Mera Bharat Mahan Essay in Marathi माझा भारत देश महान निबंध चला तर मित्रांनो आज आपण या लेखामध्ये माझा भारत महान या विषयावर निबंध लिहिणार आहोत. आम्हाला खूप आनंद आणि अभिमान वाटतो कि आम्ही भारतासारख्या एका संस्कृती प्रधान, पवित्र आणि अनेक शूरवीर होवून गेलेल्या देशामध्ये जन्माला आलो. भारत हा देश असा देश आहे जो संपूर्ण जगामध्ये एक चांगली संस्कृती म्हणून ओळखला जातो. माझा भारत देश परंपरा, शूरवीरता, संस्कृती, पावित्र्यता या सर्व गोष्टींच्यामध्ये आपले विशेषता जपतो म्हणून माझ्या देशाला महान देश म्हंटले आहे. कारण आपल्याला देशामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी नाही आणि आपल्या देशामध्ये सर्व लोक हे एकमेकांना समाजावून घेतात आणि अनेक जातीच्या लोकांच्या बरोबर मिळून मिसळून वागतात तसेच आनंदी राहतात.
माझ्या देशामध्ये कायदे आणि सुविधा चांगल्या आहेत, माझ्या देशाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान सुधारलेले आहे, माझा देश कृषी प्रधान देश आहे, माझा देश देशाची संस्कृती आणि परंपरा जपतो, माझा देश शूरवीरांनी जन्मभूमी म्हणून ओळखले जाते आणि अश्या प्रकारे मला वाटते कि माझा देश हा वेगवेगळ्या कारणासाठी खूप महान आहे.
माझा भारत देश महान निबंध – Mera Bharat Mahan Essay in Marathi
Bharat Desh Mahan Nibandh Marathi
भारत या देश संस्कृती प्रधान देश म्हणून ओळखला जाण्याचे कारण भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारे संस्कृती जपली जाते जसे कि भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सन साजरे केले जातात जसे कि गणेश चतुर्थी, दिवाळी, दसरा, पाडवा, रंगपंचमी, पोंगल, लोहरी, ईद, नागपंचमी यासारखे अनेक सन साजरे केले जातात आणि हे सन सर्व धर्माचे तसेच जातीचे लोक एकत्र येवून करतात तसेच भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या भाष्या बोलल्या जातात.
आणि जर एकाद्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीची भाषा समाजात नसेल तर तो त्या पुढच्या व्यक्तीला दुसरी भाषा म्हणजेच भारतामध्ये सर्व ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या आणि सर्वांना येणाऱ्या भाष्या म्हणजे इंग्रजी आणि हिंदी भाषा बोलून त्या व्यक्तीला काय म्हणायचे आहे हे समजावून घेतो, तसेच भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कपडे घालण्याची परंपरा आहे म्हणजेच प्रत्येक राज्यातील वस्त्र भूषा हि वेगळीच असते आणि अश्या प्रकारे भारत देश्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे संस्कृती आणि वेगवेगळे सन साजरे करून परंपरा जपली जाते आणि म्हणून मला वाटते माझा देश खूप महान वाटतो.
भारत देशाने विज्ञान, गणित, कला, वास्तुकला, आयुर्वेद आणि महाकाव्य यामध्ये जस जसे दिवस सरतील तशी लक्षणीय प्रगती केली आहे. चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. आपला भारत देश हा जगातील सातव्या क्रमांकावरील देश असून भारत देशाचे ३२,८७,२६३ चौरस किमी इतके आहे. कोणत्याही देशाची महान संस्कृती हि त्या देशामध्ये साजरे केले जाणार्या उत्सवामध्ये आणि सणांच्या मध्ये दिसून येते आणि भारतामध्ये देखील महान संस्कृती हि सणांच्या मार्फत दिसते.
भारतामध्ये दिवाळी (प्रकाशाचा सण), दसरा ( विजयादसमी ), होळी (रंगांचा सण), जन्माष्टमी ( भगवान कृष्णाचा जन्म ), गणेश चतुर्थी, रक्षा बंधन ( राखी ), पोंगल ( तामिळ सण ) ओणम ( केरळचा सण ), महाशिवरात्री ( भगवान शिवाची रात्र ), एकादशी, नागपंचमी या सारखे अनेक सन साजरे केले जातात.
भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि यातून देखील भारताची महानता समजू शकते कारण भारतीय शेतीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतली जातात जसे कि गहू, जोंधळे ( ज्वारी ), वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, फळे, कडधान्ये, उस, शेंगा, भाजी पाला यासारखी अनेक पिके घेतली जातात आणि हि भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विक्रीसाठी पाठवली जातात नाही तर मग हि देशाच्या बाहेर इतर देशांमध्ये देखील पाठवली जातात.
तसेच भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान देखील खूप पुढे गेले आहे कारण भारतामध्ये अनेक महान शास्त्रज्ञ होवून गेले आणि त्यामधील काही म्हणजे ए. पी. जे. अब्दुल कलाम, होमी भाभा, विक्रम साराभाई, चंद्रशेखर व्यंकट रामन, बिरबल सहानी, हरगोविंद खुराना या सारखे अनेक शास्त्रज्ञ होवून गेले तसेच भारतामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाने अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केली जसे कि भारताने काही दिवसापूर्वी मंगळ ग्रहावर यान सोडले आहे तसेच चंद्रावर देखील सोडले आहे.
तसेच बीजगणित, त्रिकोणमिती आणि कॅल्क्युलस याचा उगम भारतामध्ये झाला आहे त्याचबरोबर भारतामध्ये आयुर्वेद ही मानवजातीला ज्ञात असलेली सर्वात जुनी औषधी शाळा आहे आणि बुध्दीबळ या खेळाचा शोध देखील भारतामध्ये लागलाआणि अशा प्रकारे वेगवेगळे शोध भारतामध्ये लागले.
भारता हा देश जगातील सातवा सर्वात मोठा देश आहे आणि सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही अवलंबली जाते म्हणून या देशाला लोकशाही प्रधान देश मानले जाते. भारतामध्ये अनेक जातीचे आणि धर्माचे लोक राहतात जसे कि हिंदु, बौद्ध, जैन, इस्लाम, शीख, ख्रिश्चन हे भारतातील मुख्य धर्म आहेत म्हणजेच भारत देशामध्ये सर्व धर्माचे बांधव अगदी आनंदाने राहतात म्हणजेच हे सर्व धर्म आणि संस्कृती एकोपा आणि शांततेत राहतात.
तसेच भारतामध्ये पूर्वीच्या काळी अनेक घटना घडून गेल्या जसे कि रामायण, महाभारत आणि या घटनांच्यावर महाकाव्य लिहिण्यात आली तसेच अनेक जुने आणि पारंपारिक ग्रंथ आपल्या भारतामध्ये आहेत तसेच वेद (वैदिक), कालिदास, शकुंतला, चाणक्य अर्थशास्त्र यासारखी अनेक संस्कृत मध्ये लिहिलेली साहित्य आहेत.
भारत देश हा महान पुरुषांचा महान देश म्हणून ओळखला जातो कारण खूप पूर्वीच्या काळी भारताला अनेक चांगले राजे – महाराजे लाभले जसे कि छत्रपती शिवाजी महाराज. तसेच ज्यावेळी आपल्या देशावर इंग्रजांचे / ब्रिटीशांचे राज्य होते त्यावेळी त्यांच्या सत्तेपासून देशाला मुक्त करण्यासाठी आणि स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक लोकांनी लढा दिला त्याचबरोबर काही लोक शहीद देखील झाले.
जे लोक स्वातंत्र्य साठी लढा दिला किंवा शहीद झाले ते म्हणजे भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव तसेच सरदार वल्लभभाई पटेल, चंद्रशेखर आझाद, बाल गंगाधर टिळक, लाल लजपतराय या सारख्या अनेक लोकांनी स्वातंत्र्य साठी लढा दिला आणि आपल्या देशाला १५ ऑगस्ट १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळवून दिले.
अश्या प्रकारे भारतामध्ये महान नेते, महान शास्त्रज्ञ, महान समाज सुधारक किंवा कार्यकर्ते, महान प्राचीन ग्रंथ आणि महान संस्कृती आणि म्हणूनच मला म्हणावेसे वाटते कि माझा भारत देश खूप महान आहे.
आम्ही दिलेल्या mera bharat mahan essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर माझा भारत देश महान निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bharat desh mahan nibandh marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट