Uttapam Recipe in Marathi उत्तपम रेसिपी मराठी उत्तपा ची रेसिपी दक्षिण भारतीय डिश ह्या नाश्त्यासाठी लोकप्रिय आहेत जसे कि उत्तपम , इडली, आप्पे आणि त्याचप्रमाणे उत्तपम हा देखील लोकप्रिय दक्षिण भारतीय नाश्ता आहे. उत्तपम हा पदार्थ आपण तांदूळ आणि डाळ भिजत घालून बनवू शकतो किंवा आपण डोस्याचे जे बॅटर बनवलेले असते त्यापासून देखील आपण उत्तपम बनवू शकतो. उत्तपम बनवताना आपण पीठ जाड गोलाकार गरम तव्यावर पसरवतो आणि त्यावर कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर घाला आणि ते दोन्ही बाजूने तेल सोडून भाजून घ्यायचे असते.
उत्तपम हा नाश्ता अनेक लोकांचा आवडीचा नाश्ता आहे आणि हा नाश्ता हॉटेलमध्ये किंवा घरामध्ये अगदी आवडीने बनवून खातात. उत्तपम हा पदार्थ घरामध्ये बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये बनतो. चला तर आज या लेखामध्ये आपण उत्तपम हि रेसिपी कशी बनवायची याबद्दल पाहूयात.
उत्तपा ची रेसिपी – Uttapam Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | तांदूळ आणि डाळ भिजवून त्याचे बॅटर बनवून झाल्यानंतर तयारीसाठी ९ ते १० मिनिटे लागतात. |
बनण्यासाठी लागणारा वेळ | उत्तपम बनवण्यासाठी १० ते १५ मिनिटे लागतात. |
एकूण लागणारा वेळ | उत्तपम बनवण्यासाठी २५ मिनिटे लागतात. |
पाककला | दक्षिण भारतीय |
बनवण्याची पध्दत | सोपी |
उत्तपम म्हणजे काय ?
उत्तपम हि एक दक्षिण भारतीय डीश आहे लोक नाश्त्यासाठी बनवतात. उत्तपम बनवताना आपण पीठ जाड गोलाकार गरम तव्यावर पसरवतो आणि त्यावर कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर घालून ते दोन्ही बाजूने तेल सोडून भाजून घ्यायचे असते.
- तांदूळ : तांदूळ हा उत्तपम बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यापैकी एक महत्वाचे साहित्य आहे जे आपण ७ ते ८ तास भिजत ठेवले जाते आणि मग ते मिक्सरला फिरवले जाते आणि त्याचे चांगले बॅटर बनवले जाते.
- उडीद डाळ : उडीद डाळ देखील उत्तपम बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य आहे आणि हि उडदाची डाळ देखील तांदळामध्ये भिजत घातली जाते आणि उडदाच्या डाळीमुळे उत्तपम थोडे मऊ आणि हलके बनतात. उडदाची डाळ हि प्रमाणावर घालावी लागते नाही तर प्रमाण कमी जास्ती झाले तर आपला उत्तपम बिघडण्याची शक्यता असते. ३ वाटी तांदूळला १ वाटी उडदाची डाळ असे प्रमाण घालावे लागते.
- इतर मुख्य साहित्य : कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर हे साहित्य देखील उत्तपम बनवण्यासाठी लागणाऱ्या मुख्य साहित्यापैकी एक आहेत.
उत्तपम रेसिपी – rava uttapam recipe in marathi
आपल्या रोज एकसारखा नाश्ता खावून कंटाळा येतो त्यावेळी आपण वेगेवेगळ्या प्रकारचा नाश्ता बनवून खावू शकतो जसे कि इडली, मेदू वडा, मेथी पराठा, पोहे, आप्पे किंवा आलू पराठा असे वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता बनवून खावू शकतो त्यामधील एक उत्तम नाश्त्याचा प्रकार म्हणजे उत्तपम. उत्तपम हा पदार्थ बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि कमी साहित्यामध्ये बनतो.
- नक्की वाचा: झटपटीत नाश्ता रेसिपी
तयारीसाठी लागणारा वेळ | तांदूळ आणि डाळ भिजवून त्याचे बॅटर बनवून झाल्यानंतर तयारीसाठी ९ ते १० मिनिटे लागतात. |
बनण्यासाठी लागणारा वेळ | उत्तपम बनवण्यासाठी १० ते १५ मिनिटे लागतात. |
एकूण लागणारा वेळ | उत्तपम बनवण्यासाठी २५ मिनिटे लागतात. |
पाककला | दक्षिण भारतीय |
बनवण्याची पध्दत | सोपी |
उत्तपम बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते आपल्या घरामध्ये सहजपणे उपलब्द असू शकते त्यामुळे आपल्याला जेंव्हा उत्तपम हवा आहे तेंव्हा उत्तपम बनवून खावू शकतो आणि उत्तपम बनवण्यासाठी तांदूळ, उडदाची डाळ, कांदा, टोमॅटो, आणि हिरवी मिरची हे उत्तपम बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य आहे. आता आपण उत्तपम बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- ३ वाटी तांदूळ.
- १ वाटी उडीद डाळ.
- १/२ चमचा मेथी दाने.
- १ मोठा चमचा पोहे ( मुठभर ).
- १ मोठा चमचा शाबु.
- २ मोठे उभे चिरलेले कांदे.
- २ टोमॅटो ( बारीक चिरलेला ).
- ३ ते ४ हिरवी मिरची ( बारीक चिरलेल्या ).
- १ मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर.
- मीठ ( चवीनुसार ).
- तेल ( आवश्यकतेनुसार ).
वरती जी साहित्याची यादी दिलेली आहे त्या साहित्यापासून घरगुती पध्दतीने उत्तपम कसा बनवावा याबद्दल आता आपण पाहूयात.
- सर्वप्रथम डोश्यासाठी लागणारे तांदूळ आणि सर्व उडदाची डाळ मापून घ्या आणि त्या चांगल्या निवडा.
- त्यानंतर ते स्वच्छ निवडल्यानंतर तांदूळ व डाळ, पोहे आणि मेथी दाने आणि शाबु एका खोल भांड्यामध्ये एकत्र घ्या आणि त्यामध्ये पाणी घालून त्या स्वच्छ धुवून त्यामधील पाणी काढून घ्या.
- मग त्यामध्ये तांदूळ, डाळ, पोहे आणि शाबु पाण्यामध्ये चांगल्या बुडतील असे स्वच्छ पाणी घाला आणि त्यावर झाकण घालून ते मिश्रण ६ ते ७ तास चांगले भिजू द्या.
- ६ ते ७ तासानंतर ते चांगले भिजल्यानंतर त्यातील थोडे थोडे मिश्रण मिक्सर भांड्यामध्ये घालून ते चांगले फिरवून घ्या आणि त्याचे बारीक बॅटर बनवून घ्या आणि हे बॅटर एका हवा बंद डब्यामध्ये झाकून ठेवा.
- हे मिक्सरवर वाटलेले बॅटर ५ ते ६ तास भिजवा त्यामुळे ते चांगले फसफसून येईल.
- ५ ते ६ तासांनी हे पीठ चांगले हलवून मिक्स करून घ्या आणि त्यामध्ये मीठ ( चवीनुसार ) घालून ते बॅटर चांगले एकत्र करून घ्या.
- मग आता गॅसवर मोठ्या आचेवर उत्तपम तवा गरम करण्यासाठी ठेवा एकदा तवा तापला की गॅसची आच मध्यम करा आणि मग उत्तपम बॅटर चमच्याने तव्याच्या मध्यभागी घाला आणि ते चमच्याच्या सहाय्याने गोल फिरवून त्याचा एक जाड गोल उत्तपम बनवून घ्या
- आणि त्यावर टोमॅटो, कांदा, मिरची आणि कोथिंबीर पसरा आणि त्याच्या भोवतीने चमच्याने तेल सोडा आणि ते कुरकुरीत आणि लालसर होईपर्यंत खालची बाजू भाजा आणि कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची घातलेली बाजू देखील खरपूस भाजून घ्या.
- तुमचा उत्तपम खाण्यासाठी तयार झाला.
उत्तपम कश्यासोबत खाल्ला जातो – serving suggestion
- उत्तपम हा आपण गरम गरम सर्व्ह केला जातो आणि हा स्वादिष्ठ पदार्थ खोबऱ्याची चटणी किंवा सांबर सोबत खावू शकतो.
आम्ही दिलेल्या yoga information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर उत्तपम रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या uttapam recipe in marathi madhura या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि uttapam recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये uttapam recipe in marathi video Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट