chandoli national park information in marathi – chandoli abhayaranya information in marathi चांदोली राष्ट्रीय उद्यान माहिती, भारतामध्ये अशी अनेक लोकप्रिय राष्ट्रीय उद्याने आहेत ज्या ठिकाणी आपल्याला अनेक वन्यजीवा प्राणी आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडे पहायला मिळतात आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान हे त्यामधील एक लोकप्रिय राष्ट्रीय उद्यान आहे जे महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आणि हे उद्यान महाराष्ट्र राज्यामध्येच नव्हे तर संपूर्ण भारत देशामधील सर्वात लोकप्रिय उद्यान म्हणून ओळखले जाते.
चांदोली राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यामध्ये आहे आणि हे सांगली या शहरापासून ७५ किलो मीटर अंतरावर आहे आणि हे उद्यान सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांनी वेढलेले आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान हे १९८५ मध्ये वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले होते आणि मार्च २००७ मध्ये या उद्यानाला राष्ट्रीय उद्यान म्हणून मान्यता मिळाली आणि हे राष्ट्रीय उद्यान ३१५ चौरस किलोमीटर परिसरामध्ये पसरलेले आहे.
या अभयारण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी आणि वेगवेगळ्या प्रकारचे आणि जातींचे पक्षी या सर्वांचे एक उत्तम निवासस्थान आहे. या उद्यानाच्या ऐतिहासिक स्थळांच्यामध्ये स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या १७ व्या शतकातील भैरवगड आणि प्रचीतगड किल्ला पाहायला मिळतो.
चांदोली राष्ट्रीय उद्यान हे पुणे या शहरापासून अवघ्या ४ तासाच्या अंतरावर आहे आणि या ठिकाणी आपल्याला ६६ हून अधिक बिबट्या आणि ९ वाघ पाहायला मिळतात आणि तसेच इतर सस्तन प्राणी देखील पाहायला मिळतात.
चांदोली राष्ट्रीय उद्यान माहिती – Chandoli National Park Information in Marathi
उद्यानाचे नाव | चांदोली राष्ट्रीय उद्यान |
स्थापना | १९८५ |
राष्ट्रीय उद्यान म्हणून मान्यता | २००७ |
ठिकाण | महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यामध्ये |
जवळचे शहर | सांगली |
क्षेत्रफळ | ३१५ चौरस किलो मीटर |
वन्यजीव आणि जीवजंतू
चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये २३ सस्तन प्राण्यांच्या प्रजाती आहेत असे म्हटले जाते तसेच उभयचर आणि सरपटनाऱ्या प्राण्यांच्या एकूण २० प्रजाती त्या ठिकाणी आहेत आणि १२२ वेगवेगळ्या पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. सांबर हरण, उंदीर हरण, भारतीय बायसन, वाघ, भालू, भारतीय राक्षस गील्हारी आणि बिबट्या या सारखे प्राणी चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये सामान्य आहेत.
या अभयारण्यामध्ये एकूण १२२ वेगवेगळ्या पक्ष्यांच्या प्रजाती आहेत आणि हे पक्षी पाहण्यासाठी पक्षी निरीक्षक हे वसंत ऋतूमध्ये या अभयारण्याला भेट देण्यासाठी नियोजन करतात कारण या काळामध्ये पक्षी निरीक्षकांना या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी तसेच स्थलांतरित पक्षी देखील पाहायला मिळतात.
वनस्पती
या अभयारण्य हे घनदाट आहे आणि या ठिकाणी अनेक जंगली झाडे आहेत जसे कि पिसा, अंजीर, किजल, कोकम वृक्ष, अनजानी लोखंडी झाड, जमून झाड आणि फणसी झाड या सारखी काही मुख्य वनस्पती या जंगलामध्ये आहेत आणि त्याचबरोबर या जंगलामध्ये आवळा, डेव्हिल फिग आणि आसन लाकूड या सारखी इतर झाडे देखील आहेत.
त्याचबरोबर रानमिरी, तोरण, कडीपत्ता, करवंद, तामलपाटी आणि नारक्या या सारखे झुडूप आणि औषधी वनस्पती आहेत. तसेच या जंगलामध्ये अंजन गवत, काळे भाले गवत, सफेत कुसली गवत या सारखे गवताचे प्रकार आहेत.
चांदोली राष्ट्रीय उद्यानाला भेट देण्याची उत्तम वेळ – best time to visit
चांदोली उद्यान हे एक महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय उद्यान आहे आणि या उद्यानाला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक जात असतात. चांदोली अभयारण्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ हा ऑगस्ट ते फेब्रुवारी हा आहे.
- तुम्ही या ठिकाणाला वर्षभरातील कोणत्याही काळामध्ये भेट देवू शकता परंतु जे पक्षी प्रेमी आहेत त्यांनी वसंत ऋतूमध्ये भेट दिली तर उत्तम ठरेल.
- चांदोली राष्ट्रीय उद्यान हे १९८५ मध्ये वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले होते.
- सांबर हरण, उंदीर हरण, भारतीय बायसन, वाघ, भालू, भारतीय राक्षस गील्हारी आणि बिबट्या या सारखे प्राणी चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये सामान्य आहेत.
- चांदोली राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यामध्ये आहे
- हे उद्यान सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांनी वेढलेले आहे.
चांदोली राष्ट्रीय उद्यानाला भेट देण्यासाठी कसे जायचे – how to reach
रस्तामार्ग – by road
चांदोली हे मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांशी चांगले जोडलेले आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही वरील शहरातून बस पकडून किंवा स्वताची गाडी घेवून चांदोली राष्ट्रीय उद्यान पाहण्यासाठी जाऊ शकता.
तसेच चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये किफायतशीर दरामध्ये एमएसआरटीसी द्वारे चालवल्या जाणाऱ्या नियमित बस सेवेचा तुम्ही लाभ घेवू शकता किंवा तुमची खाजगी किंवा सामायिकपने टॅक्सी घेवून देखील तुम्ही हे अभयारण्य पाहण्यासाठी जावू शकता.
हवाईमार्ग / विमानाने – by plane
जर तुम्हाला विमानाने यायचे असल्यास तुम्ही कोल्हापूरच्या विमानतळावर येऊ शकता कारण हे चांदोली उद्यानाजवळचे सर्वात जवळचे विमानतळ आहे किंवा मग तुम्ही इस्लामपूर विमानतळावर उतरू शकता कारण हे देखील या उद्यानापासून ३० किलो मीटर अंतरावर आहे आणि तेथून तुम्ही टॅक्सी किंवा बस पकडून चांदोली पर्यंत जावू शकता.
रेल्वेमार्ग – by railway
जर तुम्हाला रेल्वेने यायचे असल्यास तुम्ही सांगली रेल्वे स्थानकावर उतरू शकता कारण हे या ठिकाणापासून सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे किंवा तुम्ही कोल्हापूरमध्ये देखील रेल्वेने येऊ शकता आणि मग तेथून टॅक्सी किंवा बस पकडून चांदोली पर्यंत जावू शकता.
आम्ही दिलेल्या chandoli national park information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर चांदोली राष्ट्रीय उद्यान माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या chandoli abhayaranya information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about chandoli national park in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट