त्रिकोणासन मराठी माहिती Trikonasana Information in Marathi

trikonasana information in marathi त्रिकोणासन मराठी माहिती, सध्याच्या परिस्थितीमध्ये नियमितपणे व्यायाम आणि योग करणे म्हणजे काळाची गरज बनली आहे आणि ज्या लोकांना अनेक आरोग्य समस्या आहेत अश्या लोकांनी नियमितपणे योग आणि व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. योगासनामध्ये अनेक प्रकार अनेक आरोग्य फायदे मिळवण्यासाठी केले जातात जसे कि अन्लोम विन्लोम, प्राणायम, भ्रस्त्रिका, वज्रासन, चक्रासन, पद्मासन, भुजंगासन, गोमुखासन, सूर्यनमस्कार आणि त्रिकोणासन आणि इतर प्रकार. आज आपण या लेखामध्ये त्रिकोणासन या विषयावर संपूर्ण माहिती घेणार आहोत म्हणजे त्रिकोणासन हे आसन काय आहे, आसन कसे करावे, आसनाचे फायदे या सारखी सर्व माहिती खाली आपण सविस्तर पाहणार आहोत.

trikonasana information in marathi
trikonasana information in marathi

त्रिकोणासन मराठी माहिती – Trikonasana Information in Marathi

मुद्रेचे नावत्रिकोणासन
प्रकारयोगासन
संस्कृत नावउत्थिता त्रिकोणासन
इंग्रजी नावट्रायअँगल पोझ (triangle pose)
करण्याची प्रकारमध्यम प्रकार
फायदेहे आसन केल्यामुळे पाठीचा कणा सुधारतो तसेच शरीरातील उर्जा मार्ग अवरोधित केला जातो.

त्रिकोणासन मुद्रा माहिती – trikonasana yoga information in marathi

त्रिकोणासन हि एक योग आसन मुद्रा आहे आणि हि मुद्रा कोणत्याही व्यक्तीने केल्यास त्या व्यक्तीचे शरीर हे त्रीकोनासारखे दिसते. या आसनाचे नाव हे त्रिकोणातून आला आहे म्हणजेच तरी म्हणजे तीन कोपरे आणि आसन म्हणजे मुद्रा. या मुद्रेमध्ये शरीराची तीन कोपऱ्यांची मुद्रा हि त्रीकोनासारखी दिसते. त्रिकोणासन हे उभे राहून केले जाणारे आसन आहे.

आणि त्यासाठी शक्ती, संतुलन आणि लवचिकता आवश्यक असते आणि या असणामध्ये दोन्ही हात पाय पसरतात आणि एक पाय ९० अंश कोणामध्ये वळतो. या आसन केल्यामुळे अनेक भौतिक फायद्यांच्या व्यतिरिक्त त्रिकोणासन शरीरातील उर्जा मार्गाला अवरोधित करते असे म्हटले जाते आणि हि मुद्रा योगाच्या शैलीमध्ये सामान्य असलेल्या मुलभूत मुद्रेपैकी एक आहे.

त्रिकोणासन आसनाचा इतिहास – trikonasana history in marathi

त्रिकोणासनाला उत्थिता त्रिकोणासन म्हणून देखील ओळखले जाते आणि या आसनाची सर्वप्रथम ओळख हि योगगुरू टी. कृष्णामाचार्य यांनी १९३४ मध्ये त्यांनी त्यांच्या मकरंता या पुस्तकामध्ये केली होती आणि या अगोदर योगग्रंथामध्ये या मुद्रेचा कुठेही संदर्भ आढळलेला दिसून येत नाही.

त्रिकोणासन कसे करायचे – trikonasana procedure steps 

त्रिकोणासन हे योगासनातील एक प्रकार आहे आणि हा केल्यानंतर आपल्या शरीराचे तीन कोपरे हे त्रीकोनासारखे दिसतात. या मुद्रेमध्ये तीन पेक्षा जास्त भिन्नता आहे आणि आपण आता खाली हे आसन कसे करायचे ते सविस्तरपणे पाहणार आहोत.

  • सर्वप्रथम तुमच्या दोन्ही पायांच्यामध्ये ३ फुट अंतर ठेवा आणि ताठ उभे रहा आणि व्यक्तीच्या उंचीनुसार दोन्ही पायांच्यामधील अंतर हे योग्यरीत्या समायोजित करता येते.
  • आता तुमचे हात वर करा आणि दोन्ही बाजूंनी क्षैतिज ठेवा जेणेकरून तुमचे हात शरीराशी समांतर दिसतील किंवा असतील.
  • आता उजव्या बाजूला वाकून तुमचा उजवा हा उजव्या पायावर ठेवा आणि तुमचा उजवा गुढघा योग्यरीत्या वाकलेला असू शकतो. आता तुमचा उजवा हात खाली पायापर्यंत सरळ असेल तर तुमचा दावा हात देखील वर सरळ करा म्हणजे तुमचे दोन्ही हात एका सरळ रेषेमध्ये दिसतील. आता तुमचे डोके वळवा आणि आणि डाव्या तळहातावर तुमची दृष्टी निश्चित करा आणि श्वास घ्या जितका वेळ या मुद्रेमध्ये राहणे शक्य आहे तितका वेळ म्हणजे ३ ते ४ सेकंद मुद्रेमध्ये राहण्याचा प्रयत्न करा.
  • या मुद्रेमध्ये तुमचे पाया आणि हात हे सरळ असले पाहिजेच म्हणजेच ते कुठेही वाकलेले नसावे.
  • आता हि मुद्रा सोडा आणि उभ्या स्थितीमध्ये परत या आणि परत मुद्रा करण्याचा प्रयत्न करा.

त्रिकोणासन फायदे – trikonasana benefits in marathi

सध्या व्यायाम आणि योग नियमितपणे करणे हि काळाची गरज बनली आहे आणि आपण जर नियमितपणे योगा आणि व्यायाम केला तर आपल्याला कोणत्याही प्रकारची आरोग्य समस्या उभाव्णार नाही तसेच योग नियमितपणे सराव करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या जीवनशैलीत कायमस्वरूपी सकारात्मक फरक निर्माण करू शकतो. योग ही एक जुनी कला आहे ज्यामध्ये शरीर मनाशी जोडलेले असते. त्रिकोणासन देखील जर आपण नियमित केले तर आपल्या अनेक आरोग्य समस्या दूर होतात आणि आपलेआरोग्य देखील चांगले राहण्यास मदत होते.

  • काही व्यक्तींच्या कमरेवर खूप चरबी असते आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करून देखील चरबी कमी होत नाही अश्या व्यक्तींनी जर नियमितपणे त्रीकोनासनाचा सराव केला तर यामुळे कमरेची चरबी कमी होण्यास मदत होते.
  • या आसनाच्या नियमित सरावाने चयापचन सुधारते आणि त्यामुळे हायपरटेन्शन आणि टाईप २ मधुमेह कमी होण्यास मदत होते
  • सध्या खूप दगदगीचे आणि घाई गडबडीचे जीवन आहे आणि काही व्यक्तींना अनेक कामांच्यामुळे तणाव आणि चिंता येते. अश्या तणावग्रस्त आणि चिंता जर एखाद्या व्यक्तीला कमी करायचे असेल तर अश्या व्यक्तींनी त्रिकोणासन रोज केले पाहिजे कारण त्रिकोणासन केल्यानंतर तणाव कमी होण्यास मदत होते.
  • हे आसन केल्यामुळे कंबरेचे स्नायू, हाताचे स्नायू आणि पायाचे स्नायू यांना ताण मिळतो आणि त्यामुळे ते लवचिक बनण्यास मदत होते.
  • त्याचबरोबर हे आसन पोटाच्या अंतर्गत अवयवांना उत्तेजित करते आणि त्याचे कार्य सुधारण्यास मदत करते.
  • अनेक लोकांना अपचनाची समस्या सतत उद्भवत असते, अश्या व्यक्तींनी जर रोज त्रिकोणासन केले तर त्या व्यक्तींची पचन प्रक्रिया हि सुधारण्यास मदत होते.
  • काही व्यक्तींना पोटदुखीचा देखील त्रास हा सतत जाणवत असतो आणि जर पोटदुखीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी जर हि मुद्रा नियमित केली तर अश्या व्यक्तींची पोटदुखीची समस्या दूर होऊ शकते.
  • त्रिकोणासन केल्यामुळे आपल्या मांडीचा सांधा हा लवचिक बनण्यासाठी मदत होते.
  • या आसनामुळे आपली मान, गुढघा आणि घोट्यांच्या मधील कडकपणा कमी होतो आणि त्या अवयवांच्या मधील लवचिकता वाढण्यासा मदत होते.
  • या आसनाच्या नियमित सरावामुळे जठरा संबधित समस्या दूर होतात तसेच आम्लपित्त होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.

त्रिकोणासन कोणी करू नये

  • पाठदुखीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी हे आसन करू नये.
  • गर्भवती स्त्रियांनी हे आसन डॉक्टरांचा सल्ला घेऊन हे असं करावे.
  • मासिक पाळीच्या काळामध्ये त्रिकोणासन करणे टाळावे.
  • ज्या एखाद्या व्यक्तीची कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झालेली असेल तर अश्या व्यक्तीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन हि मुद्रा करावी.

आम्ही दिलेल्या trikonasana information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर त्रिकोणासन मराठी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about trikonasana in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि trikonasana benefits in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!