morachi chincholi information in marathi मोराची चिंचोली पर्यटन स्थळ, अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारची पर्यटन स्थळे किंवा निसर्गरम्य ठिकाणे पाहण्याचे कुतूहल असते आणि तसेच पुणे शहरामध्ये असणाऱ्या पर्यटकांच्यासाठी पाहता येणारे एक पर्यटन स्थळ किंवा निसर्गरम्य ठिकाण म्हणजे मोराची चिंचोली आणि आज आपण या लेखामध्ये मोराची चिंचोली या स्थळाविषयी माहिती घेणार आहोत. मोराची चिंचोली हे एक असे ठिकाण आहे. ज्या ठिकाणी एक छोटेसे गाव आहे.
आणि त्या गावामध्ये अनेक चिंचेच्या आणि इतर झाडीने वेढलेले आहे आणि त्या ठिकाणी आपल्या खूप मोर देखील पाहायला मिळतात आणि या ठिकाणी चिंचेची झाडे आणि मोर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या ठिकाणाला मोराची चिंचोली असे नाव पडले आहे आणि हे गाव पुणे आणि अहमदनगर रस्त्यावर शिरूर या गावाजवळ आहे आणि हे पुणे शहरातून ५५ किलो मीटर अंतरावर आहे तर अष्टविनायकमधील रांजणगावचा गणपतीपासून २२ ते २३ किलो मीटर अंतरावर आहे.
मोराची चिंचोली हे ठिकाण एक दिवसीय सहलीसाठी एक चांगले ठिकाण आहे कारण आपल्या त्या ठिकाणी मोर आणि हिरवळ परिसर तर पाहायला मिळतोच परंतु आपल्याला त्या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी निरीक्षन, ग्रामीण मैदानी खेळ, लहान मुलांच्यासाठी चिल्ड्रन पार्क, नर्सरी, बैल गाडी सवारी, कॅम्पिंग आणि तंबू सुविधा, हुरडा पार्टी, पपेट शो, मॅजिक शो आणि पशुधन या सारखे अनेक उपक्रम त्या ठिकाणी करायला मिळतात.
चिंचोली मोराची या ठिकाणी मोराला खूप महत्व आहे कारण तो देशाचा राष्ट्रीय पक्षी तर आहेच आणि मोर हा पक्षी त्या ठिकाणी पूजनीय देखील आहे. जर काही व्यक्तीना ग्रामीण भागाचा खरा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही एकदा तरी मोराची चिंचोली या ठिकाणाला भेट द्या.
मोराची चिंचोली पर्यटन स्थळ – Morachi Chincholi Information in Marathi
मोराची चिंचोली हे एक छोटेसे गाव आहे जे गर्द झाडीने व्यापले आहे आणि त्या ठिकाणी चिंचेची झाले मोठ्या प्रमाणात आहेत तसेच त्या ठिकाणी खूप मोर देखील पाहायला मिळतात आणि अश्या दोन कारणांच्यामुळे या ठिकाणाला मोराची चिंचोली असे नाव पडले आहे.
जर काही निसर्गप्रेमींना एक दिवसीय सहल करायची असल्यास मोराची चिंचोली हे ठिकाण त्यांच्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे आणि हे पुणे शहरापासून ५५ किलो मीटर अंतरावर आहे.
या ठिकाणी पक्षी निरीक्षन, ग्रामीण मैदानी खेळ, लहान मुलांच्यासाठी चिल्ड्रन पार्क, नर्सरी, बैल गाडी सवारी, कॅम्पिंग आणि तंबू सुविधा, हुरडा पार्टी, पपेट शो, मॅजिक शो आणि पशुधन या सारख्या ग्रामीण उपक्रमांचा अनुभव आपण घेवू शकतो. मोराची चिंचोली या ठिकाणाला मयूर नाग म्हणून देखील ओळखले जाते आणि या ठिकाणी सुमारे २५०० मोरे निर्भयपणे फिरतात.
मोराची चिंचोलीमधील क्रियाकलाप – fun activities
या ठिकाणी होणारे सर्व क्रियाकलाप हे प्रदूषण मुक्त आणि ध्वनीमुक्त वातावरणामध्ये होतात आणि सामान्यता आरोग्यदायी आणि आरोग्यास प्रोत्साहन देणारे आहेत.
- योग / ध्यान क्षेत्र : मन शांती मिळवण्यासाठी या ठिकाणी योग आणि ध्यान क्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी पर्यटक ध्यान आणि योग करून आपले मन शांत करू शकतात.
- मैदानी खेळ : या ठिकाणी पर्यटकांना अनेक प्रकारचे ग्रामीण अनुभव घेता येतात तसेच या ठिकाणी मैदानी खेळ खेळण्यासाठी देखील मैदाने आहेत.
- फळबाग : मोराची चिंचोली हे अनेक ग्रामीण अनुभवांनी भरलेले आहे आणि या ठिकाणी आपल्याला फळांची झाडे देखील पाहायला मिळतात आणि या ठिकाणी केळी, आंबा आणि सफरचंद या सारख्या फळांचा समावेश आपल्याला पाहायला मिळते.
- कॅम्पिंग आणि तंबू सुविधा : या ठिकाणी कॅम्पिंग आणि तंबू सुविधा देखील आहे आणि तुम्हाला जर घराबाहेर राहण्याचा अनुभव अनुभवायचा असेल तर तुम्ही तंबू मध्ये राहून अनुभवू शकता.
- शेती अवजारांचे संग्रहालय : मोराची चिंचोली या ठिकाणी आपल्या शेतामधील वापरल्या जाणाऱ्या अवजारांचा संग्रह करून ठेवला आणि शेती अवजारे त्यांचे विविध उपयोग समजून घेण्यासाठी प्रदर्शित केले जातात.
- शेतातील सवारी : या ठिकाणी ग्रामीण भागातील अनेक सवारी देखील घेता येते म्हणजेच या ठिकाणी बैलगाडी, ट्रॅक्टर, उंट आणि घोडा या सारख्या ग्रामीण वाहतुकींचा प्रथम अनुभव घेता येतो.
- ग्रामीण खेळ : मोराची चिंचोली या ठिकाणी आपल्याला ग्रामीण खेळांचा अनुभव देखील येतो जसे कि संगमरवरी एक फेरी खेळ, गिली दांडा, गोट्यांचा खेळ आणि इतर ग्रामीण खेळ ज्या बद्दल तुम्ही फक्त ऐकले असेल किंवा पुस्तकामध्ये वाचले असेल.
- हुरडा पार्टी : हुरडा हि महाराष्ट्राची खासियत आहे आणि यामध्ये भाजलेल्या ज्वारीच्या चविचा संपूर्ण गोडवा चाखता येतो आणि हा एक हंगामी क्रियाकलाप आहे आणि हा अनुभव जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला घेता येऊ शकतो.
- कुकुटपालन : या ठिकाणी तुम्हाला कुकुटपालन देखील पाहता येते.
- नर्सरी : या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फुले असणारी नर्सरी देखील पाहता येते.
- पशुपालन : या ठिकाणी पशुपालन देखील केले जाते आणि या ठिकाणी आपल्याला मेंढ्या, शेळ्या, गुरेढोरे आणि गायी यांचे दुध कसे काढले जाते ते पाहता येते.
- कंदील रात्र : जर तुम्ही रात्री या ठिकाणी वस्ती राहिला तर तुम्हाला कंदिलच्या मंद दिव्याखाली ग्रामीण संध्याकाळचा आनंद हा शांततेत घेता येतो.
आम्ही दिलेल्या morachi chincholi information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर मोराची चिंचोली पर्यटन स्थळ माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या morachi chincholi pune या morachi chincholi address article मध्ये update करू, मित्रांनो हि information about morachi chincholi in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट