाय, अस्वच्छता ही समस्या आपल्या देशासमोर उद्भवणार नाही आणि प्लास्टिक निर्मूलन देखील यासोबतच आपल्याला करता येईल.

“आम्ही स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक या भारताचे संरक्षक आहोत !” असे आपण गर्वाने सगळयांना सांगितले पाहिजेत. आपल्या प्रजासत्ताक दिनाला इंग्रजीमध्ये ‘रिपब्लिक डे’ म्हणून ओळखले जाते. यातील रिपब्लिक म्हणजे काय हे आपण सर्वांनी अगदी मनापासून समजून घेतले पाहिजेत.

याचा अर्थ असा होतो की आपल्या भारत देशातील लोकांना त्यांचा राजकीय नेता निवडण्याचा अधिकार आहे. भारतीय नागरिक त्यांच्या मर्जीने देशाची सेवा करणारा नेता निवडू शकतात. यालाच दुसऱ्या शब्दात लोकशाही असेही म्हटले जाते. खरंतर, भारताच्या महान स्वातंत्र्य सैनिकांनी केवळ परिश्रम व संघर्षातूनच भारताला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे.

त्यांनी आपल्यासाठी बरेच काही केले, याचा परिणाम असा आहे की आज आपण आपल्या भारत देशात आरामात राहत आहोत. आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी  महात्मा गांधी, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, लाला लजपत राय, सरदार वल्लभभाई पटेल, लाल बहादुर शास्त्री यांच्याप्रमाणे अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी देखील बलिदान दिले होते.

आजही त्यांच्या महान कृत्यांसाठी त्यांचे नाव आपल्या भारताच्या इतिहासात लिहिलेले आहे. त्यांच्या आदर्शातून आपल्या भारतीयांना देशासाठी कार्य करण्याची स्फूर्ती मिळते. याशिवाय, आजही देशातील मुलांना त्यांचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील पराक्रम शाळांमधून शिकवला जातो आणि त्यांच्यासारखे त्यांना शूर व्हायचे आहे, असे सांगून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली जाते.

बर्‍याच वर्षांपासून या महान लोकांनी ब्रिटीश सरकारचा सामना केला आणि आपल्या देशाला त्यांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. त्यांचा हा त्याग भारतीय लोक कधीही विसरू शकत नाहीत. त्यांच्यामुळेच आज आपण आपल्या देशात मुक्तपणे श्वास घेत आहोत. परंतु मित्रांनो, भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही आज आपण गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि हिंसाचाराच्या समस्यांशी लढत आहोत.

खरंतर ही गोष्ट आपल्या सर्वांसाठीच लाजिरवाणी बाब आहे. आता वेळ आली आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन या वाईट गोष्टी आपल्या देशातून काढून टाकाव्यात, जसे स्वातंत्र्यसेनानी नेत्यांनी इंग्रजांना आमच्या देशातून हाकलून लावले होते. आपण आपल्या भारत देशाला यशस्वी, विकसित व स्वच्छ देश बनवले पाहिजे.

त्याचबरोबर आपल्या देशातील दारिद्र्य, बेरोजगारी, निरक्षरता, ग्लोबल वार्मिंग आणि असमानता इत्यादी समस्या समजून घेणे व सोडवणे ही आवश्यक आहे.चला तर मित्रांनो, २६ जानेवारी या पवित्र प्रजासत्ताक दिनी आपण सर्वांना तारण देऊया, आपण सर्वजण बापूंचे आदर्श स्वीकारून नवीन समाज निर्माण करूया, जातीधर्म यांवरून आपापसात भेदभाव निर्माण न करता सगळ्यांवर प्रेम करूया आणि आपल्या सैनिकांचे बलिदान व्यर्थ न जाऊ देता आपण भारत मातेच्या रक्षणासाठी सज्ज होऊया.

जय हिंद ! जय भारत !

– तेजल तानाजी पाटील

बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या 26 january speech in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “प्रजासत्ताक दिन भाषण 2022” republic day speech in marathi विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या 26 january bhashan marathi या 26 january speech in marathi for small child article मध्ये upadate करू, मित्रांनो हि 26 january 2022 speech in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण 26 january speech in marathi language या लेखाचा वापर 26 january speech in marathi 2022 असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “प्रजासत्ताक दिन भाषण 2024 26 January Speech in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!