मी संशोधक झालो तर निबंध मराठी – If I Am a Scientist Essay in Marathi
If I Were A Scientist Essay In Marathi
जर मी शास्त्रज्ञ झालो तर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये मी संशोधन करीन जसे कि शेती किंवा कृषी क्षेत्र, तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, आयुर्वेद आणि औषध क्षेत्र, अभियांत्रिकी क्षेत्र या सारख्या अनेक क्षेत्रामध्ये मी काम करीन आणि आणि प्रगती करण्याचा प्रयत्न करेन. जर मी एक शास्त्रज्ञ म्हणून वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करून अनेक मोठ्या मोठ्या रोगांच्यावर उपचार कसे करायचे या बद्दल शोध लावेन त्यामुळे रोगांच्यावर उपचार करणे सोपे होईल.
मोठ मोठे रोग म्हणजे कॅन्सर, एड्स. कोरोना, प्लेग यासारख्या रोगांच्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करीन त्याचबरोबर इतर आजारान्च्यावर देखील कसे उपचार करायचे शोधेन जेणे करून ते उपाय केल्यामुळे आजार थोडे कमी होतील. तसेच एक महत्वाची बाबा म्हणजे जर मी शास्त्रज्ञ असतो तर अनु आणि अणुउर्जा या सारख्या गोष्टींचा उपयोग हा युध्दासाठी किंवा लोकांचा नाश किंवा एकाद्या देशाचा नाश करण्यासाठी करू नका तर त्याचा वापर हा जगामध्ये असणाऱ्या लोकांच्या कल्याणासाठी करा.
त्याचबरोबर जर मी शास्त्रज्ञ झालो तर अनेक वेगवेगळ्या प्ताकाराचे बदल घडवेन, मी सामान्य माणूस असल्यामुळे मला वाटते कि घरामध्ये अनेक वस्तू असाव्यात जेणेकरून कोणतेही काम सोपे आणि कमी वेळेमध्ये होईल आणि त्याच्यासाठी अनेक वेगवेगळय प्रकारची उपकरणे मी तयार करण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून घरातील कामे सोपी आणि लवकर होतील.
उदाहरणार्थ आपण आपली कामे लवकर होण्यासाठी अनेक उपकरणे वापरतो जसे कि फ्रीज, वॉशिंग मशीन, व्हॅक्युम क्लिनर यासारखे अनेक शोध आहेत जे आपल्या घरातील कामे सोपी आणि लवकर करतात. जर मी शास्त्रज्ञ झालो तर मी माझी एक संशोधन संस्था स्थापन करेन ज्यामुळे मला त्या संस्थेमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन करतात येईल तसेच लोकांच्या किंवा तरुणांच्या मनामध्ये विज्ञानाविषयी जागृकता वाढवण्यासाठी अनेक प्रकारच्या विज्ञानाविषयक सभा आणि वेगवेगळ्या प्रकारची विज्ञान प्रदर्शने भरवण्याचा प्रयत्न करेन आणि त्या प्रदर्शनामध्ये अनेक तरुणांना भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करीन तसेच लोकांना विज्ञानाचे आपल्या जीवनामध्ये किती महत्व आहे.
याबद्दल पटवून सांगण्याचा प्रयत्न करेन. आपण जर आपल्या आजूबाजूला पाहिले तर रस्त्यावर मोठ्या वेगाने वाहने पळत असतात आणि हि वाहने पळण्यासाठी पेट्रोल आणि दिसेल लागते पण सध्याची परिस्थिती पाहिली तर सध्या पेट्रोल आणि दिसेल या नैसर्गिक इंधनांची कमतरता भासत आहे तसेच या प्रकारच्या इंधनाच्या किंमती देखील खूप वाढल्या आहेत त्यामुळे मी पेट्रोल न वापरता चालणाऱ्या गाड्या शोधण्याचा प्रयत्न करेन.
आपल्या सर्वांना माहित आहे कि पृथ्वी हि चारी बाजूंनी पाण्याने व्यापली आहे पण त्यामध्ये ९७ टक्के पाणी हे समुद्राचे आहे आणि राहिलेले ३ टक्के पाणी हे गोडे पाणी आहे जे नदी, तलाव, विहिरी आणि स्त्रोत्रापासून मिळते आणि हे गोडे पाणी आपण पिण्यासाठी तसेच इतर कारणांच्यासाठी वापरतो. समुद्राचे ९७ टक्के पाणी असले तरी ते पिण्यायोग्य किंवा वापरण्यायोग्य नसते कारण हे पाणी खारे असते.
पृथ्वीवर गोड्या पाण्याची कमतरता भासत आहे त्यामुळे मी असा प्रयत्न देखील करेन कि समुद्राचे पाणी स्वच्छ आणि मीठरहित कसे करायचे त्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य बनेल आणि पाण्याची कमतरता भासणार नाही. त्याच बरोबर मी एक ग्रामीण भागामध्ये राहणारा असल्यामुळे मला माहित आहे कि शेतकऱ्यांना शेतामध्ये पिक अनानाण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागते प्रथम शेतीची मशागत करावी लागते.
मग त्यानंतर त्यामध्ये बियांची पेरणी करावी लागते मग त्याला खात आणि पाणी देऊन ते चांगले पिकवावे लागते आणि पिक चांगले आले कि ते काढावे लागते अश्या प्रकारे कष्ट करावे लागते त्यामुळे मी जर शास्त्रज्ञ असतो तर मी शेतीसाठी लागणारी अनेक मशिने तयार केली असती ज्यामुळे शेतीतील कामे लवकर होतील. अश्या प्रकारे जर मी शास्त्रज्ञ असतो तर वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावालो असतो आणि देशाच्या तसेच जगाच्या संशोधनामध्ये भर पाडली असती.
आम्ही दिलेल्या if i am a scientist essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर मी संशोधक झालो तर निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या If I Were A Scientist Essay In Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट