Jatra Essay in marathi माझ्या गावाची जत्रा मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये जत्रा या विषयावर निबंध लिहिणार आहोत. जत्रा हि एक सणासारखी भावना देणारा एका गावातील कार्यक्रम असतो म्हणजेच जत्रा हि कोणत्याही गावातील ग्रामदेवतेचा वर्षातून एकदा कार्यक्रम असतो त्यामध्ये वेगवेगळे पालखीचे आणि वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम असतात तसेच मंदिराच्या भोवती अनेक खाण्याची, खेळण्यांची दुकाने येतात आणि मोठ मोठे पाळणे देखील येतात. चला तर मग जत्रा या विषयावर निबंध कसा लिहायचा ते पाहूयात.
जरी आम्ही शहरामध्ये राहत असलो तरी आमचे मूळ गाव हे ग्रामीण भागामध्ये आहे आणि ग्रामीण भागामध्ये दरवर्षी प्रत्येक गावामध्ये ग्रामदेवतेची यात्रा भरते. तसेच आमच्या गावामध्ये देखील लक्ष्मीदेवीची यात्रा भरते. आमची यात्रा एप्रिल – मे दरम्यान आमची यात्रा असते आणि त्यावेळी आम्हाला सुट्टी असते त्यामुळे आम्ही गावाकडे आलेलो असतो.
आमच्या गावची जत्रा निबंध – Jatra Essay in marathi
मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध – Mi Pahileli Jatra Essay in Marathi
आमच्या गावाची यात्रा असल्यामुळे आम्हाला खूप उत्साही वाटते आणि आम्ही यात्रेच्या अगोदर पंधरा ते आठ दिवस सर्व घरातील स्वच्छता करून घेतो. जत्रेच्या अगोदर पंधरा दिवस जत्रा कमिटी आणि गावातील लोक मिळून लक्ष्मीदेवीच्या मंदिरामध्ये स्वच्छता करतात तसेच मंदिर पूर्णपणे धुवून काढतात तसेच मूर्ती देखील स्वच्छ करतात आणि मंदिराच्या सभोवतालचा परिसर देखील स्वच्छ करतात.
कारण जत्रेमध्ये मंदिराच्या बाजूला अनेक दुकाने येतात. जस जशी यात्रेचा दिवस जवळ येईल तसतशी गावातील गर्दी वाढते म्हणजेच गावातून नोकरीसाठी गेलेले लोक गावामध्ये येतात तसेच प्रत्येकाच्या घरामध्ये पाहुणे येतात अश्या प्रकारे गावामध्ये ल्प्कांची गर्दी होते. जत्रेच्या आधी दोन दिवस पालखी सजवली जाते तसेच मंदिर देखील फुलांनी आणि लाईटिंगच्या रोशनाईने मंदिर सजवले जाते.
त्यामुळे मंदिर संध्याकाळी खूप आकर्षक दिसते तसेच लक्ष्मीला देखील नवीन साडी, मुकुट, फुलांचा गजरा आणि दागिन्यांनी नटवले जाते. यात्रेच्या अगोदर दोन दिवस पालखीची गावातून मिरवणूक काढली जाते आणि देवीच्या पालखीची मिरवणूक हि डोल ताश्यांच्या गजरात काढली जाते आणि आम्ही रोज पालखीला पाणी घालून नमस्कार करतो.
तसेच यात्रेमध्ये देखील दोन दिवस गावातून पालखीची मिरवणूक काढली जाते. यात्रेच्या पहिल्या दिवशी मदिराभोवती खूप गजबज असते आणि पहिल्या दिवशी गावातील लोक तसेच बायका घरी पुरणपोळीचा नैवैद्य बनवून त्या मंदिरामध्ये दाखवण्यासाठी येतात तसेच अनेक लोक लक्ष्मीच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे पहिल्या दिवशी सकाळी मंदिरामध्ये खूप गर्दी असते आणि विशेष म्हणजेच जत्रेमध्ये पालखी सोहळा हा बघण्यासारखा असतो.
आमच्या जत्रे मध्ये वेगवेगळ्या प्रकारची खेळण्यांची दुकाने तसेच, खाण्याच्या पदार्थांची दुकाने, मिठाईची दुकाने पाळणे येतात. पाणीपुरी, भेळचे गाडे, सामोसा, आईस्क्रीम यासारखी अनेक दुकाने येतात तसेच वेगवेगळ्या मिठाईची दुकाने देखील येतात आणि आम्ही आमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना जत्रेचा प्रसाद म्हणून एक एक मिठाईचे बॉक्स देतो.
तसेच आमच्या जत्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची खेळण्यांची दुकाने तसेच मुलींचे वेगवेगळे मेकअपचे सामान येते आणि जत्रेमध्ये ते खरेदी करण्यासाठी मुलींची, मुलांची, बायकांची खूप गर्दी असते आणि लहान मुले तर मला ट्रॅक्टर पाहिजे, फुगा पाहिजे, म्हणून हट्ट करतात तसेच आमच्या जत्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे येतात.
जसे कि आकाश पाळणा, तिरका पाळणा, ब्रेक डान्स आणि इतर अनेक पाळणे येतात आणि आम्ही प्रत्येक पाळण्यामध्ये बसण्याचा आनंद घेतो. त्याचबरोबर आमच्या जत्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गेम देखील येतात त्यामधील आपण काही पाहू शकतो तर काही खेळू शकतो. जत्रेमध्ये येणारे गेम म्हणजे बंदूक ने शुटींग करणे, रिंग बरोबर त्या वस्तूवर मारणे, नेम धरून फुगे फोडणे तसेच भिंतीवर बाईकस्वार कर्तब करत असतात.
तसेच आम्ही मौत का कुवा या सारखे खेळ देखील पाहतो. जत्रेमध्ये हे सर्व पाहण्यासाठी खूप आकर्षक वाटते आणि आम्ही जत्रेचा आनंद घेण्यासाठी रात्रीच घरातील मंडळीच्या सोबत किंवा मित्र मैत्रिणींच्या सोबत फिरायला जातो आणि मग प्रथम देवीचे आणि पालखीचे दर्शन घेवून मग आम्ही यात्रेमध्ये आलेली दुकानांच्या घरातील लोकांच्यासाठी वेगवेगळ्या वस्तू खरेदी करतो तसेच मग खाण्याच्या दुकानामध्ये ज्याला जे आवडते ते खातो जसे कि पाणीपुरी, शेवपुरी, सामोसा, भेळ यासारखे खायला खातो.
आणि जत्रेमध्ये आलेल्या पाळण्यामध्ये बसतो आम्ही जत्रेतील सर्व पाळण्यामध्ये बसतो आणि आमची पहिली पसंती हि आकाश पाळणा, तिरका पाळणा, ब्रेक डान्स यासारख्या पाळण्यामध्ये बसतो मग नेम धरून फुगे फोडणे हा आमचा आवडता यात्रातील गेम आहे आणि हा दरवर्षी आम्ही खेळतोच अश्या प्रकारे आम्ही रात्री ११ ते १२ पर्यंत यात्रेमध्ये फिरतो आणि मग कंटाळून घरी जातो.
पहिल्या दिवशी शक्यतो आमच्या घरी जेवण्यासाठी कोणी पाहुणे येत नाहीत तर ते दुसऱ्या दिवशी येतात आणि त्यादिवशी आमच्या घरी खूप गजबज असते कारण त्या दिवशी आमचे घर पाहुण्यांनी भरलेले असते आणि आम्ही पाहुण्यांच्या साठी श्रीखंड, कुर्मा, मसाले भात, पापड आणि कोशिंबीर यासारखे पदार्थ बनवतो. दुसऱ्या दिवशी जर घरी कोणी पाहुणे राहिले तर त्यांच्या सोबत देखील आम्ही जत्रेमध्ये जातो आणि त्याच्या सोबत परत जत्रा फिरतो.
तसेच जत्रेच्या दोन दिवसाच्या काळामध्ये आमच्या गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक तसेच मनोरंजक कार्यक्रम देखील ठेवले जातात आणि हे कार्यक्रम मंदिराच्या आवारामध्ये केले जातात. यात्रेच्या आधल्या दिवशी देवीच्या जागर असतो आणि त्या जागराच्या निमित्ताने त्यादिवशी कीर्तन असते तसेच जत्रेच्या पहिल्या दिवशी भजन त्याचबरोबर इतर काही धार्मिक कार्यकम देखील असतात.
तसेच जत्रेमध्ये कुस्तीचे मैदान देखीलबनवलेले असते कारण यात्रेमध्ये कुस्त्या देखील आयोजित केलेल्या असतात आणि सर्व पुरुष मंडळी हे पाहण्यासाठी गर्दी करतात. तसेच जत्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी बैलगाडी शर्यत देखील असते आणि या शर्यती मध्ये जी बैल जोडी जिंकेल त्या बैल मालकाला बक्षीस दिले जाते.
तसेच त्या बैलजोडीची ढोल ताश्याच्या गजरात गावातून मिरवनूक काढली जाते. तसेच जत्रेच्या शेवटच्या दिवशी कोणत्यातरी नाटकाच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन केलेले असते. यात्रा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दुकाने आणि पाळणे असतात परंतु संध्याकाळी हळू हळू यात्रेतील दुकानांची गर्दी कमी होते तसेच पाहुणे देखील आपल्या गावी परत जातात आणि अश्या प्रकारे भरलेली यात्रा हळू हळू कमी होते.
पण हा दरवर्षी भरणाऱ्या यात्रेचा आनंद वेगळाच असतो आणि यातर जशी जवळ येते तेव्हा अवतीभवती उत्साही वातावरण निर्माण झालेले असते.
आम्ही दिलेल्या jatra essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर आमच्या गावची जत्रा निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mi pahileli jatra essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि jatra festival essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Aamchya Gavchi Jatra Marathi Nibandh Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट