Aloo Tikki Recipe in Marathi आलू टिक्की रेसिपी नाश्त्यासाठी आपण रोज वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज बनवतो जसे कि पोहे, उपमा, शिरा, इडली, उडीद वडा, डोसा आणि आंबोळी यासारखे अनेक पदार्थ बनवतो परंतु काही वेळा आपण वेगळ्या प्रकारचा नाश्ता बनवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळी आपण नाश्त्यासाठी आलू टिक्की बनवू शकतो कारण आलू टिक्की बनवणे खूप सोपे आहे आणि कमी वेळेमध्ये म्हणजेच २० ते २५ मिनिटामध्ये बनतो आणि विशेष म्हणजेच आपण या टिक्की वापरून रगडा पॅटीस देखील बनवू शकतो. आलू टिक्की बनवताना सर्व प्रथम बटाटे उकडले जातात.
आणि मग ते सोलून मॅश केले जातात आणि मग त्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, मैदा आणि मीठ घालून ते मिक्स केले जाते आणि त्याच्या टिक्की बनवून त्या तेलामध्ये लालसर रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळले जातात आणि टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह केले जातात. आलू टिक्की आपण घरामध्ये खूप सोप्या पध्दतीने आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनते. चला तर आता आपण आलू टिक्की कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
आलू टिक्की रेसिपी – Aloo Tikki Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
आलू टिक्की बनवताना सर्व प्रथम बटाटे उकडले जातात आणि मग ते सोलून मॅश केले जातात आणि मग त्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, मैदा आणि मीठ घालून ते मिक्स केले जाते आणि त्याच्या टिक्की बनवून त्या तेलामध्ये लालसर रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळले जातात.
- बटाटा : बटाटा हा आलू टिक्की बनवण्यासाठी लागणारा महत्वाचा घटक आहे. आलू टिक्की बनवताना बटाटे उकडले जातात आणि त्याच्या साली काढून मॅश करून त्यामध्ये इतर साहित्य घातले जाते आणि त्याच्या टिक्की बनवल्या जातात.
- हिरवी मिरची : आलू टिक्की मध्ये हिरवी मिरची घातल्यामुळे टिक्कीला तिखटपणा येतो.
- तेल : आलू टिक्की तेलामध्ये तळली जाते आणि हि तळण्यासाठी तेल आवश्यक असते.
आलू टिक्की रेसिपी – aloo tikki recipe
आलू टिक्की हि एक भारतीय डिश आहे जी आपण नाश्त्यासाठी बनवू शकतो. आलू टिक्की आपण घरामध्ये खूप सोप्या पध्दतीने आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनते. चला तर आता आपण एकदम सोप्या पध्दतीने बनवता येणारी आलू टिक्की रेसिपी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
- नक्की वाचा: आलू पराठा रेसिपी
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
आलू टिक्की बनवण्यसाठी जे साहित्य लागते ते आपल्या घरामध्ये आधीपासून उपलब्ध असते आणि जर घरामध्ये उपलब्ध नसेल तर आपण ते बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करू शकतो. चला तर मग आलू टिक्की बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- ३ ते ४ मोठे बटाटे ( उकडलेले ).
- २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर.
- २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या.
- मीठ ( चवीनुसार ).
- मैदा किंवा कॉर्णफ्लोवर.
आलू टिक्की बनवणे खूप सोपे आहे आणि हे बनवण्यासाठी मोजकेच साहित्य लागते आणि हि रेसिपी कमी वेळेमध्ये बनते. चला तर आता आपण वर दिलेले साहित्य वापरून आलू टिक्की कशी बनवायची ते पाहूयात.
- पॅटीस बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुवून ते कुकरमध्ये पाणी घालून उकडून घ्या.
- मग बटाटे थोडे गार झाले कि कुकर मधून काढा आणि त्याची साल काढून ते कुस्करून एक मिक्सिंग बाऊलमध्ये घाला आणि त्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, आणि मीठ घाला आणि ते मिक्स करून त्याच्या छोट्या छोट्या टिक्क्या बनवा
- आणि मग ह्या टिक्क्या मैद्याच्या किंवा कॉर्णफ्लोवर च्या पिठामध्ये घोळून घ्या.
- आता गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करा आणि त्यामध्ये टिक्की तळण्यासाठी तेल घाला आणि तेल चांगले गरम झाले कि त्यामध्ये आपण बनवून ठेवलेल्या टिक्की घाला आणि लालसर रंग येईपर्यंत आणि टिक्की कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
- कढईतील तेलामध्ये जितक्या टिक्की मावतील तितक्या टिक्की घालून तळून घ्या म्हणजेच टिक्की २ बॅच मध्ये तळून घ्यावे.
- आलू टिक्की सर्व्ह करण्यासाठी तयार झाली.
आलू टिक्की कश्यासोबत खावी – serving suggestions
- आलू टिक्की आपण सकाळच्या नाश्त्यासाठी बनवतो आणि त्या आपण तश्याच खावू शकतो मग टोमॅटो सॉस, हिरवी चटणी किंवा खोबऱ्याच्या चटणी सोबत खावू शकतो.
टिप्स (Tips)
- आलू टिक्की मध्ये आपण थोडे लाल तिखट आणि गरम मसाला देखील वापरू शकतो
- आलू टिक्की आपण तेलामध्ये तळण्याऐवजी तवा गरम करून त्यावर तेल टाकून मावतील तेवड्या टिक्की घाला आणि त्याला तेल सोडून ते लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्या.
- जर तुम्ही टिक्की तव्यावर भाजणार असाल तर टिक्की दोन्ही बाजूंनी चांगल्या भाजा.
आम्ही दिलेल्या aloo tikki recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर आलू टिक्की रेसिपी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या aloo matar tikki recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि aloo tikki burger recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये aloo tikki chaat recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट