भोगीची भाजी रेसिपी Bhogichi Bhaji Recipe in Marathi

Bhogichi Bhaji Recipe in Marathi भोगीची भाजी रेसिपी मराठी भोगीची भाजी हा एक भारतीय प्रकार आहे आणि हा भारतामध्ये खेडेगावामध्ये मकर संक्रांतीच्या सणामध्ये नैवैद्यामध्ये बनवली जाते. मकर संक्रांतीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवतो जसे कि भरलेली वांगी, मेथीची भाजी, कोरट्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी, भाकरी, पांढरा भात, राळ्याचा भात यासारखे वेगवेगळे प्रकार बनवले जातात आणि त्यामधील एक महत्वाचा नैवैद्याचा पदार्थ म्हणजे भोगीची भाजी. आपली भारतीय संस्कृती मध्ये वेगवेगळ्या सणाला वेगवेगळ्या पदार्थाचा नैवैद्य दाखवणे विशेष असते जसे किं गणपतीच्या सणामध्ये खीर आणि मोदक बनवले जातात.

तर दिवाळीच्या सणाला चकली, चिवडा, लाडू, करंज्या, भाकरवडी असा फराळाचा नैवैद्य दाखवला जात होता तर काही इतर सणांना पुरण पोळीचा तर नैवैद्य हमखास ठरलेला असतो तसेच संक्रांतीमध्ये भोगी दिवशी हि भोगीची भाजी बनवली जाते आणि हि भोगीची भाजी वांगी, वरण्याचे दाने, गाजर आणि वाटाण्याचे दाने ( मटार ) या सर्व भाज्यांना एकत्रित फोडणी देवून बनवली जाते.

भोगीची भाजी हि घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि खूप कमी साहित्यामध्ये अगदी उत्तम बनते. आज आपण या लेखामध्ये संक्रांतीमध्ये बनवली जाणारी भोगीची भाजी कशी बनवली जाते ते पाहूयात.

bhogichi bhaji recipe in marathi
bhogichi bhaji recipe in marathi

भोगीची भाजी रेसिपी – Bhogichi Bhaji Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

भोगीची भाजी म्हणजे काय ?

भोगीची भाजी हा एक भारतीय प्रकार आहे आणि हा भारतामध्ये खेडेगावामध्ये मकर संक्रांतीच्या सणामध्ये नैवैद्यामध्ये बनवली जाते. भोगीची भाजी वांगी, वरण्याचे दाने, गाजर आणि वाटाण्याचे दाने ( मटार ) या सर्व भाज्यांना एकत्रित फोडणी देवून बनवली जाते.

भोगीची भाजी बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients 

  • वरणा : वरणा हि एक प्रकारची शेंग आहे जी डिसेंबर – जानेवारी मध्ये वेलीला लागते आणि जी शेंग चवीला खूप छान असते आणि हा घटक भोगीची भाजी बनवण्यासाठी लागणारा एक मुख्य घटक आहे.
  • इतर भाज्या : भोगीची भाजी बनवण्यासाठी इतर भाज्या जसे कि वांगी, गाजर आणि मटार देखील महत्वाचे असतात. आपण या सर्व भाज्या मिक्स करून भोगीची भाजी बनवली जाते.

भोगीची भाजी रेसिपी – bhogichi bhaji recipe

भारतीय संस्कृतीमध्ये कोणत्या ना कोणत्या सणाला काहीतरी पदार्थ बनवण्याची खासियत असते तसेच भारतामध्ये संक्रांतीच्या सणामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवले जातात त्यामधील एक नैवैद्य दाखवण्यासाठी बनवलेला पदार्थ म्हणजे भोगीची भाजी हि आपण मिक्स भाज्यांच्यापासून बनवली जाते. भोगीची भाजी बनवले खूप सोपे आहे आणि हि भाजी मोजक्याच साहित्यामध्ये झटपट बनते. चला तर मग भोगीची भाजी कशी बनवली जाते आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

भोगीची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make bhogichi bhaji 

भोगीची भाजी बनवताना घरामध्ये पूर्वीपासूनच वांगी असण्याची शक्यता असते परंतु वरणा, मटार आणि गाजर हे बाजारातून विकत आणावे लागते. चला तर मग आपण आता भोगीची भाजी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • १ मध्यम आकाराच वांग.
  • अर्धी वाटी सोललेले मटार.
  • अर्धी वाटी सोललेला ताजा वरणा.
  • अर्धी वाटी भिजवलेले शेंगदाणे.
  • २ ते ३ ताजे गाजर.
  • २ चमचे शेंगदाण्याचा कुट.
  • ३ चमचे वाटलेले खोबरे आणि कोथिंबीर.
  • १ मध्यम आकाराचा कांदा ( बारीक चिरलेला ).
  • १/२ चमचा मोहरी.
  • दीड चमचा लाल मिरची पावडर.
  • १/४ चमचा हळद.
  • १ मोठा चमचा तेल.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • साखर ( चवीनुसार ).
  • पाणी ( आवश्यकतेनुसार ).
  • कोथिंबीर ( बारीक चिरलेली ).

भोगीची भाजी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make bhogichi bhaji 

आता आपण वरती दिलेले साहित्य वापरून भोगीची भाजी कसी बनवायची ते पाहूयात.

  • सर्वप्रथम वांगी आणि गाजर चौकोनी आकारामध्ये चिरून घ्या आणि ते एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये वरण्याचे दाने, मटार देखील मिक्स करा आणि त्यामध्ये पाणी घालून ते स्वच्छ धुवून घ्या आणि त्यामधील पाणी काढून ते बाजूला ठेवा.
  • मग भाजी बनवण्यासाठी लागणारा शेंगदाण्याचा कुट आणि खोबरे – कोथिंबीर वाटून घ्या आणि ते बाजूला ठेवा.
  • आता एक कढई घ्या आणि ती कढई गॅसवर मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यामध्ये तेल घाला.
  • तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला आणि मोहरी तडतडली कि त्यामध्ये लगेच बारीक चिरलेला कांदा घाला आणि तो कांदा मध्यम आचेवर चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
  • मग त्यामध्ये स्वच्छ धुतलेल्या भाज्या घाला आणि त्या तेलामध्ये चांगल्या भाजून थोडावेळ शिजवून घ्या आणि मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, शेंगदाण्याचा कुट, वाटलेले खोबरे आणि कोथिंबीर, मीठ आणि चवीपुरती साखर घाला आणि ते सर्व मिश्रण चांगले एकत्र करा आणि त्यामध्ये थोडे पाणी घालून त्यामधी भाज्या थोड्या मऊ होईपर्यंत झाकण लावून शिजवून घ्या.
  • भोगीची भाजी हि खूप पातळ किंवा रबरबीत बनवायची नसते तर हि सुकी बनवली जाते त्यामुळे यामध्ये आवश्यक तेवढे पाणी घालून भाज्या शिजवून घ्यायच्या.
  • भाजी चांगली शिजून सुकी झाल्यानंतर गॅस बंद करा आणि त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • आपली संक्रांतीची भोगीची भाजी नैवैद्य दाखवण्यासाठी आणि खाण्यासाठी तयार झाली.
  • भोगीची भाजी आपण भाजरी सोबत खावू शकतो.

भोगीची भाजी कश्यासोबत खाल्ली जाते – serving suggestions

भोगीची भाजी हि सामान्यता सर्वजन भाकरी सोबत खातात आणि हि भाजी भाकरी सोबतच छान लागते. आपण हि भाजी ज्वारीच्या भाकरी सोबत किंवा बाजीरीच्या भाकरी सोबत खावू शकतो. भोगीची भाजी आपल्यास कावू वाटली तर ती आपण आधी मधी बनवून चपाती किंवा पांढऱ्या भातासोबत देखील खावू शकतो.

आम्ही दिलेल्या bhogichi bhaji recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर भोगीची भाजी रेसिपी मराठी bhogichi bhaji madhurasrecipe बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bhogichi bhaji recipe in marathi by archana या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि bhogichi bhaji recipe in marathi by madhura माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये recipe of bhogichi bhaji in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!