भाऊबीज माहिती मराठी Bhaubeej Information in Marathi

bhaubeej information in marathi भाऊबीज माहिती मराठी, भारत हा देश संस्कृती प्रधान देश आहे आणि आपल्या देशामध्ये आपली संस्कृती जपण्यासाठी किंवा देशातील लोकांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी किंवा लोकांना त्यांच्या रोजच्या कामातून काही वेगळेपणा म्हणून भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात. भारतामध्ये दिवाळी, गणेश चतुर्थी, दसरा, मकर संक्रांति, लोहरी, नाग पंचमी, पोंगल, बैल पोळा, होळी, रंगपंचमी, गुढी पाडवा यासारखे अनेक छोटे मोठे सण साजरे केले जातात आणि भारतामध्ये अनेक राष्ट्रीय सण देखील साजरे केले जातात जसे कि स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट), प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी), शिक्षक दिन, महिला दिन आणि बालदिन यासारखे अनेक राष्ट्रीय सन देखील साजरे केले जातात.

तसेच भाऊबीज हा दिवस देखील सणाचा एक भाग आहे आणि भाऊबीज हा सण दिवाळीमध्ये दिवाळीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी साजरा केला जातो आणि आज आपण या लेखामध्ये भाऊबीज विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत.

bhaubeej information in marathi
bhaubeej information in marathi

भाऊबीज माहिती मराठी – Bhaubeej Information in Marathi

भाऊबीज या दिवसाविषयी माहिती – information about bhaubeej in marathi

दिवाळी या सणाला दिव्यांचा सन म्हंटले जाते त्यामुळे दिवाळी या सणाला आपल्याला सगळीकडे दिव्यांची रोशनाई दिसते तसेच दिवाळी या सणामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या मोठ मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात तसेच वेगवेगळ्या प्रकारचा फराळ बनवला जातो तसेच दिवाळी मध्ये गायीचे पूजन केले जाते, लक्ष्मी कुबेर पूजन केले जाते तसेच दिवाळी पाडवा आणि भाऊबीज असे दिवस साजरे केले जातात आणि फटके देखील उडवले जातात आणि दिवाळी दोन ते तीन दिवस खूप उत्साहाने साजरी केली जाते.

भाऊबीज या सणाला बहिण भावाचा सण म्हणून ओळखले जाते आणि हा दिवस कार्तिक शुध्द द्वितीया मध्ये असतो. भाऊबीज दिवशी बहिण भावाला ओवाळते आणि भाऊ ओवाळणी देऊन बहिनाचा सत्कार करतो. भाऊबीज हा सन भारतामध्ये वेगवगळ्या प्रकारे साजरा केला आणि हा दिवश भारतामध्ये खूप आनंदाने साजरा केला जातो आणि या सणामुळे भावाला बहिणीचे आणि बहिणीला भावाचे महत्व समजते आणि हा दिवस रक्षाबंधन इतकाच महत्वाचा सण आहे.

भाऊबीज दिवशी बहिण भावाला तेलाची मालिश करून अंघोळ घालते तसेच नंतर भावाला ओवाळते आणि आणि भाऊ तिला ओवाळणी किंवा मग काही तरी भेट वस्तू देतो आणि अश्या प्रकारे आनंदाने हा दिवस साजरा केला जातो. असे म्हटले जाते कि हा सण भावाच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी साजरा केला जातो.

भाऊबीज विषयाची कथा – story 

हा दिवस हा यम आणि त्यांची बहिण यमुना म्हणजेच भाऊ-बहिणीचा प्रेमाबद्दल साजरा केला जातो. या दिवशी यमदेव हे आपल्या बहिणीच्या घरी गेले होते आणि त्यांनी त्यांच्या बहिनेने म्हणजेच यमुनाणे ओवाळले होते तसेच यमदेवांच्यासाठी जेवण देखील बनवले होते. यमाने या दिवशी बहिनेने ओवळल्यानंतर वस्त्र, अलंकार आणि इतर भेट वस्तू दिल्या होत्या आणि म्हणून हा दिवस भाऊबीज म्हणून साजरा केला जातो. असे म्हणतात कि या दिवशी नदीमध्ये अंघोळ करणे अत्यंत पवित्र मानले जाते आणि असे देखील म्हटले जाते कि पुढच्या संपूर्ण वर्षामध्ये यमाचे भय नसते.

भाऊबीज सणाचे महत्व – importance of bhaubeej festival in marathi

भाऊबीज या सणाला बहिण भावाचा सण म्हणून ओळखले जाते आणि हा दिवस कार्तिक शुध्द द्वितीया मध्ये असतो आणि भाऊबीज दिवशी बहिण भावाला ओवाळते आणि भाऊ तिला काही तरी भेटवस्तू देतो. परंतु जरी हा बहिण भावाचा सण असला तरी या सणाचे काहीतरी महत्व आहे ते आता आपण खाली पाहूया.

  • भाऊबीज हा दिवस साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे एकमेकांच्या मनातील द्वेष निघून जावा आणि आणि सर्वांच्या मनामध्ये बधुत्व निर्माण व्हावे .
  • भाऊबीज हा भाऊ आणि बहिणीचा सण आहे आणि या सणामध्ये भाऊ बहिणेचे नाते चांगले व्हावे आणि नात्यांच्यामधील काही दुरावे असतील तर ते दूर व्हावेत या साठी हा सन साजरा केला जातो.
  • भाऊबीज दिवशी बहिण भावाला ओवाळते आणि भाऊ ओवाळणी देऊन बहिनाचा सत्कार करतो.
  • भाऊबीज या सणादिवशी सर्व बहिणी आपल्या भावाच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करतात.
  • या सणाच्या मार्फत भाऊ आणि बहिण यांच्या प्रेमाचे महत्व सांगण्यासाठी साजरा केला जाणारा सण आहे.
  • हा दिवस हा यम आणि त्यांची बहिण यमुना म्हणजेच भाऊ-बहिणीचा प्रेमाबद्दल साजरा केला जातो.
  • असे म्हणतात कि या दिवशी बहिणीच्या सानिध्यात राहिल्याने तसेच तिने बनवलेले खाल्ल्याने आणि तिच्या कडून ओवाळून घेतल्याने भावाला व्यवहारिक आणि अध्यात्मिक लाभ होतात.

भाऊबीज सण कसा साजरा केला जातो ?

भाऊबीज दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जातो आणि त्यावेळी बहिणीने अनेक दिवाळीचे फराळी पदार्थ तर बनवलेले असतेच परंतु तिने आपल्या भावाला आवडणारे जेवण देखील बनवलेले असते. संध्याकाळी बहिण प्रथम आरतीचे ताट सजवून घेते जसे कि त्यामध्ये दोन आरत्या लावते, हळदी कुंकवाच्या वाट्या ठेवते, अक्षताची वाटी ठेवते, पानाचा विडा आणि फुल ठेऊन ताट सजवते आणि मग भावाला बसायला पाट ठेवते त्याभोवती थोडी रांगोळी काढते .

आणि मग प्रथम चंद्राला ओवाळते आणि मग पाटावर बसवून भावाला ओवाळते आणि मग तिने बनवलेले भावाच्या आवडीचे पदार्थ आणि गोडधोड पदार्थ भावाला वाढते अश्या प्रकारे भाऊबीज हा सन आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. भाऊबीज हा सन दिवाळीचा शेवटचा दिवस असतो आणि हा सन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

आम्ही दिलेल्या bhaubeej information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर भाऊबीज माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about bhaubeej in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि bhaubeej festival information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!